(User Level: User is not logged in.)

साहित्य - ललित

नामवंत लेखक, नवोदित लेखक, ऑनलाईन लेखक यांच्या कथा, कविता, कादंबरी, प्रवासवर्णनासहित भरपूर साहित्य.

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • ज्ञानमूर्ती कै गोविंद तळवलकर – जीवनपट – भाग १

    सिद्धहस्त, अभिजात लेखक, प्रतिभावान, संशोधक, इतिहासकार, उदार, मतवादी आणि द्रष्टा संपादक म्हणून सर्व परिचित, ‘महाराष्ट्र टाईम्स’ चे भूतपूर्व प्रसिद्ध संपादक श्री. गोविंदराव तळवळकर. तळवळकरांच्या विचारधनावर महाराष्ट्रातील तीन पिढ्यांचे पोषण झाले आहे. असं ‘मराठी वाङ्मय कोशात’ म्हटलं आहे आणि म्हणूनच टिळकयुगानंतर ‘ तळवळकर युग’ हे पत्रकारितेत महत्वाचे समजले जाते.

      April 28, 2023


  • नात्यांचा गेट – टू – गेदर

    आपल्या समाजव्यवस्थेत कुटुंब एक संस्था आहे. बहुतांश कुटुंबांचा प्रवास हा एकत्र कुटुंब पद्धतीपासून एकेरी कुटुंब पद्धतीकडे झालेला दिसून येतो. परंतु याचा अर्थ असा नाही कि वेगवेगळ्या नात्यांचे महत्व व त्यांचा आपल्या जीवनावरील प्रभाव नाहीसा झाला, नक्कीच त्यामध्ये कमी-अधिक बदल झाला असेल तरी त्याचे अस्तित्व अजूनही कायम आहे. आजच्या बदलत्या समाजव्यवस्थेत नात्यांच्या वेगवेगळ्या रंगांचा अनुभव घेयचाच असल्यास एखादा मोठा कौटुंबिक सोहळा किंवा कार्यक्रम सर्वात उत्तम जागा आहे. अश्या सोहळ्यांमध्ये आपण पूर्णपणे जागरूक अवस्थेत व विनोदबुद्धी दक्ष ठेवल्यास मानवी स्वभावाचे अनेक नाव-नवीन प्रकार अनुभवायास मिळतात.

    "तत्वज्ञानी नातेवाईक " या प्रकारातील लोक नेहमीच दुसर्यांना स्वतःचा कधी न मागितलेला सल्ला देण्यास तत्पर असतात . कोणत्याही गोष्टीत व कामात बारीक-बारीक चुका दाखवून आपले उच्च विचार मांडण्यासाठी त्यांना प्रत्येक वेळ योग्यच वाटत असते, थोडक्यात सांगायचे म्हणजे या लोकांना वेळेचे भान नसते. यांची देहबोली देखील स्वभावाला पूरकच असते. विषय कोणताही असो राजकारण, अर्थकारण, देश, विदेश, विज्ञान इ.. प्रत्येक विषयात आपला सखोल अभ्यास असल्याचा गोड गैरसमज बाळगून आत्मविश्वास कोणत्याही परिस्थितीत उच्चतम शिखरावर ठेवणे हे यांचे वैशिष्ट्य, छंद म्हणाल तर युवकांना जबरदस्तीचे मार्गदर्शन करणे. अश्या लोकांना ऐकण्याची मज्जा वेगळीच असते परंतु एक ठराविक अंतर ठेवुनच.

