नामवंत लेखक, नवोदित लेखक, ऑनलाईन लेखक यांच्या कथा, कविता, कादंबरी, प्रवासवर्णनासहित भरपूर साहित्य.

खरं तर नील तिच्या बाबतीत जे खरं घडलं तेच बोलत होता. त्यामुळे आता लताला त्याचा राग यायला सुरूवात झाली होती. तिला बघायचं होतं की, नीलला आपल्या बद्दल नक्की किती माहिती आहे? ती राग आवरून धरून त्याला पुढे बोल असे म्हणाली. ’गो अहेड नील.’
October 8, 2019
गेल्या दोन-तीन महिन्यांपासून कार्यालयात घडणाऱ्या घटनांमुळे मी भयंकर तणावात होतो. कश्यात ही मन लागत नव्हते. प्रचंड उन्हाळ्यामुळे प्रकृती वर-खाली होत होती. निराशा मनात घर करू लागली होती. अचानक ती चिमुकली परी माझ्या आयुष्यात आली आणि सर्वच बदलले. गेल्या महिन्याचीच गोष्ट, संध्याकाळी घरी आलो. उन्हाळा असल्यामुळे सांयकाळी सात वाजता ही भरपूर उजेड होता. तसे म्हणाल तर परी आमच्या शेजारीच राहते. आपल्या आई सोबत ती पहिल्यांदाच घरी आली होती. मला पाहताच त्या चिमुकलीने दादा (आजोबा) म्हणून हाक मारली. का कुणास ठाऊक. कदाचित! गतजन्मीचे ऋणानुबंध असतील. गंमत म्हणून तिला विचारले, अपने दादा के पास आओगी. सहजा-सहजी कुणाकडे न जाणारी ती परी पटकन माझ्या कडेवर आली. तिच्या आईला ही आश्चर्य वाटले.
आजकाल दररोज संध्याकाळ सात- आठच्या सुमारास मी कधी ही घरी पोहचतो. मी घरी पोहचल्याच्या १५-२० मिनिटातच तिची दारावर थाप ऐकू येते. मला ही आश्चर्य वाटते, परीला कसे कळते मी घरी पोहचलो ते. दार उघडल्या बरोबर आपल्या लटपटत्या पायांनी दुडदुड धावत दादा-दादा म्हणत सरळ माझ्या अंगावर येऊन धड्कते. तिच्या पायातल्या पैजणांच्या रुणझुण आवाज ऐकल्यावर, माझ्या शरीरात ही एक चैतन्य संचारते. दिवसभराचा थकवा आणि तणाव क्षणात दूर होतो. माझा हात पकडून लटपटत जिने चढत मला गच्ची वर घेऊन जाते. एकदा गच्ची पोहचल्यावर आमचा चोर-शिपायाचा खेळ सुरु होतो. दमल्यावर पुन्हा आम्ही जोडी खाली येते. तिच्या साठी खास काजू आणून ठेवले आहे. ते काजू कुठल्या डब्ब्यात आहे. तिला पक्के ठाऊक झाले आहे. दादा खाऊ (तिच्या बरोबर मी मराठीतच बोलतो. आणि तिला कळते ही). डब्बा तिच्या जवळ दिल्यावर मोजून ४-५ काजू आपल्या हाताने काढून मला देते. नखरेल एवढी कि एक-एक करून काजू तिला भरवावा लागतो. तीही गुणी मुलासारखे शांतीने काजू खाते. पण शेवटचा काजू तिच्या तोंडात भरवताना न चुकता ती खट्याळ, शैतान आपल्या सळसळत्या दातांनी कडकडून चावा घेते. तिच्याकडे डोळे वटारून बघितल्यावर, आपले डोळे बंद करून, नाक मुरडीत नुकतेच निघालेले दात दाखवत इतक्या जोरात हसते. काय म्हणावे, तिला रागवताच येत नाही. आजकाल तर परीने माझ्या शरीरावरच कब्जा केला आहे असे म्हंटले तरी गैर नाही. कधी पोटावर बसून तबला वाजवते, तर कधी पाठीवर चढून जोरात केस ओढते. रागवल्या बरोबर तिचे खट्याळ मुली सारखे हसणे. संध्याकाळचा तासभराचा वेळ कसा निघून जातो कळतच नाही. (त्या मुळे आजकाल लिहायला ही वेळ मिळत नाही).
गेल्या रविवारी सकाळी भुरका-भुरका पाऊस सुरु होता. नेहमीप्रमाणे आमची जोडी गच्ची वर पोहचली. परी प्रथमच वादळाने भरलेले आकाश पाहत होती. आकाशाकडे आश्चर्याने पाहत, आपल्या इवल्याशा हातात पावसाच्या छोट्या-छोट्या थेम्बाना गोळा करत आनंदाने खिदळू लागली. माझ्या अवती-भवती पाय जमिनीवर आदळत परी नृत्य करू लागली. तिच्या पैंजणाचा रुणझुण आवाज, त्यात पावसाचा हलका मृदू स्वर. स्वर्गीय दृश्य होते. तिचे ते नृत्य पाहून मोराला ही लाज वाटली असती. खरंच! पाऊस आल्याबरोबर, सर्व सृष्टी आनंदित होते. सर्वत्र चैतन्याचा संचार होतो. परी ही त्याला अपवाद कशी ठरणार. पावसाचा जोर थोडा वाढला. मी परीला कडेवर उचलले, आणि म्हणालो परी चला खाली, जास्त वेळ पावसात भिजलो आणि तुला सर्दी पडसे झाले तर तुझी ममा मला मारेल. ममा मारेल, हे शब्द ऐकल्यावर, ती इतक्या जोरात हसली कि काय सांगू, कदाचित कल्पना करत असेल, ममा, दादाला मारणार, कसे दृश्य असेल ते.
