जगभरातील विविध क्षेत्रातील उल्लेखनीय व्यक्तींचा परिचय.. हा आहे सामान्यज्ञानाचा खजिना…
भारतात विज्ञान व तंत्रज्ञानाची पाया रचणार्या डॉ.वसंत गोवारीकर यांचा जन्म पुण्यात १९३३ साली झाला! अवकाश , हवामान आणि लोकसंख्या या तीन क्षेत्रात मह्त्त्वपूर्ण असे संशोधन डॉ.वसंत गोवारीकर यांनी केले आहे.
December 15, 2010
प्रसिद्ध फारसी आणि उर्दू कवी गालिब यांचा जन्म २७ डिसेंबर १७९७ रोजी झाला. मिर्ज़ा असद-उल्लाह बेग ख़ां उर्फ “ग़ालिब” हे एक प्रसिद्ध फारसी आणि उर्दू कवी होते. ते सुधारक वृत्तीचे, सर्व धर्मांना समान मानणारे, कर्मठ नसलेले, नमाज न पढणारे, रोजा न ठेवणारे, कलेचे आसक्त, रसिक व्यक्ती होते. गालिब केवळ चार वर्षांचे असतांना त्यांचे वडील वारले म्हणून आजोबा आणि काकांनी पालनपोषण केले. लहानपणी त्यांनी इस्लामचे धडे घेतले, फारसी भाषा शिकले. मा.मिर्झा गालिब हे थोरल्या बाजीरावांची पत्नीे मस्तानी हिच्या वंशात जन्माला आले होते. मा.गालिब यांनी फारसी भाषेत लिखाण काम सुरू केले. त्यांच्या साहित्यात जीवनाचे गंभीर तत्वज्ञान त्यांनी मांडले. वयाच्या ११व्या वर्षापासून गालिब शेर लिहीत होते. जीवनाच्या झळा सोसून मिर्झा गालिब यांनी त्या सुंदर करून काव्यातून मांडल्या. त्यांनी एकूण १८,००० च्या वर शेर फारसी भाषेत रचले. पुढे मित्रांच्या आग्रहाखातर त्यातीलच १०००-१२०० शेर त्यांनी उर्दू भाषेत लिहिले. मा.गालिब यांनी कधी कोणताही उद्योग-धंदा केला नाही.
मित्रांच्या आणि नातेवाईकांच्या सहकार्याने ते राहत. त्यांना स्वतःला प्रसिद्धी मिळविण्याची गरज वाटली नाही. उत्तर मोगल काळातील राजांच्या, उमरावांच्या दरबारी जाणेही त्यांना आवडत नसे. ते म्हणत माझ्या कविता माझ्या मृत्यूनंतरही अजरामर राहणार असल्याने माझे नाव आपोआपच सर्वत्र पसरणार.
गालिबच्या काव्यावर मीर आणि आमीर खुसरो यांच्या रचनांचा प्रभाव होता. साहित्य निर्मिती करताना केवळ चौकट मोडून चालत नाही. त्यात तितकी ताकदही असावी लागते. गालिबने परंपरेला नावीन्याची झालर लावली. अभिजात सौंदर्याची बूज राखायला शिकवले. घराण्यातच सैनिकी पार्श्वभूमी असल्याने गालिबमध्ये बंडखोरीचे बीज होते. मा.मिर्झा गालिब यांच्यावर हिंदीत १९५४ साली एक चित्रपट निघाला होता व दुसरा १९८८ साली दूरचित्रवाणीसाठी बनवला होता.
