नामवंत लेखक, नवोदित लेखक, ऑनलाईन लेखक यांच्या कथा, कविता, कादंबरी, प्रवासवर्णनासहित भरपूर साहित्य.
२०१५ हे वर्ष मला बरेच काही द्यायचे असे ठरवून उजाडले. 'ठाणे नगर विकास मंच' ही संस्था दरवर्षी विविध क्षेत्रात काम करणाऱ्या पाच मान्यवरांना 'ठाणे नगररत्न' पुरस्काराने सन्मानित करते. ठाणे शहराचे माजी उपमहापौर आणि ठाणे नगर विकास मंचचे अध्यक्ष माननीय श्री. सुभाष काळे यांनी फोन करून त्यांच्या ऑफिसमध्ये बोलावून घेतले.
“अनिरुद्धजी, कलाक्षेत्रातील या वर्षीच्या ठाणे नगररत्न पुरस्कारासाठी आमच्या कमिटीने तुमचे नाव निश्चित केले आहे. गडकरी रंगायतनमध्ये एका मोठ्या समारंभात हे पुरस्कार दिले जातात. तेव्हा आपण या समारंभात हा पुरस्कार स्वीकारण्यासाठी उपस्थित राहाल याचे संमतीपत्र सही करून द्या. सुभाषजी म्हणाले. मी त्यांच्याकडे पहातच राहिलो. “संमतीपत्र सही करून देता ना?" सुभाषजींच्या या प्रश्नाने मी भानावर आलो. आत्तापर्यंत अनेक पुरस्कार मला दिल्ली आणि मुंबईत मिळाले होते. माझ्या ठाणे शहरात मिळणारा हा मोठा पुरस्कार होता.
“माझ्या ठाणेकर रसिकांसमोर आपण मला पुरस्कार देणार आहात. आपले आभार कसे मानू? यासाठी कोणत्याही पत्रावर सही करून देण्याची माझी तयारी आहे." मी आनंदाने म्हणालो. "पण माझे खरे काम तर पुढेच आहे. या पुरस्कार वितरण सोहळ्यासाठी तुमचा गाण्याचा कार्यक्रम करावा आणि त्यात तुम्हाला पुरस्कार द्यावा अशी माझी इच्छा आहे." सुभाषजी म्हणाले. हा माणूस एका मागोमाग एक सुखद धक्के देत होता. तेही अगदी शांतपणे.
“तुम्ही खरे बोलत आहात की माझी गंमत करता आहात?" मी विचारले. “अहो गंमत कशी करेल? खरंच विचारतो आहे." ते शांतपणे म्हणाले.
“सुभाषजी, मला एक हजार जाहीर कार्यक्रम पूर्ण करायचे आहेत. ९८० पर्यंत मी पोहोचलो आहे. पुरस्काराइतकाच मला पुढील प्रत्येक कार्यक्रम महत्त्वाचा आहे." मी उत्तरलो.
“तर मग या तुमच्या वाटचालीतील पुढचा कार्यक्रम ठाणे नगर विकास मंचसाठी असेल. लवकरच वर्तमानपत्रात या पुरस्कारांची घोषणा होईल.' सुभाषजी म्हणाले. एका दिवसात या माणसाने मला बरेच काही दिले होते. कार्यक्रमांसाठी वर्षाच्या सुरुवातीलाच एक 'ट्रिगर' दिला होता. उत्साह वाढवला होता आणि पुरस्कार देऊन माझा आत्मविश्वास उंचावला होता. या काळात मला त्याची अत्यंत गरज होती. कधी कधी कलाकार एकदम हळवा होऊन जातो. कलाक्षेत्रात वाटचाल करताना एकदम त्याची शक्ती संपून जाते. या वेळी 'तू पुढे चल. आमचा तुला पाठिंबा आहे. आम्ही तुझ्या कलेवर मनापासून प्रेम करतो.' अशा शब्दांची त्याला फार आवश्यकता असते. माझे काहीचे असेच झाले होते. या वेळी सुभाष काळे आणि ठाणे नगर विकास मंचने माझ्यावर दाखवलेला विश्वास मी कधीच विसरू शकणार नाही.
