थोर साहित्यिक रवींद्र पिंगेंशी तर अण्णांची गाढ मैत्री. या दोघांना एक त्र बघून खूप गंमत वाटे; यासाठी की रवींद्र पिंगे बोलघेवडे अन् श्रीपाद काळे मितभाषी. रवींद्र पिंगेंच्या पुस्तकात श्रीपाद काळेंविषयी लिहिलंय, अगदी तसेच होते ते जगदीश खेबूडकर, शं. ना. नवरे, शंकर वैद्य यांसारख्या थोर व्यक्तींनी या गावात पायधूळ झाडली ती केवळ अण्णांना भेटण्यासाठी.
July 14, 2017
त्यांनी पन्नासहून अधिक चित्रपटांचे संकलन केले होते व एक उत्कृष्ट संकलक म्हणून नावलौकिक मिळविला होता. ज्येष्ठ निर्माते दिग्दर्शक दादा कोंडके, कमलाकर तोरणे, अण्णासाहेब देऊळगावकर, जब्बार पडेल, महेश कोठारे आदींच्या चित्रपटांचे संकलन वैद्य यांनी केले होते.
June 22, 2022
बुजुर्ग रंगकर्मी पं. सत्यदेव दुबे यांना पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. कुठल्याही पुरस्कारासाठी किंवा मानसन्मानासाठी त्यांनी कधीच काही केलेले नाही. नाटक या एकमेव वेडाने झपाटलेले हे झाड मध्य प्रदेशातील बिलासपूरहून मुंबईत प्रथम आले ते चक्क क्रिकेटमध्ये करीअर करण्यासाठी! परंतु हिंदी चित्रपट दिग्दर्शक विजय आनंद यांनी त्यांना मुंबईतल्या नाटय़सृष्टीशी परिचय करून दिला आणि दुबे क्रिकेट सोडून रंगभूमीकडे वळले.
इब्राहिम अल्काझी या नाटय़क्षेत्रातील भीष्माचार्याकडे त्यांनी नाटकाचे पहिले धडे गिरविले. त्यांच्या ‘थिएटर युनिट’ या संस्थेत साहाय्यक म्हणून दुबेंनी शागिर्दी पत्करली आणि पुढे अल्काझी ‘नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा’मध्ये गेल्यावर त्यांच्या थिएटर युनिटची सूत्रे दुबेंच्या हाती आली. विजया मेहता आणि दुबे हे दोघेही अल्काझींचे शिष्योत्तम असले आणि दोघांनीही प्रायोगिक-समांतर रंगभूमी हीच आपली कर्मभूमी मानली होती तरी त्यांच्या दिशा मात्र वेगवेगळ्या राहिल्या. पाच दशकांत दुबेंनी आपली समांतर रंगभूमीशी असलेली नाळ कधीच तोडली नाही. दिल्लीच्या ‘नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा’शी (NSD) समांतर असे ‘नॅशनल स्कूल ऑफ दुबे’ (NSD) देशभरात अस्तित्वात आहे. त्यांची शिष्यमंडळी केवळ मराठी, हिंदी आणि इंग्रजी नाटय़सृष्टीतच नाहीत, तर बॉलिवूडमध्येही आहेत. तरूण रंगकर्मीचा घोळका त्यांच्याभोवती कायम असतो. दुबे हिंदीभाषिक असले तरी त्यांनी अनेक मराठी नाटके दिग्दर्शित केली आहेत. कणकवली नाटय़संमेलनाच्या अध्यक्षपदी त्यांची निवड करावी, असा आग्रह संमेलनाच्या संयोजकांनी धरला होता. परंतु नाटय़ परिषदेच्या त्यावेळच्या धुरिणांनी कोत्या वृत्तीचे दर्शन घडवत हा आग्रह अव्हेरला होता. दुबेंचे मराठी रंगभूमीवरील मौलिक योगदान त्यांना ज्ञात नव्हते, ही वस्तुस्थिती होती. विजय तेंडुलकर, गो. पु. देशपांडे, महेश एलकुंचवार, श्याम मनोहर, चं. प्र. देशपांडे, चेतन