(१२ ऑगस्ट १८९७ - २७ एप्रिल १९८०)
महाराष्ट्रातील सहकारी साखर कारखानदारीचे आद्य प्रवर्तक. अहमदनगर जिल्हयातील लोणी बुद्रुक या खेडयात एका शेतकरी कुंटूंबात जन्म. लोणी खुर्दच्या प्राथमिक शाळेत चौथीपर्यंत शिक्षण नंतर त्यांनी लहान वयातच शेतीला सुरुवात केली. त्याकाळी शेतकर्यांच्या जमिनी कर्जबाजारीपणामुळे सावकारांच्या घशात गेल्यामुळे ते कंगाल बनले होते, हे नेमके हेरुन त्यांनी व्यवहारबुध्दी, चातुर्य व काटकसरीने शेती केली. १९२३ मध्ये ‘लोणी बुद्रुक सहकारी पतपेढी‘ची स्थापना करुन ते सार्वजनिक जीवनातील सहकारी क्षेत्राकडे वळले. त्यांनी जिल्हयात सहकारी संस्थांचे जाळे निर्माण केले, तसेच गावातील पाथरवट-वडार मंडळींना एकत्र आणून ‘मजूर सहकारी सोसायटी‘ची स्थापना केली.
इंग्रज सरकारने मुंबई कौन्सिलमध्ये ‘तुकडे बंदी आणि तुकडे जोड‘ हे विधेयक आणले. या विधेयकामुळे शेतकर्यांच्या जमिनीचे तुकडे सावकारांच्या घशात जाऊन ते जमिनीला मुकणार होते. अशा वेळी इस्लामपूर येथे शाहू महारांनी घेतलेल्या शेतकरी परिषदेला विखे -पाटील नगर जिल्हयातील अनेक शेतकर्यांसह गेले व तेथे हजारो शेतकर्यांपुढे भाषण देऊन शेतकर्यांच्या प्रश्नांना वाचा फोडली. त्यातुनच त्यांच्या शेतकरी नेतृत्वाचा जन्म झाला. पुढे महाराष्ट्राच्या एक लाख शेतकर्यांनी याच प्रश्नासाठी पुण्याच्या कौन्सिल हॉलला वेढा घातला, त्यात विखे पाटील आघाडीवर होते. त्यांनी शेतकर्यांना त्यांच्या दैन्यावस्थेची जाणीव करुन देऊन, संघटित होण्याचे व त्यातून व्यक्तिगत व सामुदायिक विकास साधण्याचे महत्व पटवून दिले. विखे पाटील यांच्यावर सत्यशोधक चळवळीचा व डाव्या विचारसरणीचा प्रभाव होता. प्रसिध्द अर्थशास्त्रज्ञ धनंजयराव गाडगीळ यांच्या अध्यक्षतेखाली बेलापूर रोड येथे १९४५ मध्ये पार पडलेल्या ‘डेक्कन कॅनॉल्स बायायतदार परिषदे‘त विखे पाटील यांनी सर्व शेतकर्यांनी एकत्र येऊन सहकारी पध्दतीने साखर कारखाना काढण्याचा ठराव मांडला या परिषदेचे अध्यक्ष डॉ. धनंजयराव गाडगीळ यांनी व उपस्थित शेतकर्यांनी या कारखान्याचे मुख्य प्रवर्तक म्हणून विखे पाटील यांच्यावरच जबाबदारी टाकली. त्यांनी ही जबाबदारी पार पाडण्यासाठी १९४५ ते १९५० या कालखंडात अतोनात कष्ट घेऊन, गावोगावी व दारोदारी भटकंती करुन भाग भांडवल जमविले, तसेच कारखान्याला शासनाकडून मंजूरी मिळविली कारखान्याच्या उभारणीसाठी त्यांनी केलेल्या भटकंतिकरिता शेतकर्यांचा एकही पैसा खर्च केला नाही. ‘परान्न घेणार नाही‘ अशी त्यांची प्रतिज्ञा होती, त्यामुळे आपली भाकरी ते नेहमी आपल्या कोटाच्या खिशात बाळगीत असत. विखे पाटील यांची साखर कारखाना काढण्याची कल्पना त्यावेळी हास्यास्पद ठरविली गेली. अशा सर्वस्वी प्रतिकूल पिरस्थितीला तोंड देत विखे पाटील यांनी प्रवरानगर येथे शेतकर्यांच्या पहिल्या ‘प्रवरा सहकारी साखर कारखान्यातून साखर उत्पादन सुरु झाले.