    "जावई " नावाचा प्राणी, हा प्राणी दोन पायांचाच असतो, अगदी सर्वसाधारण माणसासारखाच दिसतो परंतु तरीही हा प्राणी पृथ्वी या ग्रहावरचा नसून बाहेरून आला आहे असा भास झाल्यास आश्चर्य वाटण्याची गरज नाही. नातेवाईकांमध्ये हा प्रकार अतिशय मौल्यवान, नाजूक व जतन करून ठेवण्याचा असतो. कोणत्याही कौटुंबिक कार्यक्रमात या प्राण्याच्या आजूबाजूला नेहमीच दोन-चार डोकी निव्वळ मनोरंजनासाठी व तोंडातून पडलेला शब्द झेलण्यासाठीच तत्पर असतात. यांचे झेलण्याचे अप्रतिम कौश्यल्य अर्थातच घरातील वरिष्ठांच्या मार्गदर्शनामुळेच लाभते. जावयाच्या प्रत्येक गोष्टीत होकार पुरवणे, उगाचच चेहऱ्यावर स्मित हास्य ठेवणे, सतत आग्रह करणे अशी यांची काही ठराविक वैशिष्ठे यांमध्ये अढळतात. या प्राण्यासाठी एवढे करूनही नाराजी व्यक्त करणारी प्रजाती यात सापडते याचा खेद वाटतो.

    थोडंसं हटके बघितले तर पारिवारिक कार्यक्रमात आत अजून एक दुसरा कार्यक्रम शांतपणे सुरु असतो, तो म्हणजे "मुली-मुले दाखवण्याचा अघोषित कार्यक्रम" ज्या पालकांना आपल्या पाल्यांचा लवकरच बार उडवण्यानचा विचार असतो त्यांच्यासाठी तर हि सुवर्ण संधीच असते. यासाठी पद्धतशीरपणे पेहरावापासून ते चालण्या-बोलण्यापर्यंत नियोजन व रंगीत तालीम करून घेतली जाते, त्यासाठी पालकांकडून विशेष महत्वाच्या सूचना व मार्गदर्शन पुरवले जाते. बिचाऱ्या मुलं-मुलींची इच्छा नसली तरी जबरदस्तीने नटून-थटून, हसू येत नसेल तरी चेहऱ्यावर एक हलकासा हसरा भाव ठेवून बुजगावण्यासारखे मिरवावे लागते. काहींची तशी हौसदेखील असते, अशी मुले कार्यक्रमाचा आनंद लुटतात परंतु इच्छेविरुद्ध आलेल्यांची मनाची घुसमट समजण्याची पालकांनी तसदी घेणे थोडेसे मला तरी गरजेचे वाटते.

    एक खास वर्ग आपल्याला कोपऱ्या-कोपऱ्याने मिरवतांना, कुठेतरी लोकांपासून लांब शांत बसलेला आणि कधी येथून पाय काढता येईल याची संधी शोधणारा पाहावयास मिळतो. हा असतो "स्पर्धा परीक्षांची तयारी करणारा वर्ग" डोक्यात एका बाजूला अभ्यास व परीक्षेचा सतत घोळणारा विचार व दुसऱ्या बाजूला नातेवाईकांचे येणारे तीक्ष्ण बाणासारखे प्रश्न यामध्ये हा पिसलेला असतो. लोकांची नजर चुकवून त्यांच्यापासून लांब राहणे हा या मुलांचा स्वभाव नसतो तर मजबुरी असते कारण यश-अपयश हा जरी शेवटच्या दिवसाचा निर्णय असला तरी तितपर्यंतचा प्रवास मोठा आणि कठीण असतो, तरी याचा काहीही विचार न करता काही लोक कळत-नकळत मुलांचा आत्मविश्वास कमी होईल असे बोलून त्यांचा हा प्रवास अजून कठीण बनवतात.

    आपण कधी-कधी सहजपणे म्हणतो कि काही लोक साखरेपेक्षाही गोड असतात, याचा संबंध त्यांच्या स्वभावाशी असतो. परंतु काही लोक फक्त तोंडावर बोलण्यापुरतेच गोड असतात ते नेहमीच तोंडात साखर ठेऊन बोलतात कि काय असे वाटते. असले नातेवाईक कार्यक्रमात फक्त स्वतःचे चाहते वाढवण्याच्या हेतूने मिरवत असतात. काहीही असो समोरून आपला गोडपण सोडायचा नाही असा पक्का निश्चय असतो. परंतु पाठीमागे दुसयांच्या नावाचे खडे फोडण्यात देखी यांचाच अव्वल क्रमांक असतो.

