(User Level: User is not logged in.)

साहित्य - ललित

नामवंत लेखक, नवोदित लेखक, ऑनलाईन लेखक यांच्या कथा, कविता, कादंबरी, प्रवासवर्णनासहित भरपूर साहित्य.

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • नैषधीयचरितम्

    महाकवी श्रीहर्ष विरचित नैषधीयचरितम् हे अभिजात संस्कृत पंचमहाकाव्यांपैकी एक महाकाव्य. संस्कृत पंचमहाकाव्यांत नैषधीयचरित्र हे काळाचा विचार करता नवीन आणि विस्ताराने सगळ्यांत विशाल. नैषधचरित, नैषधकाव्य व नैषध, निषधराजचरित अशा नावांनीही हे महाकाव्य ओळखले जाते.

      June 11, 2026


  • पालकांसाठी थोडं महत्वाचं

    एकसारख्या दिसणाऱ्या दोन घरांमध्ये दोन वेगवेगळ्या व्यक्ती रहात होत्या. पहिल्या घरामध्ये एक सेवानिवृत्त आजोबा आणि दुसऱ्या घरामध्ये गलेलठ्ठ पगाराचा आय. टी. इंजिनिअर.
    घराच्या कुंपणासाठी एकाच प्रकारची शोभेची झाडं दोघांनी लावली होती. इंजिनिअर साहेब आपल्या झाडांना भरपूर पाणी आणि खत देत असे. आजोबा मात्र फारचं थोडं पाणी आणि खत देत असत. इंजिनिअर साहेबांची झाडं एकदम भरगच्च आणि घनदाट वाढली होती, आणि आजोबांची झाडं टुमदार, छान अंग धरून होती.

    एका रात्री अचानक जोराचा वारा आणि पाऊस आला. दुसऱ्या दिवशी सकाळी नेमकं काय घडलाय हे पाहायला दोघेही घराबाहेर आले. समोरच चित्र पाहून इंजिनिअर साहेबांना धक्काच बसला. कारण त्यांची सर्व झाडे अगदी मुळापासून उखडून पडली होती आणि आजोबांची मात्र छान शाबूत होती.

    इंजिनिअर साहेब विचारात पडले, भरपूर पाणी आणि मुबलक खत देऊनसुद्धा एका साध्या वाऱ्यात आणि पावसात माझ्या झाडांची अशी दशा आणि गरजेपेक्षा कमी गोष्टी मिळणाऱ्या आजोबांची झाडे जशीच्या तशी. शेवटी न राहून इंजिनिअर साहेबांनी आजोबांना याचे कारण विचारले.त्या निवृत्त आजोबांचे उत्तर म्हणजे आजच्या सर्व पालकांसाठी खूप मोठी शिकवण आहे.

    आजोबा म्हणाले "इंजिनिअरने झाडांना लागणाऱ्या सर्व गोष्टी पुरविल्या पण अति प्रमाणात आणि त्यामुळेच झाडांची मुळे पोषणाच्या शोधार्थ खोलवर गेली नाहीत. तेच मी माझ्या झाडांना गराजेपुरतेच किंवा थोडे कमी खत आणि पाणी दिले, त्यामुळेच त्यांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी झाडांची मुळे खोलवर गेली. इंजिनिअर साहेबांच्या झाडाची मुळे खोलवर गेली नसल्याने थोड्याश्या वाऱ्याला आणि पावसाला बळी पडले. माझ्या झाडांची मुळे खोलवर गेल्याने त्यांना मजबुती मिळाली आणि वाऱ्याला आणि पावसाला न जुमानता माझी झाड मस्त उभी आहेत."

    आपल्या मुलांच्या बाबतीतही असेच असते.

