जगभरातील विविध क्षेत्रातील उल्लेखनीय व्यक्तींचा परिचय.. हा आहे सामान्यज्ञानाचा खजिना…
ना.सी. फडक्यांच्या कथा तंत्रशुद्धता, रेखीवपणा व डौलदार भाषा या त्रिगुणांनी नटलेल्या आहेत. आकर्षक प्रारंभ, कथेच्या मध्ये गुंतागुंत, अंती उकल आणि मग शेवट असे त्यांच्या लेखनाचे ठरावीक तंत्र आहे.
August 13, 2021
आजमितीला संतूर आणि शिवकुमार शर्मा हे जणू समानार्थी शब्द झालेले आहेत. संतूरला अभिजात संगीताच्या व्यासपीठावर सतार, सारंगी किंवा सरोदच्या तोलामोलाचे स्थान मिळालेले आहे. शिवकुमारांचे संतूर वादन सर्वार्थाने समृद्ध असते. ज्यांना संगीतातल्या तांत्रिक बाबी समजत नाहीत, अशांना संतूरमधून प्रकटणार्या नादमाधुर्याचा, भाव आणि नवरसांच्या उत्कट अभिव्यक्तीचा आस्वाद घेता येतो.
March 1, 2018
जोतीरावांनी त्यांच्या पत्नी सावित्रीबाईंना शिक्षण देऊन शिक्षणकार्यास प्रवृत्त केले. शाळेच्या मुख्याध्यापकपदी आरूढ झालेली भारतातील पहिली महिला म्हणजे सावित्रीबाई. त्याचप्रमाणे स्वतंत्रपणे फक्त स्त्रियांसाठी शाळा काढणारे महात्मा फुले पहिले भारतीय होत. १८४८ साली पुण्यामध्ये बुधवार पेठेतील भिडे यांच्या वाड्यात पहिली मुलींची शाळा काढून तेथील शिक्षिकेची जबाबदारी सावित्रीबाईंवर सोपविली. महाराष्ट्रातील स्त्री शिक्षणाची ही मुहूर्तमेढ ठरली.
April 11, 2022
गरीबीमुळे त्यांना शिक्षण अर्धवट सोडावं लागलं होतं. त्यानंतर त्यांनी एका मासळी विकणाऱ्या कंपनीत सुपरवाझर म्हणून काम केलं. पण त्यातून मिळकत होत नव्हती. म्हणून शिंदे यांनी रिक्षा चालवण्यास सुरुवात केली. याचवेळी ते शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि ठाण्यातील शिवसेनेचे नेते आनंद दिघे यांच्या संपर्कात आले. तेव्हा त्यांचं वय होतं १८ वर्ष. वयाच्या अवघ्या अठराव्या वर्षी त्यांनी शिवसेनेतून राजकीय श्रीगणेशा केला. शिवसेनेच्या प्रत्येक आंदोलनात सहभाग घेतला.
February 9, 2022
मालती बेडेकर ह्या मराठीतल्या पहिल्या स्त्रिवादी लेखिका होत्या.
March 3, 2018
राहुल देव बर्मन यांचे वडील संगीतकार सचिनदेव बर्मन हे त्रिपुरा संस्थानचे प्रिन्स. त्यांचा जन्म २७ जून, १९३९ रोजी झाला. हे संगीतकार पिता-पुत्र मूळ राजघराण्यातून आलेले. पंचमच्या आई मीरादेवी या सुद्धा बंगालमधल्या एक संगीतकार. पंचम ऊर्फ आर. डी. बर्मन यांचे संगीत म्हणजे... एकीकडे तरल.. भावूक... संवेदनशील मनाचा मुक्त असा सांगीतिक आविष्कार; तर दुसरीकडे आरडीचं संगीत म्हणजे मदहोश करणारी जादू... चैतन्याचा झंझावात... उल्हास... जोश आणि जल्लोष...! नवसंगीताचा प्रवाह पन्नास वर्षापूर्वी सुरु करणार्याव आर.डी.बर्मन यानं खर्यात अर्थानं अभिजात नवसंगीत निर्माण केलं. वडील मा.सचिनदेव बर्मन यांचे सहाय्यक म्हणून त्यानं आपली कारकीर्द सुरु केली. वडिलांच्या अखेरच्या वर्षापर्यंत तेच सहाय्यक होते. केवळ गीतकारांच्या शब्दांना फुलविण्यातच आर. डीं.नी कधी समाधान मानलं नाही. चित्रपटांना, त्यातील प्रसंगांना अधिक परिणामकारक करणारे पार्श्वासींगत देण्यात पंचम यांचा हातखंडा होता. त्यांना आजही बॉलिवूडमधील सर्वश्रेष्ठ संगीतकारांपैकी एक मानले जाते.