March 12, 2015
ठाणे महापालिकेचे माजी महापौर अशोक वैती यांच्या दमदार व खमक्या राजकीय नेतृत्वामुळे त्यांच्या कार्यकाळात ठाण्याचा झपाट्याने विकास झाला.
महापौरपदी विराजमान झाल्यानंतर, या शहराचा आधुनिक व अद्ययावत पायाभुत सुविधांनी चौफेर विकास करण्याचा विडा उचललेल्या वैती यांनी एकामागोमाग एक अशा कल्पक व कलात्मक योजना आखून व सर्वसामान्य चाकरदार जनतेला अग्रस्थानी ठेवून या शहराचा चेहरामोहराच बदलवून टाकला. चांगले रस्ते व पदपथ, सायकल ट्रॅकची आदर्श रचना, आरोग्य सेवेच्या प्रगत सुविधा, उच्चस्तरीय शिक्षण व मुबलक पाणी पुरवठा या मुलभूत घटकांना पुरेसा न्याय देणारा शास्त्रशुध्द विकास आराखडा त्यांच्या अधिपत्याखाली साकारला गेल्याने, हे शहर वेगाने आता एका सस्टेनेबल विकासाचे उत्कृष्ठ असे द्योतक ठरत चालले आहे.
हरित विकास प्रकल्प, हरित जनपथ प्रकल्प अशा पर्यावरणीय समतोलाशी आपलं नातं सांगणार्या प्रकल्पांच्या सामावेशामुळे, हा आराखडा पर्यावरणाशी सौहार्दपुर्ण संबंध प्रस्थापित करेल याची वैती यांनी पुरेशी दक्षता घेतली. त्यामुळे पर्यावरणमित्रांकडून देखील या उपक्रमाला हिरवा कंदिल मिळालेला.
घनकचर्याचे शास्त्रोक्त पध्दतींनी विघटन करण्याकरिता बायोमिटोनायझेशन प्रकल्प, घरोघरी कचरा संकलन, तसेच सामाजिक पायाभुत सुविधांअंतर्गत प्रभाग कार्यालये बांधणे, भाजी मंडया उभारणे, मिनी स्टेडियमच्या रचना साकारणे, क्रिडा संकुलांची उभारणी करणे अशा अनेक सार्वजनिक बांधकाम योजनांमुळे ठाणेकरांना दिलासा मिळाला. या सर्व योजनांची आखणी व त्यांच्या समर्थ अंमलबजावणीचे श्रेय अर्थात अशोक वैती यांना जाते. त्यांनी ठाणे शहरातील रस्ते वाहतुकीच्या विकासासाठी दिलेले योगदानदेखील केवळ अतुलनीय असेच म्हणावे लागेल. रस्त्यांचे सिमेंट काँक्रिटीकरण, पुलांचे रूंदीकरण, नव्या उड्डाणपुलांची रचना व या शहरातील अतिशय निकडीच्या बनत चाललेल्या अशा पार्किंग सुविधेच्या प्रश्नाचा निकाल लावण्याकरिता त्यांनी केलेली, विविध महापालिका वाहन तळांची निर्मिती, त्यांच्या दुरदृष्टीची व सामाजिक तळमळीची साक्ष देते. महापालिकेतर्फे मोक्यांच्या जागांवर ट्रक टर्मिनसची बांधणी, ही योजना देखील त्यांनीच लढवलेल्या एका कल्पक शक्कलीची परिणीती आहे.
