(User Level: User is not logged in.)

मनोरंजन

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • १९८० चे दशक: मुख्य अभिनेत्रींचा प्रवेश आणि लोकसंगीताचा बाज

    १९८० चे दशक हे बॉलिवूडच्या इतिहासातील सर्वात मोठे संक्रमण मानले जाते. या दशकात चित्रपटातील पारंपरिक ‘व्हॅम्प’ किंवा स्वतंत्र डान्सरचे पात्र हळूहळू संपुष्टात आले. याचे मुख्य कारण म्हणजे, चित्रपटाच्या मुख्य नायिकांनी (A-list Heroines) स्वतःच ग्लॅमरस कपडे घालण्यास आणि पडद्यावर मादक व वेगवान गाणी करण्यास सुरुवात केली. त्यामुळे ज्या गाण्यांसाठी पूर्वी हेलन किंवा बिंदू यांना बोलावावे लागायचे, ती गाणी आता मुख्य अभिनेत्री स्वतःच करू लागल्या.

      August 16, 2026


  • “काटेकोर” पुणेकर

    मागे पुण्याच्या बाहेर एका कार्यक्रमाला जायचा योग आला त्यावेळी त्या आयोजकांनी मेनू विषयी मत मागितलं ...त्यावेळी त्यांना दिलेले हे उत्तर...

    मेनू साधारण असा असावा-

    वरण- भात, तूप, मीठ, लिंबू - त्याबरोबर शक्य असल्यास चमचाभर पूरण.

    मसाले भात, पण त्यावर ताज्या ओल्या नारळाचं किसलेलं खोबरं आवश्यक...

    पुऱ्या, अळुची शेंगदाणे-खोबरे घालून केलेली भाजी,

    सुकी बटाटा भाजी, गोड-आंबट आमटी.

    पापड-कुरडई. कोथिंबीर वडी किंवा घोसाळ्याची भजी.

    ओल्या नारळाची कोथिंबीरीची चटणी, काकड़ी मोजक्या प्रमाणात दाण्याचा कूट व दही घातलेली कोशिंबीर.

    चवी पुरतं पंचामृमत.

    गोडात श्रीखंड किंवा बासुंदी.

    मठ्ठा.

    आता काही सूचना....लक्षपूर्वक वाचा..

    आम्ही अंमळ तिखट कमी खातो तेंव्हा भरमसाठ मसाल्याचा मारा नको.

    तेलात आंम्हास पोहावयाचे नाही, तेंव्हा तवंगाचा तलाव नको.

    श्रीखंड असेल तर वाटी चमचा हवाच, उगाच श्रीखंड बचकन पानात वाढू नये...

    आम्ही बोटाने चाटत श्रीखंड खात नाही...श्रीखंडाशी अशी प्रतारणा आम्हास मान्य नाही...

    उगीचच गळेपडू आग्रह नसावा ( विनाकारण आग्रह करून वाढल्यास अपमान करण्यात येईल ) .

    अळुच्या भाजीतील शेंगदाणे आख्खे असावेत, उगाच तुकडे तुकडे टाकू नयेत...

    तसेच खोबरे देखील पाउण इंचा पेक्षा जास्त लांबीचे नको.

    मठ्ठा हा प्रमाणशीर थंड असावा. त्यातील मीठ, साखर, ताक-पाण्याचे प्रमाण, आलं, कोथिंबीर योग्य प्रमाणातच हवी, त्यात मिरचीचे तुकडे घालणार असाल ते 5 ते 6 मी.मी. पेक्षा जास्त लांबीचे नकोत.

    वरणाची डाळ एक-पात्रीच हवी, नाहीतर चव बदलते.

    पापड-कुरडई मरतुकडे नको....त्याच्यातला कुरकुरीतपणा निघुन गेल्यास आमची कुरकुर सुरु होईल...

    गोडात सुधारस ठेवल्यास तो एक तारीच असावा, लिंबू योग्य प्रमाणात असावे.

    ताटातली भजी आणि भाजी ही चमचमीत हवी ...तिखट नको...

    त्यामुळे उगाच गुलाल उधळल्यासारख तिखट त्यात उधळू नये...

    आता पान वाढावयाच्या सूचना -

    पाट मांडून त्यासमोर छान (आटोपशीर) रांगोळी घालावी.. रांगोळी स्पर्धा असल्यासारखे वागू नये.

    पानाच्या डाव्या बाजूला लोटी भांडे ठेवावे...

    पान समोर ठेवून अगदी पुढचा भाग शून्य अंश पकडून मिठ वाढावे आणि

    त्याच्या उणे पाच अंशावर लिंबू अन मग क्रमाने पाच-पाच अंशावर चटणी, पंचामृत, कोशिंबीर, लोणचे
    वाढावे...

