साहित्य - ललित

बृहत्कथा

Category:

 

प्रसिद्ध महाकवी गुणाढ्य नावाच्या पंडिताने पैशाची भाषेत रचलेला कथाग्रंथ. त्यात सात विद्याधरांच्या प्रदीर्घ कथा व त्या अनुषंगाने इतर काही उपकथाही होत्या असे म्हटले जाते. परंतु हा ग्रंथ सध्या मूळ स्वरूपामध्ये उपलब्ध नाही.
पिशाच्च लोकांची भाषा म्हणून प्रसिद्ध असलेल्या पैशाची भाषेमध्ये रचलेला हा एकमेव ग्रंथ होय. या ग्रंथाच्या आधारे अन्य ग्रंथरचना झालेली आढळते.

  June 11, 2026


साहित्य - ललित

सूर्य शतकम्

Category:

 

संस्कृत साहित्यातील एक वैशिष्ट्यपूर्ण प्रकार म्हणजे शतक काव्य. त्याच्या नावातच त्याचे स्वरूप स्पष्ट होते. शंभर पद्यांची रचना. काही वेळा ही काव्ये नीतिशतकासारखी प्रत्येक श्लोक वेगळा असणारी असतात किंवा काही वेळा एक विशिष्ट विषय घेऊन त्यावर रचना केलेली असते. या दुसऱ्या प्रकारात बसणारे एक सुंदर काव्य म्हणजे मयूर कवी विरचित सूर्य शतकम् ! हे मयूर कवी बाणभट्टाच्या समकालीन होते हे निश्चित.

  June 11, 2026


साहित्य - ललित

हितोपदेश

Category:

 

धवलचंद्र नावाने विख्यात असलेल्या बंगालच्या राजाच्या आश्रयाला असलेल्या नारायण पंडिताने संस्कृतात लिहिलेला नीतिकथांचा एक ग्रंथ म्हणजे हितोपदेश. हितोपदेशाच्या अखेरीस नारायण पंडिताचे नाव ग्रंथकर्ता स्वरूपात नोंदवलेले पाहायला मिळते.

  June 11, 2026


साहित्य - ललित

अष्टाध्यायी

Category:

 

संस्कृत भाषेचे अत्यंत महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे तिची व्याकरण शुद्धता. संस्कृतातील पहिल्या सर्वांगपूर्ण अशा व्याकरणाचे कर्ते स्वरूपात सर्वमान्य पाणिनीच्या काळासंबंधी विद्वानांत मतभेद आहेत.

  June 11, 2026


साहित्य - ललित

वेदांत सार

Category:

 

भारतीय संस्कृती म्हटल्यानंतर जगामध्ये सगळ्यात पहिल्यांदा लक्षात येणारी गोष्ट आहे तेथील अध्यात्म. सहा वेगवेगळ्या दर्शनांना भारतीय संस्कृतीमध्ये षटदर्शन म्हणतात. त्यातही प्राधान्याने उत्तर मीमांसा अर्थात वेदांत सर्वोपरी श्रेष्ठ आणि लोकप्रिय दर्शन आहे. वेदांता मध्ये देखील केवल अद्वैत नावाने प्रसिद्ध वेदांत तत्वज्ञान म्हणजेच वेदांत अशीच अनेकांची धारणा आहे.

  June 11, 2026


साहित्य - ललित

पंचतंत्र

Category:

 

विश्वविख्यात पंडित विष्णू शर्मा यांनी पाचव्या शतकात रचलेल्या संस्कृत भाषेतील अक्षर बोधकथांचा जगद्‌विख्यात संग्रह म्हणजे पंचतंत्र.

  June 11, 2026


साहित्य - ललित

चरक संहिता

Category:

 

महर्षी चरक ज्यांचे समकालीन मानले जातात त्या कनिष्काचा काळ अनि‌‌श्चित असल्यामुळे चरकांचा काळही अनिश्चित आहे . या विषयी तिन भिन्न काळ पुढे केले जातात ते असे: इ.स.पू. ५८, इ.स. ७८ किंवा इ. स १२३ यापैकी शेवटच्या पर्यायाला विद्वानांचा सर्वात जास्त पाठिंबा मिळतो.

  June 11, 2026


साहित्य - ललित

अर्थशास्त्र

Category:

 

कौटिल्यांनी रचलेला इ.स.पू. चौथ्या शतकातील संस्कृत ग्रंथ. सम्राट चंद्रगुप्त मौर्याचे हे गुरू व महामंत्री. कौटिल्य या राजनीतिज्ञाचे विचार व सिद्धांत सांगणारा अर्थशास्त्र हा ग्रंथ. तरी तो कौटिल्यानेच रचला की नाही? याबद्दल मतभेद आहेत.

  June 11, 2026


साहित्य - ललित

नागानंद

Category:

 

संस्कृत साहित्यात श्री हर्षांच्या नावाने विख्यात असणाऱ्या तीन नाटकांपैकी एक अत्यंत सुंदर नाटक म्हणजे नागानंद. आपल्या आगळ्यावेगळ्या त्यागपूर्ण जीवनाच्या संस्कारामुळे हे नाटक संस्कृत प्रेमींमध्ये प्रसिद्ध आहे.

  June 11, 2026


साहित्य - ललित

रत्नावली

Category:

 

श्रीहर्ष विरचित रत्नावली हे साहित्यशास्त्राच्या दृष्टीने अत्यंत आदर्श अशा स्वरूपाचे नाटक आहे. विविध साहित्यशास्त्र ग्रंथांमध्ये यातील उदाहरणे वारंवार देण्यात आलेली आहेत यावरून त्याचे स्वरूप लक्षात यावे.

  June 11, 2026