अवर्गिकृत

भारतीय राज्यकर्ते आणि सम्राट – स्वातंत्र्यपूर्व काळातले आणि स्वातंत्र्योत्तर काळातलेही……….

Category:

 

स्वातंत्र्यपूर्व काळात भारतात अनेक थोर राज्यकर्ते आणि सम्राट होउन गेले. स्वातंत्रोत्तर काळात काही नवे सम्राट उदयाला आले. हे आहेत नव्या ढंगाचे… नव्या बाजाचे सम्राट..

  August 15, 2010


अवर्गिकृत

मुंबई विनाशाच्या दिशेने…

Category:

 

विकासाच्या नावाखाली होत असलेल्या औद्यागिकीकरण आणि शहरीकरणासाठी समुद्र तसेच नद्या हटवून मोठ्या प्रमाणावर जमिनी तयार केल्या जात आहेत. मुंबईलगतच्या समुद्राचा मोठा भाग अशा रितीने बुजवण्यात आला आहे. त्याचे दुष्परिणामही आपण पाहत आहोत. त्यातून धडा न घेता आता समुद्राचा आणखी काही भाग बुजवण्याचा घाट घातला जात आहे. नैसर्गिक रचनेतील असा हस्तक्षेप घातक ठरणार आहे.

  August 14, 2010


अवर्गिकृत

हमारे दो मधील व्दंव्द

Category:

 

भारतीय संस्कृतीमध्ये बंधुप्रेम, भगिनीप्रेम या भावनांना खूप महत्त्वाचे स्थान आहे. एकाच आई-वडिलांच्या पोटी आलेल्या या मुलांमध्ये निसर्गत:च प्रेम आणि आपुलकी निर्माण होते असं आपण समजतो.बंधुप्रेमाचा आदर्श म्हणून राम आणि लक्ष्मण, राम

आणि भरत आपल्या मनावर ठसलेले आहेत. याच्या विपरीत उदाहरण म्हणजे महाभारतातील एकाच कुळातले बंधू! भावंडातील मत्सराची एक भयंकर कहाणी बायबलच्या ओल्ड टेस्टामेंटमध्येही आहे. यात केन याने आपल्याच एबेल नावाच्या भावाचा खून केला. कारण काय? तर दोन भावांतील वैमनस्य.

  August 14, 2010


अवर्गिकृत

हा तर पुरुषाचाच धिक्कार

Category:

 

स्त्री-पुरुष संबंधांचा व त्यांच्यातील नात्याचा गाभा काय, याचा शोध घेण्याचा प्रयत्न आजवर अनेकांनी केला आहे आणि अजूनही करत आहेत. स्त्री-पुरुषांचे शारीरिक मीलन अपत्यप्राप्तीपर्यंत जाते. म्हणून त्यांच्यातील नाते नैसर्गिक आहे, अशी पुरुषी समाजाची धारणा असते. पण जे नैसर्गिक आहे, ते नैतिक कशावरून? स्त्री-पुरुष संबंध नैसर्गिक अवस्थेत परिपूर्ण असू शकत नाहीत. त्यावर प्रेम, आदर, समानता हे संस्कार झाले, तरच ते नैतिक होतात. निव्वळ नैसर्गिक संबंध ही प्रकृती आणि अनैसर्गिक मार्गाने मिळालेले सुख ही विकृती होय. पण जेव्हा या संबंधांवर प्रेम, विश्वास आणि आदर याचा साज चढवला जातो, तेव्हाच ती संस्कृती ठरते.

  August 14, 2010


अवर्गिकृत

लग्नं मुलांची … चिंता पालकांची

Category:

 

‘घर’ आणि ‘लग्न’ या दोन शब्दांशी ‘चिता’ नावाची गोष्ट जोडूनच येते. आणि माणसाच्या जीवनात या दोन्ही गोष्टींना सहसा

पर्याय नसतो. या दोन गोष्टींबद्दल चिता वाटणं हीसुद्धा एक ‘समाजमान्य’ गोष्ट आहे. त्यामुळेच विवाहसंस्था चालवत असताना

काही प्रमाणात का होईना, पालकांच्या चिता कमी करण्यात आम्हाला मदत करता येते, हा आनंदाचा भाग वाटतो.