    एकीकडे रुसलेले चेहरे तर दुसरीकडे प्रफुल्लित हास्य, कुणीकडे नव्या नात्यांची सुरवात तर कुणीकडे जुन्या नात्यांची सावरासावर, एकीकडे भावनाशून्य मन तर दुसरीकडे भावनिक झालेले मन, एकीकडे नवीन वादांची सुरवात तर दुसरीकडे जुन्या वादांवर पांघरून असा हा नात्यांचा गेट-टु -गेदर रंगीबेरंगी व्यक्तिरेखांनी रेखलेला व असंख्य भावनांनी बहरलेला.

    -- विवेक विजय रणदिवे

      September 1, 2019


  • अनवट-सीता रामम !

    १९६५ आणि १९८५ साली मानव्य आणि प्रियकर-प्रेयसी यांच्यातील प्रेम किती जिवंत,हळुवार, रसरशीत, नाजूक आणि भिडून जाणारं होतं याचा प्रत्यय काल “सीता रामम ” बघताना आला. मूळ भाषा तेलगू असली (with English subtitles) तरी दर्जेदार कलाकृती कायम भाषेच्या अडसरांना ओलांडून “ये हृदयीचे ते हृदयी ” पोहोचविते याचा हा दुसरा अनुभव.

      September 27, 2022


  • “क” पासून Amazing Marathi

    प्रत्येक शब्द ‘क’ पासून सुरु करुन येवढा मोठा परिच्छेद लिहिला आहे.

    जगातल्या कोणत्या इतर भाषेत अशी ताकद असेल... ? मराठी भाषेची ताकद खालील लेखात पहा...

    केव्हातरी कोल्हापूरच्या कर्तव्यतत्पर केळकर काकांबद्दल काकांच्याच कचेरीतल्या केशवने काकूंसमोर कागाळी केली. काकू कावल्या. काकूंनी कपाटातून कात्री काढून काकांच्या कामाचे कोरे करकरीत कागद कचाकचा कापले. काकांचे कापलेले कागद केशवानेच कचऱ्यात कोंबून काकांच्याच किचनमध्ये ‘कजरारे-कजरारे’ कवितेवर कोळीनृत्य केले.

    काकूंनी कागद कापल्याचे कळताच काका कळवळले. काकांनीही कमालच केली. काकांनी काकूंचे काळे कुळकुळीत केस कात्रीने कराकरा कापले. काका काय करताहेत काकूंना कळेनाच! काकूंनी कर्कश्श किंचाळून कलकलाट केला. काका काकूंची कसली काळजी करणार! काकांना कामाची काळजी. काकूंच्या कर्णकर्कश्श कोलाहलातही, केशवाने कचऱ्यात कोंबलेले कागदाचे कपटेन कपटे काढून काकांनी कचेरीकडे कूच केले. कचेरीच्या कामासाठी काकांनी कंबर कसली. कागदाच्या कापलेल्या कपट्यांचे काकांनी ‘कोलाज’ करून कामकाज कार्यान्वयित केले. केशवाचे कारनामे कळताच काकांनी काट्यानेच काटा काढला. काकांनी केशवालाच कोलाजचे काम करण्यासाठी कुथवला. कपटी केशवने काकांवरच कामचुकारपणाचा कांगावा करून कामाचा कंटाळा केला. काकांनी कठोरपणे केशवाला कामावरून काढले. कासावीस काकूंनी कालच्या कडू कारल्याची कोशिंबीर कटाप करून काकांसाठी कच्च्या कैरीचे कोय काढून कालवण केले. काकांनीही करुणेने काकूंचे कृत्रिम केस कुरवाळले. केळकरांच्या कोकणस्थ कुटुंबात कर्तव्यापुढे कर्मकांड केव्हाही कनिष्ठच. कर्तव्यदक्ष काकांच्या कार्यकाळात कचेरीने कर्मरूपी किल्ल्याचे कीर्तिशिखर काबीज केले. कामावरून काढलेल्या केशवाने कितीतरी काबाडकष्ट काढल्यावर कोल्हापूरच्या कॉम्रेड कणेकर कॉलेजने केशवाला कबड्डीचा कर्णधार केला. क्रिडापटू केशवाने कबड्डीतच करियर केले. कालच्या कागाळीखोर केशवाला काळानेच केला ‘कबड्डीतल्या किचकट कसरतींचा कर्ता’!

