नामवंत लेखक, नवोदित लेखक, ऑनलाईन लेखक यांच्या कथा, कविता, कादंबरी, प्रवासवर्णनासहित भरपूर साहित्य.
विजय बारा वर्षाचा होता . गावात याला सगळे विज्या म्हणूनच हाक मारायचे. समुद्राच्या काठावर वसलेले ते छोटेसे कोकणातले मच्छीमारांचे गाव. बहुतांशी कुटुंबांचा उदरनिर्वाह मासेमारीवरच चालायचा. विज्याच्या वडिलांची पण एक होडी होती. गावातली चार पाच लोकं त्याच्या होडीवर कामाला होती. एकत्र कुटुंब असल्यामुळे विज्याच्या घरी माणसांचा राबता खूप होता. विज्याला दोन भावंड होती, नववीत असलेला एक मोठा भाऊ आणि त्याच्याहुन लहान असलेली एक बहीण. त्याच्या काकाला पण चार मुले होती त्यामुळे घरी सात जणांची ही टोळी खूप मस्ती करायची.
मासेमारी करणाऱ्या गावातील होड्या संध्याकाळी समुद्रात जाऊन पहाटे पर्यंत परत यायच्या. आजकाल मोबाईल ची सोय झाल्यामुळे एक बरे झाले होते, माशाचा भाव किनाऱ्याला यायच्या आधीच व्यापारी ठरवून सकाळी टेम्पो हजर करायचे. उरली सुरली छोटी मासळीच कायती लोकल बाजारात जायची.
विज्या हे सारे लहानपणापासून बघत आला होता. विज्याला अभ्यासात चांगली गती होती त्यामुळे घरातल्यांच्या अपेक्षा त्याच्याकडून फार होत्या. त्याने चांगले शिकून मुंबईला नोकरी करावी असेच सर्वांना वाटत होते. पण विज्याच्या मनात मात्र मासेमारी बद्दल भलतेच कुतूहल होते. कित्येकदा त्याने बाबा कडे रात्री होडीवर यायची इच्छा बोलून दाखवली होती पण त्याला सतत नकार मिळत होता.
*********
गणपती दोन दिवसांवर येऊन ठेपले होते. चतुर्थी चा सण म्हणजे कोकणातली दिवाळीच. घरातील प्रत्येकजण बाप्पाच्या आगमनाच्या तयारीत गुंतला होता. शाळांना पण सुट्ट्या पडलेल्या त्यामुळे बच्चे कंपनी पण घरीच होती. संध्याकाळी दिवेलागणीची वेळ झाली आणि घरच्यांच्या लक्षात आले विज्या कुठे दिसत नाहीएय. गावात शोधाशोध सुरू झाली. सुरुवातीला वाटले कुठल्या तरी मित्राच्या घरी असेल पण कुणाच्याच घरी नाही हे आढळल्यावर मात्र सगळ्यांचेच धाबे दणाणले. गावकऱ्यांनी गावातली सारी ठिकाणे पालथी घातली पण विज्याचा कुठेच थांगपत्ता लागत नव्हता. त्याच्या आईने तर एव्हाना रडायला सुरुवात केली होती. आता पोलिसांना कळवावे असे सर्वांचे मत पडले. पण त्या अगोदर कुणीतरी त्याच्या वडिलांना होडीवर फोन केला. त्यांना घडल्या प्रकाराची कल्पना दिली. ते पण चिंतेत पडले. त्यांनी लगेच इतर खलाशांना परत किनाऱ्या च्या दिशेने होडी घेण्यास सांगितले. सारेच जण चिंतेत होते. होडीवरचे सारे जण विज्याच्या वडिलांची समजूत काढत होते. पण बापाचा जीव पार टांगणीला लागला होता.
**********
विज्या बसल्या जागी एकदम अवघडून गेला होता! होडीच्या सतत खालीवर होण्याने त्याच्या पोटात माळमळायला पण लागले होते. त्याच्या कानावर त्याच्या बाबाचे आणि इतर खलाशांचे बोलणे पडत होते. समुद्रात मासेमारीसाठी जायला मिळावे म्हणून तो कधीपासून हा प्लॅन बनवत होता. संध्याकाळी समुद्रात होडी लोटायच्या आधी सगळ्यांची नजर चुकवून तो बुडाशी लपून बसला होता. एवढा सगळा मोठा प्रकार होईल याचा त्याने विचारच नव्हता केला नव्हता. आता आपल्याला पडणाऱ्या माराच्या विचाराने तो जागच्या जागी थिजून गेला होता. लपण्याच्या जागेतून बाहेर येऊन वडिलांसमोर उभे राहण्याची हिम्मत त्याच्यात नव्हती. त्याला आता खूप रडायला येत होते.
