नामवंत लेखक, नवोदित लेखक, ऑनलाईन लेखक यांच्या कथा, कविता, कादंबरी, प्रवासवर्णनासहित भरपूर साहित्य.
ही पहा टीव्हीवरील भारतातील सर्व विषयांवर PHD कलेली तज्ज्ञ मंडळी. यांच्याकडे प्रत्येक विषयाचे ज्ञान आहे...
आजच्या चर्चासत्राचा विषय आहे :
१."मानववंशाच्या उत्क्रांतीक्रमात होत जाणारे जनुकीय बदल"
आणि या विषयावर बोलायला तज्ज्ञ आहेत-
प्रताप आसबे
विश्वंभर चौधरी
प्रकाश बाळ
हेमंत देसाई
समर खडस
कुमार सप्तर्षी
...आणि आजचा विषय आहे
२. "अणुभट्टीत वापरल्या जाणाऱ्या बोरॉन ला भविष्यात पर्याय निर्माण होईल का"
आणि या विषयावर बोलायला तज्ज्ञ आहेत-
प्रताप आसबे
विश्वंभर चौधरी
प्रकाश बाळ
हेमंत देसाई
समर खडस
कुमार सप्तर्षी
...आणि आजचा विषय आहे
३. "फिजी बेटावरील आर्थिक समस्या आणि त्यावर गोंगझाऊ प्रांतातील चिनी अर्थतज्ज्ञांनी सुचवलेले उपाय"
आणि या विषयावर बोलायला तज्ज्ञ आहेत-
प्रताप आसबे
विश्वंभर चौधरी
प्रकाश बाळ
हेमंत देसाई
समर खडस
कुमार सप्तर्षी
...आणि आजचा विषय आहे -
४. "पचनसंस्थेतील प्रक्रियेत प्लीहा, यकृत, जठर आणि आतडे यांची भूमिका"
आणि या विषयावर बोलायला तज्ज्ञ आहेत
प्रताप आसबे
विश्वंभर चौधरी
प्रकाश बाळ
हेमंत देसाई
समर खडस
कुमार सप्तर्षी
...आणि आजचा विषय आहे -
५. "सांबार आणि रसम् मधला फरक आणि त्याचा मसाला बनविण्याच्या पद्धतीतील कर्नाटक, केरळ, तामिळनाडू व आंध्र प्रदेश यातील फरक"
आणि या विषयावर बोलायला तज्ज्ञ आहेत-
प्रताप आसबे
विश्वंभर चौधरी
प्रकाश बाळ
हेमंत देसाई
समर खडस
कुमार सप्तर्षी
आजच्या प्राईम टाईम चर्चेचा विषय आहे :
६. "एरंडावर पडणारी कीड व त्यावरील उपाय"...
आणि या विषयावर चर्चा करायला तज्ज्ञ आहेत...
प्रताप आसबे
विश्वंभर चौधरी
प्रकाश बाळ
हेमंत देसाई
समर खडस
कुमार सप्तर्षी !!!!!!
October 21, 2019
गणपती, दसरा- दिवाळी या सणासुदीच्या दिवसांनंतर पुण्यात संगीताचे वेगवेगळे महोत्सव एकानंतर एक चालु असतात. सवाईगंधर्व भीमसेन संगीत महोत्सव, स्वरगंधार आणि शेवटी वसंतोत्सव. सवाईच्या सीझन तिकीटसाठी आतुन फिल्डिंग लावल्यास लाईनमधे उभे राहण व निराशा टाळता येउ शकते, स्वर गंधारमधे स्टुडंट डिस्काउंट असते तर वसंतोत्सव चक्क फ्रीच असतो. तिन्ही कार्यक्रमांसाठी खचाखच गर्दी होत असते. झुंडीने होणार्या ह्या गर्दीत दर्दी आणि “बेदर्दी” दोन्ही गटांचे सभासद आढळतात.