पहिल्या चित्रपटाचे दिग्दर्शक सोहराब मोदी तर दुसर्याा चित्रपटाचे दिग्दर्शक गुलझार होते. मिर्झा गालिब यांचे निधन १५ फेब्रुवारी १८६९ रोजी झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
मिर्झा गालिब यांच्या काव्यातल्या सुप्रसिद्ध पंक्ती
काबां किस नूर से जाओगे गालिब, शर्म तुमको मगर नहीं आती
दिल-ए-नादाँ तुझे हुआँ क्या आखि़र इस दर्द की दवा क्या है
नुक्ताचीं है ग़म-ए-दिल उस को सुनाये न बने
ये नथी हमारी किस्मत कि विसाल-ए-यार होता
हजारो ख्वाईशें ऐसी के हर ख्वाईश पे दम निकलें
हैं और भी दुनियामें सुखन-वर बहुत अच्छे, कहते हैं कि गालिब का अंदाज-ए-बयाँ और
December 27, 2018
शास्त्रीय संगीतातील एक उत्तुंग व्यक्तिमत्व व स्वरलिपीचे जनक
May 19, 2011
ओ पी रल्हन यांनी १९६० ते १९८० मध्ये त्यांनी अनेक हिट चित्रपट दिले. त्याच्या चित्रपटात अनेक नवीन कलाकारांना स्थान दिले. त्यांनी फूल और पत्थर धर्मेंद्रला त्याच्या पहिल्या चित्रपट स्टार केले. काही लोक देव आनंद ने झीनत अमानला हरे रामा हरे कृष्णा या चित्रपटातून आणले असा गैरसमज आहे पण झीनत अमान ओ पी रल्हन यांनी प्रथम त्याच्या हलचल या चित्रपटात काम करावयास दिले. हलचल पासून कबीर बेदी यांनी आपली कारकीर्द सुरू केली. ओ पी रल्हन यांनी अमिताभ बच्चन यांना बंधे हात(१९७३) या चित्रपटात काम करावयास दिले, जेव्हा अमिताभ बच्चन यांची सुरवात होती. ‘फूल और पत्थर’च्या यशानंतर मा.ओ. पी. रल्हन याने मोठी झेप घेताना या ‘तलाश’ चित्रपटाची निर्मिती केली.
प्रमुख भूमिकेत बलराज साहनी, राजेन्द्रकुमार, शर्मिला टागोर व स्वत: ओ. पी. रल्हन. तर चित्रपटाला संगीत सचिन देव बर्मन यांचे. यातील ‘खाई है रे हमने कसम संग रहने की’ आजदेखील तितकेच सुमधुर आहे, १९७१ चा हा चित्रपट आहे. त्याच्या पूर्वप्रसिद्धीची तयारी करताना ‘एक कोटीचा तलाश’ यावर सगळा जोर होता. चित्रपटाच्या प्रसिद्धीत ‘निर्मिती खर्चाचा आकडा’ खेळवण्याचे हे पहिले उदाहरण. त्या काळात काही लाखांत चित्रपट निर्माण होत. (किती पैशात चित्रपट बनतो, त्यापेक्षा कसा बनतो, कोण बनवतो याला खूप महत्त्व असल्याचे ते दिवस होते.)
रल्हनचे एक कोटींवर जोर देण्यामागचे कारण तोच जाणे. जास्त खर्चिक चित्रपट चांगलाच असेल असे प्रेक्षक समजतील (तशा दृष्टीने पाहतील) असा त्याचा समज असावा. एकदा चित्रपट आवडला की ‘तो किती खर्चात बनला’ व ‘तो किती रुपयांत आपण पाहतोय’ याला आपला चित्रपट प्रेक्षक फारसे महत्त्व देत नाही.) ‘तलाश’चे मुख्य चित्रपटगृह अप्सरा होते, तेथेच प्रीमियर झाला. ओ पी रल्हन यांचे १२ जानेवारी १९९७ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९३२२४०१७३३
संदर्भ. इंटरनेट
January 12, 2018
सायन येथील एका स्टुडिओत काम करताकरताच तेव्हाच्या प्रसिद्ध अभिनेत्री हंसा वाडकर यांच्या नजरेतून कुमुद यांचे तेज सुटले नाही. त्यांनी राजा परांजपे यांना सांगून ‘लाखाची गोष्ट’ या चित्रपटात कुमुद यांना नायिकेच्या भूमिकेत घेतले. हाच रेखा यांचा पहिला चित्रपट. चित्रादेखील त्यांच्या सहनायिका होत्या. ‘लाखाची गोष्ट’ची कथा, पटकथा ग.रा. कामत यांची होती.
