जगभरातील विविध क्षेत्रातील उल्लेखनीय व्यक्तींचा परिचय.. हा आहे सामान्यज्ञानाचा खजिना…
(1908-1996)
पश्चिम महाराष्ट्रातील आदिवासी क्षेत्रात मार्क्सवादी पक्षाचे काम गोदावरी परूळेकर व त्यांचे पती ऍड.श्यामराव परूळेकर यांनी अथकपणे केले. ठाणे जिल्ह्यातील वारल्यांना संघटित करून त्यांचा सावकारांच्या शोषणातुन बचाव करणे. हे अवघड काम गोदावरी परूळेकरांनी केले आणि माणुस जागा झाला हे त्यांचे आत्मचीरत्र प्रसिध्द आहे.
June 9, 2015
अभिनय दिग्दर्शन, लेखन, डबींग, नेपथ्य व प्रकाश योजना ह्या आणि अशा विविध क्षेत्रांत आपला ठसा उमटविणारे संजय बोरकर ह्यांच्या कारकिर्दीची सुरुवात ठाण्यातील शिवसमर्थ विद्यालयातून एकांकिका स्पर्धांमधून झाली.
May 23, 2014
फ्रान्सने दिलेल्या शिष्यवृत्तीद्वारे कला शाखेचा अभ्यास करत असताना त्यांनी फ्रान्स, इंग्लंड, हंगेरी, स्विर्त्झलंड, जर्मनी, ऑस्ट्रेलिया, जपान, पोर्तुगाल, आइसलंड या ठिकाणी भरवलेली प्रदर्शने प्रचंड गाजली होती.
July 7, 2022
आज ३० नोव्हेंबर.. आज मराठीतील नामवंत लघुकथालेखक वामन कृष्ण तथा बापूसाहेब चोरघडे यांची पुण्यतिथी.
बापूसाहेब चोरघडे यांचा जन्म १६ जुलै १९१४ रोजी झाला. बापूसाहेब चोरघडे यांची पहिली लघुकथा कथा 'अम्मा' १९३२ साली जन्माला आली, आणि प्रसिद्धही झाली. हळूहळू त्या काळातील गाजलेल्या वागीश्वरी, मौज, सत्यकथा या नियतकालिकांमधून त्यांच्या कथा प्रसिद्ध होऊ लागल्या. त्यांनी वर्ध्याच्या आणि नागपूरच्या जी.एस. वाणिज्य महाविद्यालयांत (गोविंदराम सेकससरिया कॉलेज) अर्थशास्त्राचे अध्यापन केले. ते दोन वर्षे महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक मंडळाचे अध्यक्ष होते. महात्मा गांधींचे अनुयायी असलेल्या चोरघड्यांचा भारतीय स्वातंत्र्यलढ्यात सक्रिय सहभाग होता. एम.ए. झाल्यावर वामन चोरघडे यांना वर्ध्याला शिक्षकाची नोकरी मिळाली. त्याच सुमाराला स्वातंत्र्यलढा ऐन भरात होता. अनेक तरुणांनी गांधीजींच्या आवाहनाला साद देऊन स्वातंत्र्यसंग्रामात उडी घेतली, त्यात चोरघडेही होते. त्यांना दोन वेळा कारावास घडला. कारावासामध्ये दादा धर्माधिकारी, विनोबा भावे, काका कालेलकर, महादेवभाई देसाई अशा व्यक्तींचा सहवास घडला. विचारांना नवी दिशा मिळाली. आचारांत बदल घडला. तेव्हापासून घेतलेलें खादीचें व्रत त्यांनी शेवटपर्यंत निभावलें. वामन चोरघडे हे नेहमी खादीचा कुडता, पायजमा अशा स्वत: धुतलेल्या स्वच्छ पांढर्याव-शुभ्र वेषातच असत. वामनरावांना