लवकरच हे पुरस्कार वर्तमानपत्रात जाहीर झाले. मग काय, माझ्यावर अभिनंदनाचा वर्षाव झाला. २२ फेब्रुवारी २०१५ रोजी 'ठाणे नगररत्न पुरस्कार वितरण सोहळा' गडकरी रंगायतनमध्ये आयोजित करण्यात आला. डॉ. मुरलीधर गोडे, डॉ. मंजूषा गोखले. श्रीधर नेवाळकर आणि नीता देवळालकर हे इतर क्षेत्रातील पुरस्काराचे मानकरी होते. 'फर्माईश' या माझ्या हिंदी - मराठी गीत - गझलच्या कार्यक्रमाने पुरस्कार वितरण सोहळ्याला सुरुवात झाली. नंतर माझ्या गाण्याच्या कारकिर्दीचा आढावा घेणारी छोटी फिल्म दाखवण्यात आली. याचे संकलन नरेन्द्र बेडेकर यांनी केले होते. महाराष्ट्र राज्याचे अर्थमंत्री माननीय सुधीर मुनगंटीवार कार्यक्रमाचे अध्यक्ष होते. सुप्रसिद्ध गायक अजित कडकडे यांना या समारंभासाठी खास आमंत्रित करण्यात आले होते. त्यांच्या हस्ते कलाक्षेत्रासाठीचा २०१५ सालचा 'ठाणे नगररत्न पुरस्कार' मला देण्यात आला. त्यांच्यासारख्या महान गायकाच्या हस्ते हा पुरस्कार मिळाल्यामुळे त्याचे महत्त्व माझ्यासाठी अनेक पटींनी वाढले. यानंतर अजित कडकडे यांनी गाणे सादर केलेच, पण एक छोटे भाषण देखील केले. 'अनिरुद्ध, आता तू गाण्याचे विविध प्रकार उत्तम तऱ्हेने गाऊ शकतोस. तेव्हा एका गायन प्रकारात अडकून न राहता विविध स्टाईलची गाणी गा.' असा संदेश त्यांनी दिला. माझी गाण्याची कारकीर्द त्यांनी जवळून पाहिली होती. त्यांचा तो अधिकार होता. या समारंभाला मोठ्या संख्येने उपस्थित राहून ठाणेकर रसिकांनी माझे कौतुक केले.
-अनिरुद्ध जोशी
August 20, 2022
शालेय जीवनापासून माझ्या सतत सोबतीला असलेला आणि माझ्या सुख-दुःखाच्या भावनांना कागदावर उतरविताना लेखणीस्वरुपात अविरत साथ देणारा शाईचा पेन हरवल्याने मनात नाराजी ओसंडून वाहिली. त्या लेखणीचा सहवास असा अचानक कायमचा संपेल असे कधी मनात सुद्धा वाटले नव्हते.
July 4, 2012
माझ्या आगामी “झंझावात” या छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावरील ऐतिहासिक कादंबरीतील काही भाग इथे प्रस्तुत करत आहे.
April 3, 2017
ती गाडीतून खाली उतरली पाठोपाठ दोन मुले आणि एक म्हातारी बाई पण उतरली,ती तिची सासू असणार असा मी अंदाज केला होता , ती सासूच होती. ते सर्वजण जवळ आले तेव्हा ती सून हसली माझ्याकडे बघून, मी पण हसले. पण तिच्या सासूला जेव्हा बघितले तेव्हा लक्षात आले ह्या बाईना कुठेतरी आधी, पूर्वी पाहिले आहे, ती सासूपण हसली ,
ती पण माझ्याकडे बघत होती.
April 18, 2020
बरेच साहित्यिक सुध्दा यमक जुळवण्यासाठी व्याकरणाची वाट लावतात. मला कुणावर टीका करायची नाहीये. पण असे शब्द वापरल्याने ते रूढ होत जातात आणि पुढच्या पिढीवर त्याचा दुष्परिणाम आढळतो. परिणामी भाषा बिघडते. पूर्वी थोडंसं शिक्षण घेणाऱ्यांचे सुध्दा भाषा आणि लिखाण व्याकरणदृष्ट्या अचूक आणि उत्कृष्ट असायचे. आता पदवीधरांचे सुध्दा नसते.
May 26, 2019
कुछ मीठा हो जाय’ असो कि ‘पप्पू पास हो गया’ असो, कॅडबरी ब्रँड जाहिरातीतही आपला एक उच्च असा दर्जा सांभाळून आहे. ‘कुछ खास है हम सभी में’ ची सिरीज आठवते ? सुमारे 15-20 वर्षांपूर्वीची ती जाहिरात मालिका रसिकांना विसरणं अशक्यच. त्या मालिकेला जागतिक स्तरावरील उत्कृष्ट जाहिरातीचा प्रथम पुरस्कार मिळाल्याचं कुठंतरी वाचण्यात आलं होतं.
