जगभरातील विविध क्षेत्रातील उल्लेखनीय व्यक्तींचा परिचय.. हा आहे सामान्यज्ञानाचा खजिना…
स्थापना : ४ फेब्रुवारी १७६८
भारतात अडीचशे वर्ष पूर्ण झालेल्या अगदी मोजक्या रेजिमेंट आहेत. त्यातली 'मराठा लाइट इन्फंट्री' ही एक अत्यंत मानाची रेजिमेंट आहे. मराठा लाइट इन्फंट्री रेजिमेंट (एम.एल.आय.आर.) ही भारतीय सेनेतील सैन्यदल असून सर्वात जुन्या सैन्यदलांपैकी एक आहे. सुरुवातीला याची ओळख ब्रिटिश लष्करातील जंगी पलटण म्हणून होती. १८०२ च्या सुमारास याला रेजमेंटचा दर्जा देण्यात आला. लाईट इंन्फंट्री म्हणजे मोजक्या सैनिकांची चपळपणे हालचाली करू शकणारी पलटण. सैनिक याचे प्रशिक्षण केंद्र बेळगाव येथे आहे. यातील सैनिकांना गणपत असेही संबोधतात. अश्या सहा बटालियन्स सैन्यात होत्या. या बटालियन्स एकत्रित करून त्याचे लाईट इन्फंट्री रेजिमेंटमधे रुपांतर करण्यात आले. मराठा लाईट इन्फंट्रीचे चिन्ह हे अशोकचक्र, ढाल तलवार व तुतारी हे आहे.
मराठा रेजिमेंटचे मुख्यालय बेळगावात आहे. मराठा लाइट इन्फंट्री रेजिमेंटचा पोशाख हिरवी बेरेट, त्यावर लाल हिरव्य़ा पिसांचा तुरा, हिरवी लॅनयार्ड. ही लॅनयार्ड खांद्यावर नसून गळ्याभोवती असते. या पद्धतीने लॅनयार्ड असण्याचा मान फक्त यांनाच आहे. त्यांचा बिल्ला म्हणजे शिकारीच्या वेळेस वाजवण्यात येणार बिगूल हा आहे. पुर्वी ५ नेटीव्ह इन्फंट्रीच्या पुर्वीहे सैनिक त्यांच्या फेट्यावर काळ्या पिसांचा तुरा लावत असत. त्या तुर्याहमुळे या बटालियनला “काळी पाचवी” असेही म्हटले जात असे. आजही हे नाव प्रचलित असलेले आढळते. आपल्या नावाला जागत या रेजिमेंटचे जवान मार्चिंग मध्ये मिनीटाला १२० पावले टाकतात.
या सैनिकांनी अबेसिनीया, मेसोपोटेमिया या देशात, जनरल एलनबी यांच्या नेतॄत्वाखाली, वाळवंटातून पॅलेस्टाईनमधे दूरवर अंतरे वेगाने कापली. येथे असलेल्या हालआपेष्टांना ज्या तडफेने तोंड दिले. इटलीमधील केरेन व आसाम, ब्रह्मदेशमधील जंगलात त्यांनी निसर्गावर मात करून जपान्यांशी घनघोर युद्ध केले. या सगळ्या युध्दातून त्यांनी शौर्याच्या बाबतीत जगाच्या सगळ्या फौजांना मागे टाकले आहे.
त्या युध्दात त्यांनी गाजवलेल्या पराक्रमासाठी त्यांना मान म्हणून चांदीचा ड्रम प्रदान करण्यात आला.
आफ्रिकेत सोमालीया येथे पाठवण्यात आले. त्या देशात पहिल्या महायुद्धापर्यंत त्यांचा मुक्काम होता. ही या सैन्याची बाहेरील कामगिरी होय.
मराठा लाइट इन्फेंट्रीची युद्धगर्जना "बोला श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय...!!" अशी जबरदस्त आहे...
हि एकमेव युद्धगर्जना जी देवाच्या नावाने नसून एका राजाच्या, एका महापुरूषाच्या नावाने आहे...
मराठा लाईट इन्फ्रंट्रीची युद्धगर्जना 'छ.शिवाजी महाराज की जय' ही कधीपासुन दिली जाऊ लागली हे पाहणे सुध्दा रंजक ठरेल.