पंचमवर लहानपणापासूनच सर्वसाधारण बंगाली घरात होतात तसे रवींद्र संगीताचे संस्कार होत होते. वयाच्या अकराव्या वर्षापासून तो माऊथ ऑर्गनवर सतत काही ना काही वाजवू लागला. त्याचं ते वाजवणं ऐकून एक दिवस दादामुनी म्हणजे अशोककुमार म्हणाले, ""अरे, ये तो पंचम सूर में बजाता है.‘‘ आणि मग दादा बर्मनांचा तो लाडका "तुबलू‘ पुढे "पंचम‘ या नावानंच ओळखला जाऊ लागला. निसर्गातल्या आविष्कारातील संगीत पंचम शोधू लागला. कडाडणारी वीज, वाऱ्याचा, लाटांचा आवाज.. रेल्वे इंजिनची शिटी.. गलबतांचे भोंगे... कुत्र्यांचं धापा टाकणं... आजूबाजूच्या प्रत्येक गोष्टीमध्ये स्वर... ताल... आणि लय शोधत पंचम मोठा झाला. सुरवातीला आपल्या वडिलांचा मुख्य सहायक म्हणून आणि नंतर स्वतंत्र संगीतकार आर. डी. बर्मन!
पंचमदाना स्वतंत्र संगीतकार म्हणून पहिली संधी निर्माता, अभिनेता मेहमूद यांनी दिली. चित्रपट होता "छोटे नवाब.‘ आपल्या अंगी असलेल्या सर्व क्षमतांची सिद्धता आरडींनी या एकाच चित्रपटात वेगवेगळ्या अशा आठ गाण्यांच्या पॅकेजमध्ये दाखवून दिली आहे. मुंबई ते तळोजा या प्रवासात स्टेअरिंगवर बोटे वाजवता वाजवता कंपोज केलेलं "घर आजा घिर आये बदरा सावरीया..‘ हे लतादिदींचं मालगुंजी रागात बांधलेलं गाणं म्हणजे पहिलीच निर्मिती आणि तीच "मास्टर पीस‘ असं विशेषण मिळवून गेली. या गाण्यात तबल्याचा ठेका आणि सतार व सारंगीला असलेला घुंगरांचा समन्वय.. ऐकून वाटणारही नाही, की हा कुणी नवा संगीतकार आहे म्हणून; कारण अमर्याद प्रयोगशीलता, नैसर्गिक आवाजांचा समावेश आणि र्हिदम सेक्श नमध्ये तालवाद्यांचा भरपूर पण सुसूत्र वापर यामुळे आरडींच्या रचना नित्यनवीन राहिल्या. पंचममध्ये एक खोडकर पोरगं सतत असायचं. तो त्याला विविध प्रयोग करण्यापासून कधी दूर ठेवत नव्हता. तबल्यावर हातोडी घासून एक विचित्र साऊंड क्रिएट करून पंचमदांनी तो एका विनोदी गाण्यात वापरला. अर्थात, हा प्रयोग होता आपला लाडका दोस्त मेहमूद याच्यासाठी आणि त्यानेच गायलेल्या गाण्यासाठी. मेहमूदबरोबर खास दक्षिण भारतीय आवाजातले हेल देत हे गाणं गायलंय आपल्या आशाताईंनी. मुत्तूकुडी कव्वाडी हडा.. (दो फूल) हे ते गाजलेलं गाणं.
पंचमदांनी इंडस्ट्रीला बरीच वाद्यं दिली.. जसं स्पॅनिश गिटार, मादल, फ्लेंजर इत्यादी. म्हणजे त्यांनी पहिल्यांदा आणून वापरायचं आणि इतर संगीतकारांनी त्याचा वापर आपापल्या संगीतात नंतर करायचा असा पायंडाच त्या काळी पडून गेला होता. बेस गिटार हे असंच त्यांनी इंट्रोड्यूस केलेलं वाद्य. भारतात बेस गिटारचा वापर असलेलं पहिलं गाणं पंचमदांनी बनवलं. १९७० ची तरुण पिढी धुंदावून सोडलेलं ते गाणं होतं, "गुलाबी आँखें जो तेरी देखी‘ (दि ट्रेन).
