जगभरातील विविध क्षेत्रातील उल्लेखनीय व्यक्तींचा परिचय.. हा आहे सामान्यज्ञानाचा खजिना…
गझलसम्राट मेहंदी हसन यांचा जन्म १८ जुलै १९२७ रोजी राजस्थान येथे झाला. मेहंदी हसन यांनी गायनाचे धडे वडील उस्ताद अझीम खॉं आणि काका उस्ताद इस्माईल खॉं यांच्याकडून गिरविले. ते दोघेही पारंपरिक धृपद गायक होते. त्यांचे कुटुंब वाद्यनिर्मिती उद्योगातही होते. फाळणीनंतर त्यांच्या कुटुंबाने पाकिस्तानात स्थलांतर केले. पंजाब प्रांतातील चिचवटनी गावात ते स्थायिक झाले. पाकिस्तानात ते एका सायकलीच्या दुकानात काम करीत होते. नंतर त्यांनी मोटार आणि ट्रॅक्टार मेकॅनिकचेही काम केले. काम करीत असतानाही त्यांनी गायनाचे धडे गिरविणे सुरू ठेवले होते. पुढील काळात ते ठुमरी गायनाकडून गझल गायनाकडे वळले. कुटुंबाला आर्थिक मदत व्हावी, या हेतूने ते गझल गायनाचे कार्यक्रम करीत असत. गझलगायन सुरू केल्यानंतरही त्यांनी शास्त्रीय गायनाचा रियाझ कायम ठेवला होता. पाकिस्तान रेडिओवर पहिल्यांदा १९५७ मध्ये त्यांना ठुमरी गायनाची संधी मिळाली. नंतर त्यांनी पाकिस्तानी चित्रपटांसाठी गीतगायन सुरू केले. "गुलो में रंग भरीये‘ हे त्यांचे "फरंगी‘ या १९६४ च्या चित्रपटातील गीत त्यांचे पहिले चित्रपटगीत होते.
"पत्ता, पत्ता, बूटा, बूटा‘, "अब के हम बिछडे‘, "रंजिश ही सही दिल ही दुखाने के लिए आ‘, "तडप ना मेरे दिल, किसी की आस में, हजार तिल्खियॉं, तेरी प्यास में..‘ अशा एकापेक्षा एक सरस आणि अविट गोडीच्या गझल मेहंदी हसन यांनी रसिकांना दिल्या. अब के बिछडे आणि पत्ता पत्ता बुटा बुटा या त्यांनी गायलेल्या गझल विशेष लोकप्रिय होत्या. मेहंदी हसन यांनी गझलेला एक वेगळीच उंची प्राप्त करून दिली. मेहंदी हसन यांचे १३ जून २०१२ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ:- इंटरनेट
मेहंदी हसन यांच्या गाजलेल्या काही गझला
https://www.youtube.com/watch?v=K-92Z3OXWZQ
https://www.youtube.com/watch?v=_52zfKw5KoE&t=526s
June 13, 2017
त्याच्या कादंबऱ्यांवर युद्धपट निघाले, ते गाजलेही. त्यातलाच एक गाजलेला चित्रपट म्हणजे ‘व्हेअर ईगल्स डेअर’. ब्रायन हट्टन या दिग्दर्शकाने रीचर्ड बर्टन आणि क्लिंट इस्टवूड या जोडगोळीला घेऊन बनवलेला हा एक हिट चित्रपट.
February 2, 2022
December 15, 2010
वयाच्या दहाव्या काररेसिंगच्या खेळात उतरलेला कोल्हापूरचा कृष्णराज महाडिक आता अमेरिकेतील मोटार रेसिंग स्पर्धेत ६० देशांच्या स्पर्धकांशी स्पर्धा करणार आहे. आतापर्यंत ज्युनिअर गटात राष्ट्रीय स्तरावरील दहा मानाच्या ट्रॉफीज त्याने मिळवल्या आहेतच.
कृष्णराज महाडिक यांच्याविषयी महाराष्ट्र टाईम्सच्या म.टा. नोंद या सदरात प्रकाशित झालेला वेगाचा फॉर्म्युला हा लेख पुढील पानावर वाचा.
कृष्णराज महाडिक यांच्याविषयी महाराष्ट्र टाईम्सच्या म.टा. नोंद या सदरात प्रकाशित झालेला वेगाचा फॉर्म्युला हा लेख वाचा.
