जगभरातील विविध क्षेत्रातील उल्लेखनीय व्यक्तींचा परिचय.. हा आहे सामान्यज्ञानाचा खजिना…
ठाण्यातील एक हजार तरुणांना रोजगार उपलब्ध करुन देणारं पहिलं कॉल सेंटर सुरु करुन डॉ. निरगुडकरांनी एक नवा वस्तुपाठच घालून दिला आहे. तसेच संपूर्ण भारतातील ६०,००० अर्धशिक्षित तरुणांना स्वयंरोजगारासाठी क्षमतावृद्धीचे शिक्षण देऊन रोजगारासाठी समृद्ध केलं.
May 23, 2014
अनेक कलाकारांना आपल्या कॅमेर्याद्वारे ग्लॅमर प्राप्त करून देणारे ज्येष्ठ सिनेछायाचित्रकार जगदीश माळी यांनी एका चित्रपटविषयक मासिकापासूनक आपल्या फोटोग्राफीच्या कारकीर्दीला सुरवात केली.अभिनेत्री रेखाचे ते आवडते फोटोग्राफर होते. व त्या केव्हाही आणि कधीपण जगदीश माळी यांच्याकडूनच फोटो काढून घेत असे.जगदीश माळींनी अनेक जाहिराती आणि म्युझिक व्हिडिओसाठी काम केले होते.
June 4, 2014
स्थापना : ३ आक्टोबर १९५७
आज विविधभारती साठ वर्षाची झाली.
जेव्हा भारतात जनतेच्या मनोरंजनासाठी वाहून घेतलेली कोणतीही वाहिनी नव्हती, तेव्हा विविध भारतीचा उदय झाला. त्या वेळी रेडिओ सिलोन हे एकमात्र विरंगुळ्याचे साधन होते. संगीताच्या सुवर्णयुगात नागरिकांसाठी मनोरंजन वाहिनी सुरू करण्याची कल्पना सुचली आणि विविध भारती सेवेला प्रारंभ झाला. ३ आॅक्टोबर १९५७ रोजी आकाशवाणीवरून शीलकुमार शर्मा यांच्या आवाजात पहिली उद्घोषणा झाली, ती अशी ‘यह विविध भारती हैं, आकाशवाणी का पंचरंगी कार्यक्रम’ विविध भारतीवर पहिले गाणे ऐकवण्यात आले, ते होते ‘नाच रे मयूर’... विविध भारतीचे आद्यप्रवर्तक पंडित नरेंद्र शर्मा यांनी ते लिहिले होते आणि मन्ना डे यांनी ते गायले होते. अनिल विश्वास यांनी संगीत दिले होते. विविध भारतीवरून शास्त्रीय संगीताचा खजिना, महान कलाकारांच्या मुलाखतींचे कार्यक्रम देखील सादर केले गेले.
सुमारे सहा दशकांच्या प्रवासानंतरही आजच्या आधुनिक प्रसारण युगात इतर एफ.एम चॅनेलच्या भाऊगर्दीत विविध भारतीची पकड मजबूत आहे. सुरुवातीला ही सेवा दिल्लीमध्ये होती. १९७२-७३ मध्ये मुंबईत चर्चगेट येथे विविध भारतीचे प्रसारण हलवण्यात आले आणि १९९८-९९ मध्ये अखेरीस ते बोरीवली येथे हलवण्यात आले. १ मे २००० रोजी थेट प्रसारण सुरू झाले, तर १६ डिसेंबर २००४ रोजी डीटीएच सेवा सुरू झाली.
जयमाला,छायागीत, पिटारा, हवामहेल,उडाला उनके यादोंका,संगीत सरीता,बेला के फ़ूल,आज के फनकार,असे अनेक कार्यक्रम अजुनही लोकप्रिय आहेत. शांत, संयमी सुरात, आणि ते लावत असलेल्या गाण्याप्रमाणेच श्रवणीय आवाज असलेले विविधभारतीवरील निवेदक कमल शर्मा, युनूस खान असोत वा ममता सिंग, रेणू बंसल व इतर या साऱ्याची वैशिष्ठ्य वेगळी,उच्च हिंदी भाषा आणि बरच काही.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ. इंटरनेट
October 3, 2017
वैजयंतीमाला यांनी आपल्या चित्रपट कारकिर्दीची सुरवात तामिळ भाषेतील ” वड़कई ” या चित्रपटापासून केली.
