जगभरातील विविध क्षेत्रातील उल्लेखनीय व्यक्तींचा परिचय.. हा आहे सामान्यज्ञानाचा खजिना…
राजेंद्रकृष्ण यांचे खरे नाव राजिंदर दुग्गल. शालेय वयात आठवीपासून राजेंद्रकृष्ण कविता करत असत.त्यांचा जन्म ६ जुन १९१९ रोजी जलालपूर पाकिस्तान येथे झाला.कवितेच्या वेडाने ते पुढे मुंबईत आला आणि सिनेमासाठी लेखन करू लागले. मुंबईतील त्यांचा प्रारंभीचा संघर्ष कंगवे, रूमाल विक्री करण्याइतपत कष्टाचा होता. त्या काळात अनेक गरीब मित्रांनी त्यांना आसरा दिला; १९४७ साली राजेंद्रकृष्ण पटकथाकार झाले आणि त्याचा पहिला चित्रपट पडद्यावर आला ‘जनता.’ गीतकार म्हणून त्याचा पहिला चित्रपट होता १९४७ सालचा ‘जंजिर.’
गीतकार आणि लेखक अशा दुहेरी भूमिकेमुळे त्याचा मान अधिक वाढला. मोतीलाल आणि सुरैया यांची भूमिका असलेल्या १९४८ सालच्या ‘आज की रात’ या चित्रपटामुळे ‘राजेंद्रकृष्ण’ नाव फिल्म इंडस्ट्रीत ओळखले जाऊ लागले. ‘सुनो सुनो ये दुनियावालो बापुजी की अमर कहानी.’ हे महात्मा गांधींच्यावर राजेंद्रकृष्ण यांनी गाणे लिहिले होतं, त्याला हुस्नलाल भगतराम यांनी या गीताला संगीत दिलं होतं आणि रफी यांनी गायिलेल्या हे गाणे रेडियो सिलोन खूप गाजले. या गाण्याने राजेंद्रकृष्ण गीतकार म्हणून घरोघरी पोहोचले. कथा-पटकथाकार म्हणून राजेंद्रकृष्ण यांचे नाव हिंदी, मद्रासी सिनेमाच्या पडद्यावर झळकत होतं. तमिळ भाषेचं उत्तम ज्ञान अवगत असल्याने त्यांना सर्वत्र दक्षिणेत व दक्षिणेतील निर्मार्त्यांकडून कामं मिळत गेली. तिथे सी. रामचंद्र ऊर्फ राम चितळकर यांचा दबदबा होता. त्यांच्याशी राजेंद्रकृष्ण यांची गट्टी जमली आणि या जोडीने नंतर पुढे उत्तमोत्तम गाणी हिंदी सिनेसंगीताच्या कोषात अजरामर केली. ‘अनारकली’, ‘आझाद’, ‘आशा’ आणि सर्व जगाला वेड लावणार्याा अलबेलाची गाणी होती. सी. रामचंद्र, राजेंद्रकृष्ण या जोडीने ‘यह जिंदगी उसी की है’ (अनारकली), ‘ए दिल मुझे बता दे, तू आ गया है’ (भाई भाई), ‘मन डोले मेरा तन डोले’ (नागीन), ‘कौन आया मेरे मनके द्वारे’ (देख कबिरा रोया), ‘छूप गया कोई रे दूर से पुकार के’ (चंपाकली), ‘चल उड जा रे पंछी’(भाभी), इतना ना मुझसे तू प्यार बढा (छाया) अशी सुरस गाणी दिली. ३०० हून अधिक चित्रपटांचं गीतलेखन करणाऱ्या राजेंद्रकृष्ण यांनी अनेक चित्रपटांचं कथा, पटकथा लेखनही केलं होते.
नया दिन नयी रात, गीता मेरा नाम, बनारसी बाबू , ब्लॅकमेल, बॉम्बे टू गोवा, रखवाला, गोपी, एक श्रीमान एक श्रीमती, सच्चाई, वारीस, पडोसन, साधू और शैतान, नई रोशनी, प्यार किये जा, खानदान, ब्लफ मास्टर, छाया, नजराना, भाई भाई, नागीन, ‘पडोसन’ची पटकथा मा. राजेंद्रकृष्ण यांनीच लिहिली होती. मा.राजेंद्रकृष्ण रेस खेळण्याचा छंद होता, यात त्यांना १९६० च्या दरम्यान त्यांच्या रेस खेळण्याच्या छंदाला यश लाभलं होतं, ४९ लाखांचा ‘जॅकपॉट’ घोड्यांच्या शर्यतीत लागला होता.