१९४१ साली दुसऱ्या महायुद्धात आफ्रिकेत आत्ताच्या इथियोपियाच्या म्हणजे त्याकाळच्या ॲबेसिनीयाच्या उत्तरेस एक छोटासा देश होता त्याचं नाव इरेट्रिया. या इरेट्रियात एक केरेन नावाचा प्रांत आहे.या प्रांतात उंच अशा डोंगररांगा आहेत.या डोंगररांगेवर एक किल्ला इटालियन सैनिकांच्या ताब्यात होता त्याचं नाव "डोलोगोरोडाँक".हा किल्ला जिंकून घेण्यासाठी ब्रिटिशांतर्फे मराठा रेजिमेंट लढत होती.बराच प्रयत्न करून सुद्धा हा किल्ला त्यांच्या ताब्यात येत नव्हता.परंतु या मराठा रेजिमेंटमध्ये एक 'श्रीरंग लावंड' नावाचे एक सुभेदार होते, त्यांनी ब्रिटिशांना सांगितलं आम्हांला शिवाजी महाराजांचं नाव घ्यायची परवानगी द्या आम्ही हा किल्ला तुम्हाला जिंकून देऊ. पण ब्रिटिश ही परवानगी देण्यासाठी घाबरत होते कारण महाराजांचं नाव घेऊन यांनी बंदुका आपल्यावरच रोखल्या तर? पण त्यांना किल्ला घेण्याशी मतलब असल्यामुळं त्यांनी ही परवानगी दिली.
नंतर आपल्या लोकांनी 'बोला छत्रपती शिवाजी महाराज कि जय' म्हणत एका रात्रीत किल्ला जिंकून घेतला आणि त्यानंतर मराठा लाइट इन्फ्रंट्रीने ही battlecry म्हणजे युद्धगर्जना अधिकृत केली. या युद्धगर्जनेमुळे केवळ सह्याद्रीतच नव्हे तर जगाच्या पाठीवर कोठेही प्रेरणा मिळाल्याशिवाय रहाणार नाही.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
February 4, 2019
सौंदर्याचं दुसरं नाव ऐश्वर्या राय आहे. अनेकांकडे सौंदर्य असतं आणि वरचा मजला रिकामा असतो. ऐश्वर्या त्याही बाबतीतही ऐश्वर्यसंपन्न आहे.
November 3, 2016
दीपिका पदुकोणचा जन्म ५ जानेवारी १९८६ रोजी डेन्मार्कच्या कोपेनहेगन येथे झाला. तिचे लूक्स हे आजच्या पिढीतील मुलींना भावणारे आहेत. लाखो मुलींसाठी ती स्टाईल दीवा तर आहेच पण अनेकजणी तिची ही स्टाईल फॉलोदेखील करतात. दीपिकाने बॉलिवूडमध्ये 'ओम शांती ओम' सिनेमामधून पदार्पण केले. हा सिनेमा २००७ मध्ये रिलीज झाला होता. तिला पहिल्याच सिनेमात बॉलिवूड किंग खानसोबत काम करायची संधी मिळाली. हा सिनेमा हिट झाला आणि त्यानंतर दीपिकाच्या अनेक सिनेमांनी बॉक्स ऑफिसवर धूम घातली. दीपिकाने अनुपम खेर यांच्या अॅयक्टिंग इंस्टिट्यूटमध्ये अभिनयाचे धडे गिरवले आणि शामक डावर यांच्याकडून डान्स शिकली. दीपिकाचा 'ऐश्वर्या' हा कन्नड भाषेतील पहिला सिनेमा होता. आज ती आज बॉलिवूडमधील एक प्रसिध्द अभिनेत्री असून २००६ मध्ये 'फिमेल मॉडल ऑफ द इयर' आणि 'फ्रेश फेस ऑफ द इयर'चा मान पटकावला. 'ये जवानी है दिवानी', 'चेन्नई एक्सप्रेस', आणि 'गोलियों की रासलीला-रामलीला', हॅपी न्यू 'इयर', ये जवानी है दिवानी, पिकू, रामलीला, बाजीराव मस्तानी हे ब्लॉकबस्टर चित्रपट देणारी दीपिका. हे तिचे हिट ठरलेले सिनेमे. दीपिका प्रसिध्द बॅटमिंटन खेळाडू प्रकाश पदुकोण यांची मुलगी आहे आणि तिची आई उज्वला एक ट्रॅवल एजंट आहेत. दीपिकासुध्दा एक बॅटमिंटन खेळाडू आहे. ती राज्य आणि