August 30, 2021
बालगंधर्व या टोपणनावाने ओळखले जाणारे नारायण श्रीपाद राजहंस हे मराठी गायक-अभिनेते होते. संगीतनाटकांतील गायन व अभिनयासाठी - विशेषकरून स्त्री-पात्रांच्या अभिनयातील कामासाठी त्यांची ख्याती होती. ते पं भास्करबुवा बखले यांचे शिष्य आणि मास्तर कृष्णरावांचे गुरुबंधू होत. बालगंधर्व ही पदवी बाळ गंगाधर टिळकांनी दिली.
जन्म 26 जून 1888 साली. संगीत रंगभुमीचा बहुमोल अंलकार. मूळ नाव नारायण श्रीपाद राजहंस असे होते. लोकमान्य टिळकांकडून वयाच्या 11 व्या वर्षी बालगंधर्व म्हणून कौतुक. किर्लोस्कर नाटक मंडळीत शारदेची पहिली स्त्री भुमिका केली. गंधर्व नाटक मंडळीची स्थापना. प्रभात कंपनीच्या धर्मात्मा बोलपटात एकनाथाची भुमिका 1929 पुणे येथील 24 व्या नाटयसंमेलनाचे अध्यक्ष होते. बालगंधर्वांनी सिंधु, रूक्मिनी, शारदा या प्रमुख स्त्री भुमिका केलेल्या होत्या. पद्मभुषणाने सन्मानित. त्यांचा मृत्यु 15 जुलै 1967 साली झाली.
मराठी रंगभूमीवरील एक अव्दितीय गायक नट. पुर्ण नाव नारायण श्रीपाद राजहंस 1906 ते 1955 या पन्नास वर्षाच्या कालखंडात स्त्रीभूमीका आणि नंतर पुरूष भूमीकाही करून बालगंधर्वांनी रसिकांना संतूष्ट केले व मराठी संगीत रंगभूमी अतिशय लोकप्रिय आणि कलासंपन्न केली. जन्म पुणे येथे. वडीलांचे पुर्ण नाव श्रीपाद कृष्णाजी राजहंस व आईचे नाव अन्नपुर्णाबाई असून पत्नीचे नाव लक्ष्मीबाई होते. त्यांच्याशी बालगंधर्वाचा विवाह 1907 साली झाला होता. त्यांना पाच आपत्य झाली. पुढे लक्ष्मीबाईंच्या निधनानंतर 1940 बालगंधर्वांनी प्रसिद्ध गायिका गोहराबाईंशी नोंदणी पद्धतीने 1952 च्या सुमारास विवाह केला. गोहराबाईंशी त्यांचा परिचय 1937 मध्येच झाला होता. नारायणरावांचे शिक्षण इंग्रजी दुसर्या इयत्तेपर्यंतच झाले. अतिशय मोहक आणि भावदर्शी चेहरा व गंधर्वतुल्य आवाज, या देणग्या त्यांना जन्मतच लाभल्या होत्या 1898 साली लोकमान्य टिळकांनी त्यांचे गाणे प्रथमच ऐकले; `हा तर बालगंधर्व आहे` असे सहजस्फूर्त उद्गार त्यांनी काढले, असा प्रवाद आहे. पुढे नारायणराव `बालगंधर्व` म्हणूनच ओळखले जाऊ लागले.
त्यांच्या अंगातील उपजत गुणांचे चीज व्हायचे असेल, तर त्यांनी नटाचा व्यवसाय करावा असे त्यांच्या काही निकटवर्तियांना वाटत होते. किर्लोस्कर नाटक मंडळी ही त्या काळातली अग्रेसर संगीत नाटयसंस्था होती. तिचे संस्थापक अण्णासाहेब किर्लोस्कर आणि तिला उत्कर्षाच्या शिखरावर नेऊन बसविणारे गायक नट भाऊराव कोल्हटकर यांनी निर्माण केलेली थोर परंपरा महाराष्ट्राच्या परिचयाची होती. लोकमान्य टिळक आणि कोल्हापूरचे छत्रपती श्रीमंत शाहू महाराज यांचा आशिर्वाद घेऊन, 1905 सालच्या गुरूव्दादशीला बालगंधर्वांनी किर्लोस्कर नाटक मंडळीत प्रवेश केला. 1906 सालच्या सुरूवातीला बालगंधर्वांनी अण्णासाहेब किर्लोस्कर यांच्या संगीत शाकुंतल नाटकातील शंकुतलेची भूमिका केली. ती पाहून भाऊराव कोल्हटकर यांच्याबरोबर अस्तंगत झालेले किर्लोस्कर नाटक मंडळीचे सौभाग्य आज तिला परत लाभले, असे तत्कालीन नाटय रसिकांना वाटले. त्यावेळी नारायण दत्तात्रेय तथा नानासाहेब जोगळेकर हे किर्लोस्कर नाटक मंडळीचे अर्ध्वयू होते.
