मोक्षा रॉय

मोक्षा रॉय यांना जगातील सर्वात तरुण वकील होण्याचा मान नुकताच मिळाला आहे. पुरस्कार मानवी जीवनाला चांगलं जीवन जगण्याची प्रेरणा देतात. पुस्तके वाचून अनेकांनी पुरस्कार मिळवले आहेत; पण पुस्तकांच्यापलीकडे जाऊनही त्याबद्दलही पुरस्कार मिळतात. आपलं भवताल आपल्याला घडवतं, बिघडवतं. आपल्या सभोवतालच्या गोष्टींची दखल घेतली नाही, तर आपलं अस्तित्वच धोक्यात येतं. ग्लोबल वॉर्मिंगमुळे दरडी कोसळणे, पूर येणे या घटना वारंवार घडत आहेत, तरीही सामूहिक जनजागृती होत नाही. मनातली जागृतीच असंख्य जणांना वाचवू शकते. शिक्षणाने मनात जाणीवजागृती निर्माण व्हायला हवी. शिक्षण म्हणजे केवळ पाठांतर करून माहिती लक्षात ठेवणं नाही. आपल्या शिक्षणामुळे आपलं व समाजाचं कल्याण कसं होईल? हा मनात विचार शिक्षणामुळे रुजायला हवा. मूल्यांची रुजवणूक पुस्तकातली मूल्यं पाठ करून होत नाही, तर त्यासंबंधीची जाणीव झाल्याने ती आपल्यात रुजतात.

मन सजग असलं की शिक्षण आपल्यात भिनतं. केवळ पुस्तके न वाचता भवताल वाचलं तर अनेक प्रश्नांची उकल व्हायला वेळ लागत नाही. मलाला युसुफजाई, ग्रेटा थर्न बग प्रमाणे अशाच एका मुलीने आपल्या सभोवतालच्या शैक्षणिक जागरूकतेची चुणूक दाखवली आहे.

प्लास्टिक बंदीला आपल्याकडे अजून गांभीर्याने पाहिलंच जात नाही. जनावरे प्लास्टिक खात आहेत. मायक्रोप्लास्टिक प्रदूषणही समस्या गंभीर बनत आहे. केवळ पशुपक्षी, जलचरमध्ये नव्हे तर मानवी शरीरातही त्याचे अवशेष आढळत आहेत. प्लास्टिक कचऱ्याचे विघटन होत नाही तर सूर्यप्रकाशात दीर्घकाळ राहिल्यास ठिसूळ होऊन त्याचे तुकडे पडतात. नव्या संशोधनानुसार तीस वर्षांत महासागरामध्ये सापडलेल्या पाच लाख कोटी टन प्लास्टिक कचऱ्यापैकी जवळपास अडीच टक्के मायक्रोप्लास्टिकचे कण आढळले आहेत. पाणी, खाद्यपदार्थ तसेच अन्नपदार्थ या सगळ्याच गोष्टीत मायक्रो प्लास्टिकचे प्रदूषण वाढले आहे, याचा प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष परिणाम हवामान बदलावर होत आहे. मार्च २०२२ मध्ये पहिल्यांदा मानवी शरीरात मायक्रो प्लास्टिक असल्याचे स्पष्ट झाले होते. मायक्रो प्लास्टिक श्वासाद्वारे मानवी शरीरात पोहोचते. एक व्यक्ती वर्षभरात ७४ हजार प्लास्टिक कण श्वसनावाटे ओढत असतो. मोक्षाने अनेक राष्ट्रप्रमुखांना पत्र लिहून याचे गांभीर्य कळवले होते. शालेय अभ्यासक्रमात प्रदूषणमुक्ती विषयाचा समावेश करण्याबाबत तिने हे पत्र लिहिले होते.

‘पॉईंट्स ऑफ लाइट पुरस्कार मिळाल्याने मला खूप आनंद झाला आहे. मला आशा आहे की, मुले आणि प्रौढ दोघांनाही हे समजले असेल की ग्रह आणि त्याच्या लोकांची काळजी घेणे आणि दैनंदिन जीवनात लहान बदल करणे हे केवळ काही लोकांसाठी नसावे. हे आपले दात घासण्यासारखे आहे.’

‘आम्ही दात घासतो, त्यांची काळजी घेण्यासाठी आणि वेदना टाळण्यासाठी; त्याचप्रमाणे आपण आपल्या पृथ्वीग्रहाची काळजी आपल्याच सुरक्षेसाठी घ्यायला हवी. हवामान बदल, प्रदूषण, गरिबी आणि असमानता यांसारख्या मोठ्या आव्हानांचा सामना करण्यासाठी आपल्यापैकी प्रत्येकजण आपल्या स्वतःच्या जीवनात, कामात आणि समुदायामध्ये छोट्या छोट्या गोष्टी करू शकतो.’

या प्रयत्नांवरून हे सिद्ध होते की, समाजातील सर्वात लहान मुलांनीही हवामान बदलाशी लढण्यासाठी भूमिका बजावली आहे.

डाउनिंग स्ट्रीटच्या मते, पॉईंट्स ऑफ लाइट अवॉर्ड्स अशा उत्कृष्ट लोकांना मिळतो, ज्यांच्या सेवेमुळे त्यांच्या समुदायांमध्ये फरक पडतो आणि ज्यांची कथा इतरांना त्यांच्या स्वत:च्या समुदायांमध्ये आणि त्यापलीकडे सामाजिक आव्हानांवर नावीन्यपूर्ण निराकरणासाठी प्रेरित करू शकते.

जाणीवजागृती केवळ प्रभातफेरी, फोटोपुरती सीमित असून चालत नाही. थोडे थोडे छोटे बदल करूनच आपल्याला अपेक्षित बदल घडवता येईल.

Author