मराठी संतवाङ्मयाचे अभ्यासक रेव्ह. जस्टिन एडवर्ड अॅबट यांनी “पोएट सेंट्स ऑफ महाराष्ट्र” अशी ग्रंथमाला तयार केली. या मालेतून त्यांनी एकनाथी भागवत, तुकारामांची गाथा, दासोपंत, रामदास, संत बहिणाबाई अशी १२ पुस्तके इंग्रजीतून लिहिली.
“स्टोरीज ऑफ इंडियन सेंट्स” हा महिपतीकृत “भक्तविजया़” चा अनुवादही अॅबट यांनी, पं. नरहर रा. गोडबोले यांच्या सहकार्याने केला होता.
संतवाङ्मयाप्रमाणेच पुरातत्वीय शिलालेखांचे वाचन, अभ्यास व भाषांतर यांतही त्यांना रस होता.
१९ जून १९३२ रोजी त्यांचे निधन झाले.
# Rev. Justin Abbot Edward
# अॅबट, रेव्ह. जस्टिन एडवर्ड
October 25, 2016
जगातील केवळ चारच लोकांना १११ वर्षे वयाचे जीवनभाग्य लाभलेले आहे. पालघर (माकूणसार) येथील रघुनाथ जीवन राऊत हे त्यापैकी एक होऊ शकले असते. मात्र वयाचे १११ वे वर्ष पूर्ण होण्यास केवळ सहा दिवस बाकी असताना त्यांचे निधन झाले.
May 8, 2014
सदाशिव पांडुरंग केळकर हे निबंधकार, पत्रकार होते. ज्ञानदीप या मासिकाचे ते संस्थापक होते.
मूर्तीपूजा आवश्यक आहे काय? आणि ग्रंथप्रामाण्य हे त्यांचे ग्रंथ प्रसिध्द आहेत.
२० डिसेंबर १९०६ रोजी त्यांचे निधन झाले.
## Sadashiv Pandurang Kelkar
July 20, 2017
सातवळेकर, श्रीपाद दामोदर - 0262
३१ जुलै १९६८
१९६८> वैदिक तत्वज्ञानाचे भाष्यकार वेदमूर्ती श्रीपद दामोदर सातवळेकर यांचे निधन. जवळपास ४०० हून अधिक पुस्तके त्यांच्या नावावर आहेत. वैदिक राष्ट्रगीत व वैदिक प्रार्थनांची तेजस्विता या लेखांमुळे त्यांना इंग्रजांनी कारावासात धाडले. “भारतीय संस्कृती” हा ५० लेखांचा संग्रह, “संस्कृत स्वयंशिक्षक माला (२४ भाग)” वेदकालीन समाजदर्शनाची १२ पुस्तकांची मालिका, वेदांतील देवमंत्रांची “दैवतसंहिता” आदी पुस्तके त्यांनी सिद्ध केली होती.
---------------------------------------------------------------------------------------------------------------------------
सातवळेकर, श्रीपाद दामोदर - 0466
११ सप्टेंबर १८६७
१८६७> वेदांचे गाढे अभ्यासक (वेदवाचस्पती) श्रीपाद दामोदर सातवळेकर यांचा जन्म. मराठी, हिंदी व इंग्रजी मिळून तब्बल ४०० पुस्तके त्यांच्या नावावर आहेत. “वैदिक धर्म” हे हिंदी व “पुरुषार्थ” हे मराठी मासिक त्यांनी काढले होते. “संस्कृत स्वयंशिक्षक” या मालेत २४ पुस्तके, “भारतीय संस्कृती” हा ५० लेखांचा संग्रह, एक हजार पृष्ठांची “उपनिषद भाष्य ग्रंथमाला” असे लेखन त्यांनी केले.
mss
August 1, 2017
नाट्यनिर्माता संघाचा अध्यक्ष, नाटकांच्या तारखा आणि तिकीविक्री या विषयावर स्वतःची मते ठामपणे मांडणारा निर्माता म्हणून सुधीर भट यांची विशेष ओळख होती व राहील. त्यांनी गोपाळ अलगेरी यांच्या साथीने सुयोग या नाट्यसंस्थेची १ जानेवारी १९८५ मध्ये स्थापना केली. या संस्थेच्या माध्यमातून आतापर्यंत ८० पेक्षा जास्त नाटके, १६ हजाराहून अधिक प्रयोग आणि एकहजार प्रयोगांचा टप्पा ओलांडणार्या आठ नाटकांची निर्मिती त्यांनी केली.
March 14, 2014
चॅरिटी बिगिन्स अॅट होम हा मंत्र अंगी बाणवून डॉ. रवी वानखेडे यांनी स्वत:च्या दोस्तासाठी किडनी दान केली. आधी भूदल, पुढे हवाई दलाची सेवा, नंतर परदेशात वैद्यकसेवा आणि त्यानंतर जागतिक दर्जाच्या रक्तपेढीचा ध्यास घेतल्यानंतर आता अवयव दानाचे महत्त्व पटवून देण्यात ते व्यग्र आहेत.
