नामवंत लेखक, नवोदित लेखक, ऑनलाईन लेखक यांच्या कथा
बंकटमल नावाचे एक व्यापारी होते. चांगला व्यापार करून त्यांनी भरपूर धन मिळविले होते. इतके, की ही संपत्ती ठेवायची तरी कोठे या चिंतेने त्यांना ग्रासलेले होते. त्यामुळे एवढा प्रचंड पैसा असूनही त्यांना सुख म्हणजे काय? हेच माहीत नव्हते.
एकदा ते असेच संपत्तीची काळजी करत करत गावाबाहेर फिरायला गेले. सायंकाळ सरत आली होती. पाखरे आपल्या घरट्यात परतत होती. निसर्गामुळे वातावरण सुंदर बनले होते. रस्ताच्या एका कडेला असलेल्या शेतात एक शेतकरी अत्यंत आनंदाने व उत्साहाने गाणे गात आपले काम करत होता.
बंकटमल त्याच्या जवळून जाताना त्याने त्यांना पाहिले व गाणे थांबवून स्मितहास्य केले. ते पाहून बंकटमलही तेथे थांबले. त्यांना त्या शेतकऱ्याच्या आनंदाचे रहस्य जाणून घ्यायचे होते. ते त्या शेतकऱ्याला म्हणाले, ' आज तुम्ही भलत्याच खुशीत दिसता. काय कोठे जमिनीत पैशाचा हंडा सापडला की काय?'
त्यावर शेतकरी म्हणाला, ' ' छे छे, मी एक साधा शेतकरी आहे. दिवसभर शेतात राबतो. जी काही कमाई होते तिचे मी चार हिस्से करतो व माझी ती जबाबदारी आहे, असे समजून कर्तव्यपूर्तीच्या आनंदात समाधान मानतो.
त्यावर बंकटमल म्हणाले, की चार हिस्से म्हणजे? त्यावर शेतकरी म्हणाला, ''माझ्या आई-वडिलांनी मला वाढविले. मात्र आता ते थकले आहेत; त्यामुळे कमाईचा एक हिस्सा त्यांना देतो. दुसरा हिस्सा माझ्या लहान मुलाबाळांना देतो कारण त्यांच्या पालनपोषणाची जबाबदारी माझी आहे तर समाजाचे ऋण म्हणून तिसरा हिस्सा दानधर्मात खर्च करतो व चौथ्या हिश्श्यात मी माझे घर चालवितो. ''
बंकटमलला पैसा कसा खर्च करायचा व आनंद कसा मिळवायचा याचा वस्तुपाठच मिळाला होता. त्याप्रमाणे त्याने 'सुखी' होण्याचा निर्णय घेतला.
January 2, 2018
एक होता राजा. त्याचं राज्य लहान होतं; पण मन मोठं होतं. त्यामुळं तो सुखी होता, आणि त्याची प्रजाही सुखी होती.
एकदा तो फिरत-फिरत एका जत्रेत जाऊन पोचला. तिथं त्याला एक तरुण दिसला. त्याच्या हातात सफरचंदाच्या झाडाची एक फांदी होती आणि त्या फांदीला सात सफरचंद लागली होती. राजाला मोठी गंमत वाटली. त्यानं त्या तरुणाला विचारलं, ‘काय रे भाऊ, ही सफरचंद विकायची आहेत कां?
October 5, 2025

खरे तर तिचे लग्न जबरदस्तीने झाले होते.. प्रेमाची शक्यताच नव्हती त्याला हे माहीतच नव्हते.. पण तिला हवा तसा तो नव्हता. नवरा म्हणून तिची काही स्वप्ने होती खरे तर तो खूपच चांगला होता… पण तिच्या स्वप्नाप्रमाणे नव्हता.. हीच तिची चूक तिला भोवणार होती.. नाही भोवलीच..
July 8, 2021
तडजोडीच्या राजकारणात सामान्य कार्यकर्त्याची होणारी फरपट व्यक्त करणारी कथा.
April 6, 2017

पेशन्स इज द की….
December 16, 2021

विजयने मांसाहार बंद केल्यानंतर पूर्वी त्याला होणारे पोटाचे त्रास बऱ्याच अंशी कमी झाले. सर्वात म्हणजे विजय रागावर विजय मिळविण्यात यशस्वी झाला. आता तर त्याच्या स्वभावात प्रचंड साधेपणा आलेला आहे इतका की एकेकाळी तो साक्षात जमदग्नीचा अवतार होता हे कोणाला सांगूनही खरं वाटत नाही.
January 25, 2022

सांगली जिल्ह्यातील बिसुर या खेडेगावात माझा जन्म झाला. घरची परिस्थिती अगदी बेताची, वडील सुतगिरणीमध्ये काम करुन उर्वरित वेळेत बिघा – दोन बिघा शेतजमिनीत जमेल तेवढं काम करत होते. आई आमचा सांभाळ करायची. जवळ जवळ सर्व शेती निसर्गावर अवलंबून होती. त्यामुळे शेतीचे उत्पन्न वर्षभर जिकिरीनं पुरवावं लागत होतं. मोठ्या दोन बहिणींची लग्न होवून त्या सासरी गेलेल्या होत्या.
December 27, 2023
सिद्धांत आणि मानव खूप जवळचे मित्र. त्यातला मानव अर्धे शिक्षण गावात पूर्ण करून आलेला आणि सिद्धांत अस्सल शहरी मुलगा. दोघेही विज्ञान शाखेचे पदवीधर. खूप दिवसांनी मानव आणि सिद्धांत ऐकमेकांना भेटतात. ते एका हॉटेल मध्ये भेटतात. त्यावेळी त्यांच्या जुन्या आठवणी ताज्या होतात.
February 5, 2026
दार उघडले आणि थंड गार वाऱ्याचा झोत अंगावर आला. शहारून गेलो, केस ताठरले.
February 5, 2026
अंगाच मुटकुळ करून बारा-तेरा वर्षाचा मुलगा एका पडलेल्या घराच्या ओसरीतअगदी डोक्या पर्यंत पांघरून घेऊन झोपला होता , सकाळचे पाच – साडेपाच वाजले होते , वस्तीला बऱ्याच प्रमाणात जाग आली होती,
June 25, 2022
Copyright © 2025 | Marathisrushti