काय योगायोग राजेंद्रकृष्ण यांचा जन्म ६ जून व निधन सुद्धा ६ जून. राजेंद्रकृष्ण यांचे ६ जून १९८८ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ. इंटरनेट
राजेंद्रकृष्ण यांची गाणी.
https://www.youtube.com/watch?v=tPvqD3K8jXQ
https://www.youtube.com/watch?v=BylUftxAmvo
June 6, 2017
भक्ती बर्वे केवळ अभिनेत्री नाही, तर उत्तम निवेदिकाही होत्या. त्यांचा जन्म १० सप्टेंबर १९४८ रोजी झाला. त्यांना लहानपणापासून अभिनयाची आवड होती. गणेशोत्सवात छोट्या छोट्या नकलांपासून त्यांच्या अभिनयाला सुरवात झाली, असे म्हणावे लागेल.
त्यांचे उत्तम पाठांतर असल्याने त्यांना पुढे आकाशवाणीवर काम करण्याची संधी मिळाली. त्या दूरदर्शनवर निवेदन करीत होत्या. त्या उपजत अभिनेत्री असल्यामुळे त्यांनी केलेली जवळजवळ सर्वच नाटके सुपर हिट ठरली. नाटक आणि भक्ती बर्वे हे समीकरणच तयार झाले. त्याकाळी नाटकांना वन्स मोअर मिळत असे. त्यामुळेच मराठी रंगभूमीतील भक्ती बर्वे या एकमेव स्त्री स्टार म्हणावे लागेल.‘‘ आकाशवाणीवर आणि दूरदर्शनवर भक्ती बर्वे निवेदिका होत्या. अशोक हांडे यांच्या 'माणिकमोती' या कार्यक्रमातही त्यांचे निवेदन असे.
पु.ल.देशपांडे यांच्या ती फुलराणी हे नाटक म्हणजे भक्ती बर्वे यांच्या भूमिकेतील अतुच्य क्षण. ती फुलराणी चे ११११ हून अधिक प्रयोग झाले. आई रिटायर होतेय या नाटकात भक्ती बर्वे यांनी साकारलेली आईची भूमिकाही खूप गाजली. या नाटकाचे एकूण ९५० प्रयोग झाले. मराठी नाट्यक्षेत्रातल्या कामगिरीसाठी ह्यांना १९९० साली संगीत नाटक अकादमी पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. हिंदी चित्रपटांतील सहअभिनेते मा. शफी इनामदार यांच्याशी विवाह झाला होता. अशोक हांडे यांच्या माणिकमोती या कार्यक्रमातही त्यांचे निवेदन असे.
रजनीश जोशी यांनी लिहिलेलं एक होती फुलराणी हे पुस्तक भक्ती बर्वे यांच्या बद्दलच्या खूप छान छान गोष्टींची आठवण करून देते.
भक्ती बर्वे यांचे १२ फेब्रुवारी २००१ रोजी निधन झाले.
भक्ती बर्वे यांनी काम केलेली नाटके.
अखेरचा सवाल, अल्लाउद्दीन व जादूचा दिवा (बालनाट्य), अजब न्याय वर्तुळाचा, आई रिटायर होतेय (मराठी आणि गुजरातीत-बा रिटायर थाय छे), आधे अधुरे(हिंदी आणि मराठी), आले देवाजीच्या मना, कळलाव्या कांद्याची कहाणी (बालनाट्य), गांधी आणि आंबेडकर, घरकुल, चिनी बदाम (बालनाट्य), जादूची वेल (बालनाट्य), टिळक आणि आगरकर, ती फुलराणी, दंबद्वीपचा मुकाबला, पपा सांगा कुणाचे, पळा पळा कोण पुढे पळे तो, पुरुष, पुलं, फुलराणी आणि मी, बाई खुळाबाई, बूटपोलिश, माणसाला डंख मातीचा, मिठीतून मुठीत, रंग माझा वेगळा, रातराणी (मराठी, हिंदी आणि गुजराती), वयं मोठं खोटम् (बालनाट्य), शॉर्टकट, सखी प्रिय सखी, हँड्स अप.
