(User Level: User is not logged in.)

साहित्य - ललित

नामवंत लेखक, नवोदित लेखक, ऑनलाईन लेखक यांच्या कथा, कविता, कादंबरी, प्रवासवर्णनासहित भरपूर साहित्य.

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • ठाण्यात भरलेली साहित्यसंमेलने

    संयुक्त महाराष्ट्रातील पहिले मराठी साहित्य संमेलन भरविण्याचा मान ठाणे शहराला मिळाला. दिनांक १ मे १९६० रोजी महाराष्ट्र राज्य अस्तित्वात आले आणि ७ व ८ मे १९६० या दिवशी ४२ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन ठाणे शहरात भरले. यापूर्वी ५ व ६ नोव्हेंबर १९३२ साली, भारतरत्न पां. वा. काणे यांच्या अध्यक्षतेखाली कोकण प्रांतीय मराठी साहित्य संमेलन ठाण्यात भरले होते.

      April 12, 2022


  • काव्यसुमनांजली – म्हणजेच अपेक्षा वाढविणार्‍या कविता

    एक उत्साही, विद्यार्थीप्रिय, प्रयोगशील शिक्षक म्हणून जिल्हास्तरीय ‘आदर्श शिक्षक’ पुरस्कार प्राप्त शिक्षक श्री. हरिश्चंद्र कोळी, एक कवी म्हणूनही ज्ञात आहेत. अध्यापनाच्या कार्यात कवितांना चाली लावून शिकविणे, विद्यार्थ्यांमध्ये साहित्याची आवड निर्माण करून त्यांना कविता लिहिण्यास प्रवृत्त करणे, शाळेची उत्कृष्ट हस्तलिखिते तयार करणे, अनेक नाटिका बसवून त्या मुलींकडून करवून घेणे वेगैरे कार्यामधून त्यांनी आपल्या प्रतिभा शक्तीचा अवकाश वाढवला आहे. ‘काव्यसुमनांजली’ या कवितासंग्रहाच्या माध्यमातून ते आता सर्व वाचकांपर्यंत पोहचत आहेत. त्यांच्या या सेवेला मन:पूर्वक धन्यवाद!

    p-22946-Kavyasumananjali-Coverहरिश्चंद्र कोळी हे मुळात शिक्षक असल्यामुळे शिक्षण, शिक्षक, विद्यार्थी, शाळा, सुट्टी, बालमन, सर्वधर्म समभाव, स्वच्छ भारत, साक्षरता, शिक्षकदिनासह, निरोपसमारंभ गीता पर्यंतचे सर्व विषय त्यांच्या कवितांमधून आलेले आहेत. सावित्रीबाई फुले यांनी रुजवलेले शिक्षण प्रमाणभूत मानल्यामुळे सामाजिक मूल्ये त्यांच्या कवितांमधून आलेली दिसतात. म्हणूनच, ‘शाळा माझी माऊली’ या कवितेत ते म्हणतात -

    ‘शाळा आपुली माय माऊली

    तिच देते तुम्हां साऊली

    हसा, खेळा, पडा, धडपडा

    राखा देशाचा मान

    वेचा कण-कण ज्ञान’

    हसत खेळत शिक्षण घेण्याचे मूल्य रुजतांनाच देशाचा मान राखण्याचा संस्कार ही ते मुलांवर करतात. साने गुरुजींचा आदर्श जपण्याचा ते प्रयत्न करतांना दिसतात.

    स्वतंत्र भारतात आपण स्वतंत्र आहोत का? ‘स्वातंत्र्या नंतरही’ या कवितेमध्ये आजच्या भ्रष्ट समाजाचा आरसा तर ते दाखवतातच पण आपण या स्वतंत्र राष्ट्रात सुरक्षित आहोत का? असा प्रश्नही विचारतात. आणि मुलांना सांगतात -

    ‘एक दिलाने गाऊ आपण

    देशाचे गुणगाण रे

    श्रमातुनी आणि त्यागातुनी

    घडवू भारत छान रे

    घडवू भारत छान’

    श्रम आणि त्यागाचे मूल्य सांगतानाच ‘कुठलंही व्यसन न करण्याचा’ आदर्श व्यक्त करतात. जीवन म्हणजे काय? जगणं म्हणजे काय? सुख - दु:ख म्हणजे काय? याची सुंदर व्याख्या ‘जीवन’ या कवितेमध्ये त्यांनी केलेली आहे. ते म्हणतात -

    ‘जीवन म्हणजे केवळ जगणं नसतं तर

    सुख - दुःखाच्या दरम्यान

    श्वास आणि उच्छवास

    यातील अंतर

    म्हणजे खरं जीवन’

    जीवनाची अशी व्याख्या त्यांच्या विचारांचा पोत ठरवते. ‘महिला दिन’ या कवितेमध्ये इतिहासातील अनेक क्रांतिकारी स्त्रियांचे दाखले देत असतांनाच... आजच्या स्त्रीला प्रेरणा देण्यासंबंधी भाष्य करून तिचा पाय मागे न ओढण्याची विनंती करतात.