त्या काळात नाटकांमध्ये स्त्रियांनी काम करणं निषिध्द मानलं जाई. त्यामुळे स्त्रीभूमिकाही पुरुषच करत असत. बालगंधर्वांच्या स्त्री-भूमिकांमध्ये विविधता होती. अचूक निरीक्षण व सौंदर्यदृष्टी यांमुळे अस्सल स्त्री भूमिका साकारण्यात बालगंधर्व यशस्वी होत. त्यांच्या भूमिकांमधील वेष व केशभूषेचं अनुकरण त्या काळातील स्त्रियाही करत असत. बालगंधर्व या भूमिकांशी तदरुप होऊन जात असत. त्यामुळे आपण या स्त्रीभूमिकांमध्ये एका पुरुषाला पाहात आहोत, अशी पुसटशी जाणीव देखील प्रेक्षकांना होत नसे. बालगंधर्वाच्या अभिनयाचा हा एक वैशिष्टयपूर्ण पैलू होता.
1913 मध्ये बालगंधर्वांनी गणपतराव बोडस आणि गोविंदराव टेंबे यांच्याबरोबर भागीदारीमध्ये गंधर्व नाटक मंडळीची स्थापना केली. पुढे टेंबे आणि बोडस या भागीदारीतून निवृत्त झाल्यानंतर बालगंधर्व या कंपनीचे एकटे मालक झाले. संगीत रंगभूमीचा तो सुवर्णकाळच होता. अण्णासाहेब किर्लोस्कर, गोविद बल्लाळ देवल, श्रीपाद कृष्ण कोल्हटकर, कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर, राम गणेश गडकरी असे श्रेष्ठ नाटककार या काळात झाले. बालगंधर्वांनी `शाकुंतल` मध्ये शकुंतला, सौभद मध्ये सुभदा, मृच्छकटिक मध्ये वसंतसेना, `मानापमान`मध्ये भामिनी, `संशयकल्लोळ` मध्ये रेवती, शारदा मध्ये शारदा, मूकनायक मध्ये सरोजिनी, स्वयंवर मध्ये सिंधू ही स्त्री पात्रं रंगवली . 4 जून 1955 रोजी त्यांनी ’एकच प्याला’ नाटकात साकार केलेली सिंधू ही त्यांची शेवटची भूमिका. त्यांनंतर त्यांनी रंगभूमीवरुन निवृत्ती स्वीकारली. रंगभूमीवरील यशस्वी कारकीर्द व रसिकांचं भरभरुन मिळालेलं प्रेम यामुळे संगीत नाटक अकादमीतर्फे राष्ट्रपतीपदक देऊन तर पुढे पद्मभूषण पुरस्काराने त्यांचा सन्मान करण्यात आला.
1933 च्या सुमारास भारतात बोलपटाचं युग सुरु झालं. त्यामूळे रंगभूमीकडे येणार्या प्रेक्षकांना ओहोटी लागली. बालगंधर्वही काही काळ चित्रपंटांकडे वळले. 1935 मध्ये प्रभात फिल्म कंपनीच्या `धर्मात्मा` या चित्रपटांत त्यांनी संत एकनाथांची भूमिका केली. मात्र बालगंधर्व चित्रपटांत रमले नाहीत. त्यांच्या ओढा रंगभूमिकडेच होता. म्हणूनच 1936 मध्ये ते पुन्हा रंगभूमीकडे परतले. 1939 पासून त्यांनी नाटकांमधून पुरुष भूमिका सादर करायला सुरुवात केली. `मानापमान` मध्ये धैर्यधराची आणि `मृच्छकटिक`मध्ये चारुदत्ताची भूमिका ते करु लागले. पण प्रेक्षकांना त्यांच्या स्त्री भूमिकाच अधिक प्रिय होत्या.
बालगंधर्व हे गायक-नट होते. त्यांची शास्त्रीय संगीताची बैठक उत्तम होती. भास्करबुवा बखले यांच्याकडून त्यांनी गायनाचे धडे घेतले होते. ख्याल, नाटकांमधील त्यांची अनेक पदं गाजली. शास्त्राचा बाज राखून अभिनयाला अनुकूल असं गाणं त्यांनी गायलं. त्यांची गाणी घराघरांमध्ये पोहोचली. नाटयसंगीताची अभिरुची निर्माण करण्याचं महत्वपूर्ण कार्य करणार्या बालगंधर्वाचा 1967 साली मृत्यू झाला.
बालगंधर्वांचे मराठीसृष्टीवरील लेख.
