यादववंशांत शूरसेन नांवाचा एक राजा झाला. हा मथुरेंत राहून राज्याचा कारभार पाहत असे. म्हणून मथुरा ही सर्व यादव राजांची राजधानी असे लोक समजू लागले. या शूरसेनाचा मुलगा वसुदेव याचे कंसाची बहीण देवकी हिच्याशी मोठ्या थाटाने लग्न झाले. लग्नसमारंभ उरकल्यावर देवकीला घेऊन वसुदेव जाण्यास निघाला, तेव्हां कंस हा आपल्या बहिणीस व मेहुण्यास पोचविण्यासाठी मोठ्या इतमामानें सोन्याचे शेकडों रथ घेऊन निघाला; इतकेच नाही, तर आपल्या बहिणीच्या संतोषासाठी तिचा रथ हांकण्याचे काम त्याने स्वतः हातीं घेतले. भाऊबहिणींचे हे प्रेम पाहून लोकांना मोठे कौतुक वाटले. कंस रथाचे घोडे हांकीत आहे, इतक्यांत त्याच्या कानीं पुढील शब्द पडले, “मूर्ख कंसा, जिला मोठ्या समारंभानें तू सासरी पोंचवीत आहेस, त्या तुझ्या बहिणीच्या आठव्या संततीच्या हातून तुझा मृत्यु आहे.” हे शब्द ऐकतांच बहिणीविषयींचें कंसाच्या मनांतलें प्रेम एकदम मावळले, आणि तो शस्त्र उपसून देवकीला ठार मारण्यास तयार झाला. “असे अविचाराचे कृत्य करूं नकोस,’ असें वसुदेवाने त्याला पुष्कळ प्रकारांनी सांगून पाहिले; पण कांहीं उपयोग झाला नाहीं. कंस स्वभावाने दुष्टच होता. तो आपला आग्रह सोडीना. शेवटी हिला जी संतती होईल ती मी तुझ्या स्वाधीन करीन, पण हिला या वेळीं सोड, असे वसुदेवानें कबूल केले, तेव्हां कंसाने तिला सोडले.
देवी व कंस यांची गोष्ट
यादववंशांत शूरसेन नांवाचा एक राजा झाला. हा मथुरेंत राहून राज्याचा कारभार पाहत असे. म्हणून मथुरा ही सर्व यादव राजांची राजधानी असे लोक समजू लागले. या शूरसेनाचा मुलगा वसुदेव याचे कंसाची बहीण देवकी हिच्याशी मोठ्या थाटाने लग्न झाले. लग्नसमारंभ उरकल्यावर देवकीला घेऊन वसुदेव जाण्यास निघाला, तेव्हां कंस हा आपल्या बहिणीस व मेहुण्यास पोचविण्यासाठी मोठ्या इतमामानें सोन्याचे शेकडों रथ घेऊन निघाला; इतकेच नाही, तर आपल्या बहिणीच्या संतोषासाठी तिचा रथ हांकण्याचे काम त्याने स्वतः हातीं घेतले.