रत्नावली

श्रीहर्ष विरचित रत्नावली हे साहित्यशास्त्राच्या दृष्टीने अत्यंत आदर्श अशा स्वरूपाचे नाटक आहे. विविध साहित्यशास्त्र ग्रंथांमध्ये यातील उदाहरणे वारंवार देण्यात आलेली आहेत यावरून त्याचे स्वरूप लक्षात यावे.



श्रीहर्ष विरचित रत्नावली हे साहित्यशास्त्राच्या दृष्टीने अत्यंत आदर्श अशा स्वरूपाचे नाटक आहे. विविध साहित्यशास्त्र ग्रंथांमध्ये यातील उदाहरणे वारंवार देण्यात आलेली आहेत यावरून त्याचे स्वरूप लक्षात यावे.

महाकवी कालिदासाच्या मालविकाग्निमित्रम् नाटकाचा यावरील प्रभाव सहज पाहता येतो. तर पात्रांची नावे भासांच्या स्वप्रवासदत्तम् मधील आहेत. सिंहल देशाची राजकन्या रत्नावली हिच्या पत्रिकेनुसार जो कोणी तिच्यासोबत विवाह करेल तो सम्राट होणार हे निश्चित असते त्यामुळे आमत्य यौगंधरायण, राजा उदयनासाठी तिला मागणी घालतो. मात्र उदयन यांची प्रथम पत्नी वासवदत्ता ही सिंहल देशाच्या राजाची भाजी असल्याने तो राजा ही मागणी नाकारतो. पुढे लावानक नावाच्या गावाला आग लागली यामुळे वासवदत्ता जळून मेली असे सांगत अमात्य आपली योजना पुढे रेटतो.

मात्र उदयनाकडे येत असताना रत्नावलीचे जहाज रस्त्यात बुडते. कशीबशी एका लाकडी फळीच्या मदतीने ती वाचते. नेमकी एका सज्जन व्यापाऱ्याच्या मदतीने वासवदत्तेपर्यंत पोहोचते. आपली बहीण जिवंत आहे हे पाहिल्यानंतर तिच्या संसारात लुडबुड नको म्हणून रत्नावली स्वतःचा परिचय लपवते.

अर्थात राज्याची तिच्यावर नजर पडतेच. राजा तिच्या सौंदर्या मोहित होतो. पुढे राजाने विदूषकाच्या मदतीने तिला प्राप्त करण्यासाठी केलेले प्रयत्न, वासवदत्तेने त्यामध्ये आणलेले अडथळे आणि राजाने त्यावरती त्यावर केलेली उपाय यातून सर्व नाटक फुलत जाते.
शेवटी इंद्रजाल म्हणजे जादूगाराच्या प्रयोगातून सर्व गोष्टींचा उलगडा होऊन रत्नावली बहीण आहे हे कळलेली वासवदकता तिचे आणि राजाचे लग्न लावून देते.

अशा रीतीने त्या काळात चालत असलेल्या पद्धतीनुसार हा कथा भाग घडला आणि विवाह झाला असला तरी महाकवी भास यांनी स्वप्नवासवदत्त मध्ये रंगवलेला राजा उदयन याच्या तुलनेत रत्नावतीतील राजा उदयन कितीतरी डावा ठरतो.

स्वप्न वासवदत्तम मध्ये राजा मेलेल्या वासवदत्तेवर नितांत प्रेम करतो. येथे मात्र वासवदत्ता जिवंत असताना माझे खरे प्रेम तुझ्यावर आहे असे तो रत्नावलीला म्हणतो.

मात्र अशा स्वरूपातील काही न समजून घेता येतील अशा गोष्टी या नाटकात असल्या तरी नाट्यशास्त्रात पाळावयाच्या नियमांच्या दृष्टीने हे नाटक अत्यंत सुंदर नाटक आहे निश्चित.

मीनल प्रह्लाद बरडे
लोकमान्य टिळक महाविद्यालय, वणी
बी.ए. भाग २
दि. १०. ०८. २०२२

Author