नारायण श्रीपाद राजहंस ऊर्फ बालगंधर्व (27-Jun-2017)
नारायण श्रीपाद राजहंस ऊर्फ बालगंधर्व (17-Jul-2017)
December 15, 2010
आपल्या जादुई स्वरांमधून रसिकांच्या मनाचा ठाव घेऊन मंत्रमुग्ध करत तर कधी थिरकायला लावणारे गायक जयवंत कुलकर्णी यांची आज पुण्यतिथी
जयवंत कुलकर्णी यांनी गायनाचे धडे प्रसिध्द शास्त्रीय गायक लक्ष्मणराव देवासकर यांच्याकडुन गिरवले, त्यासोबतच उत्तम हार्मोनियम वाजवण्याची सुध्दा त्यांचे गुरु लक्ष्मणराव देवासकर यांच्यामुळेच मिळाली. त्यांच्या आवाजातील गाण्यांवर सत्तरच्या दशकातील तरुणाई इतकी फीदा होती की, महाविद्यालयात कोणताही सांस्कृतिक कार्यक्रम असोत जयवंत कुलकर्णी यांच्या “हिल पोरी हिला” किंवा “ही चाल तुरू तुरू” या दोन गाण्यांना हमखास “वन्स मोअर” मिळत असे. विशेष म्हणजे “सावध हरिणी सावध” या गाण्याला देखील अभूतपूर्व असा प्रतिसाद मिळाला आणि संगीतविश्वात लोकप्रियतेचा उच्चांक गाठला. कारण या गाण्याला उडत्या चालीच्या संगीतासोबतच जयवंत कुलकर्णी यांच्या आवाजातील जोरकसपणा अनुभवायला मिळाला आणि मराठी चित्रपट व भावगीतांसाठी हा प्रयोग तसा नविनच होता. खरं पाहिलं तर जयवंत कुलकर्णी यांनी त्यांचा सांगितीक कारकीर्दीत जी कोणती चित्रपट गीत गायली त्या बहुतांश गाण्यां मध्ये “गावरानबाज” पहायला मिळत असे. पण विशिष्ठ कोणत्याही एकाच ढंगातील गायन प्रकारात व अडकता जयवंतजींनी “अष्टविनायका तुझा महिमा कसा”, “अंतरंगी तो प्रभाती छेडितो स्वरबासरी, नाम त्याचे श्रीहरि नाम त्याचे श्रीहरि”, “ विठुमाऊली तु माऊली जगाची, माऊली तू मूर्ती विठठ्लाची ” आणि “राम कुष्ण नारायण हरि, केशवा मुरारी पांडुरंगा” यासारखी अध्यात्मिक गीत आणि अभंग तल्लीन होऊन गायले! तसंच “अजिंक्य भारत अजिंक्य जनता” , “मंगल देशा पवित्र देशा” या दोन्ही गीतील त्यांच्या स्वरातून देशाभिमान प्रगट झाला नसता तर नवलच !
“शाब्बास बिरबल शाब्बास बिरबल” हे मराठी संगीत संगभूमीवर गाजलेले नाटक आणि त्यातील “विश्वानाथ सूत्रधार तूच श्याम सुंदरा ” ही नांदी आजही ऐकल्यावर ताजी वाटावी अशीच आहे, या नांदीला जयवंत कुलकर्णींसह पंडित-राम मराठे आणि रामदास कामत या गायकाने स्वरबध्द केले होते. या नांदीमुळे जयवंत कुलकर्णी यांच्या गायकीच्या शिरपेचात नाट्यपद गाण्याचा तुरा देखील रोवला गेला. मराठी चित्रपटांतील द्वंद्व गीतांमध्ये काही गायक-गायिकांच्या जोड्या गाजल्या, त्यापैकी जयवंत कुलकर्णीं सोबत उषा मंगेशकर ही गायनातील जोडी स्वरांच्या तालावर अक्षरश: ठेका धरायला लावत. या दोन्ही गायकांनी एकत्रित गायलेली सोंगाड्या चित्रपटातील “काय गं सखु”, आणि “माळ्याच्या मळ्यामधी कोण गं उभी” तर “सख्या साजणा” मधील “चल चल जाऊ शिणुमाला”, किंवा गारंबीचा बापू चित्रपटातील “चांदणं टिपूर हलतो वारा” तसंच “लागे ना, लागे ना रे थांग तुझ्या ह्रदयाचा ” आजही आपल्या ओठांवर रुंजी घालताहेत. यासह नवरा माझा ब्रम्हचारी मधील “आई तुझं लेकरु येडं गच कोकरु”, पडछाया चित्रपटातील “नाच लाडके नाच, जगापासुनी दूर राहुया नको जनांचा त्रास”, तर “अनोळखी”तलं “ जीवन गगन मी पाखरू ” आणि “अंधाराची खंत तू कशाला करिसी रे”, “नाते