केंद्र शासनाच्या उर्जा मंत्रालयाच्या अकराव्या पंचवार्षिक योजनेअंतर्गत ठाणे शहराची निवड सौर शहरांच्या यादीमध्ये झाल्यामुळे येथे सौर उर्जेवर चालणार्या अनेक महत्वाकांक्षी प्रकल्पांची नांदी झाली. अशा प्रकल्पांना आर्थिक पाठबळ देण्यामध्ये मोलाची भुमिका त्यांनी बजावली आहे. तसेच ठाण्यामधील ऐतिहासिक अशा मासुंदा तलावावर लेझर शोची अभिनव रचना साकारण्यामागेदेखील त्यांचा सिंहाचा वाटा आहे.
क्रीडा क्षेत्रातील हिरे पारखून त्यांना विनामुल्य प्रशिक्षण शिबीरे, व तज्ज्ञ प्रशिक्षकांचा सहवास लाभण्यासाठी त्यांनी दिलेले योगदान अगदी वाखाणण्याजोगे आहे.
January 12, 2015
शाहू मोडक हे नाव घेतले की समोर संत ज्ञानेश्वर व भगवान श्रीकृष्ण यांच्या प्रतिमा आजही समोर येतात. जन्माने ख्रिश्चन असूनही शाहू मोडक यांनी संत ज्ञानेश्वर व भगवान श्रीकृष्ण यांच्या भूमिका लीलया केल्या. त्यांनी ज्ञानेश्वतराची भुमीका शब्दशः जगले कारण त्यांनी त्या भुमीकेनंतर मांसाहार वर्ज केला होता. त्यांनी केवळ या भूमिकांमधून केवळ अभिनयच केला नाही तर तो सात्विक भाव त्यांच्यामध्ये होता. संत ज्ञानेश्वर, माझा मुलगा, माणूस, त्यांनी २९ चित्रपटांत कृष्णाची भूमिका साकारली.
April 13, 2010
नीळकंठशास्त्री शिवरामशास्त्री गोरे हे वादविवादपटू, मराठीतील महत्वाचे ख्रिस्ती धर्मविवेचक, निबंधकार, संस्कृतचे जाणकार आणि वेद-उपनिषदांचे गाढे अभ्यासक होते.
August 23, 2017
ठाण्यात सलग तीन वेळा महापौरपद भूषविण्याचा विक्रम अनंत तरे यांच्या नावावर आहे.
June 17, 2022
लावणी म्हटलं की ' अप्सरा आली...' अन् 'मला जाऊ द्या ना घरी...' या लावण्या नवीन पिढीच्या ओठी सहजपणे येतात; पण याच लावणीला मान मिळावा म्हणून काहींनी आयुष्य खर्ची घातलं. त्यातील एक म्हणजे लीला गांधी. राज्य सरकारच्या व्ही. शांताराम जीवनगौरव पुरस्काराने त्यांच्या या कार्याची दखल घेतली गेली.
वयाच्या आठव्या वर्षापासून शास्त्रशुद्ध प्रशिक्षण घेत, तालबद्ध पदन्यास आणि त्याच तोडीच्या देहबोलीतून त्यांनी लावणी सादर करताना प्रेक्षकांना खिळवून ठेवले. तमाशापटांचा जमाना सुरू झाल्यावर नृत्यपारंगत लीलाताईंच्या कारकीर्दीला खर्या अर्थाने 'ब्रेक' मिळाला. 'कुण्या गावाचं आलं पाखरू', 'ऐन दुपारी, यमुनातिरी' अशा त्यांच्यावर चित्रीत झालेल्या लावण्या असो, वा 'बुगडी माझी सांडली गं' सारख्या लावणीला लाभलेली त्यांची नृत्यदिग्दर्शनाची साथ असो; हा प्रकार प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला. यामध्ये, शब्द-संगीताची किमया तर होतीच; पण त्याचबरोबर पडद्यावर पाहायला मिळणारा लावणीचा शृंगार आणि ऐटबाज ठसका, यांचाही वाटा होता. पडद्यावर दाखवल्या जाणार्या लावणीतील नजाकत कायम राहून, ती बीभत्सपणाकडे झुकणार नाही, याची काळजी लीलाताईंनी घेतली. प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद लाभतो, टाळ्या-शिट्ट्यांची दाद मिळते म्हणून लावणीच्या सादरीकरणात त्यांनी तडजोड केली नाही. लावणीचे लावण्य त्यांनी जपले, जोपासले आणि त्यातील निखळ सौंदर्य प्रेक्षकांपर्यंत पोहोचविले.
