अमूल्य भेट – अलक (अति लघुत्त्तम कथा)

अत्यंत मोजक्या शब्दात सांगितलेली पण अत्यंत अर्थपूर्ण अति लघुकथा..



“श्री बाळा, अरे हे बघ तुझ्या आजी-आजोबांनी (‘ती’चे आई-बाबा) किती मोठ्ठं आणि महागडं गिफ्ट आणलं तुझ्यासाठी आणि तू तिकडे हा कसला कागदाचा चिटोरा पाहत बसला आहेस?’’

“अगं आई, कागदाचा चिटोरा नाही हा. नगर वाचनालयाची ‘आजीव सभासदत्वा’ची पावती आहे. आजोबांनी (‘ती’च्या सासऱ्यांनी) गिफ्ट केली आहे. आणि मागे एक संदेशदेखील आहे बघ. – ‘बाळा, आज तुझ्या वाढदिवसादिवशी अतुल्य आणि अमूल्य ज्ञानाचा खजाना तुला भेट स्वरुपात.. खूप मोठा हो, यशस्वी हो.’

— © शिल्पा परांडेकर

Author