      June 15, 2017


  • टेलिमार्केटिंग कॉल कसे एन्जॉय कराल ?…

    सर , अमक्या बँकेतून बोलतोय… लोन हवंय का ?’ असं विचारणाऱ्या किंवा प्रॉडक्ट्स खपवू इच्छिणाऱ्या टेलिमार्केटर्सच्या फोन कॉल्सनी त्रस्त झालायत ? मग थोडं डेअरिंग करून आम्ही सांगतो ते उपाय करून पाहा… हे कॉल्स एंजॉय करू लागाल , ही गॅरंटी

      January 21, 2016


  • मराठीतील दादामुनी

    १९७१ साली मी नटराज टाॅकीजला गजानन जहागिरदार दिग्दर्शित, 'दोन्ही घरचा पाहुणा' हा कृष्णधवल चित्रपट पाहिला. त्यामध्ये श्रीकांत मोघे व आशा पोतदार, प्रमुख भूमिकेत होते व एका सॅनिटरी इन्स्पेक्टरच्या भूमिकेत एक नवीन चेहरा पहिल्यांदाच दिसला. तेव्हाच मला खात्री पटली होती की, हा 'लंबी रेस का घोडा' आहे. आणि घडलंही तसंच. आज त्या चित्रपटाला ५१ वर्षे पूर्ण झाली. तरीही, याची घोडदौड सुरूच आहे.

    ४ जून १९४७ साली मुंबईत या कलाकाराचा जन्म झाला. त्याची मोठी बहीण, ही अशोक कुमार उर्फ दादामुनींची जबरदस्त फॅन होती. तिने आग्रह धरला की, माझ्या भावाचं नाव 'अशोक'च ठेवायचं. हाच तो, आज अमृतमहोत्सवी वर्षात पदार्पण करणारा, बहुरंगी व बहुढंगी भूमिका, लीलया साकारणारा. अशोक सराफ!

    शिक्षण पूर्ण झाल्यानंतर वडिलांच्या इच्छेखातर, स्टेट बॅंक आॅफ इंडियामध्ये नोकरी करणाऱ्या अशोकला नाटकात काम करण्याचं वेड होतं. 'हमीदाबाईची कोठी' नाटकात, त्यांची नाना पाटेकरशी घनिष्ठ मैत्री झाली. त्यावेळी अशोकला २५० व नानाला ५० रुपये नाईट होती.

    'दोन्ही घरचा पाहुणा' नंतर दादा कोंडके यांच्या 'पांडू हवालदार' पासून, अशोक सराफ यांचे दिवस पालटले. त्यातील दादांचा बेरकी मित्र, महादू हवालदारची भूमिका तुफान गाजली. पुढचा 'राम राम गंगाराम' चित्रपटातील 'म्हमद्या खाटीक'ला कुणीतरी विसरणं शक्य आहे का? 'तुमचं आमचं जमलं' या चित्रपटानंतर अशोक, पुन्हा कधीही दादांबरोबर दिसले नाहीत.

    दरम्यान अशोक यांनी अनेक मराठी चित्रपट केले. महेश कोठारे यांच्या 'धुमधडाका' पासून लक्ष्मीकांत बेर्डेशी त्यांची जोडी जमली. दोघांनी एकत्र मिळून वीस वर्षे प्रेक्षकांचं मनमुराद मनोरंजन केलं.

    सचिन पिळगांवकर सोबत अशोक यांनी विविध भूमिका साकारल्या. 'आयत्या घरात घरोबा' या चित्रपटातील अशोक यांची भूमिका, अविस्मरणीय अशीच आहे. 'अशी ही बनवाबनवी' चित्रपटातील धनंजय मानेनं धम्माल केली आहे. 'नवरा माझा नवसाचा' मध्ये अशोक, कंडक्टर झालेले आहेत.

    अशोक यांनी सर्व चित्रपटात हिरोचीच भूमिका साकारली आहे असं नाहीये. 'कळत नकळत' मध्ये छोट्या भाच्यांच्या, मामाची भूमिका करताना स्वतःच्या आवाजात एक बालगीतही म्हटलंय. 'चौकट राजा' मध्ये नंदूला समजून घेणाऱ्या अशोक यांच्या, गणाच्या भूमिकेनं प्रेक्षकांच्या डोळ्यांत पाणी येतं.

    अशोक आणि रंजना, ही जोडी 'मेड फाॅर इचआदर' अशीच होती. त्यांची 'केमिस्ट्री' पडद्यावर पहायला, धमाल मजा यायची. 'बिनकामाचा नवरा', 'सासू वरचढ जावई', 'खिचडी', 'गोंधळात गोंधळ', 'गुपचुप गुपचुप' हे चित्रपट कधीही पहा, तुम्ही 'ताणतणाव' विसरुन जाल, हे नक्की.

