व्यक्ती-परिचय

लेखक दिग्दर्शक प्राजक्त देशमुख

Category:

 

कवी प्राजक्त यांची ग्रेवयार्ड लिटरेचर, मीरा, लालनाक्या ही ईपुस्तके प्रकाशित झाली आहे. शिवाय आता त्यांचा “we चार” ह्या काव्यवाचनाचे प्रयोग महाराष्ट्रात सुरू आहे आणि त्यांच्या काव्याला तरूण रसिकांचा उदंड प्रतिसाद आहे.
देवबाभळी या पुस्तकाला साहित्य अकादमीचा युवा पुरस्कार जाहीर झाला आहे. प्राजक्त देशमुख हे या पुरस्काराचे मानकरी ठरले आहेत.प्राजक्त देशमुख यांनी लिहिलेलं संगीत देवबाभळी हे नाटकही प्रसिद्ध झालं आणि लोकप्रिय ठरलं.

  June 7, 2022


व्यक्ती-परिचय

बालसाहित्यकार सुमती हरिश्चंद्र पायगावकर

Category:

 

पतंग, चेंडू नि शिपला, फेनाली, अरेबियन नाइट्स, चंद्रफुले, एका पांघरुणाची गोष्ट, हॅन्स ॲ‍न्डरसनच्या परीकथा, जिमी, लालझंडी छोटी नीरा, छोटा लाल बूट, किलबिल, गंमतीदार किटली, अलिबाबाची गुहा, पोपटदादाचे लग्न, असं त्याचं लेखन प्रसिद्ध आहे.

  June 7, 2022


व्यक्ती-परिचय

नाटककार आणि ज्येष्ठ रंगकर्मी वामन तावडे

Category:

 

१९६९ साली म्युन्सिपल नाट्यस्पर्धेत ‘सुतक’ नावाची एकांकिका त्यांनी लिहिली. या स्पर्धेतत्यांच्या लिखाणाला उत्तेजनार्थ पारितोषिक मिळाले. त्यानंतर वामन तावडे यांनी ‘छिन्न’ हे दोन अंकी नाटक लिहिले. हे नाटक सदाशिव अमरापूरकर यांच्या वाचनात आले आणि त्यांनी ते स्पर्धेसाठी घेतले. या नाटकाचा प्रवास पुढे वामन तावडे यांच्या नाट्यलेखनातील कारकिर्दीला पुढे घेऊन गेला. वामन तावडे यांच्या ‘छिन्न’ या नाटकाने अनेक पारितोषिके मिळवली.

  June 7, 2022


लेखसंग्रह

भारतातील प्रवासी गाड्यांचे क्रमांक

Category:

 

प्रत्येक प्रवासीगाडीला नाव असतं. नाव नसेल, तर ती गाडी जिथून निघते त्या सुरुवातीच्या स्टेशनच्या किंवा जेथे ती अखेरीस थांबते, त्या शेवटच्या स्टेशनच्या नावानं ओळखली जाते; परंतु रेल्वे स्टेशनं, तिकीट कंट्रोल रूम येथे मात्र त्या गाड्या क्रमांकानुसार ओळखल्या जातात. १०० वर्षांपूर्वी गाडीला साधा एक अंकी किंवा दोन अंकी क्रमांक असे. मुंबईहून निघणाऱ्या गाड्यांना ‘डाऊन’ गाडी व मुंबईकडे येणाऱ्या गाड्यांना ‘अप’ असं संबोधले जाई. त्याप्रमाणे डाऊन गाडीला जो क्रमांक दिला असेल, त्याच्या पुढचा क्रमांक अप गाडीसाठी दिला जाई.

  June 6, 2022


नॉस्टॅल्जिया

नदीबाई माय माझी..

Category:

 

परवा सहजच संध्याकाळच्या वेळी गावाहून येता येता गोदावरी काठी थोडा वेळ थांबलो.ताडकळस आणि पालम या दरम्यान धानोरा (काळे) या ठिकाणी गोदावरी नदीवर मोठा पूल बांधण्यात आला आहे. तिथे थोडा वेळ काम नसतांना ही रेंगाळलो पुलावरून खाली पाहिले असं काही मनोहर दृश्य दिसलं की मला पूर्वीच्या काळच्या दिपमाला ची आठवण झाली संध्याकाळ म्हणजे दिवे लागणीची वेळ, त्यातल्या त्यात त्यात दूरवरून झगमगणारे हे दिवे पाहिले जी माणसाला अधिकच आनंद होतो.

  June 6, 2022


लेखसंग्रह

मी असा का? – महेश झगडे, I.A.S

Category:

 

मी प्रशासनात चौतीस वर्षे ज्या पद्धतीने वागलो तो तसा का वागलो याचे उत्तर खाजगी कंपनीत घडलेल्या दोन घटनांमध्ये दडले आहे. त्यामध्ये अवैध गोष्टींची मनस्वी चीड, स्पष्टवक्तेपणा, पैशापेक्षा बौद्धिक समाधानाकडे कल आणि प्रत्येक गोष्टीत खोलवर जावून परिपक्व विचार करण्याची सवय. मला अनेक वेळेस अनेक लोक विचारतात की मी माझ्या प्रशासन कारकिर्दीत असा का वागलो, त्याचे हे एक छोटे विवेचन.

  June 6, 2022


साहित्य - ललित

मंजिरी असनारे-केळकर

Category:

 

लहानपणी सांगलीला वडिलांच्या (प्रा. आनंद असनारे) शिस्तीमुळे रियाझाला बालसुलभ अळंटळं करणारी (वय वर्षे ७-८) मंजिरी, त्यानंतर ९३-९४ साली तत्कालीन लक्ष्मी क्रीडा मंदिरात तब्येतीने प्रातःकालीन रागांची मैफिल करणारी मंजिरी आणि आज आत्मविश्वासपूर्वक राग -संगीत सादर करणाऱ्या सौ मंजिरी असनारे -केळकर यांचा प्रवास मी जवळून पाहिला आहे.

  June 6, 2022