    कथासार

    क्रियेविण करिता कथन, किंवा कोरडेची कीर्तन,
    कितीक किताब कष्टाविण, काय कामाचे... !!

    खरच अभिमान वाटतो मला मी मराठी असल्याचा...

      June 15, 2017


  • चीन इन मिन तीन

    दि. 16 जून ला चिनी सैनिक dolkamm पठारावर भूतान आणि भारतीय सीमेच्या बाजूने आक्रमण करीत असलेले व त्यांना आपले सैन्य हातानेच थांबवत असल्याचे videos मीडिया वर सध्या झळकताहेत. दोन देशातील मोठे नेते गळाभेट घेत असताना चिनी राजकर्त्यांना हे असले विश्वसघातकी वागणे कसे सुचते असा प्रश्न माझ्यासारख्या अनेक सामान्यांना पडतो? आंतरराष्ट्रीय राजकारणाबद्दल सामान्य लोकांना त्यातून भारतातील तर खरेच फार काही माहिती नसते त्यामुळे आपण बऱ्याच वेळा अज्ञानात सुख मानतो आणि सुखी राहतो.चीन च्या अश्या वागण्याला काही महत्वाची कारणे आहेत त्यातून या प्रश्नाचे उत्तर मिळते. एक सध्या चीन निर्माण करत असलेल्या पाकीस्थान च्या बंदराला जोडणारा इकॉनॉमिक कॉरिडॉर ला बलुचिस्थानात होणारा प्रचंड विरोध यामुळे चीन चे युरोप शी व इतर जगाशी जोडले जाण्याचे स्वप्न भंग पावण्याची शक्यता आहे. जवळच्याच सिकीयांग प्रांतात चीन ला मुस्लिम आंतकवादाची डोकेदुखी आहेच त्यात बलुचिस्थान मधील विरोधाने त्याच्या डोक्याचा ताप वाढला आहे. हे सगळे भारत घडवत असावा असाही एक संशय चीन पाकिस्थान ला आहे. त्याला कारणही तसेच आहे कारण बलुचिस्थानिय नेत्यांनी भारताकडे मदत मागितली आहेच. आंतराष्ट्रीय राजकारणात चीन एकटा पडतो आहे फक्त पाकिस्थान व नॉर्थ कोरिया हे दोन रोगीस्ट विकृत आंतकवादाच्या उन्मादाने पछाडलेले इन मिन तीन त्यात चिनही आलाच राष्ट्रे सोडली तर आता चीन ला म्हणावा असा मोठा दोस्त कुणीही नाही. सध्या चीन देखील आर्थिक मंदीतून जातो आहे आणि आपण जर चिनी वस्तुवरील आपले अज्ञानी भाबडे प्रेम कमी केले तर चिनी सैन्याला रोजच्या खर्चाची मिळवणी करणेही कठीण जाणार आहे. याबाबत जपान चे एक उदाहरण डोळ्यासामोर ठेवण्यास हरकत नाही. दुसऱ्या महायुद्धानंतर जपान वर बरेच प्रतिबंध लादल्या गेले होते अमेरिकेने तर आमचीच फळे विकत असाही बडगा उगारला त्यावेळी नाईलाज म्हणून जपानी सरकारला अमेरिकन संत्री जी सर्वार्थाने उत्कृष्ट गुणवत्तापूर्ण होती ती आयात करावी लागली. स्वाभिमानी जपानी जनतेने मात्र ती फळे विकत घेण्याचे नाकारले आणि स्वतःची कडवट असलेली कमी गुणवत्तेची संत्री मात्र स्वतःच्या मातृभूमीच्या प्रेमापोटी आनंदाने खाल्लीत परिणामी अमेरिकन संत्री खराब होऊन फेकून द्यावी लागलीत आणि अमेरिकेला परत हा दबाव निर्माण करता आला नाही. यातुन आपण बरेच