November 19, 2019
ज्ञानेश्वरीतील पहिल्या काही ओव्या वाचल्या कि माऊलींच्या प्रतिभेची ताकत लक्षात येते. आणि आपण किती नकळतपणे आपला देव अक्षर रुपात पाहू लागतो, याची आपल्याला कल्पनाही येत नाही.
September 8, 2022
अवध नगरीचा राजा कुरसेन नावाप्रमाणेच अतिशय क्रूर होता. राज्यातील जनतेवर त्याने अनेक अन्याय-अत्याचार तर केलेच शिवाय शेजारील देशावर अनेकदा आक्रमणे करून तेथील राजा व प्रजेला जेरीस आणले. सत्तेबरोबरच तो संपतीचा भुकेला होता. त्यामुळे एकेका सुवर्णमुद्रेसाठी तो हिंसाचार करायला मागेपुढे पहायचा नाही. संपत्तीचे त्याचे हे वेड वरचेवर वाढतच होते. अवध नगरीच्या बाहेरच रस्त्याला लागून असलेल्या एका झोपडीत एक साधू रहात होता. अखंड ईश्वराचे स्मरण व गोरगरिबांना अडचणीच्या वेळी मदत एवढेच त्याचे ध्येयकार्य होते. त्यामुळे अनेकजण त्याच्या दर्शनाला येत व त्याचा उपदेश ऐकून जात. एके दिवशी सायंकाळी एक श्रीमंत गृहस्थ त्या साधुची कीर्ती ऐकून तेथे आला. त्याने साधूमहाराजाचे दर्शन घेतले व जाताना त्याने एक सुवर्णमुद्रा साधुच्या पुढे ठेवली.
निरीच्छ वृत्तीचे साधू महाराज त्याला म्हणाले, मला सुवर्णमुद्रा नको. तूच कोण्या गरजू माणसाला दे. त्यावर तो श्रीमंत गृहस्थ म्हणाला की मी तुम्हाला ती श्रद्धेने दिली. त्यामुळे तुम्हीच तिचा योग्य विनियोग करा. थोड्या वेळातच रस्त्यावरून राजा क्रुरसेनाची स्वारी येत होती. बरेचसे सैनिक त्याचाबरोबर होते. राजा क्रुरसेन स्वतः हत्तीवर अंबारीत बसला होता. राजाचा हत्ती झोपडीजवळ आला तसा तो साधू झोपडीबाहेर आला व त्याने त्याला दिलेली सुवर्णमुद्रा राजावर फेकून मारली. ती राजाच्या डोक्याला लागून अंबारीत पडली. ते पाहून राजा खूपच संतापला. तो खाली उतरला व त्याने त्या साधुला त्या कृत्याचा जाब विचारला. त्यावर साधू राजाला म्हणाला, मी मुद्दामच तुला सुवर्णमुद्रा फेकून मारली. कारण धनाचा तू लोभी आहेस त्यासाठी तू अनेकांवर अत्याचार केलेस म्हणून तुला ती सुवर्णमुद्रा देत आहे. ते ऐकून राजा अधिकच संतापला व त्याने साधूला पकडून ठार मारण्याचा सैनिकांना आदेश दिला. मात्र साधू अतिशय शांत होता.
राजाबरोबर असलेल्या प्रधानाला त्या साधुची योग्यता माहीत होती. त्यामुळे त्याने लगेच राजाला साधूमहाराजांना पकडू नये अशी विनंती केली. कारण मनात आणले तर त्या साधुची राजाचा सर्वनाश करायची तयारी होती. प्रधानाने राजाला समजावून सांगितल्यावर राजालाही साधूच्या दिव्यत्वाची प्रचिती आली व त्याने साधूचे पाय धरले. त्या वेळी साधूने त्याला संपत्तीसाठी हिंसाचार न करण्याचा सल्ला दिला व तो प्रमाण मानून राजा तेथून माघारी गेला.
December 29, 2017
कवितेचा कीड़ा डोक्यात शिरल्यावर काय होते ते – स्वत:चा खरा अनुभव!!!
March 1, 2011
लहानपणी सांगलीला वडिलांच्या (प्रा. आनंद असनारे) शिस्तीमुळे रियाझाला बालसुलभ अळंटळं करणारी (वय वर्षे ७-८) मंजिरी, त्यानंतर ९३-९४ साली तत्कालीन लक्ष्मी क्रीडा मंदिरात तब्येतीने प्रातःकालीन रागांची मैफिल करणारी मंजिरी आणि आज आत्मविश्वासपूर्वक राग -संगीत सादर करणाऱ्या सौ मंजिरी असनारे -केळकर यांचा प्रवास मी जवळून पाहिला आहे.
June 6, 2022
Copyright © 2025 | Marathisrushti