(User Level: User is not logged in.)

व्यक्ती-परिचय - profiles sub site

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • यशवंत चकोर

    आपल्या पहाडी आवाजाने महाराष्ट्राला दणाणून सोडणारे गोवा मुक्तीसंग्राम व संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीतील सेनानी शाहीर यशवंत चकोर.

    १९४२ च्या स्वातंत्र्य-लढ्यात जयप्रकाश नारायण यांच्या सभेची सुरुवात करण्याची संधी शाहीर चकोर यांना मिळाली होती. १९४७ मध्ये क्रांतिवीर नाना पाटील यांच्या सभेत त्यांनी स्वातंत्र्यगीते गायली. पुढे शाहीर अमर शेख, अण्णाभाऊ साठे अशा ज्येष्ठ शाहिरांसोबत त्यांनी संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत भाग घेतला.

    त्यावेळी मुंबई प्रांत सरकारविरोधात प्रचार केल्यामुळे त्यांना रेल्वेची नोकरी गमावावी लागली. आचार्य अत्रे यांना हे कळल्यानंतर त्यांनी 'दैनिक मराठा' नाशिक जिल्ह्याची एजन्सी त्यांना दिली. पुढे चकोर १० वर्षे मनमाड नगरपालिकेत नगरसेवक होते. लोककलेतून जनजागृती करणार्‍या या कलाकारावर आचार्य अत्रे प्रचंड खुश होते. सभेपूर्वी ते 'जय देव जय देव जय मंगलमूर्ती' हे गीत शाहीर चकोर यांना म्हणायला सांगत.

    स्वातंत्र्यापासून संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत कार्यरत राहणार्‍या आणि अनेक वर्षे पुरोगामी पक्षाबरोबर जनजागृतीचे काम करणार्‍या या शाहिराच्या वाट्याला अखेरपर्यंत उपेक्षाच आली. निळू फुले, राम नगरकर यांच्यासोबतीने पुण्यात कलापथकात काम करणारे शाहीर केवळ आईच्या आग्रहास्तव पुन्हा मनमाडला आले. त्यानंतर त्यांनी मनमाड सोडले नाही.

    पुण्याच्या बालगंधर्व नाट्यगृहाच्या उदघाटनाप्रसंगी पहिले गाणे शाहीर चकोरांनी सादर केले. त्या गाण्याला चाल व संगीत पु. ल. देशपांडे यांनी दिले. अशा कितीतरी आठवणींवर शाहीर शेवटपर्यंत चिरतरुण होते. त्यामुळेच उपेक्षित जगण्याची त्यांनी कधीही खंत व्यक्त केली नाही.

    गोवामुक्ती संग्राम स्वातंत्र्यसैनिकाचा दर्जा मिळावा, यासाठी त्यांनी केलेले सर्व प्रयत्न अयशस्वी झाल्याने त्यांचा अखेरच्या टप्प्यातील प्रवास खडतर झाला होता. जागा मराठा, आम जमाना बदलेगा, उठा है जो तुफान, वह आखिर बंबई लेके दम लेगा अशी महाराष्ट्र गीते, पोवाडे आणि शौर्यगीते गाऊन एकेकाळी महाराष्ट्राला वेड लावणारे शाहीर चकोर अखेरच्या क्षणी स्वातंत्र्यसैनिकाचा दर्जा मिळविण्यासाठी दारोदार भटकत होते. उदरनिर्वाहासाठी अल्पबचत एजंट म्हणून घरोघरी पैसे गोळा करण्याचे काम करणार्‍या शाहिरांनी अखेरपर्यंत काम केले.

    त्यांचे वयाच्या ८७ व्या वर्षी निधन झाले. अखेरपर्यंत चकोर हे शाहीर म्हणून मिळणारे तुटपुंजे मानधन व पतसंस्थेचे कमिशन यावर गुजराण करत होते.

    (संदर्भ : महाराष्ट्र टाईम्समधील नोंद हे सदर)


      August 8, 2017


  • अॅडव्होकेट शिवाजी जाधव

    वकिलीत कार्यरत असलेल्या कुणालाही दिल्लीत जाऊन सुप्रीम कोर्ट पाहण्याची नेहमीच आस असते. मराठवाड्यातील वसमत तालुक्यात घडलेले अॅड. शिवाजी जाधव यांनी सुप्रीम कोर्टाच्या पायरीवर मराठी वकिली बाण्याचा दमदार आवाज पोहोचविला. सुप्रीम कोर्टाच्या बार असोसिएशनच्या अध्यक्षपदी निवडले गेलेले ते पहिलेच मराठी वकील...

