लेखसंग्रह

युद्धसंकटाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदींचे आवाहन

Category:

 

युद्धसंकटाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदींचे आवाहन इंधन बचत, सोन्याची खरेदी कमी करा, ‘वर्क फ्रॉम होम’चा अवलंब करा; परकीय चलन वाचवण्यावर भर

  June 3, 2026


युवा-विश्व

तीन हजार टाके

Category:

 

काही पुस्तके वाचायला हवीत. पुस्तके प्रेरणा देतात. संघर्षात जगायला शिकवतात. संघर्ष माणसाला घडवतं. अपयशाच्या रस्त्यामधूनच एक दिवस यशाचा रस्ता सापडतो. नैराश्याचे ढगसुद्धा काही काळ अवकाश व्यापून राहातात; पण तेसुद्धा कधीतरी बरसतातच आणि बरसल्यावर अंकुर सोबत घेऊनच आसमंत उजळून टाकतात. पुस्तक आदर्शाचा आरसा असतो. आरशात पाहून स्वत:चं मूल्यमापन करायचं असतं. स्वतःची प्रतिमा सुधारायची असते. आरसा केवळ अस्तित्वच दाखवत नाही, तर व्यक्तित्वही दाखवतो. सामान्य व्यक्तीच्या वर्तनातही असामान्य जीवन असतं. आयुष्य निरनिराळे पदर आपल्याला उलगडून दाखवते व आपण घडतो. प्रतिकूल परिस्थितीत इंजिनिअरिंगचे शिक्षण घेतल्यानंतर सुधा मूर्ती यांनी ३००० स्त्रियांचे जटानिर्मूलन केले. त्या देवदासी म्हणून वेश्या व्यवसाय करायच्या. त्या आपण देवाला वाहिलेल्या आहोत म्हणून जटा काढतच नसत. दोनदा अपयश आल्यानंतरही सुधा मूर्ती मागे हटल्या नाहीत. तिसऱ्यांदा त्यांना समजावण्यात यश आले व हळूहळू देवदासींच्या प्रथेवरील देवदासींचा विश्वास उडून सत्य त्यांना कळू लागले.

  June 3, 2026


कथा

कुंपणापलीकडचे आकाश

Category:

 

तो होळीचा दिवस होता. ग्रंथसाहिब दर्शनासाठी ते दोघे मुद्दाम अंबाल्याहून अमृतसरला आले होते. त्यांच्या लग्नाला नुकतेच एक वर्ष झाले होते. पिढीजात कापड व्यवसायातून फुरसत काढून तो फिरण्यासाठी बाहेर पडला होता. होळीनिमित्त सुवर्णमंदिरात विशेष अर्चना केली जाते. होळी हा मोठा व महत्त्वाचा सण मानला जात असल्यामुळे पंकजच्या माँ, पिताजींनी त्यांना अमृतसरला जाण्याचा सल्ला दिला होता. त्यानुसार आदल्या रात्रीच ते दोघे तेथे पोहोचले होते. पंकज आधीही तिथे गेला होता.

  June 3, 2026


युवा-विश्व

मोक्षा रॉय

Category:

 

मोक्षा रॉय यांना जगातील सर्वात तरुण वकील होण्याचा मान नुकताच मिळाला आहे. पुरस्कार मानवी जीवनाला चांगलं जीवन जगण्याची प्रेरणा देतात. पुस्तके वाचून अनेकांनी पुरस्कार मिळवले आहेत; पण पुस्तकांच्यापलीकडे जाऊनही त्याबद्दलही पुरस्कार मिळतात. आपलं भवताल आपल्याला घडवतं, बिघडवतं. आपल्या सभोवतालच्या गोष्टींची दखल घेतली नाही, तर आपलं अस्तित्वच धोक्यात येतं. ग्लोबल वॉर्मिंगमुळे दरडी कोसळणे, पूर येणे या घटना वारंवार घडत आहेत, तरीही सामूहिक जनजागृती होत नाही. मनातली जागृतीच असंख्य जणांना वाचवू शकते. शिक्षणाने मनात जाणीवजागृती निर्माण व्हायला हवी. शिक्षण म्हणजे केवळ पाठांतर करून माहिती लक्षात ठेवणं नाही. आपल्या शिक्षणामुळे आपलं व समाजाचं कल्याण कसं होईल? हा मनात विचार शिक्षणामुळे रुजायला हवा. मूल्यांची रुजवणूक पुस्तकातली मूल्यं पाठ करून होत नाही, तर त्यासंबंधीची जाणीव झाल्याने ती आपल्यात रुजतात.

  June 2, 2026


कथा

एक दिवस

Category:

 

लेडीज जिमपाशी रेणू पोहोचली तेव्हा सकाळचे ७.३० वाजले होते. पार्किंगमध्ये नॅनो पार्क करून ती लगबगीने जिममध्ये शिरली. समोरच सुधा दिसली. “हाय रेणू ! गुडमॉर्निंग, लुकिंग व्हेरी फ्रेश !” सुधाने तिचे स्वागत केले. ‘व्हेरी गुड मॉर्निंग सुधा. आय अॅम ऑल्वेज फ्रेश.’ रेणूचा हसत प्रतिसाद.

  June 2, 2026


लेखसंग्रह

भारतीय ज्ञानाचा खजिना

Category:

 

भारतीय ज्ञानाचा खजिना’ नावाचं प्रशांत पोळ ह्यांनी लिहिलेलं अतिशय महत्वपूर्ण पुस्तक वाचलं. सदर पुस्तकाचं प्रकाशन मा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ह्यांनी केलंय आणि पुस्तकाला मा. मोहन भागवतांची प्रस्तावना आहे. सदर पुस्तकातून मुस्लिम आक्रमक भारतात येण्या आधीच्या संपूर्ण कालखंडात सर्व जगात आपला कसा दबदबा होता, आपण ज्ञानाच्या, संपत्तीच्या आणि समृद्धीच्या बाबतीत जगात कसे सर्वश्रेष्ठ होतो ह्यावर संशोधन करून प्रशांत पोळ ह्यांनी अभ्यासपूर्णपणे मांडलेलं आहे. पुस्तकातून उलगडलेली काही अद्भुत माहिती अशी

  June 1, 2026