जगभरातील विविध क्षेत्रातील उल्लेखनीय व्यक्तींचा परिचय.. हा आहे सामान्यज्ञानाचा खजिना…
हिंदी चित्रपटसृष्टीच्या इतिहासात काही अशा युती झाल्या ज्यांनी सिनेमाचा इतिहास कायमचा बदलून टाकला. अशीच एक अभूतपूर्व जुळणी म्हणजे बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन आणि दिग्गज संगीतकार जोडी कल्याणजी-आनंदजी. १९७० आणि १९८० च्या दशकात जेव्हा अमिताभ बच्चन चित्रपटसृष्टीत संघर्ष करत होते आणि नंतर जेव्हा त्यांनी सुपरस्टारपद गाजवले, तेव्हा त्यांच्या पडद्यावरील व्यक्तिमत्त्वाला संगीताची खरी ताकद कल्याणजी-आनंदजी यांनीच दिली. आनंदजी आणि अमिताभ बच्चन यांच्यात केवळ व्यावसायिक संबंध नव्हते, तर अतिशय कौटुंबिक आणि आदराचे नाते होते. अमिताभ बच्चन जेव्हा जेव्हा गाण्याच्या रेकॉर्डिंगसाठी जात, तेव्हा ते सर्वात आधी आनंदजींच्या पत्नीचे पाय छूकर आशीर्वाद घेत असत, इतकी आपुलकी त्यांच्यात होती.
August 2, 2026
बांगलादेशी पार्श्वगायिका रूना लैला यांचा जन्म १७ नोव्हेंबर १९५२ रोजी सिलहट बांगलादेश येथे झाला. भूपिंदर आणि रुना लैला यांनी गायलेलं घरोंदा या चित्रपटातील दो दीवाने शहर में हे गाणं व दमादम मस्त क़लन्दर हे खूपच लोकप्रिय झाले होते. रूना लैला यांनी जयदेव, कल्याणजी-आनंदजी, लक्ष्मीकांत प्यारेलाल व भप्पी लाहिरी यांच्या बरोबर काम केले आहे.
त्यांची काही बंगाली 'साधेर लाऊ बनाईलो मोरे', 'शिल्पी आमी, तोमादेरी गान शोनाबो' ही पण लोकप्रिय आहेत.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ. इंटरनेट
November 17, 2018
हॅलो, इन्स्पेक्टर पेंडसे हियर, होटेल हेरिटेज मर्डर केस, आरामनगर पोलिस ठाणे, यातील खुनी हात कोणता, इ. वाकडकर हियर, बोलकी डायरी, अपुरे स्वप्न, अलविदा, आयपीएस, कावेबाज, मरिच, मी हा असा!!!, युद्ध, वाँटेड, सिनिक, स्मगलर, सैली, ३ सप्टेंबर असं त्यांचं लेखन प्रसिद्ध आहे.
January 4, 2022
शिक्षण बी.कॉम., गेली २० वर्षे संगीतात कार्यरत, पु.ल. देशपांडे ह्यांच्या हस्ते मानपत्र, ई.टी.व्ही./झी.टी.व्ही./सह्याद्री/साम/दूरदर्शन/आकाशवाणी वर गायनाचे कार्यक्रम.
May 29, 2014
रघुनाथ आजगावकर यांना बंगाली भाषा उत्तम येत होती आणि बंगाली संस्कृतीची चांगली माहिती होती. ते बंगाली साहित्याचे अनुवादक होते. त्यांनी १८९५ साली ‘मासिक मनोरंजन’ सुरू केलं आणि पुढे १९०९ साली ‘मासिक मनोरंजन’चा पहिला मराठी दिवाळी अंक काढला होता.
June 25, 2021
ग. दि. माडगूळकर यांचे निधन झाल्यानंतर सन १९८२ पासून अव्याहतपणे त्यांचे कार्य आनंद माडगूळकर पुढे चालवीत आहे. समग्र जीवन यासाठीच समर्पित असून आतापर्यंत गीतरामायणाचे एक हजार हून अधिक प्रयोग देशात आणि परदेशांत सादर केले आहेत.
June 21, 2022
मनमोहन देसाई यांचे वडिल किकुभाई देसाई हे चित्रपट निर्माते व फिल्मालय या स्टुडिओचे मालक होते व बंधू सुभाष देसाई निर्माते होते.त्यांचा जन्म २६ फेब्रुवारी १९३६ रोजी झाला.
मनमोहन देसाई यांना बॉलीवुड मध्ये मनजी या नावाने ओळखले जायचे. मनजीनी बॉलीवूड मधील सुरवात आपले बंधू निर्माते सुभाष देसाई याच्या ‘छलिया’ या चित्रपटापासून केली. मनमोहन देसाई यांनी २० चित्रपट बनवले त्यातील १३ चित्रपट हिट झाले.