व्यायामाची आवड होती. एखाद्या पहेलवानासारखी त्यांची शरीरयष्टी होती. स्पष्ट व शुद्ध उच्चार, वाचनामुळे समृद्ध झालेली भाषा, अभ्यासामुळे आलेली विचारांची श्रीमंती आणि प्रचंड आत्मविश्वास यामुळे चोरघडे एक वक्ते म्हणूनही त्यांच्या काळी गाजले. स्वातंत्र्य दृष्टिपथात आलें त्यावेळी त्यांना बंदिवासातून मुक्ती मिळाली आणि गांधी विचारांवर स्थापन झालेल्या वर्ध्याच्या गोविंदराम सकसेरिया वाणिज्य महाविद्यालयात ते प्राध्यापक म्हणून रुजू झाले, १९४९ साली त्याच कॉलेजच्या नागपूर शाखेमध्ये उपप्राचार्य झाले आणि तिथूनच चोरघडे प्राचार्य म्हणून १९७४ साली निवृत्त झाले. त्याकाळी महाराष्ट्राच्या नव्या मंत्रिमंडळात रामकृष्ण पाटील होते. वामन चोरघड्यांवर त्यांनी मानद अन्नपुरवठा अधिकारी म्हणून जबाबदारी टाकली. त्यांनी ती उत्तम प्रकारे निभावली. पुढे काँगेसप्रणीत भारतसेवक समाजाच्या नागपूर शाखेची जबाबदारी त्यांच्यावर टाकण्यात आली. मा.वामन चोरघडे यांचे ३० नोव्हेंबर १९९५ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ:-इंटरनेट
December 1, 2016
वयाची ऐंशी गाठलेले ग्वाल्हेर घराण्याचे ज्येष्ठ गायक आणि गानगुरू पंडित शरद साठे यांच्यासाठी शनिवारी, २४ रोजी मुंबईत होणारा सोहळा केवळ सहस्रचंद्रदर्शनाचा वा त्यानिमित्त होणाऱ्या सत्काराचा नाही.. त्यांच्या तीन सीडींचे प्रकाशन आणि मग सतारनवाज्म अब्दुल हलीम ज्माफर खान आणि सारंगीसम्राट रामनारायण यांच्या उपस्थितीत त्यांचा सत्कार,
त्यानिमित्ताने साठे यांना गुरू मानण्याचा ‘टप्पा’ गाठलेल्या अनेक गायक-शिष्यांचीही उपस्थिती, असे हे स्वरमय वातावरण असेल. ग्लॅमरची मातबरी- ज्यापुढे आजचे अनेक गायक शरण जातात- तशी साठे यांना कधी वाटली नव्हती आणि याही सोहळय़ात, प्रसिद्धीपेक्षा गुणवत्ता महत्त्वाची मानणाऱ्यांची मांदियाळी असेल. ही गुणवत्तेची बैठक साठेंना वयाच्या १७व्या वर्षी मिळाली, ती थेट पं. द. वि. ऊर्फ बापूराव पलुस्कारांकडून!
अगदी १९५५ पर्यंत, पलुस्करांच्या अकाली निधनापर्यंत ही तालीम सुरू होती. त्यानंतर साठे मुंबईत, बी. आर. देवधरांच्या विद्यालयात शास्त्रशुद्ध बैठक पक्की करत गेले.. पण फर्गसनमध्ये असताना ऐकलेले काही काहीशा नकलेचा दोष पत्करून गळय़ात घटवलेले फय्याजखाँ, मास्टर कृष्णराव, हिराबाई बडोदेकर अशांच्या गायकीत अंगभूत असलेले मोकळेपणही त्यांना भावत होते. त्याची स्वत:शी गाठभेट करून घेण्याचा क्षण साठेंना बहुधा, पं. शरश्चंद्र आरोलकरांच्या मठीत गवसला असावा.
