बीव्हर आणि साळू

खूप खूप वर्षांपूर्वी म्हणजे अगदी ट्लिंगट जमात अस्तित्वात येण्यापूर्वी साळू आणि बीव्हर हे चांगले मित्र होते. नेहमी एकमेकांच्या घरी जात येत होते. साळू घरी आली की ती परत जाताना तिचे खूप काटे पडत. बीव्हरला ते आवडत नव्हते. म्हणून बीव्हर ठरवतो की साळूच्या घरी जाऊन तिला कधीही आपल्या घरी येण्याचे आमंत्रण द्यायचे नाही. एके दिवशी साळूने त्याच्या घरी येण्याची इच्छा आहे, असे बीव्हारला सांगितले.

(अलास्कन लोककथा)

माझ्या पाठीवर बसवून माझ्या तळ्यावर असलेल्या घरी मी तुला घेऊन जाईन’ बीव्हर म्हणाला. पण साळू जेव्हा त्याच्या पाठीवर चढून बसली, तेव्हा बीव्हरने तिला नेहमीसारखे सरळ त्याच्या घरी नेले नाही. त्याने तिला तळ्याच्या मध्यावर असलेल्या एका झाडाच्या कापलेल्या बुंध्याजवळ नेले आणि तेथेच उतरायला सांगितले.

‘हे माझे घर आहे’ असे पोहता पोहता बीव्हरने निघताना सांगितले आणि साळूला खोडावर बसवले. साळूला असे संकटात टाकून बीव्हर निघून गेला. पहिल्यांदा साळूला कळलेच नाही की तिचा मित्र तिच्याशी असा का बरं वागला असेल? ती विचार करू लागली की आता या खोडावरून आपली सुटका कशी करून घ्यावी? शेवटी तिने तिची विशेष शक्ती उपयोगात आणली.

Author

Author
लेखकाबद्दल
sachingadkari (29578 लेख)

This is editor1

सर्व लेख पहा →