शिकण्यासारखे आहे. पंडित नेहरूंच्या अति आसक्तीपूर्ण,बावळट स्वयंप्रतिमेच्या जागतिक नेता होण्याच्या अनिवार विकृत प्रेमाने 1962 च्या युद्धात आपण बरेच काही गमावले पण आता तशी स्थिती नाही. आपण चीन शी तुलनात्मक दृष्ट्या त्यावेळ पेक्षा सामरिक तंत्रज्ञान दृष्ट्या बरेच प्रगत आहोत पण मूलभूत सोयी सुविधांपेक्षा बरेच मागे. मी स्वतः 2006 ला प्रत्यक्ष बघितलेला चीन हा flyover, रस्ते, रेल्वे,sealink bridges यामध्ये त्यावेळी आपल्यापेक्षा किमान 25-30 वर्षे पुढे होता हि प्रगती त्यांनी आता तिबेट ला आपल्याला लागून असलेल्या सीमे पर्यंत,अरुणचलच्या,सिक्कीमच्या सीमे जवळ अगदी योडांग पर्यन्त आणून ठेवली आहे, त्यामुळे त्यांना सैन्याची,सामुग्रीची हालचाल करणे अगदी सहज,सोपे झाले आहे. आपल्या मागील नालायक सरकारने याचा कधी विचारच केलेला नाहीये. सुदैवाने आपले सध्याचे सरकार जागरूक दिसतेय आणि आपली भाषा ही कणखर aggressive आहे. काल परवाच्या बातमी मध्ये आपले जुने दोन बंकर चिनी सैन्याने उध्वस्त केल्याचे आवर्जून सांगितले जात असतानाच अरुणाचल मध्ये आपले सैन्य 3 km पुढे सरकल्याचे व त्यांचे सहा बंकर आपण उध्वस्त केल्याचे मात्र मोघम ठेवले जात होते. सरकारने असेच असायला हवे बोलणे कमी काम जास्त. त्याबरोबरच आपणही जपानी जनतेचा गुण घ्यावयास हवा फुकट बाता कमी आणि गुणवत्तापूर्ण कार्य जास्त. Whtasapp वरून चिनी मालावर बहिष्कार टाकण्याच्या गप्पा या बाष्कळ,पांचट,कृतिशून्य नकोत तर त्या राष्ट्रप्रेमाने कृतीपूर्ण, परिणाम दिसणाऱ्या असाव्यात हि अपेक्षा आहे!यात अज्ञान,बावळटपणा,चलता है अश्या गोष्टी कटाक्षाने टाळल्या पाहिजेत. कारण मागच्या वर्षी नथुला पास ला गेलो असताना चीन तर्फ़े आपल्या कडे येणाऱ्या व आपल्या कडून त्यांच्या कडे असणाऱ्या मालाचे अति व्यस्त प्रमाण मी जेव्हा याबद्दल मुद्दाम आपल्या सैनिकाकडून माहिती घेतली तेंव्हा कळले. हे प्रमाण तुम्ही ऐकलं तर चकित व्हाल आपल्याकडून दिवसाला 8-9 ट्रक जातात तेव्हा त्यांच्याकडून 138-139 ट्रक आलेले असतात म्हणजे आपण 6-7 % सुद्धा माल पाठवीत नाही पण त्यांचा 17-18 पट माल आपल्याकडे शिरलेला असतो आहे ना डोळ्यात अंजन घालून घेण्यासारखी परिस्थिती? आणखी एक करा स्वस्त म्हणून दार्जिलिंग ,सिक्कीम येथे स्वस्त म्हणून चिनी मालाची खरेदी चुकूनही करू नका आपल्या कडे बनलेल्या मालाची मागणी करून तपासूनच तो खरेदी करा. तेव्हा खरी राष्ट्रभक्ती असेल तर एक सामान्य माणूस म्हणून आपण आपल्यापुरते व आपल्या ओळखीत सर्वांनाच चीन मधील मालाच वापर करण्यास थांबवूया! नक्की ना मित्रानो?