होडी जेवढ्या वेगाने शक्य होईल तेवढ्या वेगाने किनाऱ्याकडे जात होती तेवढ्यात एक खलाशाला हुंदक्यांचे आवाज ऐकू आले. त्याने वाकून पाहिले असता थर थर कापत आणि हुंदके देऊन रडत असलेला विज्या नजरेस पडला!
“अरे तू हय काय करतंस?” तो खलाशी जोरात ओरडला
ते ऐकल्या बरोबर विज्याच्या रडण्याचा जोर अजून वाढला! आता काय प्रकार नक्की झालाय तो सगळ्यांच्या लक्षात आला. लपलेल्या जागेतून विज्या बाहेर यायला तयार नव्हता!
“विज्या, भायर ये” त्याच्या बाबाने ओरडून सांगितले.
“बाबा , मारू नको… मिया चुकलंय.. परत नाय करूंचय” विज्या रडत रडत बोलत होता.
बाबाने मारणार नाही असे आश्वासन दिल्यावरच तो बाहेर आला. बाबाने सर्वात प्रथम घरी फोन लावून विज्या मिळाल्याची खबर दिली तेव्हा कुठे सगळ्यांचा जीव भांड्यात पडला!
May 11, 2020
वयाच्या साठीकडे झुकलेले वामनराव तसे मोठे शिस्तीचे भोक्ते. नियमित वागणे, मृदू बोलणे. मुलगी, स्वाती (जर्मनीत), मुलगा, शेखर आय.आय.टी. (फायनलला ), पुण्यात कोथरूड सारख्या भागात स्वतंत्र बांगला. एकंदर ते एक ‘आदर्श जेष्ठ नागरिक ‘ होण्याच्या बेतांतले, उच्च माध्यम वर्गीय गृहस्थ.
April 7, 2019
जीवनावरील असे भाष्य आपल्या पूर्वापार समजुतींना /गैरसमजांना तळापासून उद्ध्वस्त करते आणि परिपक्व होण्यासाठी लागणाऱ्या सत्याचे डोस पाजते.
September 14, 2021
एकदा देव आणि दैत्य दोघांनी मिळून समुद्रमंथन करून चौदा रत्ने मिळवली. वाटणी करता करता सुधा (अमृत) कोणी घ्यावे याबाबत वाद निर्माण झाला. या वादात दैत्यांनी सुधेचा कुंभ जबरदस्तीने देवांपासून हिसकून घेतला. तेव्हा विष्णूने मोहिनीचे रूप घेतले. मोहिनीरूप विष्णूने दैत्यांना अमृत वाटण्याचे काम मी करतो असे सांगितले.
November 15, 2025
वाटते सानुली मंद झुळुक मी व्हावे
घेईल ओढ मन तिकडे स्वैर झुकावे ।।धृ।।
कधि बाजारी तर कधी नदीच्या काठी
राईत कधी वा पडक्या वाड्यापाठी
हळु थबकत जावे कधी कानोसा घेत
कधीं रमत गमत वा कधी भरारी थेट ।।१।।
लाऊन अंगुली कलिकेला हळुवार
ती फुलुनी बघे तो व्हावें पार पसार
परि जाता जाता सुगंध संगे न्यावा
तो दिशादिशातुन फिरता उधळुनि द्यावा ।।२।।
गाण्याची चुकली मुकली गोड लकेर
झुळझुळ झऱ्याची पसरावी चौफेर
शेतात पाचुच्या, निळ्या नदीवर शांत
खुलवित मखमली तरंग जावे गात ।।३।।
वेळुच्या कुंजी वाजवुनी अलगूज.
