नामवंत लेखक, नवोदित लेखक, ऑनलाईन लेखक यांच्या कथा

आपल्यापैकीच एक जण मरण पावला. तो कसा मरण पावला हे बघवत नाही. मग कुणीतरी सहन न होऊन चादर पांघरतो. जिवंतपणी बिचाऱ्याला पांघरायला काही नव्हत. थंडी-जी काय थोडीफार वाजते तिच्यामुळे अर्धमेला झाला. गेल्यावरती पांघरुण मिळालं बिचाऱ्याला. मग त्या प्रेतावर डोळा ठेवून, त्यावर मयतासाठी पडणाऱ्या पैशांवर नजर ठेवून बसणारे महाभागही असतात. त्यांना दोष देण्यात तरी काय अर्थ ? त्यांनाही थंडी वाजतच असते.
April 27, 2022

चालणारा पोपट पहिल्यांदाच बघत होतो. त्यााला कधीच उडता येणार नव्हतं. कारण पंखांची टोकं कलात्मक पद्धतीनं कापून टाकलेली होती. उडणारे पोपट बघितले, पिंजऱ्यातले पोपट बघितले. पण चालणारा पोपट पहिल्यांदाच बघितला.
May 10, 2022
ग्रामीण भागामध्ये माणसांच्या जवळ पैसा भयंकर कमी आहे. तरीपण त्यांची जगण्याची धडपड अतिशय मोठी आहे हे मला जाणवत होते पोटासाठी मिळेल ते काम प्रामाणिकपणे गावातील बरीच मंडळी करत होती. पोटासाठी किती मोठी धडपड फक्त आणि फक्त माणूस म्हणून जगण्यासाठी. तर काही जण म्हणत असत माणसाचा जन्म पुन्हा नको संसारातील यातना सारे दुःख आणि दुःख. या दुःखातून कधी सुटका होते या विचारात ग्रामीण भागातील माणूस पूर्णपणे अडकून पडला होता.
December 28, 2022
गाडीने चांगलाच वेग घेतला होता. रात्रीचे नऊ वाजले होते.मीनल खिडकीशी बसून बाहेरच्या काळोखात बघत होती. रेल्वेच्या डब्याची सावली डब्यातल्या प्रकाशामुळे बाहेर जमिनीवर पडली होती व ती पण गाडीबरोबर धावत होती. मीनल आज फार खुश होती. ती चक्क हिमाचल प्रदेशात चालली होती. सिमला मनालीचे तिचे फार वर्षांचे स्वप्न पूर्ण होण्याच्या मार्गावर होते. सोबतीला होती तिची मैत्रिणी सारखीच असलेली वहिनी, सीमा. त्यामुळे पूर्ण प्रवास खूपच आनंदात होणार यात काही शंकाच नव्हती. हसतखेळत दोघींनी नुकतच डब्यातले जेवण घेतले होते. आता झोपायची तयारी करायची होती.
June 6, 2026
पावसाळी सकाळ होती. माधवी घाईने बँकेत शिरली. कामाला भिडणार तेवढ्यात तिला साहेबांच बोलावणं आलं. शाखाधिकाऱ्यांच्या केबिनमध्ये गेल्यावर त्यांनी नॉमिनेशन नाही अशा अकाउंटस्ची एक मोठी लिस्ट तिच्या हातात ठेवली. नॉमिनेशन नसेल तर डेथ क्लेमसाठी ग्राहकांचा वेळ व पैसे खर्च होतात.
February 23, 2023
विजय हातातील पेपर सोफ्यावर टाकत उठला आणि दरवाज्याच्या दिशेने चालू लागला त्याने हळूच दरवाजा उघडला तर दरवाजात एक सुंदर स्त्री उभी होती…
December 14, 2022

एका सकाळी उंदीरमामा आपल्या बिळांतून चमकत्या डोळ्यांनी इकडे तिकडे पहात होता.
August 5, 2022
प्रेमकथा
June 3, 2017
स्मिता कॉम्प्युटर इंजिनीअर. चार वर्षे झाली विक्रोळीला एका छोट्याशा कंपनीत नोकरीला होती. तिला प्रोग्रॅमिंग व काही क्लाएंटचे प्रोजेक्ट्स बघावे लागत. ती घरातून बारा-साडेबाराला निघे व रात्री बारा साडेबारापर्यंत परत येई. अर्थात तिला कारने घरापर्यंत ड्रॉप असे. पण काल रात्री तिला अजिबात झोप आली नाही.
June 9, 2022
आटपाट नगर होतं. तिथं एक गरीब ब्राह्मण रहात असे. तो दारिद्र्याने फारच त्रासलेला होता. त्याची बायको शेजारणीच्या घरी एके दिवशी बसायला गेली. तिनं आपल्या गरिबीचं गाणं गायलं. शेजारणीने तिला शुक्रवारचं व्रत संगितलं. ती म्हणाली, “ बाई, शुक्रवारचं व्रत कर. हे शुक्रवार तू श्रावणापासून धर. सारा दिवस उपास धरावा. संध्याकाळी सवाष्णीला बोलवावं. तिचे पाय धुवावेत, तिला हळद कुंकू द्यावं. तिची ओटी भरावी.
August 18, 2024
Copyright © 2025 | Marathisrushti