January 12, 2022
बातमी कोणतीही असो ती सर्वप्रथम आपल्याच माध्यमातून सर्वांपर्यंत पोहोचली पाहिजे, अशी ईर्षां मनात बाळगणे हा आजचा प्रकार नाही. ज्यावेळी प्रसारमाध्यमांचे क्षेत्र मर्यादित होते व फक्त सरकारी माध्यमे, मोजकी वृत्तपत्रे व वृत्तसंस्था होत्या तेव्हापासून ही ईर्षां कायम आहे. मात्र आपण देत असलेली बातमी नुसती सर्वप्रथम देऊन उपयोग नाही ती बिनचूक असली पाहिजे, असा खाडे यांचा आग्रह असे. याच आग्रहामुळेच त्यांचा पत्रकारितेत दबदबा होता. त्यांचे पूर्ण नाव कदाचित कोणाला आठवणार नाही पण ‘दि. बा.’ म्हटले की पत्रकार व राजकीय नेत्यांच्या मनात लगेच खाडे हे नाव आलेच पाहिजे, अशी त्यांची ख्याती होती.
दिगंबर बाळकृष्ण तथा दि. बा. यांचे मंगळवारी वयाच्या ८२ व्या वर्षी मधुमेहाने निधन झाले. शेवटपर्यंत कार्यरत असणाऱ्या पत्रकारांच्या पिढीतला आणखी एक दुवा आता निखळला आहे. मितभाषी, मनमिळावू आणि नेहमीच सर्वाना माहिती देण्यात अग्रेसर असलेल्या पत्रकारांपैकी ते एक होते. २००५ च्या अतिवृष्टीत घर पूर्णपणे पाण्याने भरल्यामुळे जमवून ठेवलेला माहितीचा खजिना नष्ट झाल्यावर खाडे हताश झाले होते. खाडय़ांच्या त्या साहित्याचे मोल फक्त अभ्यासकांनाच कळू शकते. त्यावेळी सरकारने फक्त पाच हजार रुपये मदत देऊ केली.
वर्षांनुवर्षे मेहनतीने जमा केलेली माहिती पाच हजार रुपयांत परत मिळणार नव्हती. १९५२-५३मध्ये पत्रकारितेत आलेल्या खाडे यांनी ऑल इंडिया रेडिओमध्ये प्रसिद्धी सहाय्यक म्हणून आपल्या कारकीर्दीला सुरुवात केली. त्यानंतर त्यांची पदोन्नती होत होत ते वृत्त विभागात आले आणि नंतर ते वृत्तसंपादक या पदापर्यंत पोहोचले. कोयनेचा भूकंप झाला तेव्हा खाडे त्यांच्या अंधेरी येथील घरी होते. मुंबईत त्या भूकंपाचे धक्के बसताच सगळी पळापळ झाली. मध्यरात्रीची वेळ व वीज बंद झालेली.
खाडे यांनी आपल्या कुटुंबाला बाहेर काढले, पण स्वत: मात्र पुन्हा घरात शिरून मेणबत्तीच्या प्रकाशात त्यांनी सर्वप्रथम कुलाबा वेधशाळा तसेच संबंधित यंत्रणांकडून भूकंपाबाबत माहिती घेतली. नंतर लाइटनिंग कॉल लावून (त्या काळात मुंबईबाहेर फोन करण्यासाठी ट्रंककॉल किंवा लाइटनिंग कॉल लावावा लागत असे) दिल्ली रेडिओवर भूकंपाची बातमी दिली. पुढल्याच बातमीपत्रात रेडिओवरून महाराष्ट्रात झालेल्या भूकंपाची माहिती देशात आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर खाडे यांच्या नावासहित समजली. त्या काळी रेडिओवरून बातमी देणाऱ्या बातमीदाराचे नाव सांगण्यात येत नसे. तरीही त्यांच्या नावासहित ही बातमी देण्यात आली होती, याचे कारण त्यांनी घेतलेली मेहनत!
