सिंह आणि चर्मकार

(मॉरिशसची लोककथा)

फार फार वर्षांपूर्वी एकदा एका खेडेगावात एक चर्मकार राहात होता. त्याचा एक छोटासा ग्रामधंदा होता. तो धंदा चांगला चालावा म्हणून त्याला असंख्य कातड्यांची गरज लागत असे. तो अरण्यात जात असे आणि मेलेल्या जनावरांची कातडी गोळा करीत असे. एखादे मेलेले जनावर त्याला आढळले की तो त्याची कातडी सोलायचा.



(मॉरिशसची लोककथा)

फार फार वर्षांपूर्वी एकदा एका खेडेगावात एक चर्मकार राहात होता. त्याचा एक छोटासा ग्रामधंदा होता. तो धंदा चांगला चालावा म्हणून त्याला असंख्य कातड्यांची गरज लागत असे. तो अरण्यात जात असे आणि मेलेल्या जनावरांची कातडी गोळा करीत असे. एखादे मेलेले जनावर त्याला आढळले की तो त्याची कातडी सोलायचा. ती स्वच्छ धुऊन काढायचा. मग ती नीट सूर्यप्रकाशात ठेवून तो सुकवायचा. मग त्या कातड्याचे सुंदर बूट तयार करायचा. ते शहरात नेऊन लोकांना विकायचा. अशा रीतीने तो आपल्याकुटुंबाचा निर्वाह करायचा.

आपला धंदा नीट चालावा म्हणून त्याला सतत काळजी लागलेली असे.
त्यामुळे जवळ जवळ त्याची प्रत्येक सकाळ अरण्यात जात असे. अरण्यात
जाऊन तो कातडी शोधत असे. एके दिवशी अरण्यात तो खूप आत आत
त्याच्या दाट गडद भागात धाडस करून गेला. अरण्याच्या त्या भागात एक
म्हातारा सिंह रहात असे; त्याची प्रकृती तोळामासा झालेली होती आणि
म्हातारपणामुळे त्याचे अवयव थकलेले होते. सुदैवाने म्हणा किंवा दुर्दैव
म्हणा, तो चर्मकार आणि तो म्हातारा सिंह त्या दिवशी समोरासमोर आले.
चर्मकाराची तर घाबरगुंडी उडाली. परंतु तो सिंह मात्र त्याच्याकडे एकसारखी
नजर रोखून पहात राहिला. सिंहाची ती विचित्र वागणूक पाहून त्या चर्मकाराला
अचंबा वाटला. तो स्वतःशी पुटपुटला, ‘हा सिंह माझ्याकडे पाहून गर्जना का करीत नाही? तो माझ्यावर हल्ला का करीत नाही? तो इतका शांतपणे का उभा राहिला आहे ?’
परंतु त्याचे त्यालाच उत्तर मिळण्यापूर्वी त्या सिंहाने त्याला विचारले, ‘कोण आहेस तू? आणि तू या अरण्यात काय शोधतो आहेस?’

Author