(User Level: User is not logged in.)

कथा

नामवंत लेखक, नवोदित लेखक, ऑनलाईन लेखक यांच्या कथा

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • बारक्या

    आपली आलीशान गाडी सर्व्हिसिंगला टाकून आपल्या ८-१० वर्षांच्या मुलासोबत तो सर्व्हिस सेंटर च्या बाहेर पडला . समोरच असलेल्या रिक्षा स्टँडवर एकंच रिक्षा उभी .. तो लगबगीने आत शिरला .. आपल्या मुलाचा हात धरून त्याला आत घेऊ लागला ..तेवढ्यात ते काहीसे वयस्कर रिक्षाचालक म्हणाले .. “ दादा …. त्या “बारक्या”ला आतमधल्या साईडला बसवा .. तिकडे पॅक पट्टी आहे न्.. तेवढीच शेफ्टी !!

      August 20, 2021


  • सुदामदेवाची गोष्ट

    कृष्ण लहानपणी सांदीपनी गुरूपाशी विद्या शिकत होते, तेव्हा तेथे त्यांच्याबरोबर सुदामदेव नावाचा ब्राह्मणाचा एक मुलगा विद्याभ्यास करीत होता. तो कृष्णाचा जिवलग मित्र होता. पुढे कृष्ण मथुरेला गेला, आणि सुदामदेव आपल्या घरी गेला.

      November 15, 2025


  • पुस्तक

    मरीन लाइन्सजवळ ऑफिस आहे. त्यामुळे परत जातानाही खिडकीची जागा मिळवतो. घरी जातो. गेली पंचवीस वर्षे त्याचा हा उपक्रम चालू आहे. हातात सदोदित कोणतंतरी पुस्तक असणार. पूर्वी पु.ल. देशपांडे, वि.स. खांडेकर, गाडगीळ, सानीया अशी पुस्तक असायची. नंतर एकदम इंग्रजीवर उडी मारली.

      June 26, 2022


  • शेवटचे दिस

    प्रत्येक घरात स्वत:ला जाणे शक्य नाही म्हणून ईश्वराने आई निर्माण केली. स्त्री-पुरुष प्रमाणाचा समतोल राखण्यासाठी त्याला काही पुरुषांमध्ये मातृहृदय टाकावे लागते. त्याच्या आदेशानुसार त्यातले काही संतमहात्मे बनून जगाच्या कळवळा घेऊन पृथ्वीवर अवतरतात, तर काही प्रपंच करण्यासाठी येतात. प्रपंच करीत असले तरी त्यांची कळवळ्याची जाती संतांप्रमाणेच असते. माझे बाबा त्यांच्यापैकी एक हे निश्चित.

      June 19, 2026


  • कृष्णाकाठच्या कथा…. खेळ सूर पारंब्याचा

    कृष्णाकाठच्या कथा…. खेळ सूर पारंब्याचा

    मी शाळा शिकत असताना अभ्यासाबरोबर साहित्याचे लेखन सुद्धा करीत असे. बालभारती पुस्तकातील धडे किती सुंदर असतात यामुळे मला एक लिहिण्याची उर्मी येत असे. आपणही थोडेफार लेखन करावे असे माझ्या मनाला मनोमन वाटत होते. शाळा शिकत असतानाच नाटकात काम करण्याचा छंद मला लागला होता व भजनात सुद्धा माझे मन गुंतत होते. वडील जिवंत होते तोपर्यंत मी अधून मधून लेखन करीतच असे.

      August 22, 2023


  • भिक्षापात्र 

    "राजमहालाच्या दारात मोठा गदारोळ उडाला होता. जवळपास सगळी नगरी तिथे लोटली होती.

    प्रसंगच तसा होता.
    त्या दिवशी भल्या सकाळी एक भिक्षुक राजाच्या महाली भिक्षा मागण्यासाठी आला होता.

    राजा म्हणाला, तू पहिला याचक आहेस आजच्या दिवसातला. काय हवं ते माग. मिळेल.

    भिक्षुक म्हणाला, माझ्याकडचं भिक्षापात्र फारच छोटं आहे. त्यात बसेल एवढीच भिक्षा मला पुरेशी आहे. पण, वचन देण्याआधी विचार कर. जमेल का?