September 7, 2015
त्यांच्या प्रत्येक बॅनर मागे एक इतिहास होता, कहाणी होती. रामजोशी चित्रपटाच्या वेळी बाजारात मांजरपाट हे कापड मिळत नव्हते, तेव्हा शांतारामबापूनी मागचा पुढचा विचार न करता सर्व बॅनरसाठी रेशमी तागे मागवले. व रामजोशी चित्रपटाचे बॅनर रेशमी कापडावर रंगवले गेले. त्यावेळी कलायोगीनी रंगवलेला पेशव्यांचा दरबार अतीशय सुंदर रीत्या रेखाटला होता. पुढे मुंबईचे निर्माते पैसे घेऊन मागे लागले असताही कांबळे कोल्हापूरला गेले. तेथे त्यांनी सर्वस्वी पेंटींगला वाहून घेतले.
June 25, 2022
महाराष्ट्राचे लाडके नाटककार, उत्कृष्ट भावनाप्रधान भूमिका करणारे नट बाळकृष्ण हरी कोल्हटकर म्हणजे बाळ कोल्हटकर हे नाटयसृष्टीतला एक मानबिंदू होते. नाटककारांच्या बरोबरीने ते रंगभूमीचे उत्कृष्ट नटही होते. त्यांनी केलेल्या भूमिका अतिशय गाजल्या त्या आजही लोकांच्या आठवणीत जशाच्या तशा आहेत. हेच एका नाटककाराचे आणि नटाचे मोठेपण आहे.
September 25, 2020
आमीरचे पूर्ण नाव मोहम्मद आमिर हुसैन खान. त्यांचा जन्म १४ मार्च १९६५ रोजी झाला. आमीरचा जन्म मुंबई येथे ताहिर हुसैन व झीनथ हुसैन , या चित्रपट निर्माताच्या घरात झाला. आमीर चार भावंडांत सर्वात मोठा, त्याला एक भाऊ अभिनेता फैजल खान आणि दोन बहिणी फरहात आणि निखात खान आहे. पुतण्या इम्रान खान एक समकालीन हिंदी चित्रपट अभिनेता आहे. आमीर खानचे शिक्षणासाठी जे.बी. पेटिट शाळेत. व नंतर त्याने इयत्ता आठवी पर्यंत चे शिक्षण संत ॲन च्या महाविद्यालयात घेतले आणि इयत्ता नववी व दहावी चे शिक्षण बॉम्बे स्कॉटिश स्कूल, माहीम येथून पूर्ण केले. गेली अनेक वर्षे बॉलिवूडमध्ये कार्यरत असलेला आमीर हा हिंदी चित्रपटसृष्टीतील सर्वात प्रतिभावान व लोकप्रिय कलाकारांपैकी एक मानला जातो. 'यादो की बारात' या सुपरहिट चित्रपटात या चिमूकल्या आमीर खानने बॉलीवूड एण्ट्री केली होती. १९७३ साली आलेल्या यादों की बारात ह्या चित्रपटामध्ये आमीर खानने बाल कलकार म्हणून काम केले होते. पुढील वर्षी, त्याने आपल्या वडीलांच्या निर्मित मधहोश चित्रपटात महेंद्रसिंग संधू ची तरुण भूमीका निभवलि. त्यानंतर १९८४ सालच्या होली ह्या चित्रपटामध्ये देखील त्याची भूमिका होती. कयामत से कयामत तक ह्या १९८८ साली प्रदर्शित झालेल्या चित्रपटामधून आमिरने जुही चावलासोबत नायकाच्या रूपाने सिनेसृष्टीत पदार्पण केले. ह्या चित्रपटाच्या तूफान यशानंतर आमिरने अनेक दर्जेदार भूमिका करून बॉलिवूडमधील सर्वश्रेष्ठ अभिनेत्यांमध्ये आपले नाव जोडले. आपल्या प्रेमीकेवर होणाऱया बलात्काराचा सूड घेण्याच्या इर्शेने गुन्हेगारी पार्श्वभूमीत खेचला जाणारा आमिर खान 'राख' या क्राईम थ्रिलर चित्रपटातून प्रेक्षकांच्या समोर आला होता. भूतकाळ आणि वर्तमान यांच्यातील साम्यता दाखवून देणाऱया 'रंग दे बसंती' मधून आमिरने पुन्हा एकदा सामाजिक आणि ऐतिहासिक विषयाला हात घातला होता अभिनयासोबतच आमिरने चित्रपटांचे दिग्दर्शन व निर्मिती देखील केली आहे. २०१२ सालच्या सत्यमेव जयते ह्या दूरचित्रवाणी कार्यक्रमाचा यजमान ह्या