    अशोक यांनी खलनायकही रंगवले आहेत. 'अरे संसार संसार' मधील साकारलेला, वासनांध सावकार पाहून 'मदर इंडिया' मधील कन्हैयालाल आठवतो. 'अनपेक्षित' नावाचा चित्रपटही तसाच वेगळा आहे.

    दूरदर्शनच्या 'हम पाॅंच' मालिकेतील, शोभा आनंदचे पती झालेले अशोक, अनेक वर्षे हसवत होते. हिंदी चित्रपटात देखील अशोक यांनी लक्षवेधी भूमिका केलेल्या आहेत. 'दामाद' पासून त्यांनी हिंदीत पाय रोवले. 'मेरी बीवी की शादी', 'करण अर्जुन', 'खुबसूरत', 'कोयला', 'येस बाॅस, 'सिंघम' अशा अनेक हिंदी चित्रपटांतून त्यांनी अजोड भूमिका केलेल्या आहेत. 'करण अर्जुन' मधील 'राणाऽ तो, अब गयोऽ' हे पालुपद, त्यांच्या खास शैलीत ऐकायला धमाल वाटते. 'सिंघम' मधील, त्यांचा मराठी हवालदार लक्षात राहतो.

    अलीकडे अशोकजी निर्मिती सावंत बरोबर 'व्हॅक्युम क्लीनर' या धमाल विनोदी नाटकातून भेटत आहेत. आजचा शिवाजी मंदिर मधील प्रयोग, प्रेक्षकांसाठी विनामूल्य ठेवलेला होता.

    त्यांच्या चित्रपटांची पेपर पब्लिसिटी केल्यामुळे, प्रिमिअर शोचे वेळी अशोकजींची अनेकदा भेट झाली, मात्र बोलणं असं कधी झालं नाही. ज्यांच्या फक्त नावावर चित्रपट चालतात, त्यांना जाहिराती कुणी केलेल्या आहेत किंवा कशा झालेल्या आहेत याबद्दल फारसं स्वारस्य नसतं.

    अशोक सराफ यांनी, स्टेट बॅंक ऑफ इंडियाची नोकरी सोडलीच नसती तर मराठी व हिंदी चित्रपटसृष्टी व रंगमंच एका ग्रेट कलाकाराला मुकला असता. तरीदेखील अशोक सराफ यांच्या खात्यावर कोट्यावधी रसिक प्रेक्षकांचे, अब्जावधी हशे आणि टाळ्या जमा आहेत.

    -- सुरेश नावडकर.

    मोबाईल: ९७३००३४२८४

    ४-६-२२.

      June 20, 2022


  • पुणं बदलतंय !

    पुणं हे शहर मराठी माणसाच्या दृष्टीनं औत्सुक्याचं शहर ठरलं आहे. माणूस मग तो पुण्याचा असो वा नागपूर-नाशिकचा, पुण्याबद्दल त्याचं स्वतचं असं ठाम मत असतं. तो नागपूरचा असेल, तर त्याला या गावाचा हेवा वाटतो. नाशिकचा असेल, तर पुण्याला स्थायिक व्हावं असं वाटत असतं. पुण्यातल्या माणसाला, मग तो मूळ पुण्याचा असो वा नसो अपार असं कौतुक असतं.

      February 10, 2006


  • माझा बाळ कुठे गेला

    त्या वर्षी अण्णांनी याच मैना च्यापटीत संपूर्ण धना. केला होता. त्याकाळी पाऊस भरपूर पडत होता निसर्ग हिरवागार दिसत होता. शेतीने हिरवा गार शालू परिधान केला होता इतका निसर्ग शोभून दिसत होता. कोकिळा आनंदाने झाडावर गात होती गावातील प्रत्येक माणसाच्या चेहऱ्यावर आनंद पसरला होता.

      April 4, 2023


  • ‘टेक इट ईझी’ पॉलिसी (माझी लंडनवारी – 34)

    अशक्तपणा वाटत असल्यामुळे मी आरामात चालत ईमिग्रेशन काउंटरला पोहचले. पण मागच्या वेळेसारखे खूप चालणे नव्हते आणि ईमिग्रेशनची लाईनपण जास्त  नव्हती. देवच पावला! बाहेर येऊन टॅक्सी केली. आणि डायरेक्ट सडबरी टाऊनला गेले.

      February 5, 2022


  • नवजीवन कॉलनीत ओबामांचे स्वागत !

