जिथे सागरा धरणी मिळते..
Category:
लेखसंग्रहसोशल माध्यमातील जग खोटं असतं असं म्हणतात. पण मला वाटतं सोशल मिडीयावर आपण कसं वागतो, त्याप्रमाणे आपल्याला तेथील जग भेटतं. आज भेटलेलो आम्ही सोशल मिडीयावर भेटलो. एकमेकांच्या कामाची, तळमळीची खुण आम्हाला सोशल मिडीयावरच पटली. नाहीतरी प्रत्यऱ्क्षात भेटणारी माणसं का कमी खोटं वागतात..? पण हेतू आणि नियत शुद्ध असेल तर मग या जगात खोटं, आभासी असं काहीच नसतं असं मी समजतो. हेतू-नियत साफ असेल तर जे खोटं आहे, ते ही शुद्ध-पवित्र होऊनच समोर येतं..मनाच्या शुद्ध असण्यात प्रचंड ताकद असते, हे मी आज अनुभवलं..
February 18, 2018