कणसांच्या कानी सांगावे हितगुज
शिंपावी डोही फुले बकुळीची सारी
गाळुनी जांभळे पिकली भुळभुळ तिरी ।।४।।
दिनभरी राबुनी दमला दिसता कोणी
टवटवी मुखावर आणावी बिलगोनी
स्वच्छंद अशा या करुनि नाना मौजा
घ्यावया विसावा यावें मी तिनीसांजा ।।५।।
June 23, 2026
सहा वर्षांचा एक छोटा मुलगा त्याच्या चार वर्षांच्या बहिणीसोबत मार्केटमध्ये गेलेला असतो. ते दोघे बाजार बघत चाललेले असतात. थोड्यावेळाने भावाच्या लक्षात येते की आपत्री बहीण आपल्याबरोबर नाही. तो शोधाशोध करु लागतो. काही अंतर चालल्यावर एका दुकानासमोर त्याची बहीण उभी असलेली त्याला दिसले.
April 29, 2024
प्रथम बैठक स्थिर होण्याचा प्रयत्न यशस्वी करणे नंतर मनाला बाह्यांगातून अंतरंगात नेणे जरूरी असते. मनाला शरीराच्या आतील प्रत्येक इंद्रियाशी समरस करण्याचा प्रयत्न करावा लागेल. ह्याच मार्गाने मन एक एक अवयवाशी एकरूप होत सर्व देहाशी तादाला पावते. मानवी (वा कोणताही सजीव प्राणी) देह ही त्या निसर्गाची वा परमेश्वराची सर्वोत्तम कलाकृती आहे. कल्पनेने आणि आयोजनानी एकदम परिपूर्ण. त्याच्या सांघीक कार्यप्रणालीची माहिती कळताच कुणीही आश्चर्यचकीत व्हावे इतके यात भव्य आणि दिव्य आहे. देहामधले अनेक अवयव (इंद्रिये) ही कोट्यावधी सेल्सनी बनलेली असतात. सेल्स अतिशय सूक्ष्म व देहाचा सर्वात लहान घटक भाग आहे आणि आश्चर्य म्हणजे जे कार्य संपूर्ण देहाकडून होत असते. तेच आणि तसेच कार्य त्या प्रत्येक सेल्सकडून केले जाते. जसे जगणे, वाढणे,मरणे,नष्ट होणे, उर्जा निर्माण करणे, तिचा उपयोग करणे इत्यादी. देह हा जशा ह्या बाबी पूर्ण करीत जीवन चक्र चालू ठेवतो, त्याच पध्दतीने ती एक स्वतंत्र सेल्स देखील अशीच चक्रमय जीवन जगते. उर्जा निर्माण करणे व जीवन चक्रासाठी देणे हाच प्रमुख जीवन उद्देश.
ध्यान? कुणाचे? कुणाचेही नाही. कारण कुणीही आणि कुणालाही हे माहित नाही. काहीही न करणे ह्यासाच ‘ध्यान’ म्हणतात. (objeectess awareness) अर्थ फार सोपा व सुलभ वाटतो. परंतू काहीही न करण्याची अवस्था शरीरात निर्माण करणे, अत्यंत कठीण गोष्ट आहे. देहाच्या हालचालीवर पायबंद घालणे एखादेवेळी काही क्षणासाठी शक्य होईल. परंतू जो मेंदू, बुध्दी वा मन हे सतत चेतनामय असते, कार्य करीत असते त्यांचे कार्य थांबवणे हे फार कठीण. त्यांचे कार्य हे नैसर्गीक जीवंतपणाचेच लक्षण असते.
‘ध्यान’ म्हणजे काहीही न करणे असते, तसेच त्या मार्गाने एक शोध घेतला जातो. ज्यांना खऱ्या अर्थाने ध्यान लागते, त्यालाच त्या शोधाचे आकलन होते. येथे अनुभव निराळे, प्रचिती निराळी, फलश्रुती देखील भिन्न असू शकते. फक्त एक मात्र सत्य सर्व साधकांना सारखेच जाणवते आणि तो म्हणजे ‘नितांत आनंद, ब्रम्हानंद (Extary of joy) संपूर्ण शांतता’ आणि ह्याच सत्याचा तो शोध असतो.