नात्याने त्याने छोट्या पडद्यावर पदार्पण केले. आजवर आमिरला अनेक फिल्मफेअरसह अनेक पुरस्कार मिळाले असून त्याच्या कला क्षेत्रामधील योगदानासाठी भारत सरकारने त्याला २००३ साली पद्मश्री तर २०१० साली पद्मभूषण पुरस्कार देऊन गौरवले. २०११ साली आमिरला युनिसेफने जगातील शिशू आहार सुधारण्याच्या अभियानामध्ये राष्ट्रीय राजदूत ह्या स्वरूपात नियुक्त केले. चित्रपटसृष्टीसोबत आमिरने इतर सामाजिक व राजकीय चळवळींमध्ये योगदान दिले आहे. २००६ साली त्याने मेधा पाटकर चालवित असलेल्या नर्मदा बचाओ आंदोलनाला पाठिंबा जाहीर केला होता. आपल्या अनेक वर्षांच्या करिअरमध्ये आमिरने अनेक सिनेमांसाठी लूक बदलले आणि प्रत्येकवेळी तो वेगळ्या अंदाजात दिसला. 'दंगल' या नवीन सिनेमात आमिर कुस्तीवीर महावीर सिंह फोगटच्या भूमिकेत दिसला आहे. या सिनेमासाठी त्याने वजन वाढवून ९० किलो केले होते. आमिरचे सध्या एका सिनेमासाठी ८ कोटी रुपये मानधन आहे. तसेच, आमिर नफ्यात ४० टक्के शेअर्ससुध्दा ठेवतो. तो एका जाहिरातसाठी ४ कोटी रुपये घेतो. त्यांच्याकडे Titan, Godrej सारखे प्रसिध्द ब्रँड्स आहेत.आमिरने 'सत्यमेव जयते' या टीव्ही शोच्या एका एपिसोडसाठी ३ कोटी रुपये घेतले होते. सोबतच, तो टीव्ही शोचा सर्वात महागडा होस्ट बनला होता. आमीर खान आणि किरण राव २००५ मध्ये हे दोघे विवाह बंधनात अडकले होते. आमीर आणि किरण यांची भेट 'लगान' चित्रपटाच्या सेटवर झाली आहे. आशुतोष गोवारिकर यांनी निर्मिती केलेल्या चित्रपट 'लगान' मध्ये किरण राव असिस्टंट डायरेक्टर होत्या. लग्नानंतर किरण राव यांनी 'धोबी घाट' या चित्रपटाचे डायरेक्शन केले. आजाद असे या दोघांच्या मुलाचे नाव आहे. किरण राव आमिर खान याची दूसरी पत्नी आहे. रीना दत्ता ही आमिरची पहिली पत्नी आहे. २००२ मध्ये आमिर आणि रीना यांचा घटस्फोट झाला.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
March 14, 2017
स्वतंत्र महाराष्ट्राचे पहिले “सहकार” मंत्री म्हणून बाळासाहेब भारदे यांनी केलेले कार्य संपूर्ण देशाने गौरविले. ते त्यानंतर विधानसभेचे अध्यक्ष झाले. ते मुरब्बी राजकारणी तर होतेच त्याचबरोबर ते गांधीवादी विचारवंत, संत साहित्याचे अभ्यासक, सहकार क्षेत्रातील अग्रणी, पत्रकारही आणि कीर्तनकार होते.
July 11, 2022
यवतमाळ मधील राणी अमरावती ह्या छोट्याशा गावातून आलेले राम केवटे हे एक प्रसिद्ध चित्रकार असून आज त्यांचे ह्या क्षेत्रात फार मोठे नाव आहे.
May 16, 2014
कथा, पटकथा, संवाद लेखक व कलाकार प्रदीप कबरे हे मुळातच अष्टपैलू व्यक्तिमत्त्व. अभिनेता म्हणून त्यांनी नाव कमावलं आहेच, पण लेखक म्हणूनही कामगिरी केली आहे. त्यांनी आत्तापर्यंत दोन नाटकं लिहिली आहेत. तसंच अंदाजे अडीच हजार रेडिओ कार्यक्रम लिहिले आहेत. पाच हजारांहून अधिक रेडिओ कार्यक्रमांचं सादरीकरण केलं आहे. सहा-सात माहितीपटांचं लेखन केलं आहे. शंभरेक जिंगल्स लिहिल्यात. दोन चित्रपटांची कथा-पटकथा-संवाद लिहिले आहेत. एका चित्रपटासाठी गीतलेखनही केलं आहे.
May 9, 2019
Copyright © 2025 | Marathisrushti