मनमोहन देसाई यांच्या अमर अकबर एंन्थनी या चित्रपटाने अमिताभ बच्चन यांना बॉलीवूड मधील वन मैन इंडस्ट्री बनवले. मनमोहन देसाई यांचे लग्न जीवनप्रभा देसाई यांच्या बरोबर झाले, पण १९७९ ला त्याच्या निधनानंतर त्यांचा अभिनेत्री नंदा यांच्या बरोबर साखरपुडा झाला पण ते लग्न होऊ शकले नाही.
मनमोहन देसाई यांचे १ मार्च १९९४ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
February 27, 2017
December 15, 2010
‘प्रिये पाहा’ ही कारेकर यांची प्रकाशित झालेली पहिली ध्वनिमुद्रिका. ‘एचएमव्ही’ कंपनीने ती काढली होती. पुढे प्रभाकर कारेकर यांनी गायलेली नाटय़पदे, भजने, शास्त्रीय गायन आदींच्या अनेक ध्वनिमुद्रिका प्रकाशित झाल्या. महाराष्ट्रासह देशात आणि परदेशातही पं. कारेकर यांच्या दहा हजारांहून अधिक मैफली व कार्यक्रम आजवर झाले आहेत.
July 4, 2022
भेटी लागी जीवा...' सारख्या आर्त अभंगापासून 'कळीदार कपुरी पान...' सारख्या अस्सल बैठकीच्या लावणीपर्यंत आणि 'किलबिल किलबिल पक्षी बोलती...' सारख्या चिमखड्या बालगीतापासून 'जय जय महाराष्ट्र माझा...' सारख्या रांगड्या शब्दांना अतिशय चपखल चालीचे कोंदण देणारे श्रीनिवास खळे यांना बडोदे येथील सयाजीराव गायकवाड संगीत महाविद्यालयात मधुसूदन जोशी यांच्याकडून गाण्याचे पहिले धडे मिळाले. त्यांचा जन्म ३० एप्रिल १९२६ रोजी मुंबई येथे झाला. त्यांना अता हुसेन खाँ, निसार हुसेन खाँ आणि फैयाज हुसेन खाँ यांच्यासारख्या दिग्गजांकडूनही संगीताची तालीम मिळाली. बडोदा आकाशवाणीत संगीतकार म्हणून त्यांनी नोकरी धरली पण त्यांचे आणि संगीताचेही भाग्य मुंबईत होते.
शांताराम रांगणेकर या बालपणीच्या मित्राच्या मदतीने मा.श्रीनिवास खळे मुंबईत आले. त्यानंतर त्यांची संगीतक्षेत्रात बस्तान बसवण्यासाठी धडपड सुरू झाली; रांगणेकर यांनी त्यांना प्रोत्साहन दिले. नवलकर चाळीत राहणाऱ्या रांगणेकर यांच्या कुटुंबात सतरा जणांचा समावेश होता; त्यात खळे यांची भर पडली. रांगणेकरांनी खळेंना आपल्या कुटुंबात सामावून घेतले; एवढेच नाही, तर आपल्या खिशातील आठ आण्यांतील सहा आणे ते खळे यांना जेवणाचा डबा आणि रेल्वेच्या पासासाठी देत असत. सुरुवातीच्या धडपडीच्या काळात खळे तेव्हाचे विख्यात संगीतकार डी. पी. कोरगावकर म्हणजेच के. दत्ता यांच्याकडे सहायक म्हणून काम करू लागले. स्वरांच्या सान्निध्यातच जीवनाचा आनंद घेण्याची आंतरिक इच्छा आणि स्वप्न पूर्तीसाठीचे प्रयत्न सुरूच होते. त्यातून त्यांना "लक्ष्मीपूजन' या चित्रपटासाठी संगीत देण्यासाठी बोलावण्यात आले. त्या चित्रपटातील गाणी ग. दि. माडगूळकर यांनी लिहिली होती. पण मुंबईत आल्यानंतर खळे यांनी केलेली पहिली स्वररचना गुजराती गाण्यासाठी होती; या गीताला स्वर दिला होता तलत मेहमूद यांनी.