नेपाळी "मादल‘ हे असंच पंचमप्रिय वाद्य. ते प्रथम वापरलं त्यांनी आपल्या वडिलांच्या संगीत संयोजनाखाली म्हणजे "ज्वेलथीफ‘मधल्या "होटों पे ऐसी बात‘ या गाण्यात. या गाण्याचं संपूर्ण ऑर्केस्ट्रेशन पंचम यांचे पण मादल काही काळ उपलब्ध झालं नव्हतं म्हणून या गाण्याचं रेकॉर्डिंगसुद्धा पंचम यांनी स्थगित केलं होतं.
याच मादलचा भरपूर वापर पंचमदांनी पुढं आपल्या बऱ्याच गाण्यांत केला. "अजनबी‘ चित्रपटातल्या "हम दोनों दो प्रेमी‘च्या रेकॉर्डिंगच्या दरम्यान इंडस्ट्रीमधल्या वादकांचा संप होता; पण गाणं रेकॉर्ड करण्याची खुमखुमी आरडींना गप्प बसू देईना. त्यांनी मग आपले प्रमुख चार सहायक घेऊन गाणं पूर्ण केलं. नीट ऐकलं तर आपल्या लक्षात येईल, की या गाण्यात ऑर्केस्ट्रेशन नाहीच मुळी. स्वतःच्या संग्रहात रेकॉर्ड करून ठेवलेला रेल्वे इंजिनचा इफेक्टत, मादलचा सलग ताल, बासरी, शिटी आणि इंटरल्यूड म्युझिक म्हणून त्या चौघांचा कोरस, भूपेंद्रचा आलाप, आणि किशोर-लताचा मेन व्हॉईस.. बस् गाणं पूर्ण. मादल किती सुरेख वाजू शकतो, याची ही एक देखणी प्रचिती होती. मजरुह, गुलजार या प्रतिभावान गीतकारांच्या अनेक मुक्तछंदात्मक कवितांना आर. डीं.नी आपल्या वैशिष्ट्यपूर्ण आणि श्रवणीय संगीताने यशोचित न्याय दिला. ही गाणी आजही अगदी ताजी वाटतात. ती सहज ओठांवर येतात. पुन्हा पुन्हा ऐकावीशी वाटतात. आपल्या १९६१ ते १९९४ दरम्यानच्या कारकिर्दीमध्ये बर्मनने ३३१ चित्रपटांना संगीत दिले व स्वत: काही गाणी देखील म्हटली. किशोर कुमार व आशा भोसले हे त्याचे विशेष आवडीचे पार्श्वगायक होते. मा.आर.डी.बर्मन यांचे ४ जानेवारी १९९४ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९३२२४०१७३३
संदर्भ. इंटरनेट
आर डी बर्मन यांची गाणी
https://www.youtube.com/watch?v=5-iu86NhFfc
आर डी बर्मन यांच्या सांगीतिक वाटचाली वर ही दोन पुस्तके वाचनीय आहेत.
R D Burman, the Man and the Music - Aniruddha Bhattaraji
Prince of Music - Khangesh Dev Burman
January 4, 2018
अल्पायुषी ठरलेला हा मधुरकंठी गायक आपल्या अद्भुत गानकलेचा वारसा मागे ठेवून गेला.