जुळले मनाचे मनाशी” या भावगीतातून मानवी मनाचा वेध त्यांच्या स्वरातनं अगदी प्रभावीपणे उमटला. “आमचा राजू का रुसला” , “माझ्या मामाची रंगीत गाडी हो,तिला खिल्लारी बैलांची जोडी हो” , “ गाव असा नि माणसं अशी, नातीगोती जडतंत कशी” अशी मिश्कील स्वरुपाची व बालगीते रसिकांनी उचलून धरली. “आयलय तूफ़ान बंदराला” या चित्रपटासाठी, लता मंगेशकर यांच्यासोबत, “आयलय बंदरा चांदाचं जहाज, हवलुबाईची पुनीव आज ” , हे क्वचित प्रसंगी ऐकायला मिळणारे अगदी वेगळ्या प्रकारचे कोळीगीत गायले होते.जयवंत कुलकर्णीं यांनी गायलेली प्रत्येक गाणी आजही रसिकांच्या ओठांवर आहेत. यामध्ये भावगीतं, भक्तीगीतं व असंख्य चित्रपटगीतांचा देखील समावेश आहे. दादा कोंडकेंवर चित्रीत झालेल्या अनेक मराठी गाण्यांसाठी जयवंत कुलकर्णी यांनी पार्श्वगायन केलं असून हा आवाज जणु दादां कोंडकेंचा हे समीकरणचं होऊन बसले. अनेक मराठी गाण्यांना गावरान ढंगात गाऊन एका वेगळ्या उंचीवर घेऊन जाण्याचा बहुमान जयवंत कुलकर्णींचा आहे. “ज्योतिबाचा नवस” आणि “एकटा जीव सदाशिव” या चित्रपटातील गाण्यासाठी जयवंत कुलकर्णी यांना सर्वोत्कृष्ट पार्श्वगायक म्हणून महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कारामध्ये गौरवण्यात आले होते.
मा.जयवंत कुलकर्णी यांचे ३१ ऑगस्ट २००५ रोजी निधन झाले. आपल्या समूहाकडून मा.जयवंत कुलकर्णी यांना आदरांजली.
--संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ. सागर मालाडकर/ मराठी सृष्टी
August 31, 2016
लहान पणासूनच अपर्णाला पर्यटनाची आवड, त्यातही ट्रेकिंग सारख्या अॅडव्हेंचर प्रकाराची अधिकच ! म्हणजेच सतत चित्तवेधक गोष्टींकडे ओढा थोडा अधिक असायचा ,आणि म्हणून काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न डॉ. अपर्णा यांचा असायचा, वाहनांची सुध्दा प्रचंड आवड असल्यामुळे एक निश्चय केला होता की स्वावलंबी बनल्यावर स्वत: ची गाडी किंवा बाईक खरेदी करुन आपल्या “अॅडव्हेचर ”ची आवड ही पूर्ण करायची, त्यासाठी सर्वप्रथम बाईक चालवण्याचं प्रशिक्षण घेतलं
March 7, 2014
दामू-गोविंदा जोड रे...
राम राम मंडळी,
१९९०/९१ चा सुमार असेल. मी तेव्हा मुंबईतल्या प्रभादेवी येथे एके ठिकाणी नोकरी करत होतो. शनिवारचा दिवस. संध्याकाळी कार्यालय सुटल्यावर दादरच्या फलाटावर ठाण्याच्या गाडीची वाट पहात उभा होतो. बघतो तर काय, माझ्या बाजुला गोविंदराव उभे. तेही गाडीची वाट पहात होते.
मंडळी गोविंदराव म्हणजे, नामवंत संवादिनीवादक पं गोविंदराव पटवर्धन. त्यांच्या अनेक मैफलीतला एक श्रोता या नात्याने त्यांचा माझा बऱ्यापैकी परिचय. माझा एक मित्र विघ्नेश जोशी हा त्यांचा शिष्य. विघ्नेशबरोबर एक-दोनदा मी त्यांच्या घरीही गेलो होतो.
मी फलाटावरच गोविंदरावांना वाकून नमस्कार केला.
"अरे तू इथे कुठे?"
"बुवा, इथेच प्रभादेवीला माझं कार्यालय आहे. ते संपून आता घरी चाललो आहे. आपण कुठे निघालात ?"
"अरे पद्माचं (सौ पद्मा तळवलकर) गाणं आहे डोंबिवलीला. साथीला मी आहे. गाणं रात्री नऊचं आहे. पण हॉल नवा आहे. रात्री अंधारात शोधाशोध कुठे करणार? अजून थोडा उजेड आहे म्हणून आत्ताच निघालो आहे.