खळे यांनी "लक्ष्मीपूजन' या चित्रपटानंतर "यंदा कर्तव्य आहे' या चित्रपटाला संगीत दिले. त्यातील "गोरी गोरी पान' हे गाणे अत्यंत लोकप्रिय ठरले. त्यानंतर "जिव्हाळा', "बोलकी बाहुली', "पळसाला पाने तीन', "सोबती' या चित्रपटांना खळे यांचे संगीत लाभले. त्यांच्या चित्रपटांची संख्या मोजकीच राहिली. पण आकाशवाणीने या श्रेष्ठ संगीतकाराच्या प्रतिभेला व्यासपीठ उपलब्ध करून दिले. "निळा सावळा नाथ', "कळीदार कपुरी पान', "सहज सख्या एकटाच' ही गाणी आकाशवाणीवरून लोकप्रिय झाली आणि "शुक्रतारा मंदवारा' या गीताने तर लोकप्रियतेचा कळस गाठला. अरुण दाते आणि सुधा मल्होत्रा यांचे स्वर लाभलेले हे गाणे पहिल्यांदा मुंबई आकाशवाणीच्या "भावसरगम' कार्यक्रमातून रसिकांपुढे आले. या भावगीतानेच अरुण दाते या सुरेल गायकाची ओळख मराठी श्रोत्यांना झाली. मा.पु. ल. देशपांडे, केशवराव भोळे, मंगेश पाडगावकर, वा. रा. कांत, यशवंत देव असे दिग्गज आकाशवाणीत श्रीनिवास खळे यांचे सहकारी होते.
आकाशवाणीत असताना त्यांनी "विदूषक', "पाणिग्रहण' आणि "देवाचे पाय' या नाटकांना संगीत दिले. ते १९६८ मध्ये "एच.एम.व्ही.'च्या (हिज मास्टर्स व्हॉईस) मराठी विभागाचे संचालक झाले. त्यांच्या चाली अवघड असतात असे म्हटले जाते; परंतु त्यावर खळे यांचे उत्तर असे असायचे, ""माझ्या चाली गायला अवघड असल्याची तक्रार मला मान्य आहे. पण माझी प्रत्येक चाल ही सर्वस्वी माझीच असली पाहिजे. माझ्यानंतर किमान १०० वर्षे तरी या चाली रसिकाला आवडल्या पाहिजेत, यासाठी माझा प्रयत्न असतो.'' "एचएमव्ही'मध्ये असताना त्यांनी विविध प्रकारच्या कॅसेट काढल्या. "अभंग तुकयाचे', "राम शाम गुण गान', "अभंगवाणी' असे त्यांचे "अल्बम' अत्यंत लोकप्रिय ठरले. भेटी लागी जीवा...' सारख्या आर्त अभंगापासून 'कळीदार कपुरी पान...' सारख्या अस्सल बैठकीच्या लावणीपर्यंत आणि 'किलबिल किलबिल पक्षी बोलती...' सारख्या चिमखड्या बालगीतापासून 'जय जय महाराष्ट्र माझा...' सारख्या रांगड्या शब्दांना त्यांच्या अतिशय चपखल चालीचे कोंदण लाभले होते.
खळे यांच्या संगीत रचनांना अनेक गायकांनी स्वर दिला आहे. मा.खळे यांनी फारच मोजक्या चित्रपटांना संगीत दिले, त्याचे कारण म्हणजे स्वत:च्या मनाला आनंद देईल अशाच चालींची त्यांनी निर्मिती केली. मागणी तसा पुरवठा हे तत्वच त्यांना मान्य नाही. त्यामुळे कैक चित्रपटांचे प्रस्ताव त्यांनी फेटाळून लावलेत. यंदा कर्तव्य आहे,बोलकी बाहुली,जिव्हाळा,पोरकी,सोबती,पळसाला पाने तीन अशा काही मोजक्याच चित्रपटांना त्यांनी संगीत दिले. खळे यांनी अनेक वर्षांनंतर "कळी' या मराठी चित्रपटाला संगीत दिले होते. खळे यांना आपल्या प्रदीर्घ, स्वरमय कारकिर्दीत अनेक पुरस्कार आणि मानसन्मान लाभले होते. श्रीनिवास खळे यांना पद्मभूषण पुरस्कार देऊन भारत सरकारने सन्मानित केले होते. श्रीनिवास खळे यांचे २ सप्टेंबर २०११ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
श्रीनिवास खळे नक्षत्राचे देणे.
https://www.youtube.com/watch?v=KCWhc4XgRE4
https://www.youtube.com/watch?v=Q9mVK0BLUgA
https://www.youtube.com/watch?v=duI_pIz9SlM
https://www.youtube.com/watch?v=BfOKjCLHVZw
https://www.youtube.com/watch?v=O-tcQdcNZoY
https://www.youtube.com/watch?v=tBA-8FKXmrQ
https://www.youtube.com/watch?v=PDjfG6zBKZc&list=PLB81B18245264CEF7&index=7
https://www.youtube.com/watch?v=L5jfG1Nja1U&list=PLB81B18245264CEF7&index=8
https://www.youtube.com/watch?v=C1Q9-BfNxmU&list=PLB81B18245264CEF7&index=9
https://www.youtube.com/watch?v=PveG3siOos0&index=10&list=PLB81B18245264CEF7
https://www.youtube.com/watch?v=Um87jA1RU4s&list=PLB81B18245264CEF7&index=11
https://www.youtube.com/watch?v=nY3_LvxHtKQ&list=PLB81B18245264CEF7&index=12
September 2, 2017
Copyright © 2025 | Marathisrushti