नामवंत लेखक, नवोदित लेखक, ऑनलाईन लेखक यांच्या कथा, कविता, कादंबरी, प्रवासवर्णनासहित भरपूर साहित्य.

लेखक म्हणून मी जेव्हा लिहायला लागलो तेव्हा कथानकं , मांडणी , शैली , पात्रं , प्रसंग , संवाद यांचं महत्व काय आणि कसं असतं , त्यात शब्दांचा वापर किती जपून करावा लागतो हे अर्थातच आपोआप मनावर ठसलं गेलं होतं. वादविवाद स्पर्धा , वक्तृत्व स्पर्धा आणि परीक्षेच्या काळातही गुरुवर्य बाबीराव गोडबोले सरांच्या घरातील ज्ञानभांडाराचा मला खूप उपयोग झाला. – उगवतीच्या काळातील ह्या कळा विसरता येत नाहीत .
October 12, 2020
पण त्या दिवशी अशी काही घटना घडली की मी खडबडून जागी झाले आणि मला त्याच्या उपदेशाचे शब्दन् शब्द आठवत होते. असे नक्की काय झाले होते….. अचानक माझी तब्येत बिघडली. हृदयातील धडधड वाढली आणि ती काही केल्या थांबेना. त्यामुळे थेट दवाखान्यात भरती व्हावे लागले.
September 23, 2019
एक एवढासा, पिटुकला, तुच्छ व काहीसा किळसवाणा जीव उंदीर! तो एकटाच आणि त्याच्या विरुद्ध आम्ही दोन माणसं. गनिमीकाव्याने आमचे युद्ध सुरू होते. प्रश्न त्याच्या जीवन-मरणाचा होता. अस्तित्वाची लढाई तो निकराने लढत होता. आम्ही आमची बुद्धी पणाला लावून त्याला नेस्तनाबूत करण्याचा प्रयत्न करत होतो पण तो आमचे सर्व प्रयत्न शिताफीने धुळीला मिळवत होता.
January 5, 2025
हा पुर्ण भाग विंद्य पर्वत रांगेमुळे घनदाट झाडीचा आहे. मंडल्याच्या दक्षीणेलाच प्रसिध्द कान्हा किसली अभयारण्य आहे. कान्ह्याचा हा भाग तसा नर्मदेच्या खुप जवळ नाही पण हे घनदाट जंगल पुर्वी असलेल्या समुद्राच्या जवळते मुळे असु शकते.
October 15, 2020
आजकाल कुठल्याही समारंभाला जा, कुठल्याही पार्टीला जा, अगदी आम्हा बायकांच्या किटी पार्टीला जा कुठेही जा, सगळीकडे एका कॉमन विषयावर लोक बोलत असतात. “बदललेले हे जग आणि आजच्या मुलांचे रहाणीमान.” सगळ्यांची मुले खूप शिकलेली असतात
November 27, 2025