कधी कधी मला वाटते, निराशाच्या गर्तेतून मला बाहेर काढण्यासाठीच तर देवाने परी बरोबर माझी भेट घडविली असेल. एखाद दिवस जर ती घरी आली नाही तर माझे मन बैचैन होऊन जाते. पण काही ही म्हणा, तिच्या संगतीत आजकाल माझा वेळ मस्त जातो.
June 27, 2015
आता हा चित्रपट यु ट्युबवर कधीही पाहता येतो. थिएटरमध्ये पहाण्याची मजा आता राहिलेली नाही. त्या सुवर्णकाळातील ‘जाॅनी मेरा नाम’ या चित्रपटाची पारायणं केलेला मी, स्वतःला भाग्यवान समजतो….
September 10, 2021
सूर्यमाला सोडून आता आम्हाला पृथ्वीवरची बाराशे वर्षे होऊन गेली होती. सध्या अंतराळाच्या ज्या क्षेत्रातून आम्ही जात होतो तिकडे फक्त धुळीचे प्रचंड ढग होते, प्रकाश दर्शन होऊन जवळपास दिडशे वर्षे लोटली होती.
August 26, 2023
मी एकदम शॉकड्… जायचं हे माहित होतं. पण असं? नीलम पुढे म्हणाली, तुझा पासपोर्ट, व्हिसा, तिकीट आणि करंन्सी तुला अटेंडंट एअर पोर्ट वर रात्री 12 वाजता आणून देईल. तू आत्ता फोरेक्स् कार्ड घे झेराकडून आणि घरी जाऊन तयारी कर. तसही तुझा पासपोर्ट येई पर्यंत 7- 8 वाजतील.
February 3, 2022
आपण आपल्या जवळच्या माणसांच्या संपर्कात आहोत, मात्र सहवासात नाही.कधी मनसोक्त बोलणं नाही, चर्चा नाही. आपण सारेच ‘स्वमग्न’ झालो आहोत. फक्त स्वतःचाच विचार!
February 11, 2022

विजय त्याच्या कार्यालयात बसलेला होता त्याच्या कार्यालयाच्या बाहेर दोन म्हाताऱ्या गप्पा मारत बसलेल्या होत्या. लोकांच्यात चाललेला संवाद हे विजयच्या साहित्यिक भुकेसाठी नेहमीच खाद्य ठरत असते त्यामुळे तो त्या म्हाताऱ्या स्त्रियांमध्ये चाललेला संवाद कान लावून ऐकत होता. त्यातील एक म्हातारी फक्त दुसरी म्हातारी जे काही बोलत होती ते कान देऊन ऐकण्याचे काम करीत होती. ती बडबडी म्हातारी त्या दुसऱ्या म्हातारीला सांगत होती…” मला दोन मुलगे आणि एक मुलगी आहे मोट्या मुलाला दोन मुलगे आहेत आणि मुलीला एक मुलगा एक मुलगी आहे लहान मुलाला अजून काही नाही… त्याचे दोन वर्षांपूर्वीच लग्न झाले आहे..
September 1, 2022
तसा मी मात्र शाकाहरी ह्या खाद्य सवयीला चिटकून राहण्याच्याच विचारधारणेत होतो. मी पहीले अंडे खाण्याचा प्रयत्न केला तो केवळ मित्र मारुती ह्याच्या आग्रहामुळे.. सुटीच्या दिवशी तो अभ्यासाला येत असे. त्याचा स्वतःचा खाण्याचा डबा घेऊन येई. बऱ्याच वेळा आम्ही जवळ बसुन जेवण घेत असू.
March 24, 2019
आयुष्यात संकट किंवा धर्म संकट ही येतातच पण त्यावेळी दुर्लक्ष न करता साहसाने, संयम बाळगून त्या संकटाला समोर जाण्याची तयारी आपण केली पाहिजे.
September 20, 2021
पर्वतीच्या मंदिरातुन दर्शन घेऊन मेधा बाहेर आली. काही पायऱ्या खाली उतरून नंतर बाजूच्या वाटेने चालत ती त्यांच्या नेहमीच्या जागी येऊन पोहोचली. खांद्यावर अडकवलेली पर्स आणि हातातली रेड हार्टच चित्र असलेली पिशवि तिथल्या दगडी कट्यावर ठेवून मेधा तिथून समोर दिसणाऱ्या पुण्याकडे पाहत होती.
March 29, 2022
Copyright © 2025 | Marathisrushti