व्यक्ती-परिचय

नारायण राणे

Category:

 

मुख्यमंत्रीपदाच्या थोड्या काळातही त्यांनी महाराष्ट्रावर आपल्या कार्यकर्तृत्वाची छाप पाडली आहे. राज्यातील शासकीय कर्मचार्‍यांच्या सेवानिवृत्तीचे वय ६० वर्षांवरुन ५८ वर्षे करण्याचा महत्त्वपूर्ण व धाडसी निर्णय त्यांनी घेतला.

व्यक्ती-परिचय

पं. दिनकर पणशीकर

Category:

 

‘कट्यार काळजात घुसली’ नाटकात पं. वसंतराव देशपांडे यांच्यासमवेत भूमिका साकारण्याची संधी पं. दिनकर पणशीकरांना लाभली. ‘आडा चौताला’ सारख्या कमी प्रचलित तालात त्यांनी रचलेल्या २०० बंदिशी हा हिंदुस्थानी शास्त्रीय संगीत क्षेत्रासाठी बहुमूल्य ठेवा मानला जातो.

व्यक्ती-परिचय

नितीन ढेपे

Category:

 

नितीन ढेपे यांना ह्या संकल्पनेचे पेटंट देखील १४ जानेवारी २०१६ रोजी भारत सरकारकडून मिळाले असून ही वास्तू सर्वा्थाने लोकांच्या पसंतीस उतरली आहे. भारतीय पारंपरिक खेळ, खाद्यपदार्थ, पेहराव तसेच विविध कला आणि संस्कृती जोपासण्याचे काम करणाऱ्या ‘ढेपे वाडा’ या वास्तूला भारत सरकारकडून २०१९ मध्ये बौद्धिक स्वामीत्व हक्क मिळाले आहेत.

व्यक्ती-परिचय

नूतन पेंढारकर म्हणजेच अनंत दामले

Category:

 

अनंत दामले यांनी सत्तेचे गुलाम, कृष्णार्जुन युद्ध, संगीत सौभद्र, संगीत शारदा संगीत संशयकल्लोळ संगीत पंढरपूर रीती अशी प्रीतीची, संगीत मृच्छकटिक, सुवर्णतुला, शारदा अशा अनेक नाटकात कामे केली.

व्यक्ती-परिचय

पं. बबनराव हळदणकर तथा श्रीकृष्ण हळदणकर

Category:

 

१९५९ पासून ते खादिम हुसेन खाँसाहेबांच्या मृत्यूपर्यंत म्हणजे १९९३पर्यंत हळदणकर त्यांच्या सहवासात राहिले. १९६०च्या दशकापासून हळदणकरांनी आग्रा घराण्याच्या गायकीतला डौल आणि त्यातील परिपक्वता प्रेक्षकांपुढे मांडली.

व्यक्ती-परिचय

नारायण जनार्दन जाईल

Category:

 

स्थापत्यशास्त्रातील पदवी, कोयना प्रकल्प, अवजड अभियांत्रिकी प्रकल्प (रांची), उद्योग मंत्रालय (नवी दिल्ली) असे अभियांत्रिकी क्षेत्रात पाच दशकांहून अधिक काळ कार्यरत असलेले नारायण जनार्दन जाईल यांना ठाणं ओळखतं ते त्यांच्या लेखनामुळे.

व्यक्ती-परिचय

पं. तुळशीदास बोरकर

Category:

 

पं.तुळशीदास बोरकर उर्फ बोरकर गुरुजी संवादिनी (हार्मोनियम) वादन क्षेत्रातील ऋषितुल्य नाव. आज घडीला संवादिनी अर्थात पेटीवर प्रभुत्व असणारी जी काही मान्यवर मंडळी आहेत त्यातील हे अग्रगण्य नाव होते.