बृहत्कथा
Category:
साहित्य - ललितप्रसिद्ध महाकवी गुणाढ्य नावाच्या पंडिताने पैशाची भाषेत रचलेला कथाग्रंथ. त्यात सात विद्याधरांच्या प्रदीर्घ कथा व त्या अनुषंगाने इतर काही उपकथाही होत्या असे म्हटले जाते. परंतु हा ग्रंथ सध्या मूळ स्वरूपामध्ये उपलब्ध नाही.
पिशाच्च लोकांची भाषा म्हणून प्रसिद्ध असलेल्या पैशाची भाषेमध्ये रचलेला हा एकमेव ग्रंथ होय. या ग्रंथाच्या आधारे अन्य ग्रंथरचना झालेली आढळते.
June 11, 2026