    उणे 90 अंशावर पापड़, त्याखाली पूरी वाढावी.

    मध्यभागी भाताची मुद असावी व सगळं वरण भसकन वाढू नये... वरणाचा ओघळ अजिबात येता कामा नये...

    मुदाचा आकार प्रमाणशीर असावा...भसाडा नको...

    वरण-भाता खाली मसाले भात वाढावा.

    मसालाभाताच्या उजव्या बाजुलाच भाजी वाढलेली असावी..

    आणि त्याच्या बरोबर वर आमटीची वाटी असावी.

    उजव्या हाताला वरच्या साइडला 45 अंशावर गोडाची वाटी असावी व त्याच्या वर मठ्ठा वाटी असावी.

    आमटी व भाजी गोडाच्या खाली असावी.

    वर नमूद केलेल्यात काही त्रुटि असल्यास दुरुस्त कराव्यात, उगाच आमच्या चुका आंम्हाला दाखवू नये.

    बस ऐवढेच अपेक्षित आहे. सूचना संपल्या असे समजू नये. प्रत्यक्ष जेवताना असतीलच.

    आपला , ( नम्र वगैरे म्हणून मान खाली घालणे आवश्यक नाही )
    "काटेकोर" पुणेकर

      March 2, 2017


  • बाबला : भारतीय ‘डिस्को दांडिया’चे जनक

    बाबला : भारतीय ‘डिस्को दांडिया’चे जनक

    ‘बाबला ऑर्केस्ट्रा’ने लाईव्ह परफॉर्मन्स, फ्युजन म्युझिक, पारंपरिक संगीताला आधुनिक रूप देण्याच्या आणि स्वतंत्र संगीताच्या (Non-film music) क्षेत्रात निर्माण केलेले स्थान आजही अढळ आणि मार्गदर्शक मानले जाते. आजचे अनेक गरबा किंग, रिदम अरेंजर्स आणि लाईव्ह बँड्स हे बाबला यांनाच आपले आदर्श मानतात. भारतीय चित्रपट संगीताच्या पलीकडे जाऊन जगाला आपल्या तालावर नाचवणारा एक ‘रिदम किंग’ म्हणून बाबला यांचे नाव संगीताच्या इतिहासात नेहमीच सुवर्ण अक्षरांनी लिहिले जाईल.

      August 4, 2026


  • पाऊलखुणा

    जे जे स्कूल ऑफ आर्टस मध्ये असताना मला 1984 ला अंतरराज्य फोटोग्राफी स्पर्धेमध्ये प्रथम पारितोषिक मिळाले. दिल्ली येथे माझी फोटोग्राफी प्रदर्शनासाठी महाराष्ट्र राज्याने खास निवड केली. दिवस होता 28 ऑक्टोबर 1984 प्रदर्शनाचा विषय होता प्रौढ शिक्षा. या प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यासाठी आल्या होत्या त्या वेळेच्या माननीय पंतप्रधान इंदिरा गांधी. त्यावेळी प्रत्येक राज्यातून आलेल्या स्पर्धकांना सन्मानचिन्ह देऊन गौरव केला गेला. त्यात माझा समावेश होता

      June 16, 2026


  • अभिजात संगीत नाटकांकडे

    मला नेहमी वाटायचं की, आपल्याला दोन/ तीन नवीन नाटकं मिळाली. पण आपण अजून आपल्या अभिजात संगीत नाटकांत ( ‘सौभद्र’, ‘संशयकल्लोळ’, ‘शारदा’, ‘मानापमान’ इत्यादी ) भूमिका केल्या नाहीत. त्या आपण करायला हव्यात, पण कशा? त्यावेळी रंगभूमीवर या नाटकांचे प्रयोग विविध कलाकारांच्या संचात होत होते. सर्वांची कामे बसलेलीच होती. छोटा गंधर्व, राम मराठे, प्रसाद सावकार, जयमाला शिलेदार, मा. अनंत दामले, भार्गवराम आचरेकर, नानासाहेब फाटक, मा. दत्ताराम अशी सर्व मंडळी या अभिजात नाटकांतून भूमिका करत होते. त्या नाटकांचे प्रयोग संयुक्त नटसंच किंवा अशाच काहीतरी नावाने केले जात. आम्हाला तालमीशिवाय नाटकाला उभं रहाणं शक्य नव्हतं. तालीम हवी म्हटलं की काम मिळत नसे. त्यांना तयार नट हवे असत.