राष्ट्रीय पातळीवर बॅटमिंटन आणि बेसबॉस खेळली आहे. बंगळूरु येथून शालेय शिक्षण आणि माउंट कॅरमल महाविद्यालयातून पदवीपर्यंत शिक्षण पूर्ण केले आहे. जेव्हा ती पदवीचे शिक्षण घेत होती तेव्हा तिला मॉडलिंगची ऑफर आली होती. तिने मॉडलिंग एक छंद म्हणून केली, परंतु नंतर तिने या छंदाला गांभीर्याने घेतले आणि अनेक जाहीरातीत ती झळकली. म्हटले जाते, की दीपिकाला अभिनेत्री होण्याची इच्छा नव्हती. तिच्या म्हणण्यानुसार फिल्म इंटस्ट्रीमध्ये येण्याचा तिने कधीच विचार केला नव्हता. परंतु आज ती यशस्वी अभिनेत्रींमध्ये सामील आहे. सांगायचे झाले तर, तिचे नाव अनेक लोकांसोबत जोडण्यात आले आहे.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
January 5, 2018
केंडे यांनी “यदाकदाचित”, “जागो मोहन प्यारे”, इत्यादी नाटकं, “शुभं करोती”, “सपनोसे भरे नैना”, “हम है लाईफ” अशा मराठी व हिंदी मालिका तसेच “गोजिरी”, “ती रात्र”, “तुला शिकवीन चांगला धडा”, “शर्यत”, “हाय काय नाय काय” इत्यादी चित्रपटांसाठी ध्वनी रचना केली.
May 23, 2014
त्यांची १८९४ सालची ‘द ग्रेट गॉड पॅन’ ही दीर्घकथा ही आदर्श भयकथा म्हणून नावाजली गेली आणि स्टीफन किंगसारख्या मातब्बर लेखकाच्या मते तर, ती इंग्लिश भाषेतली सर्वोत्तम भयकथा ठरावी!
December 15, 2021
एक शिस्तबद्ध अभिनेते आणि दिग्दर्शक अशी ओळख असणार्या् दिलीप कुलकर्णी यांनी अनेक मराठी नाटकं, चित्रपट व दूरचित्रवाणी मालिकांमधुन चरित्रात्मक भुमिका साकारल्या होत्या. मा.सुरेश खरे यांच्या “एका घरात होती” या नाटकाद्वारे त्यांनी रंगभूमीवर पदार्पण केले. “बखर एका राजाची”, “अफलातून”, “घरोघरी” ही नाटके व “चौकट राजा”, “आक्रित”, “रात्र आरंभ” या चित्रपटांतील त्यांच्या भूमिका लोकप्रिय ठरल्या. ‘ओली’ या नाटकात त्यांनी शरीरभाषेचा केलेला वापर हा अभिनेता म्हणून एक आदर्श वस्तुपाठ होता. संवेदनशील मनाच्या मा.दिलीप कुलकर्णी यांना प्रत्येक गोष्ट चांगलीच झाली पाहिजे,याचा सतत ध्यास असे.”आपलं बुवा असं आहे!” ही त्यांच्या कारकीर्दीतील सर्वात अप्रतिम भूमिका ठरली होती.
दिलीप कुलकर्णी यांचे २२ डिसेंबर २००२ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
December 22, 2018
ज्या काळात महिला घराबाहेर सुद्धा फारशा पडत नसत. गायन आणि संगीत यांचं वास्तव्य फक्त माडीवरच असत, अशा संगीताच्या कोंडलेल्या काळात हिराबाईंनी संगीत माडीवरून माजघरात आणलं. त्यांचा जन्म ६ जानेवारी १९२८ रोजी झाला. त्यावेळी समाजाचा तीव्र रोष पत्करून सुद्धा आपल्या शांतवृत्तीनी त्यांनी संगीताला आणि विशेष म्हणजे स्त्रियांच्या गायनाला समाजात प्रतिष्ठा मिळवून दिली. त्याकाळी हिराबाईंच्या रूपाने स्त्रियांसाठी एक नवी वाट मोकळी झाली म्हणजेच आपल्या गायकीनी त्यांनी त्यावेळी क्रांती घडवून आणली. बालगंधर्वांनी सुद्धा हिराबाईंच्या गाण्याला, त्यांच्या सात्विक सूराला गौरविले होते.