‘ध्यान’ म्हणजे काहीही न करणे हे जरी असले, तरी आम्हाला आमच्याच शरीर – मनाच्या प्रक्रीया कराव्याच लागतील. साधनाला साध्याकडे नेण्यासाठी ज्यामुळे आम्हीच आमच्या अंतरंगात अर्थात देहाच्या आत प्रवेश करून अवयवांशी संवाद साधून आणि त्या सूक्ष्म मूळ घटक ज्या भागात सेल्स आहेत त्यांच्या संपर्कामध्ये येवून प्रत्येक विश्लेशनाची एक सूक्ष्म पायरी असते. ज्यावर भव्यदिव्यतेचा डोलरा उभा रहात असतो, त्या मूळ घटकांपर्यत आम्ही जाणीवेच्या माध्यमातून जाण्याचा प्रयत्न ‘ध्यानातून’ करणार आहोत. डोळे मिटून (वा उघडे – हे सवयीनंतर शक्य असते.) ध्यान धारणेच्या आसनस्थ झाल्यावर जाणीव होऊ लागते की तुम्ही शरीराने स्थीर, अचल होत आहात. शरीराच्या अस्तीत्वाची जाणीव कमी कमी होत जाते. फार प्रयत्नानंतर देहहीनतेचा भास होवू लागतो. परंतू हे सारे असत्य आहे. कारण देहहीन झाल्याचा 12 भास ही तुमची कल्पना असते. विचार असतो आणि विचाराचे अस्तीत्व मन चंचल असल्याचे दाखवितो.
डॉ. भगवान नागापूरकर
संपर्क - ९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
March 23, 2016

ही एक लोककथा आहे.
तिन्ही लोकांत असुरांचे प्राबल्य वाढले होते. देव, देवता, ऋषीमुनी, लोक असुरांच्या त्रासाने त्रस्त झाले. शिव संहारक आहे. सर्वांनी जाणले की शिव व शक्ती एकरूप झाल्याशिवाय असुरांचे निर्दालन होणार नाही. सर्वजण शंकराला शरण गेले. आपली व्यथा त्यांनी शंकराला सांगितली. शिव व शक्ती एकत्र येण्याची आवश्यकता पण शंकराला पटवून दिली. शंकरालासुद्धा तो विचार पटला.
हिमालयाची पत्नी मेना! हिमालय व मेनेच्या कन्येचे नाव 'नंदा'! नाजूक फुलांसारखी, प्रेमळ, सर्वांशी गोड व प्रेमाने वागणारी नंदा तर सर्वांची जीव की प्राण होती. पशु-पक्षी, वृक्ष-लता, फुले-पानेसुद्धा नंदावर फार प्रेम करीत! नंदा आता उपवर झाली होती. सर्व देवदेवता, ऋषिमुनींनी जाणले की नंदा हीच शंकराला पत्नी म्हणून योग्य आहे. नंदा हे आदिमाया पार्वतीचेच रूप आहे व जगाच्या कल्याणासाठीच तिने हे रूप धारण केले आहे.
सर्वजण आनंदाने, हर्षाने ते हिमालयाच्या सदनी गेले. सर्वांना पाहून हिमालयपण आनंदला. सर्वांचे त्याने प्रेमाने स्वागत केले. आदरसत्कार केला. देवदेवतांनी, ऋषि-मुनींनी आपण येण्याचे प्रयोजन सांगितले. शिवासारखा जावई मिळणार या कल्पनेने हिमालय आनंदला. मोठ्या आनंदाने त्याने विवाहाला संमती दिली.
लग्नाची तयारी जोरात सुरू झाली. मुहूर्त ठरला. देव-देवतांना, ऋषि-मुनींना, जनता-जनार्दनाला आग्रहाची निमंत्रणे गेली. एका शुभमुहूर्तावर शंकराचे सर्व गणासहित कैलासाहून विवाहस्थळी आगमन झाले. सीमेवर देवदेवतांनी, ऋषीमुनींनी शंकराचे स्वागत केले व मोठ्या मानाने त्याला विवाहस्थळी आणले. आपल्या पतीचे चोरून दर्शन घेताना नंदापण मोहरली. ठरवलेल्या शुभमुहूर्तावर कैलासपती शिवशंकर व हिमालयपुत्री नंदा यांचा शुभविवाह मोठ्या थाटात संपन्न झाला. देवदेवतांनी आकाशातून पुष्पवृष्टी केली. ऋषीमुनींनी उभयतांना शुभाशीर्वाद दिले. सर्वत्र आनंद पसरला. सर्वजण तृप्त झाले.