    अॅड. शिवाजी जाधव यांच्याविषयी महाराष्ट्र टाईम्सच्या म.टा. नोंद या सदरात प्रकाशित झालेला सुप्रीम कोर्टात मराठी बाणा हा लेख पुढील पानावर वाचा.

    अॅड. शिवाजी जाधव यांच्याविषयी महाराष्ट्र टाईम्सच्या म.टा. नोंद या सदरात प्रकाशित झालेला सुप्रीम कोर्टात मराठी बाणा हा लेख वाचा.

    jadhav-adv-shivaji-modified

      July 24, 2015


  • मास्टर अविनाश

    शारदा, उग्रमंगल, भावबंधन, राजसंन्यास, संन्यस्त खड्ग, ब्रह्मकुमारी इ. नाटकातील त्यांच्या भूमिका रसिकांना पसंत पडल्या. दीनानाथांच्या सहवासात आणि त्यांच्याकडून मिळालेल्या संगीत शिक्षणाने गणपतरावांची कला बहरली.

      July 16, 2022


  • डॉ. अनिल भास्कर तांबे

    आपलं हृदय हा आपल्या शरीरातील सर्वात महत्वाचा घटक असतो आणि त्याचीच आपण योग्यरितीनं काळजी घेत नाही; अशावेळी काही विपरित घडलं तर डॉ. हाच देव ठरतो!

      May 23, 2014


  • डॉ. के. एन. दस्तुर

    हृद्य ही मानवाला मिळालेली सर्वात अमुल्य व कलात्मक भेट आहे. सामान्य माणसाला कवित्व देणारे, विवीध भावनांचे पितृत्व स्वीकारणारे, यंत्रांच्या गर्दीमध्ये हरवत चाललेल्या व्यक्तींना संवेदनांचे व हळुवार जाणीवांचे शहारे देऊन त्याला माणुस म्हणून जगण्यास प्रवृत्त करणारे, व त्याच्यातील ‘दर्दीपण’ जोपासणारे हृद्य जेव्हा त्याच्या तांत्रिक बाबींमध्ये गुरफटते तेव्हा नश्वर देहाची परलोक यात्रा सुरू होते. परंतु आज वैद्यकीय क्रांतीमुळे दुर्मिळ हृद्यविकारांवर देखील औषधे व शस्त्रक्रिया जन्मास आल्या आहेत.

      August 18, 2011


  • राज वसंत शिंगे

    सर जे.जे. स्कूल ऑफ अप्लाइड आर्ट तसेच सर जे.जे स्कुल ऑफ आर्ट मधून राज शिंगे यांनी जी.डी.आर्ट व जी.डी. आर्ट मेटल या पदव्या प्राप्त केल्या. कलानिर्मितीचा ध्यास घेतलेल्या राज शिंगे यांनी आपल्या कलाप्रवासाला १९८५ सालापासून सुरुवात केली.

      May 16, 2014


  • बापू लिमये

    बापूंना हा इतिहास पुढच्या पिढीपर्यंत पोचवावासा वाटायचा. केवळ इतिहासच नव्हे तर नेपथ्याचे तंत्र आणि मंत्र नव्या रंगकर्मींना सांगावेसे वाटत. त्यांनी ‘गोष्ट नेपथ्याची’ हे तीन भागांतले पुस्तक लिहिले.