    बराक ओबामांची भारताची ट्रीप पक्की झाली आणि आमच्या कॉलनीत उत्साहाचे वातावरण पसरले.अर्थात ओबामांच्या ट्रीपचा आणि आमच्या नवजीवन कॉलनीचा तसा अर्थाअर्थी काहीही संबंध नाही .ओबामा आमच्या कॉलनीला सोडाच पण आमच्या शहरालाही भेट देणार नव्हते.पण जगात कुठलीही घटना घडली की आमच्या कॉलनीत अत्यंत उत्साहाचे वातावरण पसरते.तसा अमेरिकेचा आमच्या कॉलनीशी तसा काही विशेष संबंध नाही ,फक्त आमच्या कॉलनीचे सेक्रेटरी कुलकर्णींचा मुलगा दोन महिने कंपनीतर्फे अमेरीकेला जाउन आला ,एवढाच संबंध . पण एवढ्याशा संबंधावरपण आमच्या कॉलनीतले लोक अमेरिकेविषयी अत्यंत अधिकारवाणीने बोलतात. फक्त बोलण्याचा शेवट ” अहो , कुलकर्ण्यांच्या मुलाने बघितलय ना हे सगळ . हो अगदी अस्सच, अगदी खर ” असा करतात. ते जाउ द्या . कुलकर्ण्यांनी रात्री कॉलनीची मिटिंग बोलावली , आणि आपण आपल्या कॉलनीतर्फे बराक ओबामांच्या स्वागताचा एक जंगी कार्यक्रम करावा असा प्रस्ताव मांडला . देशपांड्यांनी त्यांना लगेच दुजोरा दिला . कुलकर्ण्यांनी अगदी काहीही म्हटल तरी देशपांडे त्याला लगेच दुजोरा देतात .( यांची मुलगी लग्नाची आहे आणि त्यासाठी त्यांना कुलकर्ण्यांचा फॉरिन रिटर्न मुलगा डोळ्यासमोर आहे ) आता कॉलनीतील दोन प्रतिष्ठित मंडळींनी ठरवल्यावर मोडता घालायचे काही कुणाला कारण नव्हते . शेवटी शनिवारी संध्याकाळी आठ वाजता गणपती मंदिरात कार्यक्रम करायचे ठरले आणि सभा संपली.

    आमच्या कॉलनीचे एक वैशिष्ट्य म्हणजे इथली बरीचशी मंडळी कलाकार आहेत. अर्थात ती नुसतीच कलाकार नाहीत , तर पोटापाण्याची नोकरी सांभाळुन कलाकार आहेत. नुसत्या कलाकाराला त्या कलेशिवाय दुसरे काही येत नाही . पण आमच्या कॉलनीतल्या कलाकारांना आपल्या कलेशिवाय पोटपाणी सांभाळण्याची कलाही पार पाडावी लागते . त्यामुळे समोरचे पांडेकाका बॅंकेत कॅशियर कम कवी आहेत , आणि बाजुच्या ढोलेकाकु एलायसीत क्लर्क कम नर्तिका आहेत. पांडेकाकांचा तर “ नोटा मोजा पटापटा ” नावाचा कवितासंग्रह प्रकाशित झाला असुन त्यांच्याकडे गेलेल्या सर्वांना तो ते सही करुन देतात. ढोलेकाकुंच्या नाचाचा प्रोग्रामपण कॉलनीत नेहमीच होतो .

    आता या कलाकार असण्याला माझा मात्र अपवाद आहे. मी बॅंकेत अकाउंटंट असल्याखेरीज काहीही नाही . त्यामुळे चेक पास करणे किंवा लेजरला डेबीट टाकण्याखेरीज मला दुसरे काहीही येत नाही . तसे लहानपणी माझ्या वडीलांनी मला तबला शिकविण्याचा बराच प्रयत्न केला . दररोज मला ते तबल्याच्या क्लासला घेउन जायचे . पण इतरांच्या तबल्यातुन तिरकीट , धा , कत्ता , त्रक , धिन असे वेगवेगळ्या प्रकारचे आवाज यायचे तसे माझ्या तबल्यातुन कधीच आले नाहीत . माझ्या तबल्यातुन फक्त ” ढुम्म “ असा एकच आवाज यायचा . शेवटी कंटाळुन माझा क्लास बंद झाला. या गोष्टीनंतर मला आयुष्यात दुसरी कला किंवा छंद कधीच जमला नाही . नाही म्हणायला टिव्ही बघण्याचा छंद मला पुढच्या आयुष्यात जडला पण या छंदाचे स्टेजवर प्रदर्शन करता येत नसल्याने त्याचा काहीच उपयोग नव्हता.आमच्या हिला मात्र उखाणे म्हणण्याचा छंद आहे . प्रत्येक कार्यक्रमात तिचा एकतरी ऊखाणा असतोच .