दातार आदींची मराठी नाटके त्यांनी केली. कुसुमाग्रजांच्या कवितांवर आधारीत ‘आयुष्यात पहिल्यांदाच’ हा आगळा रंगाविष्कारही त्यांनी सादर केला. ‘आधेअधुरे’, ‘अबे बेवकूफ’, ‘संभोग से समाधी तक’, ‘अंधायुग’, ‘एज्युकेटिंग रिटा’, ‘हयवदन’, ‘डॉन जॉन इन हेल’ अशी अनेक नाटके त्यांनी केली. नाटककाराच्या संहितेवर दिग्दर्शकीय कुऱ्हाड चालवून तिचे आपल्या पद्धतीने अर्थनिर्णयन करण्याचा पायंडा त्यांनी पाडला. त्यामुळे अनेक लेखक त्यांच्यावर नाराज झाले. पण त्यांनी लेखकांच्या नाराजीची कधीच पर्वा केली नाही. दुबे हे भणंग, कलंदर, अवलिया रंगकर्मी आहेत. त्यांच्या व्यवहाराची काळजी नेहमी त्यांच्या शिष्य व हितचिंतकांनीच वाहिली. त्यांच्या कार्यशाळांतून अनेक लेखक घडले. सत्यदेव दुबे हे मूळचे रा. स्व. संघाचे. पण ही विचारधारा त्यांनी कलेच्या क्षेत्रात आणली नाही. गो. पु. देशपांडेंसारख्या डाव्या नाटककाराची नाटकेही त्यांनी तितक्याच आत्मीयतेने सादर केली. हिंदुत्वाचा पुरस्कार ते त्यांच्या वक्तव्यांतून करीत असले तरी त्यात कडवेपणा आढळत नाही. हिंदुत्ववादी भाजपच्या कथनी व करणीत अंतर दिसल्यावर त्यांच्या विरोधात लोकसभेची निवडणूक लढवायलाही त्यांनी कमी केले नाही. त्यांनी काही नाटकेही लिहिली. त्यातून त्यांचे आयुष्य तुकडय़ा-तुकडय़ांत समजून घेण्यास मदत होते. त्यांच्या मतांवर नेहमीच जोरदार चर्चा, वादविवाद होत असतात. ‘थिएटर मर रहा है’ असे म्हणणारे दुबे दुसरीकडे सातत्याने नाटके करतच असतात. कारण ते त्याशिवाय जगूच शकणार नाहीत.
August 5, 2017
इलेक्ट्रिकल आणि मेकॅनिकल इंजिनिअर
December 15, 2010
पुरातत्त्व शास्त्राची मुहूर्तमेढ रोवणारे आणि या क्षेत्रातील अभ्यासकांसाठी पितामह असलेले प्रा. डॉ. मधुकर केशव
ढवळीकर यांना यावर्षी पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला.
प्रा. ढवळीकर यांचा जन्म १९३०चा. त्या काळात पुरातत्त्वशास्त्र अगदीच दुर्लक्षित होते. अर्थात आजही त्याबाबत सरकारी पातळीवर उदासीनता आहेच. त्यामुळे पदवी-शिक्षण पूर्ण झाल्यावर भारतीय पुरातत्त्व विभागामध्ये १९५३ पासून टेक्निकल असिस्टंट म्हणून कामाला सुरुवात करून ढवळीकर यांना वेगळी दिशा पकडली. प्रा. ढवळीकर यांची अभ्यास, चिकाटी आणि विषयाचा चारी बाजूंनी विचार करण्याची वृत्ती यामुळे त्यांनी या शास्त्राच्या संशोधनात मूलभूत स्वरूपाचे कार्य केले.
July 26, 2011
श्रीपादशास्त्री किंजवडेकर हे हिंदू धर्माच्या विविध पैलूंचे आणि योगशास्त्राचे अभ्यासक होते. मुक्ताबाईच्या ताटीच्या अभंगांचे संपादन त्यांनी केले. तसेच 'भक्तीच्या वाटा' हे सुगम पुस्तकही त्यांनी लिहिले. रुद्रार्थदीपिका, परिव्राजकाचार्य आदी त्यांची पुस्तके अभ्यासूंसाठी उपयुक्त ठरली. त्यांच्या अशा पुस्तकांची यादी बरीच मोठी आहे.