October 25, 2016
शाळेत शिक्षक विद्यार्थ्यांना शिकवतात.परंतु शिक्षकांच्या शिकवण्याच्या प्रयत्नांना अनेक वेळा मर्यादा असतात.कधी कधी अशा शिक्षकांमुळे मुलांच्या त्या विषयाचे नुकसान होते.माझ्या बाबतीत पण असेच झाले होते.माझ्या संस्कृत शिकवणा-या शिक्षिका यथा तथाच होत्या .एस एस सी ला संस्कृत हा भरपूर गुण मिळवून देणारा विषय.त्यामुळे काळजीत पडलो. मुख्य परीक्षेच्या आधी काही दिवस भीत भीत वडिलांना सांगितले .जानेवारी महिना होता.वडिलांनी मला एक पत्र दिले आणि कर्जत जवळच्या दहिवली गावात ठाण्याहून पाठवले.मला आठवतंय ,सकाळी ११ च्या गाडीने मी कर्जत ला दर रविवारी जायचो.कर्जत हून दहिवली पर्यंत चालत.दहिवली ला मुळे गुरुजींचे घर होते. घर कसले सुंदर वाडाच होता.सर्व प्रथम गुरुजी जेवायला बसवायचे.अतिशय सुग्रास जेवण त्यांच्या पत्नी करीत असत. मग जेवण झाल्यावर मुळे गुरुजी त्यांच्या सोप्यावर फे-या मारत मला संस्कृत वाक्य, संधींची फोड करून कसे वाचावे हे शिकवत .पांढरे शुभ्र धोतर,खांद्यावर शुभ्र पंचा आणि अतिशय प्रसन्न मुद्रेचे वयोवृद्ध मुळे गुरुजींचे ते शिकवणे अजूनही माझ्या डोळ्या समोरून हलत नाही. अतिशय कमी वेळात त्यांनी मला संस्कृत हा विषय माझ्या आवडीचा करून दिला. जवळ बसवून प्रेमानी जेवायला घालणे, त्यानंतर संस्कृतची शिकवणी हे चित्र अजूनही माझ्या डोळ्यासमोर उभे राहते. शिक्षक कसा असावा याचे मुळे गुरुजी मूर्तिमंत उदाहरण होते. मुळे गुरुजींनी माझ्या कडून एक पैसा न घेता मला शिकवले आणि त्यांची प्रतिमा माझ्या मनात कायमची कोरली गेली.
हे सर्व सांगण्याचे कारण असे कि -
खासदार परेश रावल यांनी सभागृहात चे कोचिंग क्लास कडे लक्ष वेधले .रावल म्हणाले, विविध क्षेत्रात झुंडशाहीच्या बळावर वर्चस्व प्रस्थापित करणाऱ्या माफियांची वर्णने आजवर सर्वांनी ऐकली आहेत. त्या यादीत आता पालकांचे शोषण करणाऱ्या कोचिंग क्लासेसच्या दहशतवादाची भर पडली आहे. त्यांच्या विचित्र शोषणातून गरीब व मध्यमवर्गीय पालकांना भगवान काय रजनीकांतही वाचवू शकणार नाही. ( रावल यांनी अभिनेता रजनीकांतचा असा मजेशीर उल्लेख करताच सभागृहात हास्याची कारंजी उडाली )
परेश रावल पुढे म्हणाले-भारतात बालवाडीच्या प्रवेशापासूनच पालकांच्या शोषणाला प्रारंभ होतो. प्रवेशासाठी लाखो रूपयांच्या देणग्या उकळल्या जातात. ज्यांच्यामुळे सरकारी शाळांची गुणवत्ता खालावली त्यापैकी अनेक शिक्षक विद्यार्थ्यांना कोचिंग क्लासेसचा आग्रह करतात. क्लासेसमधे जाणाऱ्या मुलांना अधिक चांगल्या गुणांनी पास केले जाते. भारतात कोचिंग क्लासेस सुरू करण्यासाठी कोणतीही परवानगी, शैक्षणिक अर्हता अथवा गुणवत्ता लागत नाही.
चिंतामणी कारखानीस --
February 17, 2016
अत्यंत तर्कनिष्ठ व वस्तुनिष्ठ विचार मांडणारे नरहर कुरुंदकर हे एक प्रभावी वक्ते सुद्धा होते. त्यांचा जन्म १५ जुलै १९३२ रोजी झाला. नांदेड एज्युकेशन सोसायटीचे पीपल्स कॉलेज, नांदेड येथे प्राचार्य होते. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद दोनदा बिनविरोध त्यांच्याकडे येऊनही त्यांनी त्याला नम्रपणे नकार दिला होता.
