नामवंत लेखक, नवोदित लेखक, ऑनलाईन लेखक यांच्या कथा
अनेक वर्षांपर्यंत चांगल्या रीतीने काम करण्याबद्दल नोकराने त्याच्याशी करार केला होता. जर कराराप्रमाणे त्याने बरोबर काम केले नाही, तर त्याच्या पाठीचे पेटीच्या आकाराचे चामडे काढण्यात येईल, आणि जर का नोकराने आपली नोकरी चांगल्या रीतीने केली तर हाच व्यवहार पादरी साहेबांबरोबर करण्यात येईल. यापूर्वी पोप साहेबांजवळ पुष्कळ नोकर येवून गेले होते. पण कुणीही टिकू शकला नव्हता.
October 10, 2024
बसमधून प्रवास करताना प्रतिभाला एका तरूणाने धक्का मारला. कदाचित तो चुकुनही लागला असेल पण प्रतिभाला तेव्हा तसं वाटलं नाही म्हणून ती त्याला म्हणाली,” काय रे ! आंधळा आहेस काय? की मुलगी पाहून जाणुनबुजुन धक्का मारतोस ? प्रतीभाची ही वाक्ये त्याने ऐकली नसतील हे तर शक्यचं नव्हतं. पण तरीही ऐकून न ऐकल्यासारखं करत तो पुढे निघुन गेला.
March 26, 2021
एक राजा होता. तो खूपच पराक्रमी होता. जेवढा पराक्रमी तेवढाच प्रजाहितदक्ष. प्रजेच्या फायद्यासाठी त्याचे सारखे प्रयत्न चालू असायचे. त्यामुळे प्रजाही राजावर खूश होती. असा राजा जन्मोजन्मी मिळो अशीच प्रार्थना प्रजा करीत होती. राजा पराक्रमी असल्यामुळे त्याने अनेक राजांना आपले मांडलिक बनवले होते. त्या मांडलिक राजांकडून राजाला वेळोवेळी धन व संपत्तीचा पुरवठा होत असे. त्यामुळे राजाचा खजिना नेहमीच भरलेला असे. राजाची आर्थिक बाजू भरभराटीला असल्यामुळे राज्यात सुबत्ता होती. दुष्काळातही प्रजेचे फारसे हाल होत नसत. राजाच्या राज्यात एकूणच सर्वत्र आबादीआबाद होते. राजाला याच गोष्टीचा फार अभिमान होता. या अभिमानाचे रूपांतर हळूहळू अहंकारात व नंतर गर्वात झाले. पुढे पुढे हा गर्व राजाच्या आचरणातही दिसू लागला. एकदा राजधानीत एक मोठे साधूमहाराज कोठून तरी आले. साधूमहाराज अतिशय निरिच्छ वृत्तीचे होते.दर्शनासाठी वा भेटायला आलेल्या लोकांकडून ते काहीही घेत नव्हते.
राजधानीत त्यांची प्रसिद्धी वाहू लागली व त्यांचे दर्शन घेण्यासाठी लोकांची रांगही वाढू लागली. या साधूमहाराजांची महती राजाच्याही कानावर गेली. त्यामुळे एकदा राजाही त्या साधूला भेटायला गेला व म्हणाला, 'तुम्ही मागाल ते मी द्यायला तयार आहे; मात्र तुम्ही ते स्वीकारले पाहिजे. माझा सारा खजिना, सारे राजवैभव इतकेच काय माझे शरीरही तुम्हाला द्यायला तयार आहे. यापैकी तुम्ही काहीही स्वीकारू शकता ?' त्यावर साधूमहाराज राजाला म्हणाले, ' राज्याचा खजिना तर
प्रजेच्या मालकीचा आहे. त्याचा तू केवळ राखणदार आहेस. तुझ्या शरीरावर तुझ्या पत्नीचा तसेच तुझ्या मुलाबाळांचा हक्क आहे. ' साधूच्या या उत्तरामुळे राजा गोंधळला व म्हणाला, ' 'मग माझी स्वतःची अशी कोणती भेटवस्तू तुम्हाला देऊ हे तुम्हीच मला सांगा. ' त्यावर साधूमहाराज राजाला म्हणाले, ' 'तुझ्या मनातील अहंकार हा सर्वस्वी तुझाच आहे. त्याचे दान तू मला करू शकतोस. '' साधुमहाराजांच्या या
उत्तराचे मर्म राजाला समजले व त्याने अहंकार सोडून देण्याचा निश्चय केला.