    शनिवार उजाडला , संध्याकाळ झाली , आणि गणपति मंदिरात मंडळी जमायला चालु झाली . कलाकार मंडळींची गडबड दुपारपासुनच चालु होती. आम्ही मात्र प्रेक्षक असल्याने जेवण वगैरे करुन आरामात समोरच्या खुर्चीवर जाउन बसलो. एलायसीतले सराफ माझ्याच ‘अ’कलाकार लायनीतले. तेही माझ्याशेजारी येऊन बसले. आम्ही सिक्स्थ पे कमिशन वगैरे गप्पा मारीत बसलो. आमच्या बोलण्याचे विषय काहीही प्रसंग असला आणि जागा कुठलीही असली तरी सारखेच असतात . उद्या समोर लता मंगेशकर गायला बसली काय किंवा माधुरी दिक्षित नाचायला बसली काय आम्ही आपले “ पे रिव्हिजन , सॅलरी हाइक बॉसची लफडी ” या विषयामधेच असतो . काही वेळाने समोर स्टेज म्हणुन एक सतरंजी अंथरण्यात आली.पुर्वी असे काही कार्यक्रम असताना आम्ही लाकडी स्टेज अरेंज करायचो. पण काही वर्षांपुर्वी बिल क्लिंटन भारतात आले असताना त्यांच्या स्वागतार्थ केलेल्या कार्यक्रमात ढोलेकाकुंनी कथ्थक डान्स केला , त्यावेळी तो स्टेज कोसळला. तेव्हापासुन फरशीवरच सतरंजी अंथरुन त्याला स्टेज म्हणुन आम्ही कार्यक्रम करतो. अर्ध्या तासात तयारी पुर्ण झाली आणि कार्यक्रमाला सुरुवात झाली.

    सुरवातीला कुलकर्णी काकु अमेरिकेची आपल्याला थोडक्यात ओळख करुन देतील असे सांगण्यात आले आणि नउवारी साडी , मोठे कुंकु ,केसांचा अंबाडा या वेषातल्या काकु बोलायला उभ्या राहिल्या.काकु भुगोलशिक्षिका म्हणुन रिटायर झाल्या असल्या तरी त्यांचे भुगोलाचे ज्ञान पुस्तकीच होते. त्या स्वतः औरंगाबाद जिल्ह्याच्या बाहेर कधी गेल्याच नाहीत. अपवाद एकदाच . मुलाला एअरपोर्टवर सोडायला. काकुंनी अमेरिकेची ओळख करुन द्यायला सुरुवात केली.

    ” अमेरिका हा अत्यंत खंडप्राय देश असुन त्याचे श्रेत्रफळ सुमारे दहा हजार चारशे चौरस किमी आहे. उत्तरेकडे पॅसिफिक समुद्र असुन दक्षिणेकडे अटलांटीक समुद्र आहे .पुर्वेकडे मेक्सिको आणि पश्चिमेकडे कॅनडा आहे.एकुण पन्नास प्रदेशांनी बनलेला हा देश जगातला अत्यंत बलाढ्य देश आहे . “
    काकुंची अमेरिकेची पुस्तकी ओळख सुमारे अर्धा तास चालली .त्यानंतर पांडेकाका ओबामांच्या स्वागतार्थ आपल्या कविता गातील असे समजले. पांडेकाका चालु झाले.