July 8, 2019
सोनू, अगं उठ, आज दिवाळी, अशी उशीरा उठून कसं चालेल? आज लवकर उठायचं, पहाटे पहाटे अंगाला उटणं लावून गरम गरम पाण्यानं आंघोळ करायचा दिवस. हो, रोज जरी तू आंघोळ करत असलीस तरीही, आजची गोष्टच वेगळी. त्यात आज आपण लोकांना शुभेच्छा द्यायला जायचंय, हॅप्पी दिवाली असं म्हणायचंय. असं, काय करतेस, तुला मी शिवसेना किंवा मनसे चा अजेंडा उचलायला सांगितला नाहीये, आपण दिवाळीच्या शुभेच्छा, असं संकुचित मराठीत बोलायचं नाही, आपण धेडगुजरी समाजात रहात असल्याने, आपण हॅप्पी दिवाली असंच म्हणायचं!! चल आटप लवकर. आपण थोरा-मोठ्यांचे आशीर्वाद घ्यायला जाऊ या मुंबईला.
October 18, 2009
आपल्या सामर्थ्याची पुन्हा पुन्हा आठवण करून देणारा, खूप जवळचा तरीही तटस्थ, कटू असलं तरी सत्य तेच सांगणारा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ‘तो’ किंवा ‘ती’ च्या पलीकडचं नातं असणारा…निर्मळ आरसा! असा किमान एक तरी आरसा प्रत्येकाला हवाच!!
November 25, 2021
परमेश्वर कोणाला भरभरून प्रतिभा देईल सांगता येत नाही.काही जणांना आपल्याकडे प्रतिभेच लेणं आहे याची जाण असते तर काहीना आपल्याकडे प्रतिभा आहे याची जाणीवच नसते. सुदैवाने शांताबाईकडे ह्याची जाणीव फार लवकर झाली. कॉलेज मध्ये असतानाच शांताबाई कवितेकडे वळल्या.
August 3, 2020
डायरी तशी साधीच होती. पण जाडजूड होती. खादीच्या कापडाचं कव्हर होतं. वरवर सुस्थितीत असावी असं वाटत होतं. पण उघडल्यावर मात्र डायरीची पानं विस्कटल्यासारखी दिसत होती. डायरी चाळताना आणखी एक गोष्ट लक्षात आली. सुरुवातीच्या पानांवरचं अक्षर चांगलं होतं. काहीसं मोडी लिपीच्या वळणावर गेलेलं आणि शेवटी शेवट मात्र अक्षरात बदल होत गेलेला दिसत होता.
June 21, 2021
नेहमी चर्चा होत असतात की बाहेर सहलीला गेल्यानंतर आलेले भयानक अनुभव. आता या अनुभवांसाठी भुतंखेतं काहीतरी विचित्र घटना असलं पाहिजे असं काही नाही. भयानक अनुभव म्हणजे काय की जो तुमची झोप उडवून टाकतो.
September 1, 2022
भारतीय गुन्हेगारी जगतातील तो पहिला ‘लाईव्ह एनकाऊंटर’ होता. मनोहर अर्जुन सुर्वे ऊर्फ मन्या सुर्वे हा मुंबईतील गुन्हेगारी विश्वातील पहिला हिंदू-भंडारी डॉन होता. मन्याची हत्या हा सर्वात पहिला एनकाऊंटर असल्याची नोंद करण्यात आली आहे.
October 20, 2017
गेल्या तीन वर्षापासून माझा संपादकीय भूमिकेतून वाचकांशी आणि लेखकांशी थेट संपर्क येत आहे. मी वाचकांच्या रुची बद्दल काही गोष्टी सांगू इच्छितो पण त्या माझ्या व्यक्तीगत अनूभवातून सांगत आहे हे येथे लक्षात घ्यावे.