तमाशा आणि लावणी याऐवजी मराठी चित्रपट आणि लावणी, असा काळ निर्माण करण्यात लीलाताईंचा सहभाग खूप महत्त्वाचा आहे. असंख्य चित्रपटांतून लावणीचा ठुमका सादर केल्यानंतर त्यांनी 'लीला गांधी नृत्यदर्शन' हा कार्यक्रमही राज्यभर सादर केला. रुपेरी पडद्यावरची त्यांची लावणी गाजली, तशीच लोकप्रियता त्यांच्या या कार्यक्रमालाही मिळाली. सादरीकरणासाठी उत्तम स्टेज, येण्या-जाण्याचा खर्च, निवासाची पंचतारांकित व्यवस्था अशा सुविधा नसतानाही केवळ लावणीचा प्रेक्षक तयार करण्यासाठी त्यांनी राज्याचा काना-कोपरा ढवळून काढला. शेतातल्या ढेकळांवर आणि मुलाच्या आजारपणाची पर्वा न करता 'शो मस्ट गो ऑन' यासाठी त्या सातत्याने कार्यरत राहिल्या.
खूप वर्षांनी मराठी चित्रपटांमध्ये लावणीला पुन्हा महत्त्व प्राप्त झाले आहे; पण त्याच्या सुवर्णकाळाच्या साक्षीदार असलेल्या लीलाताईंना त्यातील बाजारू गोष्टी खटकतात. सध्याच्या नृत्यकलावंतांची तारीफ त्या आवर्जून करतात; परंतु त्याचवेळी लावणी चमचमत्या कपड्यांतून नाही, तर मुद्राभिनयातून, अदाकारीतून प्रेक्षकांपर्यंत पोहोचवायची असते, असे परखड मतही व्यक्त करतात. गुडघ्याच्या दुखापतीमुळे शिष्य न घडवता आल्याची त्यांच्या मनातील सल म्हणूनच सर्वसामान्य प्रेक्षकांनाही बोचत राहते.
(संदर्भ : महाराष्ट्र टाईम्समधील नोंद हे सदर)
August 8, 2017
सत्तरीच्या दशकाचा काळ हा मराठी व्यावसायिक नाटकांच्या बहराचा काळ. या काळात अनेक गुणी कलावंत मराठी रंगभूमीला मिळाले. या कालखंडात अभिनेत्रींची एक सशक्त फळी उभी राहिली. त्यात सुहास जोशींचे नाव अग्रक्रमाने घ्यावे लागेल.
January 3, 2019
चित्रकलेच्या क्षेत्रात ठाण्याचे नाव उज्वल करणारे प्रसिद्ध चित्रकार व नामवंत संस्थांच्या बोधचिन्हांचे निर्माते श्री. शांताराम काशिनाथ राऊत.
May 16, 2014
विद्याधर ठाणेकर हे साहित्य, कला, शिक्षण, क्रीडा, नाट्य, चित्रपट या क्षेत्रातील ठाण्यातील एक महत्त्वाचे व्यक्तिमत्त्व आहे.
June 6, 2010
अवघ्या एकोणिसाव्या वर्षी तीन हजार दंड, पाच हजार बैठका आणि सात तास कुस्तीचा सराव करणा-या माणिकरावांचे अस्थिसंस्था, युनानी वैद्यक व शस्त्रास्त्रविद्येवरही प्रभुत्व होते.
June 25, 2022
Copyright © 2025 | Marathisrushti