प्रियदर्शिका

प्रियदर्शिका हे चार अंक असलेले श्रीहर्षांचे एक नाटक आहे. याचे प्रियदर्शिका हे नाव नाटकाच्या नायिकेच्या म्हणजे प्रियदर्शका च्या नावाच्या आधारावर केले आहे. हे नाटक महाकवी कालिदास यांच्या मालविकाग्निमित्र या नाटकाने प्रभावित असलेले हे नाटक आहे. यामध्ये वत्स देशाचा सम्राट उदयन आणि राजा दृढवर्मा यांची कन्या प्रियदर्शिका च्या प्रणयकथेचे अत्यंत सरळ आणि रोचक वर्णन मनोहारी पद्धतीने केलेले आहे.



प्रियदर्शिका हे चार अंक असलेले श्रीहर्षांचे एक नाटक आहे. याचे प्रियदर्शिका हे नाव नाटकाच्या नायिकेच्या म्हणजे प्रियदर्शका च्या नावाच्या आधारावर केले आहे. हे नाटक महाकवी कालिदास यांच्या मालविकाग्निमित्र या नाटकाने प्रभावित असलेले हे नाटक आहे.
यामध्ये वत्स देशाचा सम्राट उदयन आणि राजा दृढवर्मा यांची कन्या प्रियदर्शिका च्या प्रणयकथेचे अत्यंत सरळ आणि रोचक वर्णन मनोहारी पद्धतीने केलेले आहे.

या नाटकाच्या पहिल्या अंकाच्या प्रारंभी कंचुकीय सूचित करतो की प्रियदर्शनीचे वडील अंग देशाचे महाराज दृढवर्मा आपली कन्या कोसंबीचे राजा उदयनला देण्याचे निश्चित करतो. परंतु कलिंगाच्या राजाने प्रियदर्शिके साठी कित्येक वेळा याचना केली होती.
त्या याचनेच्या उपेक्षेने अपमानित होऊन क्रोधित कलिग राजाने दृढवर्मावर आक्रमण करून त्याला बंदी बनवतो असा कथाभाग या पहिल्या अंकाचा आहे.

नाटकाच्या दुसऱ्या अंकात राजा उदयन विदूषका सोबत उपवनात परिभ्रमण करण्यासाठी जातो. तिथे त्याला प्रियदर्शिकाचे दर्शन होते. प्रियदर्शिकेला महाराणी सोबत पूजेसाठी कमल पुष्प आणण्यासाठी पाठवले होते. प्रियदर्शिका कमलपुष्प वेचत असताना भुंग्यां द्वारे बाधित होते आणि ओरडायला लागते त्या क्षणी राजा उदयन समोर येऊन प्रियदर्शिकेला भुंग्यांपासून वाचवण्यासाठी तिला आलिंगन देतो. त्यानंतर राजा उपवनातून निघून जातो.

नाटकाच्या तिसऱ्या अंकात वासवदत्तेची सखी महाराणी वासवदत्ते च्या मनोरंजनासाठी राजा उदयन संबंधित एक प्रणय पर नाटक आयोजित करते. ज्यात वासवदत्तेचा अभिनय प्रियदर्शिका आणि राजा उदयनचा अभिनय मनोरमाला करायचा होता. अशी माहिती मिळते.
तर चौथ्या अंकात आपल्याला वासवदत्ता आणि प्रियदर्शिकेची अवस्था सांगितली आहे. प्रियदर्शिका कारागृहात निराश होऊन विष प्राशन करण्याचा विचार करते. तर एकीकडे वासवदत्ता आपल्या आईचे पत्र वाचून दुःखी होते. यात लिहिलेले असते की तिचा मामा राजा दृढवर्मा अजूनही कलिंगच्या कारावासात आहे.

या नाटकातून आपल्याला कळते की समोरचा व्यक्ती ला कोणी नातेवाईक असेल तर आपण त्याच्यावर संकट आले असता मोठ्यात मोठे पाऊल उचलतो. ज्या निर्णयासाठी आपण कोणताही विचार करू शकत नाही. या नाटकाच्या चौथ्या अंकात जेव्हा वासवदत्तेला कळतं की प्रियदर्शिका हे तिची सखी मावस बहीण आहे. तेव्हा ती तिचा प्रियकर उदयन चा विवाह तिच्यासोबत करण्यासाठी तयार होते. कोणतीही प्रेमिका आपल्या प्रियकराला दुसऱ्या कोणासोबत पाहू शकत नाही. यावरून आपल्याला कळतं की वासवदत्तेत त्याग आणि प्रेमाची भावना आहे. त्यामुळे हे नाटक अतिशय रोचक आणि मनोरंजनात्मक आहे. त्याग आणि प्रेमाची माहिती देणारे. त्यामुळे तुम्ही एकदा वाचून पाहावे असे नाटक म्हणजे प्रियदर्शिका.

कु. हर्षाली प्रमोद घाटे
लोकमान्य टिळक महाविद्यालय, वणी
बी.ए. भाग २
दि. ०३. ०८. २०२२

Author