इंटरनेटच्या महाकाय पसाऱ्यातून खास निवडलेल्या वेगवेगळ्या विषयांवरील व्हिडिओजचा संग्रह.
राजा कृष्णदेवराय यांच्या काळातील एक बालकथा.
August 12, 2021
लेखक, दिग्दर्शक आणि अभिनय मधुकर तोरडमल प्रस्तृत एक दर्जेदार नाटक
2:24:18 AM
April 20, 2026
लेखक : शेखर ढवळीकर, दिग्दर्शक : विजय केंकरे
कलाकार: विक्रम गोखले, स्वाती चिटणीस, शर्वरी पाटणकर आणि अनिकेत विश्वासराव
Running Time 2:57:59
April 13, 2026
लेखक : साहित्यसम्राट आचार्य अत्रे. दिग्दर्शक: मो. ग. रांगणेकर.
कलाकार : प्रभाकर पळशीकर, जानवी पणशीकर, ज्युडित बेंजामिन, मोहिनी पणशीकर, नीलिमा दामले, श्रीकृष्ण दळवी, वासुदेव जोशी, श्याम जोशी, नंदू कुलकर्णी, गौरू दळवी, राजा कार्ले, बिपीन तळपदे, आप्पा गजमल, सुनीत जोशी, जयश्री पाटलकर, सुरनकर, उभयकुमार पाटील
Running Time 2:53:04
April 13, 2026
आजकालच्या धावपळीच्या युगात होणार्या घुसमटीवर प्रकाश टाकणारी पद्यरचना.
June 11, 2021
दिनांक 6 डिसेंबर ….
भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाणदिन… महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण यात्रेचं जे एकमात्र चित्रीकरण आज जगात उपलब्ध आहे, ते करण्यासाठी एका अवलियाने आपले घर, छापखाना गहाण टाकून हा अमूल्य साठा जतन केला, हे कोणाला माहीत आहे? त्या अवलियाचे नाव आहे…नामदेव व्हटकर.
नामदेव व्हटकर हे ढोर समाजात जन्मले. पण स्वकर्तृत्वाने मोठे झाले. खूप शिकले. भाषेवर प्रभुत्व मिळवले. गीत लेखन केले. त्यांच्या गाण्यांच्या रेकॉर्ड्स निघाल्या. आकाशवाणीवर कार्यक्रम केले. शेकडो वगनाट्य लिहून जनप्रबोधन केले. कॅमेरा तंत्रज्ञान शिकून फिल्म डिव्हिजन मध्ये नोकरी केली. तिथे अनेक डॉक्युमेंटरीज केल्या. मराठी चित्रपटांची निर्मितीही केली. आणि चक्क नायकाची भूमिकाही केली. हे करत असताना डॉक्टर बाबासाहेब यांचा अस्पृश्यता निवारण, सामाजिक समता हा विषय त्यांनी कायम आपल्या लिखाणातून, कलाकृतीतून मांडला. आमदार म्हणून विधानसभेतही वंचितांच्या समस्या हे त्यांनी अभ्यासपूर्ण पद्धतीने मांडल्या.
नामदेव व्हटकर यांनी डॉ. बाबासाहेबांविषयीचा पहिला लघुपट देखील निर्माण केला. तो अनेक भाषांत प्रसिद्ध झाला. त्यामुळे डॉक्टर बाबासाहेबांचे कार्य जगभरात गेले.
बाबासाहेबांचे निष्ठावान अनुयायी असलेल्या नामदेव व्हटकर यांच्या कार्याची माहिती घेऊया, त्यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त राज्य शासनातर्फे या पूर्वी केलेल्या कार्यक्रमातील काही संकलित चित्रीकरणातून….
सादरकर्ते: नरेंद्र बेडेकर
संकल्पना: डॉ. सोनाली कदम
October 29, 2026
गदिमांच्या बहुप्रसवा लेखणीतून उतरलेलं हे एक नितांत सुंदर बालगीत, ‘इवल्या इवल्या वाळूचं हे तर घरकुल बाळुच’. कित्येकदा, चित्रपटाच्या गंभीर आशयामुळे आणि विषयामुळे चित्रपटातलं सुंदर गीत सुद्धा उगीच दुर्लक्षिला जात त्यातलंच हे एक गीत हे. गीत सुधीर फडक्यांनी अतिशय सुंदर पद्धतीने गायलं होतं. आणि विशेष म्हणजे, प्रपंच या चित्रपटाची कथा सूत्ररुपाने या बालगीतआता आली आहे.
May 25, 2025
भगवान श्री दत्तात्रय यांचा कलियुगातील पहिला अवतार म्हणजे श्रीपाद श्रीलल्लभ. त्यांचे जन्मस्थान पिथपुरम (पूर्व गोदावरी) आहे. त्यांची कर्म भूमी आणि तपस्या भूमी ही श्रीक्षेत्र कुरवपूर, जि. रायचूर (कर्नाटक).
June 11, 2021
स्त्री कोणतीही असो शहरातली किंवा गावातली .. ती आधी एक आई असते, आपल्या पिल्लांसाठी ती सर्व सहन करत असते, पूर्ण जगाशी लढत असते. अशाच एक स्त्रीची कहाणी या व्हिडीओच्या माध्यमातून मांडण्यात आलेली आहे.
June 11, 2025
कदाचित आपण आपल्या घरातील रद्दी विकू शकतो पण आपल्या मनातील वाईट विचारांची रद्दी मात्र आपणालाच काढून टाकावी लागते, ती कोणीही विकत घेऊ शकत नाही आणि फुकटही घेऊ शकत नाही.
November 20, 2021
Copyright © 2025 | Marathisrushti