      July 9, 2022


  • रघुनाथ पंडित

    मराठी पंडित कवी. त्याची चरित्रविषयक माहिती निश्चित स्वरुपात उपलब्ध नाही. तो कोण असावा, हयाबद्दल पाच मते आढळतात ः (1) तो कारवारकडील चंदावर गावचा सारस्वत ब्राम्हण असावा. (2) तो तंजावरचा असावा आणि मोरोपंतांचा समकालीन असावा. (3) तो मुळात रायगड जिल्हयातील चौलचा आणि त्याचे आडनाव मनोहर. तो पुढे कर्नाटकात स्थायिक झाला. त्याने वैद्यविलास, कविकौस्तुभ, छंदोरत्नावलि, चिकित्सामंजरी व नाडीज्ञानविधी ही साहित्यविषयक व वैद्यकविषयक प्रकरणे संस्कृतात लिहिली. प्रसिध्द दमयंतीस्वयंवरही त्यानेच लिहिले. (4) तो शिवाजी महाराजांचा अष्टप्रधानांपैकी एक असून `पंडितराव ` हया पदावर होता. (5) शिवकालातील राजव्यवहारकोश लिहिणारे रघुनाथ नारायण हणमंते हेच रघुनाथपंडित होत. दमयंतीस्वयंवर किंवा नलोपाख्यान हे त्यांनीच लिहिले. हया सर्व मतांचा विचार करुन , शं. गो. तुळपुळे हयांनी हा कवी तंजावरचा होता व तो राजकारणपटूही होता, असा निष्कर्ष काढला आहे.

      March 11, 2015


  • मोहन दाते

    १९९५ साली धुंडीराजशास्त्रींचे निधन झाल्यानंतर ‘दाते पंचांग’ चालविण्याची जबाबदारी मोहनराव दाते यांच्यावर पडली. तेव्हापासून आतापर्यंत मोहनराव ती जबाबदारी समर्थपणे पार पाडत आहेत हे दाते पंचांगाच्या लोकप्रियतेवरून दिसून येतच आहे.

      July 19, 2022


  • संत तुकाराम

    भागवत धर्माचा पाया ज्ञानेश्वरांनी घातला आणि त्यावर कळस चढविण्याचे कार्य संत तुकारामांनी केले. मराठी काव्यात ‘अभंग‘ प्रकार निर्माण केला. त्यांच्या अभंगाची संख्या ५ हजार आहे. अभंगात सुभाषितवजा पंक्ती आढळतात शुध्द परमार्थाची शिकवण. भक्तीची कास. नामस्मरण व सतसंग यावर अभंगरचना. सगुण-निर्गुण हे आध्यामिक साक्षात्काराचे पैलू.

    तुकारामांचा जन्म, पुण्याजवळील देहू गावी, इ.स. १६०८ मध्ये झाला. प्रारंभी ते सुखी संसारी गृहस्थ होते. ते व्यवसायाने वैश्य होते. त्यांची दुकानदारी उत्तम चालली होती. पण दुष्काळ पडला, पत्नी वारली, मुगला गेला. इकडे दिवाळे निघाले. तुकाराम विठ्ठलभक्तीकडे वळले. अभंगरचना करु लागले. महान विठ्ठलभक्त झाले. श्रीविठ्ठलाचा त्यांना साक्षात्कार झाला. भक्तिमार्गाचा जयजयकार करीत त्यांनी जगाचा निरोप घेतला. फाल्गुन वद्य द्वितीयेला ‘तुकाराम बीज‘ म्हणतात. तुकारामांनी आपले लौकिक आणि अध्यात्मिक जीवनातले अनुभव आपल्या अभंगांतून व्यक्त केले आहेत. उत्स्फूर्त आणि उत्कट भावोद्रेकाची ही अभंग -कविता म्हणजे मराठी भाषेचे अक्षर -लेणे आहे.

    संत तुकाराम हे महाराष्ट्राचे सर्वात लाडके संत आहेत. ज्या काळात संत तुकाराम महाराष्ट्रात पुण्याजवळच्या देहू गावी जन्माला आले त्याच काळात अनेक संत होऊन गेले. म्हणून त्या काळाला भक्तियुग म्हणतात. त्यांच्या जन्मवर्षाबद्दल इतिहासकारांमध्ये मतभेद आहेत, त्यातल्या चार लोकप्रिय तारखा १५६८, इ.स. १५७७, इ.स. १६०८ आणि इ.स. १५९८ या आहेत. इ.स. १६५० मधे एका सार्वजनिक समारंभात, श्री विठ्ठल त्यांना सदेह वैकुंठी घेऊन गेले अशी मान्यता आहे. विष्णूचे दुसरे रूप असलेला पंढरपूरचा श्री विठ्ठल वा विठोबा हा तुकारामांचा लाडका देव होता.

      March 12, 2015