अस्ताव्यस्त पसरलेल्या या स्टेशनवर किती प्लॅटफॉर्म आहेत हे स्टेशनमास्तरला सुद्धा सांगता येणार नाही. किती पूल आहेत तेही मोजावे लागतील. कुठल्या पुलावर चढल्यावर कुठल्या प्लॅटफॉर्मवर उतरता येईल ? कुठे जाता येईल ? सांगता येणार नाही. कोण कुठे अडवील समजणार नाही. गर्दीत काहीही स्वत:च डोक न चालवता चालत राहिलात तरच स्टेशनच्या बाहेर पडू शकाल.
May 7, 2022
ज्या सगुण ईश्वरी स्वरूपाची कल्पना तुमच्या मनात पक्के घर करून असेल तर कदाचित तसेच तुम्हास दिसू शकते वा जाणवू शकते. भाव तसा देव म्हणतात, त्याप्रमाणे परंतू हा प्रयत्न अपूर्ण असाच ठरणारा असेल. तुम्हास असत्याच्या दालनात नेणारा असेल. तुमचे सगुण ईश्वराबद्दलचे ज्ञान आणि त्याचे इच्छीत दर्शन हेच मग तुमचे ध्येय बनते. ईश्वराला जाणण्यापेक्षा त्याच्या दिव्यत्वाला अनुभवने, त्याच्याशी काही क्षणासाठी का होईना तादाल होणे, एकरूप होणे हे अंतीम ध्येय असावे. कारण जाणणे ह्यात कल्पनाविलास व ज्ञान ह्याचे योगदान असेल. ती अनश्चीततेबद्दलची जाण असेल. परंतू त्याला अनुभवने हा सत्याचाच शोध असेल. निर्गुण, निराकार आणि दिव्या शक्तीमध्ये मिसळून जाणे. एक नितांत आनंद, कल्पनातील अनुभव जीवनाचे अंतीम सत्य.समोर कुणीच नसते, तरी जणूकाही सर्व असते. त्यापेक्षा जास्त नसते. सर्वत्र केवळ आनंद, समाधान, शांतता. काय हवय तुम्हाला ह्या पेक्षा जास्त. ह्याचाच शोध बोध तुम्ही आपल्या प्रयत्नाने, तपश्चर्येने घेत होतात. मला फक्त त्या शांततेचा शोध होता,वेध होता, तगमग होती. सारे मिळाल्याप्रमाणे भासत होते. संपूर्ण समाधान. हेच जर सगुण रूपाने मला प्राप्त झाले असते. इष्ट देवतेचे दर्शन झाले असते, इच्छीत इश्वरी रूप माझ्या दृष्टीला पडले असते, तर माझ्या आनंदापुढे इच्छेच्या वा वासनांच्या रूपांत अपेक्षा निर्माण झाल्या असत्या. समोरचा दिसणारा भासणारा सगुण ईश्वर हा जरी भव्य दिव्य असला तरी तो माझ्याच स्वरूपाचा असता, मला त्याच्याशी भावनीक संवाद करण्यामध्ये आनंद वाटला असता. एक रूची निर्माण झाली असती. कुणालाही भेटल्यानंतर मग तो संत महात्मा का असेना होणारा संसारीक संवाद ही नैसर्गीक क्रियाच बनते. मला ते टाळता आले नसते. आणि तशा तथाकथित सगुण ईश्वरी दर्शनाची सत्यता प्रश्नाकींत राहीली असती. त्या मिळणाऱ्या आनंदाला समाधानाची साथ मिळाली नसती.
मला माझ्याच कल्पनेनुसार ध्यान धारणेमध्ये जो ईश्वरी वा दिव्य म्हणा हवे तर अनुभव आला त्याचे वर्णन करणे, मिळालेल्या आनंदाचे समाधानाचे मोजमाप करणे केवळ अशक्यच ठरणारे असेल. फक्त एक झाले तो अप्रतिम मनाच्या शांततेचा क्षण पुन्हा पुन्हा घेण्याचा प्रयत्न केला गेला. मुख्य म्हणजे त्या नितांत आनंद अनुभवाचा, जाणीवेचा पुढे काही वा कोणता प्रवास असू शकेल हा विचारच नष्ट झाला. जे मिळाले, जाणले वा अनुभवले ते अंतीम सत्य आहे. हा विचार दृढ झाला. ह्याहून दुसरे आणखी काही नाही. हेच ते ईश्वरी दर्शन, अंतिम ध्येय, एक नितांत आनंद, समाधान आणि मनाची खरी शांतता. ह्याच विचारात धन्यता पावलो. कुलस्वामिनी श्री.रेणुका देवी आणि गुरू जेरे स्वामी यांचे आभार मानले. त्यांना साष्टांग दंडवत.
डॉ. भगवान नागापूरकर
संपर्क - ९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
March 27, 2016

लीसन कांचेतून दिसणाऱ्या ताऱ्याला सहज “बिली जॅक्सन” हे नांव देते आणि अखेर त्याच नांवाचा डॉक्टर रूग्णवाहिकेंतून तिला वाचवायला येतो. चेटकीणीचे पाव मधे प्रेमिकेच्या आशेचे अचानक निराशेत परिवर्तन झाले तर ह्या कथेत संपूर्ण दु:खद गोष्टी घडत अखेरचे वळण आशादायी करते.
तरूण कर्तव्यदक्ष डॉक्टर चार चार पायऱ्या ओलांडत जिना चढून जातो रूग्णवाहिकेत तिला खाली ठेवत नाही आणि तिला प्रयत्नांची पराकाष्ठा करून उपचार करत असतो.
July 6, 2022
February 10, 2015
मीनाकुमारीच्या कारकिर्दीतील सर्वोत्कृष्ट चित्रपट ‘साहिब बीवी और गुलाम’ हा होता. तिला बारा चित्रपटांसाठी फिल्मफेअरचं नामांकन मिळालं होतं, त्यांपैकी चार चित्रपटांसाठी हा पुरस्कार मिळाला. तिला शायरी लिहिण्याचा छंद होता. तिच्या शायरीने भरलेल्या डायऱ्या आज गुलजारजींकडे शाबूत आहेत.
June 21, 2022
Copyright © 2025 | Marathisrushti