प्रमुख चित्रपट - जाने भी दो यारों (हिंदी) इ.स. १९८३,बहिणाबाई, ‘हजार चौरासी की माँ’ (हिंदी) इ.स. १९९८
-- संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
September 10, 2017
हलाखीच्या परिस्थितीवर मात करीत वर्ध्याचे अविनाश जोशी डॉक्टर झाले. मानसोपचारतज्ज्ञ म्हणून सेवा देत असताना त्यांना पालक आणि मुलांच्या समस्या जाणवल्या. त्यावर उपाय म्हणून त्यांनी गतिमंदांसाठी 'मे फ्लॉवर' शाळेचे नंदनवन फुलविले. विशेष शाळा सुरु केली. शेकडो आयुष्ये सावरली. समाजात 'बुद्धी' विषयी जनजागृती व्हावी म्हणून 'म्युझियम ऑफ ब्रेन अॅण्ड माइंड' हा उपक्रम सुरु केला. मानसिक रुग्णांच्या वैवाहिक आयुष्याचा डाव अर्ध्यावरती मोडू नये, म्हणून त्यांनी आता ऑनलाइन मॅरेज ब्युरो सुरु केला आहे...
'मे फ्लॉवर्स' चे नंदनवन
July 14, 2017
वयाच्या १२ व्या वर्षी त्यांनी मो.ग. रांगणेकर यांच्या आशीर्वाद या नाटकात प्रथम काम केले.
August 8, 2021
केशवराव भोळे यांनी इ.स.१९३३ साली ’नाट्यमन्वंतर’ नावाची नाट्यसंस्था काढली. त्या संस्थेने रंगमंचावर आणलेल्या ’आंधळ्यांची शाळा’या नाटकाचे त्या काळी शंभराहून अधिक प्रयोग झाले होते. पहिला प्रयोग मुंबईच्या रिपन थिएटरात १जुलै १९३३ रोजी झाला.
May 23, 2021
ज्येष्ठ अभिनेते आणि दिग्दर्शक सुहास भालेकर यांनी सहा दशकांहून अधिक काळ नाटक, मालिका, तसंच रुपेरी पडदा गाजवला. कीर्तनकार वडिलांकडून आलेली शुद्ध वाणी, तसंच आई कडून या क्षेत्रात काम करण्यासाठी मिळालेलं पाठबळ यामुळे त्यांच्यातील कलाताराला आपसूकच प्रोत्साहन मिळत गेलं.
October 4, 2013
कृष्णा बोरकर यांच्या आजवरच्या प्रवासात व्ही. शांताराम, राजकमल स्टुडिओ, ज्येष्ठ रंगभूषाकार बाबा वर्दम यांचेही महत्त्वाचे स्थान आहे. एकदा ‘राजकमल’चे मुख्य रंगभूषाकार बाबा वर्दम आलेले नसताना बोरकर यांनी ‘राजकमल’मधील ज्येष्ठ अभिनेते बाबुराव पेंढारकर यांची रंगभूषा केली. शांताराम बापू यांनी ठीक आहे, अशा शब्दात पावती दिली आणि नंतर चक्क स्वत:ची रंगभूषा बोरकर यांना करायला सांगितली.
July 23, 2021
एखादा वाघ किंवा बिबट्या नरभक्षक आहे, याची खात्री पटल्याशिवाय ते त्याला ठार करत नसत. ४३६ लोकांचा बळी घेणारा या भागातला पहिला नरभक्षक वाघ ‘चंपावत’ याला कॉर्बेट यांनी ठार केले. तिथून नरभक्षक वाघांना ठार करण्याची त्यांची मोहीम सुरू झाली. दोन नरभक्षी बिबट्यांचीही त्यांनी शिकार केली. या नरभक्षक वाघांच्या शिकारी ते एकटेच करत. फक्त रॉबिन हा त्यांचा कुत्रा त्यांच्या सोबत असे.