‘प्रेम’ या विषयावरील साहित्य आणि त्या भोवती गुंफलेल्या साहित्य वाचण्यात मराठी वाचकांना रुची अधिक दिसते. त्यानंतर आरोग्याशी निगडीत साहित्य वाचण्यात वाचकांना रुची दिसते कारण आता आपल्या आरोग्या बाबतची जागरूकता लोकांच्या मनात वाढू लागली आहे. त्यानंतर चित्रपट, नाटक , क्रिकेट, आणि सध्याच्या दैनदिन मालिका यांच्या विषयी वाचण्यात वाचकांना रुची दिसते. त्यानंतर उरलेल्या वाचकांना राजकारण वगैरे विषयांवर वाचण्यात रुची दिसते. आर्थिक, सामाजिक वगैरे विषयांवरील साहित्य वाचण्यात रूची असणारा एक वेगळाच गट आहे.
संपादकीय भूमिकेतून मला आणखी एक गोष्ट लक्षात आली ती म्ह्णजे आज लोकांना भरमसाठ वाचायला नाही आवडत. लोकांची आज थोडक्यात बरच काही सांगणारे आणि शिकवून जाणारे साहित्य वाचण्यात अधिक रुची दिसते. वेळेचा अभाव हे एक कारण असेलही कदाचित त्या मागे. मराठी वाचकांना आजकाल शंभर लेखकांचे शंभर विषयांवरील शंभर लेख वाचायला आवडतात पण एकाच लेखकाचे एकाच विषयावरील शंभर पानांचे विचार वाचायला काही मोजक्याच वाचकांना आवडतात त्यामुळेच तर मराठी साहित्यात मराठी दिवाळी अंकाचे महत्व दिवसेन दिवस वाढत आहे.
लघूकथा लोकांना वाचायला आवडत नाहीत अशी ओरड होते पण तस नाही आज वाचकांची रुची डोळ्यासमोर ठेऊन कथा लिहल्या जात नाही हेच कारण असावं कदाचित. बोध देणारे साहित्य वाचकांना वाचायला आवडते पण ते एका मर्यादेपर्यत. त्या साहित्याकडे कोणीही वाचक मनोरंजन या दृष्टीने पाहत नाही. आजच्या वाचकांची मनोरंजन करणारे साहित्य वाचण्याकडे रुची अधिक दिसते. ती रुची लक्षात घेऊनच बोध दाखवणार्या साहित्याची निर्मिती भविष्यात करावी लागेल.
लहान मुलांची वाचनाची रुची लक्षात घेता लहान मुलांनीच् लिहले साहित्य येत्या काळात लहान मुलांना वाचायला आवडेल असं मला व्यक्तीशः वाटत.
वाचकांची जशी रुची असते तशी रुची काही बाबतीत काही संपादकांनाही असते. त्यांना वाचकांना बोध देणारे, त्यांच्या फायद्याचे, त्यांच्या हिताचे ,एकूणच समाजाच्या हिताचे आणि देशाच्या हिताचे रक्षण करणारे साहित्याला प्रोत्साहन देण्याकडे त्यांचा कल असतो. त्यांच्या हया रुचीचा वाचकांनीही सन्मान करायलाच हवा !
भविष्यात वाचकांची रुची सांभाळत – बोधपर साहित्य निर्माण करणारे संपादकच पुढे दिसतील असं चित्र आज तरी स्पष्ट दिसतय.
-- निलेश बामणे
February 10, 2014
जिमी वेल्स याचा जन्म ७ ऑगस्ट १९६६ रोजी वेल्स ह्यांचा जन्म अलाबामा राज्यातील हंट्सव्हिल शहरात मध्यरात्री झाला . म्हणून त्यांची जन्मतारीख त्यांच्या जन्मदाखल्यावर 8 ऑगस्ट ही आहे. लहानपणी त्याचे वाचन खूप होते , तो अत्यंत काळजीपूर्वक वाचन करत असे. त्याचे वडील एका ग्रोसरीच्या दुकानांमध्ये मॅनेजर होते तर त्याची आई एक खाजगी शाळा चालवत होती
August 7, 2023
Copyright © 2025 | Marathisrushti