January 3, 2018
नागू दुपारची भाकरी खावी म्हणून औत सोडून बैलायला पाणी पाजवू लागला.डोबी पाण्यानं ठिल भरलेली होती.सूर्य नारायण आग ओकत व्हता.बैलायनं पूर sपूर करत खाली मुंडी घालून गटागटा पाणी पेलं.
February 4, 2026
एकदा काय झालं! अग्नीदेव, वरुणदेव, वृषभदेव आणि करहणमाता (अन्नदेवता) यांच्यात झगडा सुरू झाला. अग्नीदेव म्हणाले, ‘ते काही नाही, मीच या धरतीवरील मोठा देव आहे.’ वृषभदेव आपली मान डोलवत- डोलवत म्हणाले, ‘नाही नाही. मीच या धरतीवरील मोठा देव आहे.
November 25, 2025
जिंदगी’ एक रेस है रफ्तार के सिवा कुछ नही. आपल्या सगळ्यांची जगण्याची ही एक पध्दतीच झाली आहे. आयुष्यभर या रेस बरोबर आपण धावतच असतो. आला दिवस गेला दिवस रुटीनच्या नावाने फक्त जगतच असतो. काही कारणांनी या रुटीनमध्ये जेव्हा खंड पडतो किंवा बदल होतो तेव्हा लक्षात येते की अरे त्या रेस बरोबर आपण धावत पळत कुठपर्यंत पुढे निघून आलो.
November 27, 2025

खरं तर नील तिच्या बाबतीत जे खरं घडलं तेच बोलत होता. त्यामुळे आता लताला त्याचा राग यायला सुरूवात झाली होती. तिला बघायचं होतं की, नीलला आपल्या बद्दल नक्की किती माहिती आहे? ती राग आवरून धरून त्याला पुढे बोल असे म्हणाली. ’गो अहेड नील.’
October 8, 2019
आय.सी.सी.आर. तर्फे भारत सरकारचा सांस्कृतिक प्रतिनिधी म्हणून नरेंद्रने जपान, रशिया, मॉरिशस, इंडोनिशिया येथे भारतीय कलापथकाचे नेतृत्व केले आहे. प्रजासत्ताकदिनाच्या परेडमध्ये ठाणे जिह्यातील आदिवासी कलावंतांचे पथक नेऊन ठाण्याची आणि महाराष्ट्राची ही मान उंचावण्याचे काम नरेंद्रने केले आहे.
June 24, 2022
एका शहरात तीन मित्र रहात होते. एक राजपुत्र, एक मंत्रिपुत्र आणि एक वणिक पुत्र. एकदा तिघंही एकत्र आले आणि विचार करू लागले की कोण कशामुळे जिंकला आहे. राजपुत्र म्हणाला, “मी आपल्या पुण्यामुळे जिंकलो आहे.” मंत्रीपुत्र म्हणाला, “मी आपल्या बुद्धिबळावर जिंकलो आहे.” वणिक पुत्र म्हणाला, “मी आपल्या चतुराईने जिंकलो आहे.” तिघे मित्र परदेशात गेले आणि एका शहरातील बगीच्यात थांबले. वणिक पुत्रास जेवण्याची व्यवस्था करण्यास सांगण्यात आले. वणिक पुत्र एका वाण्याच्या दुकानावर गेला. त्या दिवशी कोणतातरी सण होता आणि दुकानात इतकी गर्दी होती की तो वाणी सर्व ग्राहकांना लवकर किराणा देवू शकत नव्हता.
October 1, 2024
संध्याकाळची वेळ होती. पावसाळ्याचे दिवस होते. दिवसभर पाऊस नुसता भरभरून कोसळत होता. मुंबईत पावसाळ्याच्या दिवसात झुमझोड पाऊस आणि ट्रॅफिक अडकून पडणे ही काही नवीन गोष्ट नव्हती.
November 27, 2025
Copyright © 2025 | Marathisrushti