प्रा. नरहर कुरुंदकर यांचे ‘इसापनीती’ हे भाषण आणीबाणीच्या काळात खूप गाजले. मनुस्म्रुतीवरच्या पुस्तकात मा. नरहर कुरुंदकर लिहितात, मध्ययुगीन जगात सर्वच देशात विषमता होती. अमेरिका, युरोप ते अरबस्तानापर्यंतचा इतिहास गुलामिच्या आणी स्त्री छळाच्या काळ्या शाइने लिहिला आहे. पण ह्या गुलामिचे आपल्या धर्माने ज्या प्रमाणात समर्थन केलेले आहे, तेव्हढे जगाच्या पाठीवर कोठेही आढळणार नाही. कर्म करत रहा, फळ अत्ता मागू नकोस, पुढल्या जन्मी तुला ते मिळेलच. त्यानुसार तुझी जात ठरेल अन त्यावरून लायकी; ही धार्मीक शिकवण हिंदूना घातक ठरली. देशाला दुर्बल करणार्या . ह्या धार्मीक व्यव्स्थेचे समर्थक आजाही अस्तित्वात आहेत. ही कुरुंदकरांची खरी खंत होती. मनुस्म्रुतीत शुद्राला कर नाही असे मनुसमर्थक म्हणतात. पण त्याचवेळी शुद्राला धनसंचयाचा अधिकारच मनू देत नाही. तर तो कर भरणार कोठून ? अशा बाबी डोळ्याआड करतात. केवळ ग्रंथप्रामाण्यातून हे घडत नाही पण जातीचा दंभ मनूच्या उच्चवर्णीय समर्थकाना बौद्धीक गुलामगिरीत ढकलतो हे कुरुंदकर दाखवून देतात. परंपरेची बौद्धीक गुलामी अमान्य करणार्या उच्चवर्णीयांनाही मनू शूद्राचीच वागणूक देतो असे प्रतिपादून मनूच्या उच्चवर्णीय समर्थकानाही ते चक्रावून टाकतात. सुभाषबाबूंचे आकलन करताना मा.कुरुंदकर लिहितात - जे सशस्त्र क्रांतीकारक आहेत, ते सगळे अहिंसाविरोधी. जे अहिंसाविरोधी ते सर्व गांधीविरोधी आणी जो गांधीविरोधी तो हींदुत्ववादी अशी सोयीची समजूत मध्यमवर्गीयांनी केलेली आहे. सुभाषबाबूंनी त्यांच्या आझाद हिंद रेडीओवरच्या भाषणातून गांधीचा उल्लेख राष्ट्रपिता असाच केला होता. बंगाल मधल्या दास पॅक्ट नुसार ५२ % मुसलमानाना ६०% जागा मिळणार होत्या आणी सुभाषबाबू ह्या करारात सामील होते हे पटवून देत कुरुंदकर सुभाषबाबूंचे मुस्लीम प्रेम दाखवून देतात. स्वतःला गांधीवादी म्हणवणारे कुरुंदकर महात्मा गांधीचे अमक्या विषयावरचे विचार साफ चूक आहेत असे म्हणायला कचरत नाहीत. फाळणीच्या वेळी गांधीजींनी मुस्लीमांचे लांगुलचालन केले होते असा आरोप हिंदुत्ववादी करतात. त्याला उत्तर देताना कुरुंदकर म्हणतात " एका मुसलमानाला तीन मतांचा अधिकार देउन; लखनौ कराराच्या वेळी कोंग्रेस मधील मुस्लीम लांगुलचालनाचा पाया; खुद्द लोकमान्य टिळकांनी घातलेला आहे. हे हिंदुत्ववादी का विसरतात ?" श्रोत्यांच्या प्रस्थापित कल्पनांना तडाखे हाणत त्यांना संपूर्णतः नव्याने विचार करायला शिकवणे हे कुरुंदकरांचे वैशिष्ट्य होते. क्लिष्ट विषयांवर धक्कादायक भाष्ये करताना कुरुंदकरांची भाषा मार्मिक, प्रवाही तरी विचारप्रवर्तक अशी होती.
बाबा आमटे यांनी मा.कुरुंदकरांवर लिहिलेल्या ओळी वास्तवाच्या जाणीवांना वाचा यावी; तस बोलायचास प्रज्ञेच्या दाहक हुंकारासारखा. काळोख उजळत येणाऱ्या किरणांसारखा यायचा तुझा शब्द; नीतीच्या वाटा प्रकाशत,आयुष्याचे अर्थ दाखवत. त्यातून दिसायचे नवे प्रश्न नव्या दिशा; कुणाला गवसायचा प्रकाश कुणाला संधी, तर कुणाला सापडायचे ते स्वत:च.