    भिक्षुकाच्या हातातलं अतिशय छोटं भिक्षापात्र पाहून राजा हसून म्हणाला, अरे याचका, माझ्याकडच्या संपत्तीची गणती नाही, माझ्या राज्याला सीमा नाही. हे छोटंसं भिक्षापात्र भरण्यात काय अडचण.

    राजाने नोकरांकरवी आपल्या खजिन्यातले उत्तमोत्तम जडजवाहीर मागवले आणि त्यांनी ते भिक्षापात्र भरायला सांगितलं...

    ...संध्याकाळ उजाडली तरी ते भरणं सुरूच होतं...

    ...राजाचा सगळा खजिना रिता झाला होता,

    आपल्या लाडक्या राजावर खजील होण्याची पाळी यायला नको, म्हणून प्रजाजनांनी आणलेली त्यांच्या घरची संपत्तीही त्यात गायब झाली होती. रात्र झाली तसा राजा भिक्षुकाच्या पायावर कोसळला आणि म्हणाला, महाराज, माझ्याकडे हे पात्र भरण्याइतकी संपत्ती नाही.

    भिक्षुक म्हणाला, अरेरे, उगाच माझा दिवस वाया गेला. सकाळीच सांगितलं असतं तर पुढे गेलो असतो. पात्र उलटे करून सगळी संपत्ती ओतून तो पुढे निघाला.राजा धावत त्याच्या मागे गेला आणि हात जोडून त्याने विचारलं, भगवन्, मला फक्त एक सांगा. या इतक्याशा भिक्षापात्रात माझा सगळा खजिना रिता झाला, तरी ते भरलं नाही. असं काय आहे या भिक्षापात्राचं वैशिष्ट्य?

    भिकारी म्हणाला, ते मलाही माहिती नाही. हे भिक्षापात्र मी माणसाच्या कवटीपासून तयार केलं आहे. त्यातच माणसाचं मन असतं म्हणतात. आणि ते कशानेही भरत नाही.!!

      December 13, 2016


  • आठवणी… पैशांच्या

    मी रिझर्व्ह बँकेत रुजू झालो टायपिस्ट म्हणून व निवृत्त झालो अधिकारी म्हणून. पूर्ण कारकिर्दीत पगाराच्या पाकिटातून आलेल्या नोटा सोडल्या तर मला ऑफिसमध्ये कधीही नोटा हाताळाव्या लागलेल्या नाहीत; असं मी सांगितलं तर जसा इतरांचा विश्वास बसत नाही त्याप्रमाणे तुमचाही बसणार नाही. पण ही वस्तुस्थिती आहे, एवढं मात्र खरं.

      April 10, 2023


  • गावांची ओढ (कथा)

    माणूस भाऊच्या धक्क्यावर उतरो, व्हीटी स्टेशनला उतरो, बॉम्बे सेंट्रलला उतरो, नाही तर सांताक्रुझ विमानतळावर उतरो. त्याच्या पाठीवर त्याच बि-हाड असतं, डोळयात स्वप्नं असतात आणि मनात एक खूणगाठ बांधलेली असते. नाव आणि पैसा मिळवून गावी परत जायचं.

      April 20, 2022


  • गाढव बाजार

    आटपाट नगर होते.

    “त्याला राजा नव्हता. एक मुख्य मंत्री होता आणि अनेक मंत्री होते. आधी सुरुवातीला एक मुख्य मंत्री आणि पाच दहा मंत्री असे छोटेसे मंत्रीमंडळ होते. सगळे चांगले चालले होते. हळू हळू मंत्र्यांना कळले की आपण मंत्री आहोत ते लोकांनी निवडून दिलेले असलो तरी त्यांची कामे केलीच पाहिजे असे नाही. एकदा निवडून आलो की लोकांना विसरले तरी चालते. आपली आणि आपल्या सात पिढयांची कमाई करून घ्यायची ही संधी आहे.

     

      December 22, 2023


  • रेव्हनची गोष्ट

    सुरुवातीच्या काळात रात्रीच्या वेळी सूर्य, चंद्र आणि तारे नव्हते. रेव्हन हा सर्वशक्तिमान होता. त्याने सगळ्या प्राण्यांना, माशांना आणि माणसांना निर्माण केले होते. तरी ते सगळे प्राणी अंधारातच राहत होते. कारण त्याने अजून सूर्य तयार केला नव्हता.

      December 25, 2024