आता रिवाजाप्रमाणे नंदा आपल्या सासरी जाणार! आणि शेवटी ती वेळ आली. नववधूने आपल्या पतीसमवेत सासरी जाण्यासाठी पाऊल उचलले व सर्वजण व्यथित झाले. नंदाच्या विरहाची कल्पनाच कोणी सहन करू शकत नव्हते. पिता व्यथित झाला, माता अश्रू ढाळू लागली. सर्वजण सैरभैर झाले. फुले कोमेजली, पक्ष्यांचे कुजन थांबले. ही रूपसंपन्न, गोड, प्रेमळ, सर्वांची लाडकी नंदा आता सर्वांना अंतरणार होती. नंदालासुद्धा हा विरह सहन होत नव्हता. ती वेलीवृक्षांना कुरवाळत होती. देवदार वृक्षांना मिठी मारत होती. ज्या हरणांशी, कस्तुरीमृगांशी ती खेळली, त्यांच्याबरोबर बागडली त्यांना आता ती कंवटाळू लागली. ती हरणे, कस्तुरीमृग, पशुपक्षी पण अश्रू ढाळत होते. नंदाला आता हे सर्वच कायमचे अंतरणार होते.
जड अंतःकरणाने नंदाने पाऊल उचलले. पती पाठोपाठ तिची वाटचाल सुरू झाली. क्षणाक्षणाला, प्रत्येक पावलाला तिची नजर पाठीमागे वळत होती. नंदाबरोबर मातापिता, ऋषीमुनी, लोक, पशूपक्षीपण चालू लागले. 'नंदाशिवाय जीवन' ही कल्पनाच ते सहन करू शकत नव्हती. शिवगण पुढे जाऊन वाट बनवत होते. दुर्गम वाटा सुकर करत होते. रस्त्यात राज्यातील पहाडी लोक नंदाला येऊन भेटत होते. तिला भेटी देत होते. फुले-फळे देत तिच्या पायावर अश्रू ढाळत होते व खिन्न मनाने तिचा निरोप घेत होते. एका वळणावर नंदाने आपल्या माहेराचे पाणावलेल्या नजरेने दर्शन घेतले. आता माहेरही दृष्टीआड झाले.
सर्वजण नंदाबरोबर चालत होते. कोणीच मागे फिरत नव्हते. नंदावरील सर्वांचे प्रेम शंकर जाणत होते व त्यामुळे त्यांना 'परत फिरा' असे सांगण्याचे धाडस शंकरांनापण होत नव्हते. नंदाच्या प्रेमाने हे लोक कुठपर्यंत येणार हेच त्यांना समजत नव्हते.
नंदा दमली होती. तिला तहान लागली. शंकरांना तिने सांगितले, जवळ कुठेच पाणी दिसत नव्हते. शंकरांनी आपल्या त्रिशुळाचा जमिनीवर प्रहार केला. जलधारा वाहू लागल्या. एक सुरेख सरोवर निर्माण झाले. नंदा हसली. पाणी पिण्यासाठी वाकली. पाण्यात आपले प्रतिबिंब पाहू लागली. रूप न्याहाळू लागली.
स्वतःला विसरली व शिवाशेजारी ही दुसरी कोणती स्त्री, असा विचार करू लागली. भोळी नंदा रूसली. शिवाने तिच्या रूसण्याचे कारण ओळखले. तिला समजावले. तिच्या आत्मरूपाची तिला ओळख करून दिली. शंकर सांगू लागले, शिव शक्ती सदैव एकरूप आहेत. आपणास कोणीही अलग करू शकत नाही. माझ्याजवळ ये व माझ्या रूपात एकरूप होऊन जा. नंदा हसली. लाजली. शिवाजवळ गेली व शिवात एकरूप झाली, शिवरूप झाली. सर्वांनी शिवाचा 'अर्धनारीनटेश्वर' म्हणून जयजयकार केला. नंदाने रूप पाहिलेल्या शिवनिर्मित सरोवराला 'रूपकुंड' म्हणून ओळखू लागले.
रूपकुंडापासून लोक मागे वळतील, असे शंकराला वाटत होते. लोक नंदाच्या प्रेमाने आणखी किती चालणार आहेत? पण त्यांना 'परत फिरा' असे सांगणे शंकरांना जमत नव्हते. स्थिती विचित्र झाली होती. या पुढचा मार्ग दुर्गम होता. शेवटी शंकरांनी धाडस केले. समजुतीच्या सुरात ते सर्वांना सांगू लागले, 'नंदा जशी माझ्यात आहे तशी ती तुमच्यातही आहे. ती आदिशक्ती आहे. सर्वत्र तिचा निवास आहे. जगाच्या कल्याणासाठी तिचा जन्म आहे व आता अवतारकार्य सुरू करण्याची वेळ आली आहे. नंदावरील तुमचे प्रेम मी जाणतो. यापुढे हा सर्व परिसर नंदाच्या नावाने ओळखला जाईल. ही पर्वतशिखरे नंदादेवी, नंदाकोट, नंदाखाट इ. नंदाच्या नावाने ओळखली जातील. ही नदी 'नंदाकिनी' म्हणून ओळखली जाईल. या पर्वतशिखरांच्या, नद्यांच्या, झऱ्याच्या दर्शनाने तुम्हाला नंदा भेटल्याचे सुख लाभेल. आता तुम्ही नंदाला आशीर्वाद द्या व परत फिरा.' लोक अश्रू ढाळत स्तब्ध उभे राहिले. कोणीच परत फिरायला तयार नव्हते.
