नामवंत लेखक, नवोदित लेखक, ऑनलाईन लेखक यांच्या कथा

पण आपण असं काय वागलो की तिला आपल्याबद्दल असा संशय यावा? आपली दी आपल्याबद्दल असा विचार कसं काय करू शकते याचे तिला आश्चर्य वाटत होतं. मग गढीवर गेल्यावर आपल्यामुळं त्या दोघांच्यात भांडण झालं असेल? आपल्यामुळं राज दीला कायमचा सोडून गेला असेल? बापरे…. विचार करून करून आरूचं डोकं ठणकायला लागलं..
October 3, 2019
इकडे स्टेशन मास्तरांच्या एव्हाना ही घटना दृष्टीस पडली होती. त्यांनी स्वप्नील कडे नजर टाकली आणि शुभांगी च्या दिशेने हात करत बोलले,” स्वप्नील, तिकडे बघ, कोणीतरी लहान मुलगा ट्रॅक वर पडला आहे.” स्वप्नील ने तिकडे बघितले आणि तो एकदम बेभान झाला. काय करावे हा तो विचार करत होता तेवढ्यात स्टेशन मास्तरांनी आपल्या हातातील लाल झेंडा उंच उभारून उद्यान एक्स्प्रेस च्या लोकोपायलट ला धोक्याचा इशारा दिला होता.
December 26, 2021
स्वतःच्या केबिन मध्ये अनय शांतपणे बसून होता. त्याला कारणही तसंच काहीसं होतं पैसा, पॉवर, स्टेटस मिळवताना खूप काही निसटून गेलं होतं. वळून मागे बघितल्यावर त्याला जाणवलं की या सगळ्या चढाओढीत आपण आपल्या माणसांना हरवून बसलोय.
February 4, 2026
पंचवीस एक वर्षापूर्वी विजय एका सरकारी शाळेत तिसर्या इयत्तेत शिकत होता. त्यावेळ्चा प्रसंग आठवून विजयला आजही स्वतःवरच ह्सू येत. त्या शाळेपासून पंदरा मिनिटाच्या अंतरावर असणार्या झोपडपट्टीत विजय त्यावेळी रहात होता. पण झोपडपट्टीत रहात असतानाही त्यावेळी विजयच्या वडिलांची आर्थिक स्थिती उत्तम होती. त्यामुळे विजय शाळेत जाताना इतर मुलांच्या तुलनेत जरा जास्तच रूबाबात जात असे त्याचा तो रूबाब आजही कमी झालेला नाही म्ह्णजे त्याने तो कधीच कमी होऊ दिला नाही. पहिली – दुसरीला तो ज्या शाळेत शिकत होता त्या शाळेच्या मुख्याध्यापिकाच त्याच्या वडिलांच्या खास परिचयाच्या होत्या आणि त्याकाळी त्या शाळेची शिस्त फारच कडक होती. पण ती शाळेत जाण्यासाठी बसने प्रवास करावा लागत असे तो टाळण्यासाठी नाईलाजाने त्याने या नवीन शाळेत प्रवेश घेतला होता. विजयला वर्गात शांत आणि शिस्तीत राहण्याची जणू सवयच जडलेली होती. पण तो कितीही शांत दिसत असला तरी स्वभावता शांत अजिबातच नव्हता. या नवीन शाळेत बहूतेक मुल खोडकर होती. त्यामुळे त्या मुलांच्या तुलनेत विजय किंचित वेगळाच होता.
December 24, 2015
यादववंशांत शूरसेन नांवाचा एक राजा झाला. हा मथुरेंत राहून राज्याचा कारभार पाहत असे. म्हणून मथुरा ही सर्व यादव राजांची राजधानी असे लोक समजू लागले. या शूरसेनाचा मुलगा वसुदेव याचे कंसाची बहीण देवकी हिच्याशी मोठ्या थाटाने लग्न झाले. लग्नसमारंभ उरकल्यावर देवकीला घेऊन वसुदेव जाण्यास निघाला, तेव्हां कंस हा आपल्या बहिणीस व मेहुण्यास पोचविण्यासाठी मोठ्या इतमामानें सोन्याचे शेकडों रथ घेऊन निघाला; इतकेच नाही, तर आपल्या बहिणीच्या संतोषासाठी तिचा रथ हांकण्याचे काम त्याने स्वतः हातीं घेतले.
November 15, 2025
भैय्याजीच्या गल्ल्यावर भाजी घेत उभी होते. पंजाबी ड्रेस परिधान केलेली साधारणपणे पंचविशीतली एक तरुणी धक्का मारत धाडकन शेजारी येऊन उभी राहिली. तिचा मोबाईल फोन चालूच होता. एका हातात तो कानाशी धरून, मान वाकडी करत तिने पर्स उघडली. त्यातला एक कागद काढला आणि भैय्याजीकडे दिला. भैय्याजीनी पण माझी भाजी तोलता तोलता तो हातात पकडला. त्याचा मला भाजी देण्यातला उत्साह मावळला.
November 27, 2025
एकदम सायकली? आणखीन काही नको का?” शेटजींचं उपहासात्मक बोलणं ‘सुखा’च्या लक्षात आलं. तो म्हणाला, “रागवू नका शेठजी, आम्ही राहतो ते जव्हारच्या पुढे खूप आडगाव आहे. आदिवासी पाडे तिथे आहेत. नीट शिक्षण नाही. दवाखाने नाहीत. शाळेला पोरान्ला पाच-सहा मैल चालत जावं लागतं. दुकानं नाहीत.
January 30, 2023

विजयला बुटाचे आकर्षण लहानपणापासून होते. विजय कमवायला लागल्यावर त्याने कधी स्लीपर फार घातली नाही.मग ती कितीही महागातली का असेना ? गोव्यावरून विजयने आणलेली स्लीपर त्याने कारखान्यात काम करताना वापरली.
March 11, 2022

माझ्या स्वाक्षरीच्या घरात शांत बसतो नेहमीप्रमाणे, भिंतीकडे तोड करून… समोर स्वाक्षऱ्या आहेत… स्वतः येऊन केलेल्या.. मोठी माणसे..मोठी स्वप्ने..मोठे यश.. सर्व काही माझ्या घराच्या भीतीवर वसलेले आहे… शब्दाच्या रूपात…
November 1, 2019

महानगरातली रात्र. लखलखणाऱ्या दिव्यांची दिवाळी असल्यासारखी सजलेली. पण त्या सर्व गजबजाटापासून दूर असलेला, समुद्र किनाऱ्यालगत असलेला, श्रीमंत समजल्या जाणाऱ्या वस्तीतला एक बंगला. या बंगल्याला असलेली अखंड सोबत समुद्राच्या गाजेची.
December 23, 2025
Copyright © 2025 | Marathisrushti