गोस्वामी संत तुलसीदासाचे जन्मगाव उत्तर प्रदेशातील राजापुरा असावे असा अंदाज आहे. ‘रत्नावली‘ या सौंदर्यशालिनीशी त्यांचा विवाह झाला. तिच्यावरील प्रेमाने तो पागल झाला. तिचा विरह त्याला सहन झाला नाही. ते गंगानदी पोहून मृत सर्पाची दोरी करून तिच्या माहेरी तिला भेटला, ‘एवढं प्रेम ईश्वरावर केलेत तर.... ?‘ तिने त्यांना विचारले., तेव्हा त्यांना उपरती झाली. तो रामभक्तीत लीन झाला. भक्तीमार्गाचे उपासक असलेल्या तुलसीदासांना लहानपणी काशीच्या नरहरीदास स्वामींनी सांभाळलेले होते. वेद, उपनिषदे, पुराणे, अठरा शास्त्रे इत्यादी प्राचीन ग्रंथांचे ज्ञान त्यांना शिकविले होते. रत्नावलीच्या ईश्वर, राम शब्दाने केवढे परीवर्तन घडवून आणले याची तिलाही कल्पना आली नाही. हिंदु समाजात त्यांच्या काव्यग्रंथाने प्रचंड परीवर्तन घडवून आणले, ‘रामचरितमानस‘ हा श्रीरामाच्या आदर्शांचे सूक्ष्म दर्शन घडवितो. तत्कालिन बहूजन समाजाच्या लोकभाषेत हे काव्य लिहले आहे. इस्लामी लोक ‘कुराण‘ वाचतात, ख्रिश्चन लोक ‘बायबल‘ वाचतात, त्याच भक्तीभावानेने हिंदु लोक ‘रामचरितमानस‘ वाचतात. अकबराच्या उदारमतवादी दृष्टीकोन स्वीकारणारा राजा मानसिंग हा तुलसिदासाचा निस्सीम भक्त होता.
तुलसीदासांच्या रामचरितमानसात तात्त्विक चिंतनासमवेतच हिंदी भाषेचा डौल आहे. शब्दालकार, अर्थालंकार, नवरसयुक्त मधुर शब्दांचे भांडार आहे. हिंदू धर्मातील पावित्र्य व धार्मिक निष्ठा मुस्लिम आक्रमणामुळे ढेपाळल्या होत्या. स्वच्छंदीपणा, स्वैराचार बोकाळळा होता. अज्ञानाचा सागर पसरला होता; परंतु तुलसीदासाने हे सामाजिक परिवर्तन घडवून आणले. जनसामान्यांच्या भाषेत सांस्कृतिक-मानस परिवर्तन केले. माणसाने ‘मर्यादापुरूषोत्तम राम‘ आदर्श मानला. रामभक्तीत सदाचरणाचे, श्रध्देचे धडे आहेत. हिंदी साहित्यसागरातील तुलसीचे ‘रामचरितमानस‘ हा कौस्तुभमणी आहे. जगभर भारतीय संस्कृतीच्या आध्यात्मिक ज्ञानासाठी या ग्रंथाचा अभ्यास केला जात आहे.
युगप्रवर्तक हिंदी महाकवी . त्यांची जन्मतिथी, जन्मस्थान, जात, गुरु, मातापिता या सर्वाबद्दल मतभिन्नता आढळते. हाजीपूर, तारी, राजापूर, सोरो सूकर क्षेत्र अयोध्या इ. गावांची नावे गोस्वामी तुलसीदासांचे जन्मस्थान ठरविताना पुढे आली आहेत. पंडित रामदत्त भारद्वाज यांनी या सर्व संशोधनांचा अभ्यास करुन तुलसीदासांचा जन्म सारो या स्थानाजवळच रामपूर येथे झाला. असे निश्चित केले आहे. ते सवरिया, सारस्वत, सरयू पारीण, सनाढय आणि कान्यकुब्ज या ब्राम्हण जातींपैकी निश्चित कोणत्या जातीचे होते याबद्दल मतभेद आहेत. ते ब्राम्हण नसावेच, असेही एक मत पुढे आले आहे. जगन्नाथदास, रामदासजी, नहर्यानंद, नरहरिदास, नृसिंह अशी त्यांच्या गुरुची नावे दिली जातात. बहुसंख्य विद्वान त्यांचा विवाह झाला होता, असे मानतात.
त्यांच्या जन्मतिथीसंबंधी सहा संवत तिथी सामान्यतः पुढे आल्या आहेत. त्या अशा संवत १५५४, १५६० , १५६८, १५८३, १५८९ आणि १६०० बहुसंख्य विद्वान भाद्रपद शुध्द एकादशी मंगळवार, संवत १५८९ म्हणजे इ.स. १५३२ ही तिथी मान्य करतात. मृत्यू मात्र संवत १६८० श्रावण वद्य तृतीया, शनिवार या तिथिला म्हणजे १६३२ मध्ये झाला, याविषयी सामान्यतः एकमत आहे.
गोस्वामी संत तुलसीदासाचे जन्मगाव उत्तर प्रदेशातील राजापुरा असावे असा अंदाज आहे. ‘रत्नावली‘ या सौंदर्यशालिनीशी त्यांचा विवाह झाला. तिच्यावरील प्रेमाने तो पागल झाला. तिचा विरह त्याला सहन झाला नाही. ते गंगानदी पोहून मृत सर्पाची दोरी करून तिच्या माहेरी तिला भेटला, ‘एवढं प्रेम ईश्वरावर केलेत तर…. ?‘ तिने त्यांना विचारले., तेव्हा त्यांना उपरती झाली. तो रामभक्तीत लीन झाला. भक्तीमार्गाचे उपासक असलेल्या तुलसीदासांना लहानपणी काशीच्या नरहरीदास स्वामींनी सांभाळलेले होते. वेद, उपनिषदे, पुराणे, अठरा शास्त्रे इत्यादी प्राचीन ग्रंथांचे ज्ञान त्यांना शिकविले होते. रत्नावलीच्या ईश्वर, राम शब्दाने केवढे परीवर्तन घडवून आणले याची तिलाही कल्पना आली नाही. हिंदु समाजात त्यांच्या काव्यग्रंथाने प्रचंड परीवर्तन घडवून आणले, ‘रामचरितमानस‘ हा श्रीरामाच्या आदर्शांचे सूक्ष्म दर्शन घडवितो. तत्कालिन बहूजन समाजाच्या लोकभाषेत हे काव्य लिहले आहे. इस्लामी लोक ‘कुराण‘ वाचतात, ख्रिश्चन लोक ‘बायबल‘ वाचतात, त्याच भक्तीभावानेने हिंदु लोक ‘रामचरितमानस‘ वाचतात. अकबराच्या उदारमतवादी दृष्टीकोन स्वीकारणारा राजा मानसिंग हा तुलसिदासाचा निस्सीम भक्त होता.