    श्रीराम जोशी
    दि 2 जूलै 2017

      July 17, 2017


  • टपाल पेटी…

    तुमच्या आमच्या साऱ्यांच्या जीवनात कितीतरी महत्वाची भूमिका बजावणारी ही टपालपेटी आता फारशी दिसत नाही. पूर्वी ती अशीच कुठेतरी शहराच्या मध्यवर्ती चौकात, झाडाच्या खोडाला, गावात कुणाच्या तरी दारात तरी लावलेली असायची. ठराविक वेळेला ती पेटी उघडण्यासाठी टपाल खात्याचा कर्मचारी यायचा आणि गाठोड भरून पत्र, पाकिट घेऊन जायचा.

      May 24, 2020


  • जाणिव आणि भान

    खूप दिवसांनी असे सगळे मास्क लावून असलेले लोकांना पाहून वाटले की अवघा मास्क एकचि झाला. आणि तिथे आपली आपल्यासाठी काम करणारे सेवेकरी मात्र डोक्यापासून पायापर्यंत संरक्षण कवच घालून अहोरात्र फक्त आणि फक्त डोळे उघडे ठेवून काम करणारे बहुतेक सर्व तरुण पिढी अशा वेळी जाणिव व भान ठेवून वागणे बरोबर वाटत नाही.

      January 13, 2022


  • ओळख नर्मदेची – भाग सहा

    एकुण, ओंकारेश्वर ते भालोद पर्यंतचा भाग पौराणीक इतिहासाच्या दृष्टिनी संपन्न आहे. येथील आध्यात्मिक गांभीर्य बहुदा येथील नर्मदेच्या गांभिर्यामुळेच असावे. तेच गांभीर्य पैलतिरावर पण गरूडेश्वर, नेमावर, नारेश्वर ह्या भागांत पण प्रकर्षांने जाणवते. जप, तप, साधना करण्यासाठीची शांतता, नर्मदेचे अवखळ, वेगवान, नटखट रूप असताना आढळत नाही. जसजशी ती शांत, विस्तिर्ण होत जाते, तसतसे तिच्या सानिध्यातले आध्यत्मिक महत्व वाढत जाते. असे पण असु शकते की प्रत्येक स्थानाची एक “स्थान देवता“, वास्तु देवता असते तसे त्यांच स्थानांचे वास्तुच्या दृष्टिने महत्व असणार.

      October 9, 2020


  • कालातीत

    टाइम मशीनची थिअरी तोवर सिद्ध होणार नाही किंवा आम्ही मान्य करणार नाही, जोवर मागील किंवा पुढील काळात गेलेली व्यक्ती आजच्या काळात परत येऊन तिचे अनुभव पुराव्यानिशी सादर करीत नाही.” टाळ्यांच्या कडकडाटात डॉ. देवाशीष रॉय आपले भाषण संपवून प्रेक्षागृहातील श्रोत्यांवर अभिमानाने नजर फिरवीत आसनस्थ झाले.

      January 27, 2024


  • शुभ-मंगल-सावधान (सुमंत उवाच – ११२)

    सुमंत जयंत परचुरे. 

    बोहल्यावर चढलेल्या 12 वर्षाच्या नारायणास शुभ मंगल सावधान हे शब्द ऐकल्यावर प्रसंगावधान राखावे हे लक्षात आले म्हणून पुढे समर्थ घडले.

      January 1, 2022