"त्यात काय विशेष बुवा. मीही त्या गाण्याला जाणार आहे. मला हॉल ठाऊक आहे. मी आपल्याला तिथे व्यवस्थित घेऊन जाईन. आपण कृपया माझ्या घरी ठाण्याला जरा वेळ चलावं. मला खूप बरं वाटेल."
शेवटी हो, नाहीचे आढेवेढे घेत गोविंदराव वाटेत ठाण्याला जरा वेळ माझ्या घरी आले. माझ्याशी, माझ्या आईशी अगदी आपुलकीने भरपूर गप्पा मारल्या. माझ्याकडे असलेल्या पेटीवर माझ्या आग्रहाखातर सुरेखसं 'नाथ हा माझा' वाजवलं. आम्ही जेवलो, आणि एकत्रच कार्यक्रमाला निघालो.
पं गोविंदराव पटवर्धन!
संगीतक्षेत्रातला एक फार मोठा माणूस. मंडळी, या माणसाच्या बोटात जादू होती. गोविंदराव म्हणजे संवादिनी आणि संवादिनी म्हणजे गोविंदराव असं जणू समिकरणच झालेलं. अगदी लहानपणापासून, म्हणजे १२-१५ व्या वर्षीपासूनच गोविंदरावांनी संवादिनी वादनाला सुरवात केली. पण पेटीवादनाची कला त्यांच्यात उपजतच. पेटीवर त्यांची बोटं लीलया फिरायची. स्वरज्ञान उत्तम. गावात होणाऱ्या भजना-कीर्तनाच्या साथीला गोविंदराव हौसेखातर साथसंगत करू लागले. कधी पेटीवर, कधी पायपेटीवर, तर कधी ऑर्गनवर.
गोविंदराव मूळचे कोकणातल्या गुहागर जवळील अडूर गावचे. लहानपणापासूनच ते गावतल्या त्यावेळच्या सांस्कृतीक वातावरणात रमले. गावात होणाऱ्या नाटकात हौसेखातर कामही करायचे. पण जीव मात्र पेटीतच रमलेला. त्यानंतर गोविंदरावानी नोकरी धंद्याकरता मुंबई गाठली. मुंबईच्या पोलीस कमिशनरच्या हापिसात नोकरी आणि बिऱ्हाड गिरगावात. मंडळी, त्याकाळचं गिरगाव म्हणजे सदैव सुरू असलेली एक सांस्कृतीक चळवळच. कीर्तनं, नाटकं, गाणी यांची लयलूट. आणि इथेच गोविंदरावांतल्या कलाकाराला अगदी पोषक वातावरण मिळालं.
पं रामभाऊ मराठे, पं वसंतराव देशपांडे, आणि पं छोटा गंधर्व ही गोविंदरावांची श्रध्दास्थानं. या तिघांनाही गोविंदराव गुरूस्थानी मानत. तिघांच्याही शैलीतून गोविंदरावांनी खूप काही घेतलं.
एकंदरीतच 'गाणारा तो गुरू' असं गोविंदराव नेहमी म्हणत. म्हणजे ज्यांच्या ज्यांच्या म्हणून साथीला ते बसत असत त्यालाच ते त्याक्षणी मनोमन गुरूस्थानी मानायचे. मग तो गायक लहान असो, कुणी नवशिका असो, की रामभाऊं, वसंतरावांसारखा कुणी दिग्गज असो!
मंडळी, गोविंदरावांची पेटीवरची साथसंगत हा फार मोठा आणि समस्त पेटीवादकांनी अभ्यास करावा असा विषय आहे. कीर्तनं, भजनं, नाट्यसंगीत, ख्याल यापैकी प्रत्येक गायन प्रकाराला ते तेवढीच समर्थ आणि अत्यंत रसाळ साथ करीत. गिरगावातल्या जयराम कानजी चाळीतल्या ट्रिनिटी क्लबात त्यावेळच्या बड्या बड्या गवयांचा सतत राबता आणि उठबस असे. पं रामभाऊ मराठे, पं सुरेश हळदणकर, पं कुमार गंधर्व यांसारख्या गवयांबरोबर गोविंदराव साथसंगत करू लागले.
त्यांच्या वादनाचा विशेष म्हणजे ज्या गायकाबरोबर साथसंगत करायची आहे त्याच्या शैलीचा त्यांचा अभ्यास असे. त्या शैलीतच त्यांचा हात फिरत असे. म्हणजे जेव्हा ते रामभाऊंबरोबर साथ करत तेव्हा ज्या आक्रमकतेने रामभाऊंच्या लयकारी, ताना चालायच्या, त्याच आक्रमकतेने गोविंदरावही जायचे. तेच आक्रमक गोविंदराव वसंतरावांबरोबर अगदी नटखट आणि नखरेल होत असत, तर तेच गोविंदराव छोटागंधर्वांसोबत वाजवताना फार लडीवाळ साथ करीत! मंडळी, माझ्या मते ही फार फार मोठी गोष्ट आहे.