सर्वजण नंदाबरोबर परत चालू लागले. शंकराची अवस्था फारच अवघड झाली. सर्वजण होमकुंडापाशी आले. जवळच्या एका शिळेवर शंकराने त्रिशुळाच्या साहाय्याने श्रीयंत्र काढले व सर्वांना सांगितले, या यंत्रात नंदाचे कायम वास्तव्य असेल. त्याच्या दर्शनाने तुम्हाला नंदाभेटीचा आनंद लाभेल. आमचे निवासस्थान कैलास सदैव अस्पर्श राहणार आहे. तिथे कोणीही मानव येऊ शकणार नाही. आज भाद्रपद अष्टमी आहे. हा दिवस नंदाष्टमी म्हणून ओळखला जाईल. या परिसरात फिरल्यास तुम्हाला नंदाचे वास्तव्य जाणवेल. म्हणून हा परिसर 'घुमकी' म्हणून ओळखला जाईल. आता तुम्ही परत फिरा. त्यात सर्वांचे कल्याण आहे.
लोकांची समजूत पटली. दु:खी मनाने सर्वांनी नंदाला निरोप दिला. शंकरापाठोपाठ नंदा चालू लागली. तिची नजर वारंवार मागे जात होती. दूर जाणाऱ्या नंदाकडे लोक अश्रूपूर्ण नजरेने पाहत होते. नंदा दृष्टिआड झाली. आता परत नंदा कधीच आपल्या मूळ रूपात भेटणार नव्हती. लोकांना शंकराचे शब्द आठवत होते. 'जेव्हा नंदाला माहेरची आठवण येईल तेव्हा ती माहेरच्या तुम्हा लोकांना भेटायला येईल. माहेरचे सुख व आनंद उपभोगील.' लोक परत वळले एकटेच! लोक घरोघर नंदाला पुजू लागले. तर नंदाष्टमीला होमकुंडाची खडतर यात्रा करू लागले. नंदाभेटीचे सुख अनुभवू लागले. ७ व्या शतकात गढवालमध्ये भानुप्रताप म्हणून राजा होऊन गेला. तो नंदादेवीचा भक्त होता. दर नंदाष्टमीला तो होमकुंडाला जाऊन श्रीयंत्राची पूजाअर्चा करीत असे. नंदादेवीच्या कृपेने त्याला अनेक सिद्धी प्राप्त झाल्या होत्या. तो म्हणेल ते होत असे. लोक त्याला 'बदरीनाथ' म्हणत. लोक होमकुंडाची यात्रा उत्साहाने करीत पण या खडतर यात्रेत भक्तांना खूप त्रास होई. निसर्गकोपाला काही वेळा लोक बळी पण पडत. एके दिवशी नंदादेवीने भानुप्रताप राजाला दृष्टांत दिला व सांगितले की, माझ्या प्रेमाने लोक यात्रेला येतात..पण त्यांना फार त्रास होतो. त्यामुळे मला खूप वाईट वाटते तरी जेव्हा मला माहेरची आठवण येईल, तेव्हा मीच माहेरी येईन पण आता मी शिवरूपी झालेली असल्यामुळे मला माझ्या मूळ रूपात येता येणार नाही. मी चारशिंगी मेंढ्याच्या रूपाने जन्म घेईन. माहेरचे सुख उपभोगीन आणि मग मला होमकुंडापर्यंत येऊन निरोप द्या. यापुढे दरवर्षी होमकुंड यात्रा करण्याची गरज नाही."
