कथा

प्युली

Category:

 

जंगली भागात, पहाड-पर्वतामध्ये एक छोटेसे पिवळ्या रंगाचे फूल दिसून येते. टेहरी, गढवाल मधील लोक त्या फुलाला ‘प्ली’ म्हणून ओळखतात. तिकडील लोकांमध्ये या फुलासंबंधी एक लोककथा आहे

कथा

देवी व कंस यांची गोष्ट

Category:

 

यादववंशांत शूरसेन नांवाचा एक राजा झाला. हा मथुरेंत राहून राज्याचा कारभार पाहत असे. म्हणून मथुरा ही सर्व यादव राजांची राजधानी असे लोक समजू लागले. या शूरसेनाचा मुलगा वसुदेव याचे कंसाची बहीण देवकी हिच्याशी मोठ्या थाटाने लग्न झाले. लग्नसमारंभ उरकल्यावर देवकीला घेऊन वसुदेव जाण्यास निघाला, तेव्हां कंस हा आपल्या बहिणीस व मेहुण्यास पोचविण्यासाठी मोठ्या इतमामानें सोन्याचे शेकडों रथ घेऊन निघाला; इतकेच नाही, तर आपल्या बहिणीच्या संतोषासाठी तिचा रथ हांकण्याचे काम त्याने स्वतः हातीं घेतले.

कथा

यी तेजदेवता

Category:

 

कुणी एके काळी आद्यदेव सृष्टी निर्माता बाईमी यांनी पशुपक्षी, जलचर, कीटक, फुले, वृक्ष अशी सारी सृष्टी निर्माण केली. परंतु ही सारीसृष्टी चित्रासारखी स्तब्ध होती. निर्जीव होती. या सृष्टीत चैतन्य नसल्यामुळे जमिनीतून रोपांना अंकूर फुटत नव्हते. तळ्यातील पाण्यावर बर्फाचे दाट थर असल्यामुळे जलचर बंदिवान झाले होते. अतिथंडीमुळे पक्षी गारठले.

कथा

बीव्हर आणि साळू

Category:

 

खूप खूप वर्षांपूर्वी म्हणजे अगदी ट्लिंगट जमात अस्तित्वात येण्यापूर्वी साळू आणि बीव्हर हे चांगले मित्र होते. नेहमी एकमेकांच्या घरी जात येत होते. साळू घरी आली की ती परत जाताना तिचे खूप काटे पडत. बीव्हरला ते आवडत नव्हते. म्हणून बीव्हर ठरवतो की साळूच्या घरी जाऊन तिला कधीही आपल्या घरी येण्याचे आमंत्रण द्यायचे नाही. एके दिवशी साळूने त्याच्या घरी येण्याची इच्छा आहे, असे बीव्हारला सांगितले.

कथा

ससा आणि कासव शाळेला निघाले

Category:

 

ससा आणि कासव यांच्या शर्यतीची गोष्ट तुम्हा आम्हाला सर्व परिचित आहे. राम गणेश गडकरी यांच्या ‘चिमुकल्या इसापनीती’त ही बीजकथा या संग्रहात दिलेली आहे. पहा (४.५९) नव्या संदर्भात नवी भर घालून अनेकांनी या बीजकथेचा आपापल्या पद्धतीने विस्तार केला आहे. शालेय विद्यार्थ्यांनीही या बीजकथेचा केलेला विस्तार यापुढील तीन कथांमध्ये दिला आहे. या विस्तार कथांमधून मुलांना शर्यतीपेक्षा किंवा स्पर्धेपेक्षाही मैत्रभाव महत्त्वाचा वाटतो आणि त्यामुळेच ह्या कथा पारंपरिक कथेपेक्षा कशा वेगळ्या आहेत ते पहा.

कथा

सिंह आणि चर्मकार

Category:

 

फार फार वर्षांपूर्वी एकदा एका खेडेगावात एक चर्मकार राहात होता. त्याचा एक छोटासा ग्रामधंदा होता. तो धंदा चांगला चालावा म्हणून त्याला असंख्य कातड्यांची गरज लागत असे. तो अरण्यात जात असे आणि मेलेल्या जनावरांची कातडी गोळा करीत असे. एखादे मेलेले जनावर त्याला आढळले की तो त्याची कातडी सोलायचा.

कथा

ससा आणि कासवाची शाळा

Category:

 

ससा आणि कासव म्हटल्यावर आपल्या डोळ्यांसमोर एकच गोष्ट उभी राहते ती म्हणजे ‘ससा व कासवाची शर्यत’. पण माझी गोष्ट यापेक्षा निराळीच आहे बरं का.

कथा

सिंह आणि ससा

Category:

 

मध्य भारतातल्या एका प्रचंड मोठ्या जंगलात एक दांडगा सिंह राहात होता. त्याचं नाव होतं भासुरक. त्याला स्वतःच्या शक्तीची घमंड होती. नि ह्या शक्तीचे प्रदर्शन करण्यासाठी तो खुशाल दुबळ्या जनावरांना ठार मारीत असे. एकदा काय झालं, त्या जंगलातली सगळी जनावरं एकत्र जमली आणि सगळी सिंहाकडे गेली.

कथा

सशाचं हृदय

Category:

 

कोणे एके काळी समुद्राच्या तळाशी एक महाल होता. या महालात विविध प्रकारचे मासे, कासव आणि साप राहत असत. एके दिवशी सापांचा राजा पोटदुखीमुळे इकडेतिकडे सरपटत होता. दिवसरात्र वेदना असह्य झाल्यामुळे तळमळत होता. त्याच्या कुटुंबातील राजकुमार, राजकन्या, राणी, प्रधान सगळेच काळजी करू लागले. काय करावं कुणालाच काही सुचत नव्हते आणि राजाच्या वेदनाही कुणाला बघवत नव्हत्या. प्रधान म्हणाले, “आपण आपले मुख्य राजवैद्य माशाला बोलावू.” राजवैद्यांनी राजाची नाडी पाहिली आणि म्हणाले, ”महाराजांना सशाचं हृदय उकडून खायला दिलं तर लवकर आराम पडेल.”

कथा

मोती पोवळ्याची मोष्ट

Category:

 

एका गावात एक वृद्ध शेतकरी राहत होता. तो आंधळा होता. त्याला दिसत नसे. एके दिवशी चालता चालता तो विहिरीत पडला. तेव्हा “देवा मला वाचव रे” असे तो ओरडू लागला.