त्यानंतर त्यांनी आकाशवाणीच्या चमूसहित कोयना येथे जाऊन तेथील भूकंपग्रस्तांच्या मुलाखती घेत तो अनुभव श्रोत्यांसाठी जिवंत केला होता. त्यांची बदली शिलाँग येथे काही काळासाठी झाली होती. मुंबई दूरदर्शन सुरू झाले तेव्हा त्यांची बदली दूरदर्शनच्या वृत्त विभागात झाली. मुंबई दूरदर्शनचे ते पहिले वृत्तसंपादक होते. पण तेथे त्यांचे मन काही रमेना. ते पुन्हा आवर्जून ऑल इंडिया रेडिओत आले. जनता पक्ष सत्तेवर असताना जयप्रकाश नारायण मुंबईत जसलोक इस्पितळात उपचार घेत होते. अचानक त्यांच्या निधनाचे वृत्त पंतप्रधान मोरारजी देसाई यांनी संसदेमध्ये जाहीर केले.
सभागृहात श्रद्धांजलीही वाहण्यात आली. प्रत्यक्षात मात्र जयप्रकाश नारायण यांची प्रकृती फक्त चिंताजनक झाली होती. पण त्यांच्या निधनाचे वृत्त खरे की खोटे याची खातरजमा न करताच संसदेमध्ये त्याना श्रद्धांजली वाहण्यात आली आणि संसदेचे कामकाज थांबविण्यात आले. बातमीची पक्की खातरजमा करून घेण्याची सवय खाडेंना स्वस्थ बसू देईना. त्यांनी इस्पितळात धाव घेतली तेव्हा खरी परिस्थिती उघड झाली. खाडे यांनी तातडीने दिल्लीला खरे वृत्त कळविले. यामुळे सरकारचे हसे झाले. मात्र त्यानंतर प्रत्येक वृत्तसंस्था व वृत्तपत्राचा पत्रकार जसलोकमध्ये तळ ठोकून बसू लागला व इस्पितळातूनही रोज अधिकृतपणे माहिती देण्यात येऊ लागली. आता अशी माहिती देणे हे नेहमीचे झाले आहे. मात्र या पायंडा खाडे यांच्यामुळे पडला हे विसरता येत नाही. बिनचूकपणा हाच खरा बातमीचा आधार, असा आग्रह धरणारे खाडे यांच्यासारखे पत्रकार आजच्या ‘ब्रेकिंग न्यूज’च्या जमान्यात सापडणे कठीण!
मंत्रालयात तेव्हा पीटीआय व युएनआय या दोन वृत्तसंस्थांचे पी.के. व व्ही.के. नाईक आणि रेडिओचे खाडे या त्रिमूर्तीचा दबदबा होता व त्यांच्यामुळे पत्रकार परिषदाही रंगत असत. तिघेही अत्यंत गप्पिष्ट असत आणि मैफल रंगविण्यात तिघांचाही हातखंडा असे. त्यातही खाडे नेहमीच आघाडीवर असत. कमी पण योग्य शब्दांत समोरच्याचे वर्णन करण्याची खाडे यांची हातोटीही वाखाणण्यासारखीच होती.खाडे यांच्या जाण्याने आता ती रंगत निघून गेली आहे.
August 5, 2017
सुरेश वाडकर यांना लहानपणापासूनच त्यांना गाण्याची आवड होती. त्यांचा जन्म ७ ऑगस्ट १९५५ रोजी झाला. त्यांनी वयाच्या आठव्या वर्षापासून त्याने जियालाल वसंत यांच्याकडे संगीताचे शिक्षण घेण्यास सुरुवात केली, तसेच ‘पतियाळा’ घराण्याची तालीम घेतली. त्यांनी पार्श्वनाथ डिग्रजकर यांच्याकडून ही प्राथमिक गायनाचे शिक्षण व सदाशिव पवार यांच्याकडून तबल्याचे प्राथमिक शिक्षण घेतले.
१९७६ साली सूर-सिंगार नावाच्या संगीत स्पर्धेत सुरेश वाडकरांनी भाग घेतला. त्या मधील स्पर्धकांची कामगिरी पारखायला हिंदी चित्रपटसृष्टीतील संगीतकार जयदेव इत्यादी नामवंत परीक्षक होते. सुरेश वाडकर या स्पर्धेत विजेते ठरले. १९७६ नंतर सुरेश वाडकर यांनी चित्रपटांमध्ये गायला सुरुवात केली होती. त्यानंतर जयदेवांनी चाली बांधलेल्या गमन या हिंदी चित्रपटातील सीनेमें जलन हे गाणे वाडकर यांना गायला मिळाले.