    ‘शाळेतील मुलांना मला शिकवायचे आहे

    समाजात जगण्यालायक बनवायचे आहे’

    (आदर्श शाळा)

    त्यासाठी श्रमप्रतिष्ठा, नैतिकमूल्य, अंधश्रद्धेचे उच्चाटन, साक्षरतेचा प्रसार करण्याचा मार्ग ते सुचवतांना दिसतात -

    ‘एका जागी राहून उभा

    आला असेल वीट

    विठ्ठला s s s सोड तुझी वीट’ (वारकरी)

    असे विठ्ठलाला अगदी सहजपणे सांगतात. ‘उन्हं पाहून पाठ फिरवणारी माणसं’ त्यांना नको आहेत. ‘भाकरीचा चंद्र शोधणारी माणसं हवी आहेत.’ ‘मी अडाणी कसा’ या कवितेमध्ये नैतिकता ही शिक्षणावर अवलंबून नसते तर ती नैतिक वागण्यावर अवलंबून असते. हे सांगताना कवी म्हणतात, ‘निरक्षर माणसाला लिहिता वाचता येत नाही पण बाकी सगळा व्यवहार समजतो. मान - अपमान समजतो. भ्रष्ट्राचार लक्षात येतो. पाहुणचार करता येतो’ मग असा माणूस अडाणी कसा? भ्रष्ट वागणारे साक्षर शहाणे कसे?... विचार करायला लावणारा प्रश्न कवीने उपस्थित केला आहे.

    ‘आम्ही सालस प्रेमळ

    निर्व्यसनी माणसं पेरली

    पण निरक्षर, लाचार

    पण हावरट माणसंच जन्मली’ (निर्दयी माणसे)

    या काव्यसंग्रहातील ‘भारती’ ही भारत मातेची आजची अनावस्था दाखविणारी कविता मुळातूनच वाचायला हवी. शिवाय ‘गर्दी’, ‘जगणं’, ‘कलियुग’, ‘बाप’, ‘चेंडू’, ‘पोर वयात आली’, ‘विटंबना’, ‘वादळ’ सारख्या कवितांनी कवी बद्दलच्या अपेक्षा वाढवल्या आहेत. साध्या - सोप्या सरळ भाषे मधील कविता गेय, गझल, मुक्तछंद, चारोळ्या, लावणी वगैरे प्रकारातील असून काही कविता गीतांच्या चालीवर लिहिलेल्या आहेत.

    हरिश्चंद्र कोळी यांचा लिहिता हात आहे. विचारांची झेप आहे. ती अधिक खोल व व्यापक व्हावी. त्यांना त्यांची लय सापडावी. भविष्यातील अधिकाधिक कसदार लेखनासाठी त्यांना अनेकानेक हार्दिक शुभेच्छा! आणि ‘काव्यसुमनांजली’ या पहिल्या कविता संग्रहाचे मन:पूर्वक स्वागत!

    - नीलम माणगावे,

    कवयित्री व लेखिका, जयसिंगपूर

    Title - Kavyasumananjali (काव्यसुमनांजली)

    Poet - Harishchandra Mahadev Koli (हरिश्चंद्र महादेव कोळी)

    Edition - First Edition

    Price - Rs. 100/- (मूल्य 100/- रुपये)

    Publisher - Dr. Sunil Patil (डॉ. सुनील पाटील)

    Publication - KavitaSagar Publication (कवितासागर प्रकाशन)

    Contact - 02322 - 225500, 09975873569

    Email - kavitasagarpublication@gmail.com

      March 7, 2016


  • शब्दाविण कळले सारे

    कोलाहला पासून दूर दूर शांत सागर किनारा. संध्याकाळची वेळ आणि ओलसर वाळूची बैठक. समुद्रातून ये-जा करणारा एखाद दुसरा पडाव. मधेच निरव शांततेचा भंग …..

      September 2, 2014


  • अमूल्य भेट – अलक (अति लघुत्त्तम कथा)

    अत्यंत मोजक्या शब्दात सांगितलेली पण अत्यंत अर्थपूर्ण अति लघुकथा..

      October 23, 2018


  • जैत रे जैत 

    गो नी दांडेकरांनी लिहून ठेवलेल्या अनेक अजरामर कांदबर्यांपैकी जैत रे जैत हि ठाकरवाडीतल्या ठाकरांची विशेषतः नाग्या अन् चिंधीची प्रेमकथा. महादेवाच्या गळ्यात बांधलेल्या पोळ्यात विराजमान असलेल्या राणी या मधमाशीविषयीची सूडकथा.

      May 29, 2019


  • सब की पसंद ‘निरमा’

    अगदीं सुरुवातीला सरकारी जाहिराती असायच्या त्यानंतर कमर्शियल जाहिराती सुरु झाल्या. त्यासुद्धा प्रमाणात असायच्या. आजच्यासारखा त्यांचा भडीमार नसायचा.

