कविता-गझल-चारोळी-वात्रटिका

जपणुक भारतीय संस्कृतीची

Category:

 

अध्यात्म ही भारतीयांची शक्ती, मानसिक स्वास्थ्य व आत्मिक बळ प्राप्त करून देणारं माध्यम ! जगात वैज्ञानिक क्रांती झाली, तरी भारतीयांनी आपली अध्यात्माची परंपरा सोडलेली नाही. कॅनडात आलेल्या बहूसंख़्य लोकांमध्ये पदवीधर त्यातही तांत्रिक शिक्षण घेतलेल्यांची संख्या अधिक…. नोकरीच्या निमित्तांने त्यांनी देश सोडला; परंतु आपली आध्यात्माची परंपरा कायम जतन केली.

साहित्य - ललित

नायगारा … निसर्गाचा एक अद्भुत चमत्कार !

Category:

 

भारतातील सर्वच प्रमुख नद्यांच्यामागे एखादी लोककथा (दंतकथा) दडलेली आहे. अशीच लोककथा नायगारा धबधब्याच्या बाबतीत असेल का याचा मी विचार करीत होतो. अमेरिका, कॅनडा ही प्रगत राष्ट्रे ! विज्ञान क्षेत्रात त्यांची प्रगती उल्लेखनिय ! त्यामुळे अशा निराधार दंत कथांवर त्यांचा विश्वास नसावा, अशीच माझी भावना! त्यामुळे नदी किंवा धबधब्याबाबत अशी एखादी लोककथा प्रचलित असेल असे मला वाटले नाही. परंतु बोटीत बसून धबधब्याजवळ जाताना कुणीतरी ‘मेड ऑफ दी मिस्ट’ असा शब्दोच्चार  केल्याचे मी ऐकले. ही ‘मेड ऑफ दी मिस्ट’ काय भानगड आहे हे जाणून घ्यायची ओढ लागली; अधिक चौकशीअंती ती एक लोककथा असल्याचे समजले.

साहित्य - ललित

कॅनडा व्हाया लंडन

Category:

 

विदेशदौरा नि तोही विमानातून ……! विचारच न केलेला बरा. सगळे कल्पने पलिकडचे, स्वप्नवत वाटावे असेच ! शेजारच्या शहरात जायचे म्हटले तरी दहा वेळा विचार करावा लागायचा. खर्चाचा कधी ताळमेळ बसायचाच नाही. जग आज प्रगत झालंय, माणूस चंद्रावर जाऊन पोहोचलाय. मंगळ, शुक्राचा तो वेध घेतोय …….. तिथे विमानातून विदेशदौरा, ही तशी आज सामान्य गोष्टच ! त्याचे आश्चर्य वाटण्याचे कारणही नव्हते. पण आम्हा सामान्य माणसांच्या दृष्टीने ही गोष्ट तशी मोठीच !

साहित्य - ललित

मनं खुलविणारी माणसं

Category:

 

विदेशी नि त्यातल्यात्यात पाश्चिमात्य संस्कृतीबद्दल माझ्या मनात गैरसमजाचं काहूर माजलं होतं. पारतंत्र्याच्या काळात भारतीयांवर इंग्रजानी केलेल्या अन्याय, अत्याचारांमुळे त्यांच्याविषयी मनात घृणाच अधिक होती. परंतु सगळेच गोरे तसे नसतात याची अनुभूती कॅनडातील गोऱ्या लोकांच्या बाबतीत मला आली. अनेक चांगल्या, अनुकरणीय गोष्टी इथे पहायला मिळाल्या नि शिकता आल्या. त्यांची आगळी संस्कृती अनुभवता आली.

साहित्य - ललित

सीएन टॉवर ….. एक आधुनिक आश्चर्य !

Category:

 

गगनभेदी इमारती सर्वांचे लक्ष वेधून घेत होत्या. गाईड त्यांचे महत्व विषद करीत होता. फर्स्ट कॅनेडियन प्लेस (1165 फूट), कॉमर्स कोर्ट वेस्ट (942 फूट), ट्रुंप इंटरनॅशनल हॉटेल अँड टॉवर (908 फूट), स्कोशिया प्लाझा (902 फूट), टीडी कॅनडा ट्रस्ट टॉवर (862 फूट), टोरेंटो डोमिनियन बॅंक टॉवर (732 फूट) अशा एका पेक्षा एक टोलेजंग व ऐतिहासिक इमारती प्रेक्षकांना आकर्षित करीत होत्या. पण मला ओढ लागली होती ती सीएन टॉवर पहाण्याची !

साहित्य - ललित

शतकाचा साक्षीदार !

Category:

 

कॅनडात मी जे पाहिलं, अनुभवलं ते कधीच विस्मृतीत जाणारं नव्हतं! मी जेंव्हा एकांतात बसतो तेंव्हा एकएक गोष्ट माझ्या नजरेसमोरून तरळू लागते. माझ्याशी बोलू लागते. तिथल्या निसर्गाची किमया व निसर्गाशी अनुरूप मानवनिर्मित कलाकृती मनाला भुरळ घालतात, एक अनोखा आनंद देऊन जातात. त्यापैकीच एक अविस्मरणीय पर्यटन क्षेत्र म्हणजे अटलांटीक महासगराच्या किनारपट्टीवरील पेगीची खाडी (पेगीज कोव्ह) व शतकाचा शाक्षिदार ठरलेले तिथले लाईट हाऊस!

साहित्य - ललित

मला भावलेले सेंटजॉन

Category:

 

कॅनडाच्या न्युब्रुन्सविक राज्यातील सेंट जॉन हे प्राचीन, ऐतिहासिक व सांस्कृतिक शहर. आकाराने लहान; परंतु पाचुच्या बेटासारखे सुंदर! रस्त्यावर ना माणसांची गर्दी; ना गाड्यांचा गोंगाट. रुंद, स्वच्छ नि सुंदर रस्ते. त्याच्या दुतर्फा उंच व रंगरंगोटी केलेल्या निटनेटक्या इमारती. फुटपाथवरून क्वचितच चालत जाणारी माणसं, पण रस्त्यावरून अविश्रांत संथगतीने धावणाऱ्या गाड्या……सारेच कसे शांत नि शिस्तबद्ध!‘आम्ही स्वप्नांच्या दुनियेत तर नाही ना’, असा प्रथम दर्शनीच भास झाला.