हिराबाई बडोदेकर ख्याल, ठुमरी, मराठी नाट्य संगीत, भजन मध्ये तज्ञ होत्या. त्यांना लोकांमध्ये हिंदुस्तानी शास्त्रीय संगीत लोकप्रिय करण्याचे श्रेय जाते. त्यांच्या मैफिली अतिशय लोकप्रिय होत असत. त्यांचा गोड आणि नाजूक आवाज खूप लोकप्रिय होते. हिराबाई बडोदेकर यांनी किराणा घराण्याला अधिक लोकप्रिय करण्याचे काम केले. हिराबाई बडोदेकर यांनी "सुवर्णा मंदिर", " प्रतिभा ", " जनाबाई " अशा अनेक चित्रपटात अभिनय केला. संगीत शिकवण्यासाठी संगीत विद्यालय, नूतन संगीत विद्यालय नावाने सुरू केले. हिराबाई ह्या फार लवकरच्या कारकिर्दीत रेकॉर्डिंग कलाकार झाल्या. ध्वनिमुद्रिकांच्या द्वारे आणि रेडिओवर नित्यनियमाने होणा-या कार्यक्रमांमुळे हिराबाई खूपच लोकप्रिय झाल्या.
नाटयसंगीताच्या हिराबाईंच्या सुमारे ४८ ध्वनिमुद्रिका प्रसिध्द झाल्या, चित्रपटसंगीताच्या अवघ्या तीनच ध्वनिमुद्रिका निघाल्या. शास्त्रीय संगीताच्या सुमारे चाळीस ध्वनिमुद्रिका प्रकाशित झाल्या. तसेच 'राधेकृष्ण बोल', 'गिरीधर गोपाला',(खमाज), 'पायोरे मैने' दुर्ग), 'चाकर राखोजी', यासारखी भजने आहेत. पाच ठुम-या आहेत तर, 'किस कदर है', 'या आकर हुआ मेहमान', या गझला आहेत. हिराबाईंचा भैरवी हा आवडता राग होता. १९७० पर्यंत हिराबाईंच्या सुमारे १७५ ध्वनिमुद्रिका प्रसिध्द झाल्या. मा.हिराबाई रेडिओवर प्रथम गायल्या ते १९२९ मध्ये तेव्हा रेडिओ सुरू होऊन त्यावेळी अवघी दोन वर्षे झाली होती. त्यानंतर त्यांचे कार्यक्रम सातत्याने रेडिओवर होऊ लागले. १९२९ पासून ते १९७३ मध्ये हिराबाई गायनातून निवृत्त हाईपर्यंत, म्हणजे जवळ जवळ ४५ वर्षे त्या रेडिओवरून गायल्या. ध्वनीमुद्रिका आणि आकाशवाणी ही दोन प्रभावी माध्यमे उपलब्ध झाल्यामुळे हिराबाईंच्या सुरेल गीतांचा सुगंध दुरवर तर पसरलाच परंतू आजच्या पिढीत त्यांची गाणी रसिक आवर्जून ऐकतात. हिराबाई बडोदेकर यांचे २० नोव्हेंबर १९८९ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
May 20, 2017
‘नयन तुझे जादुगार’ हे नाटक कांबळी यांच्या नाट्यप्रवासात महत्त्वाचा टप्पा ठरले. ‘वात्रट मेले’हे त्यांचे गाजलेले नाटक आहे. ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर यांनी सादर केलेला ‘हसवा फसवी’ हा कार्यक्रम रसिकांच्या लक्षात असेल. प्रभावळकर यांनी यात सहा वेगवेगळ्या प्रकारच्या भूमिका साकारल्या होत्या. कार्यक्रमात सुरुवातीपासून ते अगदी शेवटपर्यंत नाटक तोलून धरणारी ‘वाघमारे ’ही एक महत्त्वाची व्यक्तिरेखा होती. ज्येष्ठ अभिनेते लीलाधर कांबळी यांनी ती भूमिका आपल्या सहजसुंदर अभिनयाने खुलविली. म्हटले तर भूमिका ‘रिप्लेसमेंट’ची होती. कारण आधी ही भूमिका रमाकांत देशपांडे व नंतर डॉ. हेमू अधिकारी आलटून पालटून करत होते. या दोघांनाही काही कारणाने ती करणे शक्य झाले नाही आणि ती भूमिका लीलाधर कांबळी यांच्याकडे आली आणि कांबळी यांनी ती समर्थपणे पेलली.