गायक काय गातो आहे, कोणती सुरावट आहे, कोणता आलाप आहे, कोणती तान आहे हे ऐकून ते पुढच्याच क्षणी जसंच्या तसं हातातून वाजणं, या फार अवघड गोष्टीवर गोविंदरावांचं प्रभुत्व वादातीत होतं.
पं कुमार गंधर्व यांच्याबरोबरही गोविंदरावांनी खूप साथसंगत केली आहे. कुमारांच्या गाण्यात पेटीवादनाला तसा वाव कमी असे. ते बऱ्याचदा गोविंदरावांना नुसता षड्जच धरून ठेवायला सांगत असत. कुणीतरी एकदा सहज कुमारांना विचारलं, 'काय हो, नुसता सा धरायचा, तर त्याकरता तुम्हाला गोविंदरावच कशाला हवेत?' यावर कुमारांनी उत्तर दिलं होतं, 'अरे, आमचा गोविंदा नुसता 'सा' जसा धरतो ना, तसा 'सा' देखील कोणाला धरता येत नाही हो.'! जाणकारानी यातून काय तो अर्थ काढावा.
कुमारांचा गोविंदरावांवर फार जीव! मस्त काळी सातारी तंबाखू आणि चुना यावर दोघांचंही प्रेम. मूड लागला की कुमार गंमतीत म्हणायचे, 'अरे सुदाम्या, जरा तुझे दही-पोहे काढ पाहू'! :) कुमारांची ही एक मजेशीर आठवण मला गोविंदरावांनी सांगितली होती.
नाट्यसंगीताच्या क्षेत्रात एक ऑर्गनवादक म्हणून गोविंदरावांची कामगिरी ही अक्षरशः आभाळाएवढी मोठी आहे. अनेक संगीतनाटकं आणि त्याचे अक्षरशः हजारांनी प्रयोग गोविंदरावांनी ऑर्गनवर वाजवले आहेत. अहो, त्या नाटकातल्या पदांसकट अक्षरशः संपूर्ण नाटकं गोविंदरावांची पाठ झाली होती. रात्री उशिरापर्यंत चालणारे संगीतनाटकांचे प्रयोग, त्यानंतर दिवसभर ऑफीस, घरी येऊन जेवले की चालले पुन्हा प्रयोगाला साथ करायला. हे अक्षरशः वर्षानुवर्ष अव्ह्याहतपणे सुरू होतं!
बोलायचे अगदी कमी. पण अत्यंत विनम्र आणि मृदुभाषी. त्यांना स्वतःला कुणी 'गोविंदराव' म्हटलेलं आवडत नसे. ते नेहमी सांगायचे, 'अरे मला गोविंदा पटवर्धन पेटीवाला' एवढंच म्हणा. त्यांच्या मते गोविंद या नांवानंतर 'राव' हे बिरुद लावावं अशी एकच व्यक्ती होती. ती म्हणजे पं गोविंदराव टेंबे!
मंडळी, नाट्यसंगीताला साथसंगत करणं हे खरं तर महामुष्कील काम आहे. नाटक सुरू असताना खालून ऑर्गनवर साथ करणाऱ्या गोविंदरावांचं नाटकातल्या संवादांकडे फार बारकाईने लक्ष असे. जिथे संवाद संपून पद सुरू होणार त्याच क्षणी खालून ऑर्गनवाल्याने नेमका स्वर रंगमंचावरच्या गायकनटाला दिलाच पाहिजे. हे टायमिंग फार महत्वाचं आहे. नाटकातलं पद सुरू होण्याच्या अगदी बरोब्बर वेळेला तिथे गोविंदरावांनी ऑर्गनवर अगदी भरजरी स्वर दिलाच म्हणून समजा. आहाहा! ऑर्गनच्या स्वरांचा भरणा द्यावा तर गोविंदरावांनीच. नाटकातील पदं वाजवताना गोविंदरावांच्या वादनातून पदांतील शब्द तर वाजायचेच, अहो पण ऱ्ह्स्व-दीर्घ, जोडाक्षरंदेखील जशीच्या तशी वाजायची, असं पं सुरेश हळदणकरांसारखे जाणकार सांगतात तेव्हा या माणसापुढे नतमस्तक होण्याशिवाय दुसरा पर्याय रहात नाही. उदाहरणार्थ, 'सुजन कसा मन चोरी' हे पद जेव्हा गोविंदरावांच्या हातून वाजायचं तेव्हा सुजनतला 'सु' हा ऱ्ह्स्वच वाजायचा, किंवा 'स्वकुल तारक सुता' मधलं स्व हे जोडाक्षर वाजवताना त्यांचा हात पेटीवर अश्या रितीने पडायचा की स्वकुल तारक सुता असंच ऐकू यायचं. ते कधीही सकुल तारक असं वाजलं नाही!!