    ओबामांच्या घराचे
    नाव व्हाइट हाउस
    ओबांमांपुढे नतमस्तक
    चायना फ्रान्स व रुस

    ओबामांच्या विमानाचे
    नाव एअरफोर्स वन
    ओबामांचे मात्र
    भारतावर जडले मन

    अशा कवितांचा रतीब चालु झाला . सर्व प्रकारची यमके जुळवुन झाली.” मिशेल ,स्पेशेल “, ” बराक नाक ” अशा पंचवीस तीस कवितानंतर कवितावाचन संपले. काकांनी नंतर भाषण केले . त्यात आपल्या “ नोटा मोजा पटापटा” या काव्यसंग्रहाला वाचकांचा प्रचंड प्रतिसाद मिळाल्याचे सांगितले. आता आपण सध्या एक थ्रिलर सस्पेन्स कादंबरी “ बंद दरवाजा ” लिहित असल्याचे सांगितले . हा ” बंद दरवाजा ” बॅंकेच्या एका लॉकरचा असुन आपल्या पुर्वीच्या मालकाच्या खुन्याचा हे लॉकर कसा प्रतिशोध घेते ह्यावर ही कादंबरी आधारित होती . ह्यावर सर्व लोकांनी टाळ्यांचा कडकडाट केला.

    त्यानंतर ढोलेकाकुंचा नवीन हिंदी गाण्यावर डान्स झाला , शेजारच्या गौरीचे ( वय चार ) गाणे झाले , एकंदर खुप कला सादर झाल्या . बराक ओबामांच्या येण्याचा आणि ह्या हिंदी गाण्यांचा कसा संबंध ? हा प्रश्न पडला असता , हे ओबामांना भारतीय संस्क्रुतीचे दर्शन आहे असे उत्तर मिळाले .

    कार्यक्रमाच्या शेवटी आमच्या हिचा उखाणा घेण्याचा प्रोग्राम होता. आता या प्रकाराला मी फार भितो. आमच्या हिला कसला पाचपोचच नाही . मागे बिल क्लिंटन आले तेव्हा ” क्लिटनच्या घरी मोनिकाचा मुक्काम , – रावाचे डोके दुखले की मी लावते बाम ” असा उखाणा घेतला .आता या उखाण्यात कशाचा कशाला काही संबंध आहे का ? पण नाही . स्टेज दिसले की उखाणा झालाच पाहिजे . आतासुध्दा ” मिशेलला म्हणतात सगळे फर्स्ट लेडी , —- रावांशी बांधली मी लग्नाची बेडी .” हा उखाणा घेतला . आता आमच्या लग्नाचा आणि मिशेलला फर्स्ट लेडी म्हणण्याचा काही संबंध आहे का ? पण असंबध्द बोलण्यात बायकांचा हात कोणी धरु शकत नाही . त्यातल्या त्यात एक बरी गोष्ट म्हणजे आमच्या कॉलनीत माझ्या ऑफिसमधले कोणी रहात नाही . नाहीतर माझे ऑफिसमधे जाणे लोकांनी मुश्कील करुन टाकले असते.

    कार्यक्रम संपल्यावरचे जेवण ही एकच जरा त्यातल्यात्यात बरी गोष्ट होती. बाकी जाऊ द्या , चांगल्या जेवणामुळे आणि त्यातल्या त्यात जिलेबीमुळे कार्यक्रमाचा शेवट अत्यंत गोड झाला.

    -- निखिल नारायण मुदगलकर

      December 4, 2010


  • कोणीतरी आयुष्यात डोकावते तेव्हा…

    आज शाळेचा उद्घाटन सोहळा सुरू आहे. कारणसुद्धा तसेच आहे. शाळेसाठी तब्बल ८० लाख रुपये खर्च करून सर्व सोयीसुविधांसह एक एकर क्षेत्रात शाळेची इमारत दिमाखात उभी आहे. आज शाळासुद्धा सर्वांसोबत त्या व्यक्तींची वाट बघत आहे जी व्यक्ती शाळेचे उद्घाटन करणार आहे.

      May 5, 2022


  • बालरंगभूमी माझ्या नजरेतून- (भाग १-प्रस्तावना)

    १९७९ साली पहीलं बालनाट्य लिहीलं तेंव्हापासून बालरंगभूमीशी माझं नात जुळलं. रंगदेवतेच्या कृपेने गेली ४१ वर्षे बालरंगभूमी वर कार्यरत राहून बाल मनोरंजनाचे कार्य करत आहे. बालरंगभूमीच्या सहवासात चार दशके राहील्यावर मला जे दिसलं, जाणवलं, ते माझ्या शब्दातुन मांडण्याचा प्रयत्न करत आहे.

      March 9, 2022