      December 30, 2021


  • पेशन्स इज द की…’

    तिचे वडील मला भेटले म्हणाले तू काहीतरी कर तिच्यासाठी . तिची अवस्था गेले वर्षभर तशीच होती. चांगले लग्न ठरले होते , मुलगा चांगला होता . पण एक दिवशी स्कुटरचा अपघात झाला आणि तो गेला. फक्त लग्नाची तारीख ठरायची राहिली होती.

      June 16, 2021


  • प्रॉपर्टीचे कागद.. (तो आणि ती)

    गाडी त्या सुप्रसिद्ध हायफाय वृद्धाश्रमाजवळ थांबली.त्यातून साठ पासष्टीचा माणूस त्याची पत्नी त्याचा मुलगा सून उतरले.तिथले वातावरण पाहून त्याला खूप बरे वाटले.ऑफिसमध्ये गेला तो कोण आणि का आला ते संगितले.

      July 7, 2021


  • सायको

    गेल्या काही महिन्या पासून आमच्या गावाचं नाव या पेपरात झळकतंय ! चार मुडदे पडलेत ! हो या रेल्वेस्टेशनच्या परिसरात ! कोणी तरी एकट्या दुकट्याला गाठून डोक्यात दगड घालून खून करतोय ! का ? माहित नाही. पोलीस पण चक्रावलेत .

      December 17, 2017


  • द रोड नॉट टेकन

    Two roads diverged in a yellow wood,
    And sorry I could not travel both
    And be one traveler, long I stood
    And looked down one as far as I could
    To where it bent in the undergrowth;

    Then took the other, as just as fair,
    And having perhaps the better claim
    Because it was grassy and wanted wear,
    Though as for that the passing there
    Had worn them really about the same,

    And both that morning equally lay
    In leaves no step had trodden black.
    Oh, I marked the first for another day!
    Yet knowing how way leads on to way
    I doubted if I should ever come back.

    I shall be telling this with a sigh
    Somewhere ages and ages hence:
    Two roads diverged in a wood, and I,
    I took the one less traveled by,
    And that has made all the difference.

    - Robert Frost

    कॉलेजमध्ये असताना स्पेशलायझेशनला हि कविता होती. to be very frank, त्यावेळी अशा फिलोसोफिकल का काय ते गटात मोडणाऱ्या कवितांचं प्रयोजन दाताखाली आलेल्या खड्यासारखं वाटलेलं. उमलू घातलेल्या उमेदीला पानगळीचं सिंचन जरा अजबच कॉम्बो वाटायचं. आता पुन्हा जेव्हा इथे अडखळले तेव्हा माझ्या आधीच्या प्रतिक्रियेचं मलाच हसू आलं होतं.

    तेव्हा फारशी न कळलेली किंवा फारशी न रुचलेली (न झेपलेली?) ही कल्पना आज अचानक एवढी आपली का वाटू लागलीये? असं काय आहे यात की यातले सारे संदर्भ पुन्हा एकदा नव्याने भेटलेत मला आणि आधी होती तशी परकेपणाची फ्रेम निखळलिये आणि त्या जागी मला माझ्याच जगण्यातले काही कवडसे असल्याचा भास

    होतोय? नव्याने सापडलेल्या रस्त्यावरून दुसऱ्यांदा चालताना वाटणारी ओळखीची भावना किंवा असंच काहीसं... एवढा बदल झालाय का आपल्यात?

    इतकं मात्र नक्की दोन्ही वेळच्या अनुभवण्यात फरक आहे नक्की...

    I shall be telling this with a sigh Somewhere ages and ages hence: Two roads diverged in a wood, and I, I took the one less traveled by, And that has made all the difference.

    मळलेली पायवाट जाणीवपूर्वक नाकारताना चोखळलेली नवी वाट नव्या गोष्टी समोर घेऊन येते.. जगण्याचा कस लागूनही जे हाती लागलं ते फार खास होतं, गर्दीतून वेगळं उभं करणारं होतं. असाच एक भावार्थ या कवितेचा. म्हणालं तर गाभा या कवितेचा. माणूस म्हणलं की नाविन्याचा सोस म्हणा किंवा नवं काहीतरी ट्राय करून बघण्याची उर्मी अनादी आदिमच आहे. कधी कधी मात्र याची दुसरी बाजूही असू शकते किंवा ती तशी असतेच हेच विसरायला होतं. जिथे एका ऐवजी दोन ऑप्शन हातात असतात तेव्हा निर्णय काहीही असो, त्या दुसरया न जाता आलेल्या रस्त्याचा सल तर कायमच सोबतीला असतो नं? म्हणजे काहीही निवडा, मग त्या न अनुभवलेल्या वाटेचं प्राक्तन काय असलं असतं हा प्रश्न तर सही सलामत उरतोच नं? म्हणजे निर्णय घेऊनही समाधान फार कमी वेळा लाभतं. असंच काहीसं. दुसरी बाजू कायमच unpredictable वाटत राहणार. आपल्या शेक्सपिअर साहेबांचा to be or not to be हा प्रश्न इथे निकालातच निघतो की. आणि त्या ऐवजी what if... हा नवीन व्हर्जन पिंगा घालू लागतो नाही का? :)

    -- श्रद्धा कुलकर्णी

      December 11, 2012