दरवर्षी निघणारी यात्रा बंद झाली. घरी, गावी लोक नंदादेवीची पूजा करू लागले. एके दिवशी भानुप्रताप राजाला बद्रीनाथाने दृष्टान्त दिला व दृष्टान्तात वानप्रस्थ आश्रम स्वीकारून पुढील आयुष्य ईश्वर चिंतनात व्यतित करण्यास सांगितले. बदरीनाथाच्या दृष्टान्ताप्रमाणे भानुप्रताप राजाने वानप्रस्थ आश्रम स्वीकारला. आपले राज्य व कन्या त्याने धारमाळवा येथील राजकुमार कनकपाल याला दिले व तो जंगलात निघून गेला. ईश्वराच्या चिंतनात रममाण झाला. पण नंदादेवीवरील त्याचे प्रेम, निष्ठा व भक्ती अढळ होती. जेव्हा नंदादेवीला माहेराची आठवण येई तेव्हा ती चारशिंगी मेंढ्याच्या रूपाने जन्म घेत असे. पण भानुप्रताप राजाला वाटे, दरवर्षी नंदादेवीने माहेरी यावे. आपण तिला आमंत्रित करीत नाही, म्हणून ती दरवर्षी येत नाही. शेवटी एके दिवशी भानुप्रताप राजाने आपल्या धाकट्या भावाच्या, कासुवाच्या स्वप्नात जाऊन सांगितले की, 'तू दरवर्षी माहेरी येण्याचे नंदादेवीला आमंत्रण देत जा.' कासुवाच्या नावावरून कसुवा वास्तव्य करीत असलेल्या त्या गावाचे नाव कासुवा पडले व अजूनही कासुवाच्या राजघराण्यातील प्रतिष्ठित व्यक्ती नौटी या गावी दर ललितापंचमीला नंदादेवीच्या मंदिरात येऊन नंदादेवीला माहेरी येण्यासाठी आमंत्रित करतात. नौटी हे नंदाचे माहेर मानले जाते.
आणि खरंच! साधारण दर १५-२० वर्षाच्या काळात गढवाल हिमालयात चार शिंगे असलेला एक मेंढा जन्म घेतो. नंदा समजून त्याचे प्रेमाने लाडाने संगोपन केले जाते व समारंभपूर्वक मेंढारूपी नंदाची सासरी पाठवणी केली जाते. पुरातन काळी या यात्रेला नंदाजाट यात्रा म्हणत. जाट म्हणजे मेंढा! पण भानुप्रताप राजाने गढवाल, कुमाऊँमधील राजांना सुद्धा या यात्रेत सहभागी होण्यासाठी निमंत्रित केले. सर्व यात्रेचे आयोजन व नियोजन राजघराणे करत असे. म्हणून सर्वजण या यात्रेला नंदराजजट यात्रा म्हणू लागले व यात्रेचे तेच नाव रूढ झाले.
-प्रकाश लेले
July 29, 2022
रोज प्रमाणे एकीकडे दूध कपात ओतत, तर दुसरीकडे सँडविच टिफीन मध्ये भरत रश्मीच्या तोंडाचा पट्टा अखंड सुरू होता . सेंट पीटर्स शाळेत चौथीत शिकणाऱ्या मुलाला अर्थात विहानला आणि ही सगळी हातघाई सुरू असताना सोफ्यावर शांतपणे बसूंन पेपर वाचत बसलेल्या नवऱ्याला म्हणजेच राघवला हे काही नवीन नव्हतं .. कडाक्याच्या थंडीचे दिवस होते त्यामुळें गरम गरम पाण्याचा शॉवर सोडून बाहेर यायचं विहान ला जीवावर आलं होतं.
November 17, 2024
जुन्यातील काही माणसे सर्विस मधून रिटायर झालेली दुपारी चार नंतर फिरायला आलेली मला दिसली. त्यातील काही माणसांनी मला ओळखले आणि आठवणी जाग्या झाल्या. आमच्या गावांमधून रेल्वे लाईन जाते पलीकडे बुरुंगवाडी अलीकडे जुळेवाडी व काही अंतरावर हजारवाडी. या गावातील माणसे जुळेवाडी तील प्रत्येक घरटी माणूस ट्राफिक डिपारमेंट इंजिनीरिंग डिपारमेंट. व बुरुंग वाडीतील बहुता श लोक इंजीनियरिंग डिपार्टमेंट मध्ये काम करतात तर हजार वाडी येथील घरटी एक दोन माणूस टेलिफोन खात्यामध्ये काम करीत होते.
December 16, 2022
Copyright © 2025 | Marathisrushti