  August 14, 2010


लेखसंग्रह

न्याययंत्रणेला भ्रष्ट्राचाराचा विळखा

Category:

 

सर्व क्षेत्रात वाढत चाललेला भ्रष्ट्राचार चिताजनक ठरत आहे. भ्रष्ट्राचाराची पाळेमुळे खोलवर रुजल्यामुळे वरवरच्या उपायांनी तो आटोक्यात येण्यासारखा नाही. आजवर न्यायसंस्था भ्रष्ट्राचारापासून दूर होती. पण अलीकडेच याही क्षेत्रात भ्रष्ट्राचाराच्या घटना आढळल्याने खळबळ माजली. कर्मचारी भविष्य निर्वाह निधीतील रकमेच्या अपहार करणार्‍या न्यायाधिशांवर काय कारवाई केली जाते याकडे सयार्‍यांचे लक्ष लागले आहे.

  August 14, 2010


लेखसंग्रह

चीनची विकासाची घोडदौड

Category:

 

चीनने नुकतेच जगातील दुसर्‍या क्रमांकाची अर्थसत्ता हे स्थान मिळवले. 2025 पर्यंत चीन अमेरिकेला मागे टाकून पहिल्या क’मांकाची आर्थिक सत्ता होईल असा अंदाज आहे. आर्थिक सामर्थ्यावर लष्करी सामर्थ्य अवलंबून असल्याने महासत्ता बनण्याच्या प्रकि’येत आर्थिक विकास महत्त्वाचा ठरतो. जगात सर्वाधिक लोकसं’या असूनही चीनने हे यश मिळवले आहे. एकवीसावे शतक आपले असल्याचा दावा चीन खरा करेल असे वाटते.

  August 14, 2010


अवर्गिकृत

आयकर रिटर्न्स भरायचे राहिलेत

Category:

 

आयकर भरणे म्हणजे खूप गुंतागुंतीची आणि किचकट प्रक्रिया असल्याने तो टाळणे हा सर्वसामान्यांचा समज असतो. परंतु, आयकर पत्रिका भरणे अनेक कारणांमुळे विशेष आवश्यक ठरते. घटनेनुसार ते बंधनकारकही आहे. वेळच्या वेळी आयकर न भरल्याने आपल्याला अनेक अडचणींना सामोरे जावे लागू शकते. या पार्श्वभूमीवर 4 ऑगस्टपर्यंत आयकर भरला नसेल तर कोणते पर्याय समोर आहेत हे तपासून पहायला हवे.

  August 14, 2010


अवर्गिकृत

जीपीएस तंत्राची वेधक सफर

Category:

 

वाढत्या जागतिकीकरणामुळे नोकरी किवा व्यवसायाच्या निमित्ताने फिरण्याच्या प्रमाणात बरीच वाढ झाली आहे. अनोळखी प्रदेशात असताना एखादे ठिकाण शोधणे अवघड असते. विशेषत: तेथील भाषा अवगत नसल्यास हे काम अधिक जिकीरीचे बनते. अशा वेळी जीपीएस किवा डिजिटल मॅप्सची सेवा हाताशी असल्यास नेमके ठिकाण शोधणे सोपे बनते. या तंत्रज्ञानाचा ताजा वेध.

  August 14, 2010


अवर्गिकृत

दारूबंदीची प्रभावी अंमलबजावणी हवी

Category:

 

महाविद्यालयीन तरुण-तरुणींच्या फ्रेशर्स पार्टीमुळे पुण्यात बराच गदारोळ झाला. या पार्टीत अटक झालेल्या विद्यार्थ्यांवर गुन्हे नोंदवून कारवाई सुरू झाली आहे. परंतु, त्यांच्याकडे परवाना नसतानाही मद्य पुरवणार्‍या मद्य विक्रेत्यांवर कोणतीही कारवाई झालेली नाही. या व्यक्तींना शिक्षा झाल्याशिवाय असे प्रकार थांबणार नाहीत. विद्यार्थ्यांना वाचवायचे असेल तर देशभर दारूबंदीच्या कायद्याची प्रभावी अंमलबजावणी व्हायला हवी.

  August 14, 2010