सूर्य शतकम्
Category:
साहित्य - ललितसंस्कृत साहित्यातील एक वैशिष्ट्यपूर्ण प्रकार म्हणजे शतक काव्य. त्याच्या नावातच त्याचे स्वरूप स्पष्ट होते. शंभर पद्यांची रचना. काही वेळा ही काव्ये नीतिशतकासारखी प्रत्येक श्लोक वेगळा असणारी असतात किंवा काही वेळा एक विशिष्ट विषय घेऊन त्यावर रचना केलेली असते. या दुसऱ्या प्रकारात बसणारे एक सुंदर काव्य म्हणजे मयूर कवी विरचित सूर्य शतकम् ! हे मयूर कवी बाणभट्टाच्या समकालीन होते हे निश्चित.
June 11, 2026