      June 26, 2026


  • २०१० चे दशक: ‘शीला विरुद्ध मुन्नी’चे युद्ध आणि बेली डान्सची नवी क्रांती

    २०१० चे दशक हे बॉलिवूडमधील आयटम सांग्सच्या इतिहासातील सर्वात मोठे आणि सर्वात स्पर्धात्मक दशक मानले जाते. या दशकात गाण्यांच्या लोकप्रियतेवरून दोन मोठ्या अभिनेत्री आणि चित्रपट निर्मात्यांमध्ये उघड स्पर्धा पाहायला मिळाली.

      August 28, 2026


  • हिंदी चित्रपटसृष्टीतील ‘आयटम साँग्स’

    हिंदी चित्रपटसृष्टीत (बॉलिवूड) ‘आयटम साँग’ हा केवळ गाण्याचा एक प्रकार नसून तो संपूर्ण भारतीय सिनेमाचा एक अत्यंत महत्त्वाचा, मनोरंजक, ग्लॅमरस आणि व्यावसायिकदृष्ट्या सर्वाधिक यशस्वी मानला गेलेला भाग आहे. तांत्रिक किंवा ढोबळ भाषेत सांगायचे तर, ‘आयटम साँग’ म्हणजे चित्रपटाच्या मुख्य कथानकाशी थेट किंवा कोणताही संबंध नसलेले, एक अतिशय वेगवान, तालबद्ध, आकर्षक आणि नृत्याभिमुख गाणे असते. हे गाणे प्रामुख्याने प्रेक्षकांना चित्रपटगृहाकडे आकर्षित करण्यासाठी, बॉक्स ऑफिसवर तिकिटांची विक्री वाढवण्यासाठी आणि चित्रपटाच्या जोरदार प्रसिद्धीसाठी (Promotion) एक हुकमी एक्का म्हणून वापरले जाते.

      August 5, 2026


  • जिंदगी का सफर

    जिंदगी का सफर

    जीवन…..म्हणजे नक्की काय? कुणी जाणलंय?कुणाला कळलंय?सगळंच अतर्क्य! चौऱ्याऐशी दशलक्ष योनीतून एकदाच हा जन्म मिळतो.त्यापासून शोध घ्यावा की बोध? सारंच अनभिज्ञ!अकल्पित! जीवनाचा हा प्रवास की प्रवाह?……हे फक्त “आपले आयुष्य आपण वाहून नेण्यात की वाहवून जाण्यात” पणाला लावतोय,यावर ठरत असतं.गंध उगाळल्याशिवाय पाजळत नाही,हेच खरं!वाट्याला आलेलं आयुष्य कल्याणकारी होण्यासाठी त्यावर मेहनतीचा अखंड अभिषेक केल्याशिवाय पर्याय नाही.त्यातून फलनिष्पत्ती होईल की नाही,हे कर्मावर सोपवावं. निस्वार्थ परोपकारी वाटचालीतून परमार् प्रगट होतो. त्यासाठी लाभार्थी कोण? हे ठरवणंही आपल्या हातात नसतं.

      July 1, 2023


  • न झालेले गुजराती नाटक

    मोहन वाघला नानांनी नवीन नाटक दिलं नाही, पण यादरम्यान मोहन तोंडवळकर यांच्या कलावैभवला मात्र एक नवीन नाटक दिलं. विषय होता सत्यभामा आणि पारिजात. आणि नाव होतं ‘पारिजात फुलला’. ‘शिवाजी मंदिर’ला प्रयोग पहायला गेलो. प्रयोग संपल्यावर नानासाहेबांना भेटायला आत गेलो. इकडची तिकडची बोलणी झाल्यावर कसं काय चाललंय यावर एकमेकांच्या आगामी कार्यक्रमाविषयी बोलणं निघालं.

      July 11, 2026


  • मराठी चित्रपटसृष्टीचे ‘महाखलनायक’ निळू फुले : गाजलेले चित्रपट, अजरामर संवाद

    मराठी रंगभूमी आणि चित्रपटसृष्टीच्या इतिहासात काही अशी नावे आहेत, ज्यांच्याशिवाय हा इतिहास पूर्णच होऊ शकत नाही. या यादीत सर्वात अग्रस्थानी असणारे एक नाव म्हणजे ‘निळू फुले’. भारदस्त आवाज, डोळ्यांतील तीक्ष्ण भाव, चेहऱ्यावरील हुशार आणि धूर्त हावभाव आणि संवादफेकीची अफाट शैली यांच्या जोरावर निळू भाऊंनी तब्बल चार दशके मराठी प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले. त्यांनी पडद्यावर साकारलेल्या खलनायकी भूमिका इतक्या जिवंत असायच्या की, चित्रपटगृहात बसलेला प्रेक्षक त्यांचा तिरस्कार करू लागायचा. हाच त्यांच्या अभिनयाचा सर्वात मोठा विजय होता.

      July 19, 2026