आधी केले मग सांगितले !
July 24, 2015
नितीन गडकरी हे उद्योजक, राजकीय नेते आणि भारतीय जनता पक्षाचे विद्यमान राष्ट्रीय अध्यक्ष आहेत.
April 21, 2011
व्यवसायाने शल्यविशारद अशी ख्याती असणारे डॉ. वा. भ. पंडित हे संस्कृत भाषेचे गाढे आभ्यासकही होते.
“शब्दांगण” या प्रसिध्द मासिकाचे जनक म्हणून ते सर्वसामान्यांना परिचित आहेत. कविवर्य म. पां. भावे हे या नियतकालिकाचे संपादक म्हणून कार्यरत होते.
डॉ. अनंत देशमुख, डॉ. महेश केळुस्कर, शिरीष लाटकर, पद्माकर चितळे, गोविंद मुसळे अश्या मान्यवर लेखकांनी “शब्दांगण” मध्ये विविध विषयांवरील सकस लेख लिहून या मासिकाची वैचारिक पातळी अनोख्या उंचीवर नेऊन ठेवली होती.
दैनिक गावकरी च्या पुरवणीवरुन संपादित
January 3, 2015
नाशिकच्या यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे दूरशिक्षणाच्या क्षेत्रात दोन दशकांहून अधिक काळ मोलाचे योगदान आहे. सध्याच्या ‘डिजिटल’ युगामध्ये बहुमाध्यम तंत्रज्ञानाच्या माध्यमातून दूरशिक्षणाची व्याप्ती आणखी वाढविणे शक्य आहे आणि याच आव्हानाला सामोरे जात डॉ. आर. कृष्णकुमार मुक्त विद्यापीठाचे कुलगुरुपद स्वीकारतील. डॉ. कृष्णकुमार हे मूळचे नागपूरचे. पदार्थविज्ञान क्षेत्रात उच्चशिक्षण व पीएच.डी. दर्जाचे संशोधन केल्यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयाचे प्राचार्य म्हणून ते रुजू झाले. नागपूर विद्यापीठातील महाविद्यालय व विद्यापीठ विकास मंडळाचे संचालकपद सांभाळत त्यांनी विद्यापीठीय प्रशासन-व्यवस्थापनाचा अनुभव घेतला. उच्चशिक्षण क्षेत्रात पंचवीसहून अधिक वर्षांच्या कारकीर्दीनंतर त्यांची केरळच्या राज्यपालांचे विशेष सचिव म्हणून नियुक्ती झाली. आता मुक्त विद्यापीठाच्या माध्यमातून कौशल्याधारित प्रशिक्षणाची चळवळ ते उभारणार आहेत. ‘भारताकडे जागतिक महासत्ता म्हणून पाहिले जात आहे. मात्र उपलब्ध मनुष्यबळाला कौशल्याधारित प्रशिक्षण मिळाले नाही, तर लोकसंख्येतील ही लाभजन्य स्थिती अल्पावधीतच देशासाठी मोठी डोकेदुखी ठरेल. सध्याच्या बहुतांश पदवीधर विद्यार्थ्यांमध्ये जीवनकौशल्यांचा अभाव आहे. सामाजिक, आर्थिक गरजांमुळे रोजगारप्राप्तीच्या मार्गाने गेलेल्या फक्त दहा टक्के मनुष्यबळाला कौशल्याधारित प्रशिक्षण मिळाले आहे. या पाश्र्वभूमीवर प्रत्यक्ष कंपनीच्या आवारामध्येच जाऊन कौशल्याभिमुख अभ्यासक्रम सुरू करण्याचा प्रकल्प राबविण्याचा त्यांचा मानस आहे. ‘उच्चशिक्षणाच्या विस्ताराबरोबरच ज्ञानाधारित समाजात कालानुरूप कौशल्यांचा दर्जा वाढविण्याचे आव्हानही मुक्त विद्यापीठाला पेलायचे आहे. त्यासाठी अभ्यासक्रम पुनर्रचना करण्याची मोहीम मी हाती घेणार आहे,’ असे कृष्णकुमार सांगतात."
August 5, 2017
कधी ते कविता लिहितात. कधी एखाद्या शॉर्टफिल्मची कथा, तर कधी स्वत:च चित्रपटाचे दिग्दर्शन...हे सगळे त्यांचे छंद असले तरी, या कलाकृतींना आंतरराष्ट्रीय महोत्सवांमध्ये अव्वल स्थान मिळते. औरंगाबादचे सत्यजित खारकर शिकागोत इंजिनीअरिंग शिक्षणाशी निगडीत नोकरी करीत असले, तरी त्यांचे रुपेरी पडद्याशी घट्ट नाते आहे.
शिकागोत उलगडला रुपेरीपट
July 24, 2015
Copyright © 2025 | Marathisrushti