गोविंदरावांकडून पेटीवर नाट्यपदं ऐकणं हादेखील एक गायनानुभव असे हो! फार मोठा माणूस.. अशी माणसं पुन्हा पुन्हा होत नाहीत. गोविंदरावांचा साठीचा सत्कार सोहळा फार सुरेख झाला होता. त्यात गोविंदराव आणि भाईकाका या दोघांची हार्मोनियमवादनाची जुगलबंदी होती. तेव्हा सुरवातीलाच भाईकाकांनी असं म्हटलं होतं की आज गोविंदाबरोबर वाजवायचंय ह्या जाणिवेने माझ्या पोटात नाही तरी बोटात गोळा आलाय!
"पोलीस खात्यात इतके वर्ष काम करून इतका साफ हात असलेला दुसरा माणूस माझ्या पाहण्यात नाही!" इति भाईकाका!
साहित्य संघातली एक घटना जिला ऐतिहासिक मोल आहे. पं सुरेश हळदणकरांचं 'श्रीरंगा कमलाकांता' सुरू होतं. हळदणकरबुवा नेहमी सारखेच रंगले होते. अप्रतीमच गायचे बुवा. काय आवाज, आणि काय गाण्यातली तडफ! अक्षरशः तोड नाही. साथीला गोविंदराव होते. तबल्याच्या साथीला दामुअण्णा पार्सेकर होते. तेही रंगून वाजवत होते. त्यादिवशी एकंदरीत 'श्रीरंगा कमलाकांता' अफाटच जमलं होतं. आणि विशेष म्हणजे हळदणकरबुवांच्या तोडीस तोड गोविंदरावही तेवढेच रंगून वाजवत होते. हळदणकरबुवांची प्रत्येक जागा, प्रत्येक हरकत अशी काही सही सही वाजत होती की खुद्द बुवाच आश्चर्यचकीत झाले. मंडळी त्या मूळ पदात शेवटी 'धोडो-सदाशिव जोड रे' अशी ओळ होती, तिथे ऐनवेळेला हळदणकरबुवांनी भारावून जाऊन 'दामू-गोविंदा जोड रे' असा बदल केला आणि सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला. श्रीरंगा कमलाकांता या फार सुरेख पदात गोविंदरावांना अढळ स्थान मिळालं!
साल १९९६. (चूभूद्याघ्या). सकाळी ७ वाजता विघ्नेशचा फोन आला, "तात्या, गोविंदराव गेले."
मी शिवाजीपार्कची स्मशानभूमी गाठली. तयारी सुरू होती. अनेक कलावंत अंतयात्रेकरता जमले होते. गोविंदराव शांतपणे निजले होते. बाजुलाच हळदणकरबुवा सुन्नपणे उभे होते. एका क्षणी त्यांचा बांध फुटला आणि ते रडत रडत म्हणाले "माझ्या 'दामू-गोविंदा जोड रे' मधला गोविंदा गेला हो...."
तात्या अभ्यंकर.
संकलन. संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ :- इंटरनेट
January 31, 2017
लेखक, कादंबरीकार, कथाकथनकार अशी ख्याती असलेल्या व.पु. काळे अर्थात वसंत पुरुषोत्तम काळे,हे पेशाने वास्तुविशारद होते.
“आपण सारे अर्जुन”, “गुलमोहर”, “गोष्ट हातातली होती!“, “घर हलवलेली माणसे”, “दोस्त”, “माझं माझ्यापाशी?”, “मी माणूस शोधतोय”, “वन फॉर द रोड”, “रंग मनाचे”, “माणसं”,“प्लेझर बाँक्स भाग १ आणि २”, “वपुर्वाई”, “वपुर्झा़”, “ हुंकार” असे पत्रसंग्रह, व्यक्तीचित्रे, ललितप्रकार खुपच प्रसिध्द आहेत.
June 4, 2014
माराठी क्रीडा पत्रकारितेत स्वत:चे अग्रगण्य स्थान निर्माण करणारे चंद्रशेखर संत हे तब्बल २५ वर्षे ते “म.टा”त क्रीडा पत्रकार म्हणून कार्यरत होते. त्याचबरोबर ‘स्पोर्ट्स वीक’ मध्येही त्यांनी काम केले.
February 9, 2015
Copyright © 2025 | Marathisrushti