श्रीपादशास्त्री किंजवडेकर यांचे २१ ऑक्टोबर १९७७ रोजी निधन झाले.
## ShripadShastri Kinjavadekar
July 31, 2017
मराठी चित्रपट दिग्दर्शक उमेश कुलकर्णी हे नेहमी समाजातील घटनांवर तिरकस कटाक्ष टाकत विनोदाची शैली हाताळतात. चाकोरीबाहेरचे काहीतरी करतानाच मनोरंजनाचा बाज न बिघडवता चित्रपट रंगवण्यात त्यांचा हातखंडा आहे.
November 22, 2021
राजाभाऊ या नावाने परिचित असेलेले प्रा. राजेंद्र विठ्ठल शिरगुप्पे यांची नाटककार, कवी, साहित्यिक म्हणूनही ओळख आहे. कोल्हापूर. सावंतवाडी, गडहिंग्लज येथे प्राध्यापक म्हणून त्यांनी काम केले.
निपाणी येथील महिला बिडी कामगार व शेतकर्यांच्या तंबाखू आंदोलनापासून ते संपूर्ण महाराष्ट्राला परिचित झाले. शिरगुप्पे यांचे “सडक” हे नाटक व त्यातील कविता आजही आंदोलकांच्या तोंडी आहेत.
विद्रोही सांस्कृतिक चळवळीशी ते गेली दहा वर्षे जोडले गेले आहेत. धरणग्रस्त, देवदासी प्रथा निर्मूलनाच्या लढ्यातही ते सहभागी झाले होते. त्यांनी अनेक राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय परिषदांत भाग घेतला आहे. नाट्यलेखन व दिग्दर्शन म्हणून त्यांची अनेक नाटके गाजली आहेत.
तुकोबांच्या पत्नीच्या जीवनावरील “तिच्या नवर्याचे वैकुंठगमन”, “कपान”, “होते कुरुप वेडे”, “उंटावरचा शहाणा”, “आम्ही क्रांतिसिंह आहोत”, “हा आणि बारावा” अशी नाटकांचे लेखनही त्यांनी केले.
किशोर, मासिक ऋग्वेद, लोकमत वगैरेंमध्येही त्यानी विपुल लेखन केले आहे. हिंदू-मुस्लिम समस्येवर आधारित “षड्यंत्र” या माहितीपटाची निर्मितीही त्यांनी केली होती. बसवाण्णांच्या तत्वज्ञानाचे ते गाढे अभ्यासक आहेत.
सांगली येथे झालेल्या दहाव्या विद्रोही साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद राजाभाऊ शिरगुप्पे यांनी भुषविले आहे.
## Shirguppe, Rajendra Vitthal (Rajabhau Shirguppe)
## Shirguppe, (Prof) Rajendra Vitthal
January 14, 2016
(१८९२-१९७३)
ठाणे जिल्हातील निसर्गरम्य आदिवासी परिसरात ग्रामिण बालशिक्षणाचे यशस्वी प्रयोग करणार्या शिक्षणसंशोधक. राज्य विधानसभेच्या सदस्य. त्यांचे कार्य असंख्य कार्यकर्त्यांना व सेवाभावी संस्थाना प्रेरणादायी ठरले. अनेक बालपुस्तकांचे, नियतकालिकांचे लेखन व संपादन त्यांनी केले. बालशिक्षिकांचे प्रबोधन. शिक्षिकांचे प्रशिक्षण, संशोधन हे त्यांच्या कामाचे इतर पैलू होते. अंगणवाडी, कुरणशाळा, विकारवाडी अशा नवनवीन कल्पना त्यांनी रूजवल्या.
March 12, 2015
गंगाधर सरदार हे मराठी साहित्यिक आणि विचारवंत होते.
December 15, 2010
Copyright © 2025 | Marathisrushti