कुरुंदकरांच्या स्मृतिप्रीत्यर्थ नांदेड शहरात त्यांच्या नावाचे ’नरहर कुरुंदकर प्रतिष्ठान’ स्थापन झाले आहे. या प्रतिष्ठानने २०१० साली, नांदेड एज्युकेशन सोसायटीच्या आणि काही विद्यार्थ्यांच्या मदतीने सोसायटीच्याच स्वामी रामानंद तीर्थ संशोधन केंद्रात नरहर या अभ्यास केंद्रातर्फे कुरुंदकर प्रगत अध्ययन व संशोधन केंद्र सुरू केले आहे. या अभ्यास केंद्रातर्फे वेगवेगळ्याक्षेत्रात काम करणाऱ्या संशोधकांना त्यांच्या प्रकल्पासाठी शिष्यवृत्ती दिली जाते. मा. ऩरहर कुरुंदकर यांचे निधन १० फेब्रुवारी १९८२ रोजी झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ :- इंटरनेट
February 10, 2017
गीतकार इन्दीवर यांचे खरे नाव श्यामल बाबू राय, इन्दीवर यांना लहान पणा पासून लेखक, संगीत आणि गायन लेखन याची आवड होती. त्यांचा जन्म १५ ऑगस्ट १९२४ रोजी झाला. बाबू भाई मिस्त्री यांच्या चित्रपट 'पारसमणि' मधील इन्दीवर यांची गाणी गाजली.
निर्माता-दिग्दर्शक मनोज कुमार यांच्या चित्रपटात मा.इन्दीवर गाणी लिहिली. 'उपकार' मधील "क़स्मे वादे प्यार वफा सब बातें हैं, बातों का क्या..." ही गाणी काय किंवा 'पूरब और पश्चिम' मधील "दुल्हन चली वो पहन चली" और "कोई जब तुम्हारा हृदय तोड़ दे" ही गाणी तर अजून ही अवीट वाटतात मा. इन्दीवर यांनी संगीतकार जोड़ी कल्याणजी-आनंदजी च्या बरोबर "छोड़ दे सारी दुनिया किसी के लिये...", "चंदन सा बदन..." और "मैं तो भूल चली बाबुल का देश..." अशी सुंदर गाणी लिहिली आहेत.
राकेश रोशन यांच्या चित्रपटात इन्दीवर यांनी सदाबहार गाणी लिहिली. 'कामचोर', 'ख़ुदग़र्ज', 'खून भरी मांग', 'काला बाज़ार', 'किशन कन्हैया', 'किंग अंकल', 'करण अर्जुन' व 'कोयला' या राकेश रोशन यांच्या चित्रपटातील गाणी मा.इन्दीवर यांनी लिहिली. त्यांच्या या गाण्या मुळे राकेश रोशन यांचे चित्रपटातील गाणी आज आपण आठवणीने ऐकतो. विजय आनंद यांच्या 'जॉनी मेरा नाम' या चित्रपटातील "नफ़रत करने वालों के सीने में...", "पल भर के लिये कोई हमें..." ही गाणी मा.इन्दीवर यांचीच.
मनमोहन देसाई यांच्या 'सच्चा-झूठा' या चित्रपटातील "मेरी प्यारी बहनिया बनेगी दुल्हनियां..." हे इन्दीवर यांचे गाणे आज ही लग्नात वाजवले जाते. 'सफ़र' या चित्रपटातील इन्दीवर यांचे "जीवन से भरी तेरी आंखें..." व "जो तुमको हो पसंद..." ही गाणी तर लाजबाब.
१९७५ मध्ये 'अमानुष'या चित्रपटासाठी इन्दीवर यांना 'फ़िल्म फेयर पुरस्कार' मिळाला. इन्दीवर यांनी ३०० पेक्षा जास्त चित्रपटांसाठी गाणी लिहिली. २७ फेब्रुवारी १९९७ मा.इन्दीवर यांचे निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
इन्दीवर यांनी लिहीलेली काही गाणी
दिल ऐसा किसीने मेरा तोडा
फुल तुम्हे भेजा है खत में
गरजत बसरत
जिंदगी का सफर
चंदन सा बदन
जो तुमको हो पसंद
मधुबन खुशबु देता है
एक तु जो मिला
पास बैठो तबीयत बहेल जायेगी
एक बार तु कहदे
इस दिल मे बसा था प्यार तेरा
ओठों से छु लो तुम
कोई जब तुम्हारा
दिल एैसा किसीने
August 15, 2017
Copyright © 2025 | Marathisrushti