July 2, 2021
टूनटून यांचे खरे नाव उमा देवी खत्री होते. त्यांचा जन्म १ जानेवारी १९२३ रोजी झाला. १९४०-४५ चा काळ होता, रम्य अशा दिवसातली ती सकाळची वेळ होती, संगीकार नौशादजी आपल्या आशियाना या घरात हार्मोनियमवर गाण्याचे स्वर काळ्या पांढरीच्या शृंगारात बसवत होते. इतक्यात त्यांच्या दारावर थाप पडली. पाठोपाठ आणखी थापा पडल्या. डोअर बेल न वाजवता दारावर कोण सलग थापा मारतंय हे बघण्यासाठी त्यांनी दरवाजा उघडला आणि समोर कोणीच नव्हते, ते दार बंद करणार इतक्यात बाजूला लपलेली एक १२- १३ वर्षांची धिटूकली समोर आली. तिने त्यांच्या पायाला मिठीच मारली ! ते तिच्याशी बोलण्याआधी तिने भोकाड पसरले, ते तिला घरात घेऊन आले. तिची विचारपूस केली तेंव्हा ती बोलती झाली. ती म्हणाली, "मला तुम्ही गायनाची संधी दिली नाही तर मी इथल्याच समुद्रात जीव देईन !" गावात असताना रेडीओवर गाणी ऐकून ऐकून तिने एकलव्यी बाण्याने रियाझ केलेला, इतकीच काय ती तिची गायनाची तयारी पण तिचा आवाज मधुर असल्याने तिचा स्वतःवर विश्वास होता अन तिच्या डोक्यात सतत नौशादजींचे वेड असे.
या शिदोरीवर तिने घर सोडून वयाच्या १३ व्या वर्षी थेट मुंबई गाठली होती. नौशाददेखील युपीच्या लखनौचेच असल्यामुळे त्यांना तिची काळजीही वाटत होती. नौशादजीनी तिच्या अशा या पार्श्वभूमीमुळे काही दिवस काम दिले नाही अन एके दिवशी तिची ऑडीशन घेतली आणि ते अचंबित झाले ! या मुलीचे नाव उमा देवी होय ....गाण्याचे वेड डोक्यात घेऊन आलेल्या उमादेवीच्या आयुष्यात पुढे अनेक चढउतार येऊन ती एक हसण्याजोगी बाब होणार आहे याचा तिला तिळमात्र अंदाज नव्हता. त्या दिवशी नौशादजींनी तिला ऐकले अन तिला पार्श्वगायनासाठी तत्काळ निवडले. तिची वर्णी इतरत्र लागू नये म्हणून नौशादजींनी ए. आर. कारदार यांना गळ घातली, नौशाद म्हणजे त्या काळाचे सर्वात मोठे संगीतकार असल्याने त्यांचा शब्व्द डावलणे अशक्य होते. तत्काळ उमादेवीची निवड शैलीदार सोनेरी आवाजाची गायिका म्हणून ए. आर.कारदार प्रॉडक्शन हाऊससाठी झाली, तिच्याशी करार केला गेला, तिचे मासिक वेतन ५०० रुपये ठरवले गेले. पण एक अट होती तिने ३ वर्षे दुसरया प्रॉडक्शन हाऊससाठी गायचे नाही.