ग्वाल्हेर गायकीतील ‘टप्पा’ हा गानप्रकार शिकायला आरोलकरांकडे साठे गेले आणि तिथे रमले. पुढे विद्यापीठीय स्तरावर टप्पा गायकीचे प्राध्यापक परीक्षक म्हणून काम करणारे पं. साठे यांची ‘यमनकल्याणा’सारख्या रागांवरही इतकी घरंदाज हुकमत आहे की, या गायनाचे जतन अव्वल देशी संस्थांखेरीज वॉशिंग्टन विद्यापीठानेही केले. आयटीसी- संगीत संशोधन संस्थेचा पुरस्कार (२००६), काशी संगीत समितीतर्फे ‘संगीतरत्न’ (२००७) हे सत्तरीनंतर मिळालेले सन्मान वगळता, ‘आकाशवाणीचे ए ग्रेड आर्टिस्ट’ ही साठे यांची ओळख होती, पण त्याबद्दल खंतखेद बाळगणाऱ्यांपैकी साठे नव्हेत. ‘डीव्ही पलुस्करांवरील लघुपटासाठी आवाज वापरला गेला’ या समाधानाचे मोल मात्र साठेंकडून जाणावे!
August 5, 2017
वसंतराव नाईक यांचा वारसा लाभलेले सुधाकरराव नाईक हे मीतभाषी पण करारी बाणा असलेले व्यक्तिमत्व. पाणलोट क्षेत्राचा विकास हे नवे सूत्र सुधाकररावांनी प्रभावीपणे वापरले.
September 3, 2010
आझमगड जिल्ह्यातील मिजवां येथे जन्मलेले अतहर हुसेन रिझवी हेच नंतर कैफी आझमी बनले. त्यांचा जन्म १४ जानेवारी १९१९ रोजी झाला. उत्तर प्रदेशातील आझमगढ जिल्ह्यात एका जमीनदाराच्या घरी कैफी आझमी यांचा जन्म झाला. नातेवाईकांच्या हट्टामुळे धार्मिक शिक्षणासाठी लखनौच्या सुलतान-अल-मदरिस मध्ये दाखल व्हावे लागलेल्या कैफी यांना त्याच्या बंडखोर स्वभावामुळे तिथून हाकलून देण्यात आले. ते अत्यंत संवेदनशील होते. लहानपणापासूनच जो माणूस अलम दुनियेतील दु:खे संपवणा-यांच्या गटात सामील झाला, सर्वांच्या दु:खाला आपल्या गीतांमधून ज्याने शक्ती दिली आणि न्यायाच्या लढाईत ज्याची गाणी पुढच्या रांगेत असत, तो स्वत:चे दु:ख कधीही व्यक्त करीत नसे. मा.कैफी आझमी फार मोठे कवी होते. आपल्या भावाची गझल पूर्ण करण्यासाठी त्यांनी १२ व्या वर्षी जी गझल लिहिली ती अमर झाली. नंतर तीच गझल बेगम अख्तर यांनी गायिली. ‘इतना तो जिंदगी में किसी की खलल पडे, हंसने से हो सुकून न रोने से कल पडे’.
कैफी आझमी यांचे नशीब म्हणजे त्यांना मित्र फारच चांगले मिळाले. मुंबईत इप्टाच्या दिवसांतील त्यांचे मित्र नंतर नावाजलेले कलावंत म्हणून ओळखले जाऊ लागले. इप्टामध्येच होमी भाभा, किशन चंदर, मजरूह सुलतानपुरी, साहिर लुधियानवी, बलराज साहनी, मोहन सहगल, मुल्कराज आनंद, रोमेश थापर, शैलेंद्र, प्रेम धवन, इस्मत चुगताई, ए. के. हंगल, हेमंतकुमार, अदी मर्झबान, सलिल चौधरींसारख्या कम्युनिस्टांसोबत त्यांनी काम केले. ते एकदा असेच हैदराबादला गेले असताना ‘यूँही कोई मिल गया था चलते चलते’ असे काहीसे त्यांच्या बाबतीत घडले. ज्या मुलीच्या प्रेमात ते पडले होते ती मुलगी म्हणजेच उदारमतवादी याह्या खान यांची कन्या शौकत. शौकत यांनी कैफींना पसंत करण्याचे कारण म्हणजे कैफी विख्यात शायर होते. प्रोग्रेसिव्ह रायटर्स असोसिएशनचे संस्थापक सज्जाद जहीर यांच्या ड्रॉइंग रूममध्ये त्यांचे लग्न लागले होते. १९४६ मध्ये क्रांतिकारी विचारसरणीच्या शौकत यांनी आईच्या मर्जीविरुद्ध आपल्या पुरोगामी वडिलांसोबत औरंगाबादहून मुंबईला येऊन कैफी यांच्याशी लग्न केले होते. त्यांच्या निकाहच्या वेळी काझीने शौकतजींना विचारले, ‘‘तुला हे लग्न कबूल आहे?’’ तिने ‘हो’ म्हटले. पण पंचाईत पुढे आली. मुलगा शिया अन् मुलगी सुन्नी पंथाचा. असे लग्न असेल, तर तिथे दोन्ही काझी आवश्यक असतात. त्याकाळी ते परिस्थितीने गरीब होते. त्यांनी कसाबसा एक काझी आणला होता. दुसर्या् काझीला द्यायला पैसे नव्हते. तेव्हा काझीने मुलाचा धर्म विचारताच मित्राने सांगितले, ‘‘मुलगा हनफियुल (म्हणजे इमाम अबू हनाफी यांचे जे अनुयायी आहेत, त्यांच्या पंथाचा) आहे.’’ या युक्तीवादाच्या जोरावर लग्न पार पडले. लग्नानंतर कैफींनी ब-याच खस्ता खाल्ल्या. ते गावी गेले. तिथे त्यांच्या मुलाचा जन्म झाला. त्यांचा पहिला मुलगा ‘खय्याम’ एक वर्षाचा होऊन वारला. नंतर ते मुंबईला गेले. सुरुवातीलाही ते लखनऊला राहिले होते. धार्मिक शिक्षण घेण्यासाठी ते गेले होते; पण न्यायासाठी लढा सुरू केल्याने त्यांना हाकलून देण्यात आले. त्यांची मुलगी शबाना पोटात होती तेव्हा कम्युनिस्ट पक्षाने आदेश दिला की, गर्भपात करा. कैफी भूमिगत होते आणि पक्षाला मुलाबाळांच्या खर्चाची चिंता होती. शौकत कैफी आपल्या आईकडे हैदराबादला गेल्या. तेथेच मुलगी शबाना आझमी यांचा जन्म झाला. नंतर त्यांना एक मुलगा झाला त्याचे नाव अहमद ऊर्फ बाबा.
शबाना आझमी यांच्या यशात कैफींचा फार मोठा वाटा आहे.
शबाना आझमीने आपले वडील कैफी आझमी यांच्या कवितांना समर्पित एका वेबसाइटची निर्मिती केली आहे.
http://www.azmikaifi.com
या वेबसाइटवर कैफी आझमी यांनी लिहिलेली गाणी आणि कविता ऑडिओ आणि व्हिडिओ स्वरुपात उपलब्ध आहेत. त्याशिवाय येथे व्हिडिओ, त्यांनी लिहिलेल्या कविता आणि गाण्यांबरोबरच त्यांच्या विषयीची माहितीदेखील पुरविण्यात आली आहे. विसाव्या शतकातील अनेक उत्कृष्ट चित्रपट कैफींच्या नावाने ओळखले जातात. ‘हीर रांझा’मध्ये चेतन आनंदने सर्व संवाद कवितेच्या रूपात सादर करण्याची इच्छा व्यक्त केली आणि कैफी यांनी ते संवाद लिहिले. प्रियाऐवजी कुणी दुसरी नायिका असती तर राजकुमारला हा चित्रपट कुठवर घेऊन गेला असता सांगता येत नाही. सर्वोत्कृष्ट युद्धपट ‘हकीकत’ हाही कैफींचा चित्रपट. ‘गर्म हवा’, ‘कागज के फूल’, ‘मंथन’, ‘कोहरा’, ‘सात हिंदुस्तानी’, ‘बावर्ची’, ‘पाकीजा’, ‘हंसते जख्म’, ‘अर्थ’, ‘रजिया सुलतान’, असे चित्रपट कैफींमुळे अजरामर झाले. मा.कैफी यांनी जास्ती गाणी लिहीली नाहीत पण जी लिहीली ती काळजाचा ठाव घेणारी ठरली. त्यातला अर्थपूर्ण आशय रसिकांच्या मनाला अलगद स्पर्श करणारा होता. 