April 19, 2022
श्री.निवृत्तीनाथ, संत ज्ञानेश्वर व संत सोपानदेव या अलौकिक भावंडांची मुक्ताबाई ही तितकीच अलौकिक बहीण. इ.स. १२७७ मध्ये हिचा जन्म झाला.
चौदाशे वर्षे जगलेले चांगदेव जेव्हा ज्ञानदेवांना कोरे पत्र पाठवतात तेव्हा इतकी वर्षे जगून हा कोराच असे मुक्ताबाई म्हणते.
May 25, 2010
लाहोर येथे जन्मलेले बडे गुलाम अली खान फाळणीनंतर तेथेच राहिले. त्यांचा जन्म २ एप्रिल १९०२ रोजी झाला. पहिले काही वर्ष ६ महिने भारत आणि ६ महिने पाकिस्तानात येथे राहत. त्यांनी मुख्यमंत्री मोरारजी देसाई यांना भारताचे नागरिकत्व मिळण्याकरता मदतीची विनंती केली. आणि खासाहेब हिंदुस्थानचे नागरिक झाले. मैफलीत खांसाहेबाना अपेक्षित ठेका तबलजीकडून मिळाला नाही कि फक्त ठुमऱ्या गाऊन वेळ मारून नेत. कै जी एनन जोशी ऐक आठवण जरूर सांगतात एकदा खांसाहेब त्यांच्या घरी आंब्यांच्या दिवसात दुपारी आले होते तेव्हा साहजिकच भोजनास आमरस पुरीचा बेत होता. खासाहेब तब्येतीत जेवले जेवण संपल्यावर आमरस एवढा आवडला कि नंतर त्यांनी चार वाट्या रस प्यायले. आणि नंतर गायचा मूड लागला तेव्हा तंबोरे लावून २-३ आस तब्येतीत गायले.
ख्यालगायकी प्रमाणे ठुमरी म्हणण्यात त्यांचा हातखंड होता. मारवा आणि पुरिया सारखे जवळचे स्वर असलेले राग ऐका पाठोपाठ गात नाहीत कारण राग जरी जवळचे असले तरी दोन वेगळे राग वेगळे वातावरण निर्मिती करतात त्यामुळे ऐका पाठोपाठ शक्यतो गाऊ नयेत असे जाणकार सांगतात!! पण खांसाहेबांचे गायकीवरचे प्रभुत्व उच्च दर्जाचे होते!! १९४४ साली मुंबईत प्रथम झालेल्या मैफलीत मारवा आणि पुरिया ऐका पाठोपाठ म्हणून खासाहेबांनी रसिकांची तसेच जाणकारांची वाह व मिळवली होती. मैफलीत त्याकाळी पाच हजार रुपये खासाहेब घ्यायचे. जेव्हा मोगले आझम या चित्रपटाकरता गाणे म्हणण्यासाठी जेव्हा संगीतकार नौशाद आणि दिग्दर्शक के असिफ यांनी पाचारण केले तेव्हा खासाहेबांनां गाण्याची इच्छा नव्हती म्हणून टाळण्याकरता त्यांनी ऐका गाण्याचे २५००० रुपये मानधन मागितले (त्याकाळात आघाडीचे गायक ३०० ते ५०० रुपये मानधन घेत असत) आणि असिफ यांनी ते देऊ केले. जेव्हा ध्वनीमुद्रण सुरु होते तेव्हा त्यांनी ऐक आक्रमक तान घेतली आणि नौशाद म्हणाले यागाण्यात आक्रमक तान नको आहे पण त्यांना काही सुचत नव्हते तेव्हा ते म्हणाले मला केलेले चित्रीकरण दाखवा!! चित्रीकरण बघताना जवळ बसलेल्या उस्ताद निझामुद्दीन खान (तबलजी) यांना म्हणाले ये लौंडीया (अभिनेत्री मधुबाला) तो बहोत खुबसुरत है!!
लतादीदी या त्यांच्या ऐक मोठ्या चाहत्या होत्या. बडे गुलाम अली खान यांचे २५ एप्रिल १९६८ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
बडे गुलाम अली खान यांचे गायन
https://www.youtube.com/watch?v=Gy75Hipt8IQ
https://www.youtube.com/watch?v=BViraiWfRqU
https://www.youtube.com/watch?v=JXxe9dU9N0U
April 25, 2017
Copyright © 2025 | Marathisrushti