त्यांना गाण्यासाठी लगेच सिनेमे मिळाले दर्द, दिल्लगी, चांदनी रात, नाटक पैकी 'दर्द' मधील शकील बदायुनी यांनी लिहिलेलं' अफसाना लिख रही हुं' ने तिला रातोरात प्रसिद्धीच्या झोतात आणले सुरैयाबरोबरचे 'बेताब है दिले दर्द' ने तिला आणखी प्रसिद्धी मिळाली. दर्द नंतर मेहबूब खानच्या 'अनोखी अदा' मधलं 'काहे जिया डोले' आणि 'दिल को लगाके हमने कुछ भी न हमने पाया. 'हे गाणंही हिट झालं. पण उमादेवी मात्र करारात बांधल्या गेल्या असल्यामुळे इतर संधींना मुकत गेल्या अन त्यांना हळूहळू गायकीसाठी इतर प्रॉडक्शन हाऊसची दारे जवळजवळ बंद झाली अन तिचे करारबद्ध प्रॉडक्शन हाऊसच शेवटी बंद पडले. अन उमा देवी गायिकेच्या भूमिकेतून स्ट्रगलरच्या फेऱ्यात अडकली. त्या कामासाठी फिरू लागल्या. त्या गव्हाळ वर्णाच्या, थोडीशी जाड अंगाची, किंचित बसक्या चणीची होत्या, दिसायला लाखात एक वगैरे अशी काही नव्हत्या पण ती अगदी जेमतेम सौंदर्यवती होती अशी बाब होती. गायकीत नाव झाले तरी हरकत नाही पण अपयशाचा शिक्का घेऊन गावाकडे तिला परत जायचे नव्हते. त्यामुळे गाण्यातील संधींनी तोंड फिरवल्यामुळे तिने अभिनयासाठी प्रयत्न सुरु केले, एखादा रोल मिळतो का यासाठी ती वेगवेगळ्या प्रॉडक्शन हाऊसचे उंबरठे झिझावू लागल्या. त्याचा गायकीचा प्रवास थांबला, नायिका होण्याचे स्वप्न भंगले अन ती बॉलीवूडची पहिली महिला कॉमेडीयन म्हणून नावारूपाला आली.
१९५० मध्ये नौशाद यांचीच निर्मिती असलेला बाबुल हा सिनेमा सेट वर आला. या सिनेमातील नर्गिसच्या मैत्रिणीच्या - मुन्शीजीच्या मुलीच्या विनोदी भूमिकेसाठी तिला विचारणा झाली प्रेक्षकांनी या सिनेमातील उमादेवीच्या पात्रावरही प्रचंड कौतुकाचा वर्षाव केला, या पात्राचं नाव होतं टूनटून! हे नाव पुढे उमादेवीला आयुष्यभर चिकटले. त्यांची गायिका ही मूळ ओळख या सिनेमाने पुसून काढली अन टूनटून हे नाव जन्मास आले. जॉनी वॉकर, मेहमूद, धुमाळ, आगा, मुक्री, केष्टो मुखर्जी, भगवानदादा अशा अनेक कॉमेडीयन्स सोबत त्यांनी सिनेमे केले पण कधी कुणाशी नाव जोडू दिले नाही. टूनटून यांचा समाजावर इतका प्रभाव पडला की टूनटून या शब्दाचा अर्थच जाडी मुलगी असा होऊन गेला. टूनटूनने केलेल्या गुरुदत्तच्या आर-पार, मिस्टर और मिसेस फिफ्टी फाईव मधील आणि आबरू, एक राज, प्यासा, शराफत, दिल और मोहब्बत मधील भूमिका विशेष गाजल्या. १९५० ते १९६०च्या दशकातील ५० सिनेमात त्यांनी काम केलं. मा. उमादेवी उर्फ टूनटून यांचे २४ नोव्हेंबर २००३ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ. समीर गायकवाड / इंटरनेट
उमादेवी उर्फ टूनटून यांनी गायलेली काही गाणी
मेरी प्यारी पतंग
अफसाना लिख रही हुं
दिलवाले
January 1, 2018
१९५३ मध्ये पंतप्रधानांनी फरीदाबाद शहराची नव्याने नियोजन करून उभारणी करण्याचे काम त्यांच्यावर सोपवले. नंतर चिंतामणराव देशमुख यांनी त्यांना अर्थखात्याच्या कामासाठी बोलावून घेतले. या काळात आंतरराज्य विक्रीकर कायदा, खासगी विमा कंपन्यांचे LIC मध्ये विलीनीकरण झाले. पुढे १९५७ मध्ये ते PWD चे सचिव झाले. या काळात कोयना धरण बांधायला जागतिक बँकेकडून कर्ज घेण्यासाठी अर्थखात्याचे प्रतिनिधी म्हणून ते अमेरिकेला गेले, कोयना धरणासाठी त्यांनी अडीच कोटी डॉलर्सचे कर्ज मंजूर करून घेतले.
March 15, 2022
Copyright © 2025 | Marathisrushti