साहित्य - ललित

नीतिशतकम्

Category:

 

जगामध्ये बाकी सर्व पशुंपेक्षा माणूस वेगळा आहे तो त्याच्या मानसिक विकासामुळे. आहार, निद्रा, भय आणि मैथुन या चार गोष्टीत सर्व पशूंना देखील येतात. मात्र याच्या पलीकडे जाऊन मानसिक, बौद्धिक विकास साधतो तोच खरा माणूस. माणसाच्या या नैतिक उन्नतीसाठी भारतीय संस्कृतीने निर्माण केलेल्या असंख्य ग्रंथांमध्ये विश्वविख्यात असणारा सर्वाधिक लोकप्रिय असा एक ग्रंथ म्हणजे महाकवी भर्तृहरी विरचित नीतीशतकम् .

  June 11, 2026


साहित्य - ललित

रघुवंशम्

Category:

 

रघुवंशम् हे सूर्यवंशाचा इतिहास सुबोध आणि अनुसरणीय स्वरूपात रंगविणारे कविकुलगुरू कालिदासांचे १९ सर्गाचे महाकाव्य आहे.
रघुवंशाचे प्रमुख आकर्षण म्हणजे त्यातील विविध गुणसंपन्न व्यक्तीचित्रे. रघुवंशातील हे महान राजे एरव्ही इतिहासाच्या पानांमध्ये आपला मोठेपणा हरवून गेले असते.

  June 11, 2026


साहित्य - ललित

नाट्यशास्त्र

Category:

 

पंचमवेद स्वरूपात गौरविलेला भरताचे नाट्यशास्त्र हा नाट्यशास्त्रावरील सध्या उपलब्ध प्राचीनतम ग्रंथ. परंतु पाणिनीच्या अष्टाघ्यायीतील शिलाली व कृशाश्व यांच्या नटसूत्रांचा उल्लेख, नाट्यशास्त्रातच आढळणारे सूत्ररूप गद्य आणि आनुवंश्य श्लोक इ. गोष्टी नाट्याची, नाट्यप्रयोगाची परंपरा प्राचीन असल्याचा पुरावा आहे.

  June 11, 2026


साहित्य - ललित

गीतगोविंदम्

Category:

 

संस्कृत साहित्याच्या इतिहासात बाराव्या शतकात झालेल्या जयदेव कवीचे विख्यात संस्कृत काव्य आहे गीतगोविंद. संस्कृतमधील भगवान श्रीकृष्णांवर आधारित असंख्य काव्यांपैकी अत्यंत श्रेष्ठ असे एक काव्य म्हणून गीतगोविंद प्रसिद्ध आहे. या काव्याचा विषय राधा-कृष्णांच्या परस्पर अनुराग, विरह आणि मीलन असा आहे. चैतन्य संप्रदायात या काव्याला विशेष महत्त्व आहे. रोमेश चंद्र दत्त, चिं.वि. वैद्य, डॉ. कीथ असे अनेक विद्वान गीतगोविंदाची उत्तम काव्यात गणना करतात.

  June 11, 2026


साहित्य - ललित

शिशुपालवधम्

Category:

 

संस्कृत पंचमहाकाव्यांपैकी एक अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण महाकाव्य म्हणजे महाकवी माघ विरचित शिशुपालवधम्

इ. स. सातव्या शतकाचा उत्तरार्ध हा माघाचा काळ मानला जातो. शिशुपालवधाच्या अखेरीस जोडलेल्या पाच श्लोकांत महाकवी माघाविषयीची माहिती तृतीय पुरुषी निवेदनात दिलेली आहे. त्यावरून त्याच्या पित्याचे नाव दत्तक सर्वाश्रय होते असे दिसते. त्यांचे आजोबा सुप्रभदेव हा वर्मल नावाच्या कोणा राजाचा मंत्री होते अशी देखील माहिती ह्या श्लोकांमधून मिळते.

  June 11, 2026


साहित्य - ललित

नैषधीयचरितम्

Category:

 

महाकवी श्रीहर्ष विरचित नैषधीयचरितम् हे अभिजात संस्कृत पंचमहाकाव्यांपैकी एक महाकाव्य. संस्कृत पंचमहाकाव्यांत नैषधीयचरित्र हे काळाचा विचार करता नवीन आणि विस्ताराने सगळ्यांत विशाल. नैषधचरित, नैषधकाव्य व नैषध, निषधराजचरित अशा नावांनीही हे महाकाव्य ओळखले जाते.

  June 11, 2026


साहित्य - ललित

किरातार्जुनीयम्

Category:

 

पंचमहाकाव्यांपैकी महत्वपूर्ण काव्य असणाऱ्या भारवी विरचित किरातार्जुनीयाचे अठरा सर्ग असून, विविध वृत्तांत रचिलेले एकूण १,०३९ श्लोक आहेत. त्याचा आरंभ ‘श्री’काराने झालेला असून प्रत्येक सर्गाच्या अखेरच्या श्लोकात ‘लक्ष्मी’ हा शब्द योजिलेला आहे. यावरून ह्या महाकाव्याला लक्ष्मीपदांक असेही म्हणतात. महाकाव्याचा नायक अर्जुन, प्रधान रस वीर आणि अर्जुनाला प्राप्त झालेले पाशुपतास्त्र हे फळ आहे.

  June 11, 2026


साहित्य - ललित

मुद्राराक्षस

Category:

 

चाणक्यांच्या राजनीती वर विशाखादत्तांनी लिहिलेल्या मुद्राराक्षसाच्या प्रारंभकात म्हटल्याप्रमाणे ते सामन्त वटेश्वरदत्ताचा नातू व महाराज भास्करदत्ताचे पुत्र होते. विशाखदत्ताचा काळ निश्चितपणे सांगता येत नाही. तथापि इ. स. च्या नवव्या शतकापर्यंत केव्हा तरी तो होऊन गेला, असे दिसते.

  June 11, 2026


साहित्य - ललित

मृच्छकटिकम्

Category:

 

दोन हजार वर्षापूर्वीची भारतीय नाट्य कला,भारतीय राजनीति, भारतीय अर्थकारण,भारतीय समाजरचना समजून घेण्याच्या प्रयासात मृच्छकटिकम् हा एक मैलाचा दगड आहे. हे नाटक म्हणजे केवळ नाटक नाही,तर तत्कालीन समाजाचे ते नितांत रमणीय असे शाश्वत चित्रणच आहे.

  June 11, 2026


साहित्य - ललित

सौंदरानंद

Category:

 

महान संस्कृत महाकवी अश्वघोष यांनी लिहिलेले सौंदरानंद हे संस्कृत साहित्यातील एक श्रेष्ठ महाकाव्य आहे. भगवान गौतम बुद्ध यांचा सावत्र भाऊ नंद आणि त्याची स्वरुपसुंदर प्रिय पत्नी सुंदरी यांच्या प्रेमावर आणि राजा नंदाने बुद्धधर्माचा स्वीकार करणे या आधारभूत कल्पनेवर हे महाकाव्य रचलेले आहे.

  June 11, 2026