‘मेघा रे मेघा रे’, ‘चप्पा चप्पा चरखा चले’, ‘ए जिंदगी’ यांसारख्या अनेक सुपरहिट गाण्यांमुळे सुरेश वाडकरांनी चाहत्यांच्या मनावर त्यांच्या आवाजाची छाप सोडली आहे. प्रेमरोग, सदमा या चित्रपटातील त्यांची गाणी खूपच गाजली. सुरेश वाडकर यांनी प्रामुख्याने मराठी व अनेक हिंदी चित्रपटांमधून पार्श्वगायन केले आहे. याखेरीज त्यांनी काही भोजपुरी, कोकणी, मल्याळी, गुजराती, बंगाली, सिंधी चित्रपटांतूनही आणि उर्दू भाषेतूनही गाणी गायली आहेत.
हिंदुस्तानी शास्त्रीय संगीताची परंपरा टिकावी यासाठी सुरेश वाडकर यांनी आजीवासन गुरुकुलम नावाची संस्था सुरू केली. सुरेश वाडकर यांची पत्नी पद्मा वाडकर याही गायिका आहेत. या दोघांनीही गायकीच्या जगात स्वतःचं असं वेगळं स्थान निर्माण केले आहे. संगीत स्पर्धांमध्ये सुरेश वाडकर अनेकदा परीक्षक असतात. सुरेश वाडकर यांना त्यांच्या संगीतसेवेसाठी सुमारे ११ पुरस्कार किळाले आहेत.
कला क्षेत्रात सर्वोच्च समजल्या जाणा-या संगीत नाटक अकादमीचा पुरस्कारही सुरेश वाडकर यांना मिळाला आहे. तसेच २०१९ मध्ये सुरेश वाडकर यांना भारत सरकारने पद्मश्री पुरस्कार देऊन गौरव केला आहे.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ :- इंटरनेट
सुरेश वाडकर यांनी गायलेली काही गाणी
https://www.youtube.com/watch?v=-KTx-FJE3Y0
https://www.youtube.com/watch?v=2JXDLvxIF0Q
https://www.youtube.com/watch?v=2JXDLvxIF0Q
https://www.youtube.com/watch?v=_hfck-AakUg
सुरेश वाडकर यांनी गायलेली काही मराठी गाणी
https://www.youtube.com/watch?v=7H4CU8vHuys
https://www.youtube.com/watch?v=1V2pB9KCidE
August 7, 2021
गदिमांना १० भाषा येत होत्या. मराठीमधील लावणी या प्रकाराला त्यांनी एक विशिष्ट उंचीवर नेऊन ठेवले. त्यांनी १५७ मराठी चित्रपट केले तर २३ हिंदी चित्रपट केले.
December 14, 2021
१८३९ मध्ये सिंगर यांनी पहिल्यांदा खडकात छिद्र पाडण्यासाठी मशीन बनवली.नंतर लाकूड आणि धातू कापण्यासाठी मशीन बनवली.दरम्यान १८५१ मध्ये त्यांना शिलाई मशीन बनवायची संधी मिळाली. त्यांनी ते मशीन फक्त दुरुस्तच केले नाही, तर आणखी चांगले मशीन बनवण्याचा संकल्प केला आणि केवळ ११ दिवसांच्या अथक परिश्रमानंतर ते बनवले आणि जगासमोर सादर केले.हे यंत्र सिंगर म्हणून ओळखले जाऊ लागले.
August 18, 2024
दलित आत्मकथा, दलित साहित्य, चर्चा आणि चिंतन, लोकरंग, स्त्री आत्मकथन, महारांचा सांस्कृतिक इतिहास हे त्यांनी संपादन केलेले काही ग्रंथ. चळवळीला वैचारिक अधिष्ठान देणारे नियतकालिका म्हणून अस्मितादर्शकडे पाहिले जाते.
March 28, 2022
Copyright © 2025 | Marathisrushti