मूर्ख कोल्हा

एक कोल्हा होता. त्याला सगळेच मूर्ख कोल्हा म्हणून ओळखायचे. आपल्या
या ओळखीने कोल्हा खूप दुःखी असायचा. तो विचार करू लागला, आपला
मूर्खपणाचा शिक्का पुसून हुशार, बुद्धिमान कोल्हा ही प्रतिमा सगळ्यांसमोर
येण्यासाठी काहीतरी केले पाहिजे. लोकांनाच मूर्ख बनवून आपल्याला
राजाप्रमाणे सन्मान मिळवायला हवा.



एक कोल्हा होता. त्याला सगळेच मूर्ख कोल्हा म्हणून ओळखायचे. आपल्या
या ओळखीने कोल्हा खूप दुःखी असायचा. तो विचार करू लागला, आपला
मूर्खपणाचा शिक्का पुसून हुशार, बुद्धिमान कोल्हा ही प्रतिमा सगळ्यांसमोर
येण्यासाठी काहीतरी केले पाहिजे. लोकांनाच मूर्ख बनवून आपल्याला
राजाप्रमाणे सन्मान मिळवायला हवा.

खूप खूप विचार केल्यावर त्याला एक कल्पना सुचली. तो जंगलातील सगळे
प्राणी उठण्यापूर्वी नदीवर गेला. तिथे त्याने दगड, माती, चिखलाच्या साहाय्याने
छान ओटा बनविला. ओटा शेणाने सारविला. उरलेला चिखलाचा, शेणाचा,
गाळाचा एकत्र लगदा करून स्वतःच्या अंगाला चोपडला. स्वतःचेच रूप
पाण्यात बघितल्यावर कोल्हा हसला. नदीकाठी असलेली दोन बेडके त्याने
पकडली. ती मारली आणि त्यांनाही चिखल चोपडून कानात बांधली. आपले
रूप तो पुन्हा नदीच्या पाण्यात न्याहाळू लागला. खुष झाला. आता आपल्याला
कोणी ओळखू शकणार नाही याची खात्री झाली. आपल्या हुशारीवर तो खुष
झाला.

पशु पक्ष्यांच्या गोष्टी
सकाळ झाली. कोल्हा ओट्यावर जाऊन बसला. नदीवर पाणी पिण्यास
कोणी प्राणी आला की, कोल्हा ओरडायचा,
“एमाझ्या मागून म्हण-
चांदीचा ओटा, सोन्याने लिंपला

कानात कुंडले, जसा राजा बसला.”
आपल्या जंगलात कुणी अजब कोल्हा आला आहे हे पाहून प्राणी कधी
कुतुहलाने तर कधी भीतीने म्हणू लागले
“चांदीचा ओटा, सोन्याने लिंपला
कानात कुंडले, जसा राजा बसला.”
या अजब कोल्ह्याला बघायला सगळे जमले. कोल्हा सगळ्यांना म्हणू
लागला, “मी या तळ्याचा राजा आहे. तुम्हाला पाणी प्यायचे असेल तर म्हणा –
“चांदीचा ओटा, सोन्याने लिंपला कानात कुंडले, जसा राजा बसला.”
सगळे एकसुरात बोलू लागले. कोल्ह्याचा आनंद गगनात मावेना! आपला हेतू
साध्य झाला. जंगलातील मूर्ख प्राण्यांनी मला ओळखले नाही. आता मी सर्वांवर
राज्य करीन. या विचाराने तो नाचू लागला. नाचता नाचता त्यांच्या अंगावरचा
वाळलेला चिखलाचा थर पडू लागला. मूर्ख कोल्ह्याचे मूळ रूप उघडे पडू
लागले. तरी मूर्ख कोल्हा आपल्याच तंद्रीत होता. मात्र इतरांच्या लक्षात आले,
मूर्ख कोल्ह्याने अंगाला माती फासून आपलं रूप बदललं !
कोल्हा ओरडला, असे गप्प का? बोला बोला
‘चांदीचा ओटा, सोन्याने लिंपला
कानात कुंडले, जसा राजा बसला.’
सगळे खदा खदा हसू लागले. आणि त्याला चिडवत म्हणाले,
‘मातीचा ओटा, शेणाने लिंपला
कानात बेंडकोळी, जसा घुबड बसला.’
मूर्ख कोल्ह्याने पाहिले अंगावरचा चिखलाचा थर गळून पडला होता. तो
खाली मान घालून उभा होता. सगळे ‘मूर्ख कोल्हा रे मूर्ख कोल्हा’ म्हणत निघून
गेले. कोल्हा परत एकटाच उरला.

Author