'चलते-चलते यूँ ही कोई मिल गया था' (पाकिजा), 'वक्त ने किया क्या हसीं सितम' (कागज के फूल), 'तुम बिन जीवन कैसा जीवन'(बावर्ची), 'तुम जो मिल गए हो तो ये लगता है...' (हंसते जख्म), 'कुछ दिल ने कहा, कुछ भी नहीं' (अनुपमा), 'इक जुर्म करके हमने चाहा था मुस्कुराना' (शमा), 'जीत ही लेंगे बाजी हम तुम' (शोला और शबनम), 'ये नयन डरे डरे' (कोहरा), 'सारा मोरा कजरा चुराया तूने'(दो दिल), 'बहारों...मेरा जीवन भी सँवारो'(आखिरी खत), 'धीरे-धीरे मचल ए दिल-ए-बेकरार' (अनुपमा), 'या दिल की सुनो दुनिया वालों' (अनुपमा), 'मिलो न तुम तो हम घबराए' (हीर-रांझा), 'ये दुनिया ये महफिल' (हीर-रांझा), 'जरा सी आहट होती है तो दिल पूछता है' (हकीकत) ही त्यांची काही लोकप्रिय चित्रपट गीते होत... १९८० च्या दशकात मा.कैफी आझमींनी 'अर्थ' चित्रपटासाठी अतिशय आशयसंपन्न गीते लिहिली 'झुकी झुकी सी नजर करार है की नही, दबा दबा सा सही, दिल में प्यार है की नही' 'कोई ये कैसे बतायें की वो तनहा क्यों है' आणि तुम इतना जो मुस्कुरा रहे हो, क्या गम है जिसको छुपा रहे हो'. भारत सरकार ने १९७४ मध्ये त्यांना पद्मश्री पुरस्कार देऊन सम्मानित केले होते. कैफी आझमी यांचे निधन १० मे २००२ रोजी झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ. इंटरनेट
May 10, 2017
आपल्या मधाळ आवाजाने पाच दशकं रसिकांच्या हृदयावर राज्य करणार्या भारतातील आघाडीच्या पार्श्वगायिका म्हणून आशा भोसले यांचा लौकिक आहे. प्रदीर्घ काळ अनेकविध प्रकारची गीतं आपल्या सहज शैलीत गाऊन चिरतरुण, चतुरस्त्र गायिका म्हणूनही त्यांनी लोकप्रियता मिळवली.
June 10, 2017
त्यांनी पुढे स्वतःच्या लेखनकौशल्यावर , स्वतःच्या प्रतिभेवर रेडिओसाठी कार्यक्रम लिहावयास सुरवात केली. तिथे यशवंत देव , नीलम प्रभू , बाळ कुरतडकर यांच्याशी त्यांची ओळख आणि मैत्री झाली. रेडिओवर त्यांची ‘ मास गीत ‘ ह्या कार्यक्रमात गाणे लागे . ‘ मास गीत ‘ म्हणजे एकच गाणे महिनाभर दर रविवारी लागायचे. त्यावेळी त्यांची तेथे खूप गाणी रेकॉर्ड झाली आणि ती आकाशवाणीवर प्रसारितही झाली. त्यावेळी कॅसेट्स नसायच्या किंवा आजच्यासारख्या डी.व्ही.डी. ही नसायच्या . त्यावेळी रेकॉर्ड्स असायच्या , ध्वनिमुद्रिका असायच्या. त्यांच्या खूप खूप ध्वनिमुद्रिका रेकॉर्ड झाल्या.
July 21, 2021
भारतातील नामांकित वास्तुशास्त्रज्ञ. अहमदाबादचे हरिवल्लभदास हाऊस, कानपूर आयआयटी आणि वाचनालय, दिल्लीचे नॅशनल सायन्स सेंटर, नेहरू सायन्स सेंटर, स्विस ट्रेड मिशन, मेहसाण्याची नॅशनल डेअरी बोर्डाची इमारत, बांगला देशातील ढाक्याची नॅशनल लायब्ररी इत्यादी इमारती ह्या त्यांच्या वास्तुकलेचे नमूने आहेत.
December 15, 2010
Copyright © 2025 | Marathisrushti