नामवंत लेखक, नवोदित लेखक, ऑनलाईन लेखक यांच्या कथा, कविता, कादंबरी, प्रवासवर्णनासहित भरपूर साहित्य.

आज विजयचा पाय प्रचंड दुखत होता. त्यात मरणाच्या थंडीमुळे अधिकच त्रास होत होता. पायात थोडी सुजही होती. शरीरातील सर्व सांध्यात थोड्या थोड्या वेदना जाणवत होत्या. कशामुळे काय दुखतंय तेच कळत नव्हतं. त्यामुळे विजय लांब पाय करून खुर्चीत बसला होता.
March 1, 2022
भर थंडीच्या दिवसात अकबर आणि बिरबल तळ्याभोवती फेऱ्या मारत होते. बिरबलच्या मनात विचार आला की, पैशासाठी माणूस काहीही करू शकतो. बिरबलने आपल्या मनातले विचार व्यक्त केले. अकबराने तत्काळ त्याचे बोट पकडले आणि तळ्यातल्या पाण्यात बुडवले; बिरबलने चटकन आपले बोट मागे घेतले, कारण तळ्यातल्या थंड पाण्याने ते गारठले होते.
December 14, 2023

पोरगं बाहेर आलं. हातातल्या मळक्या कपड्याने त्याने टेबल साफ केलं आणि उचलावी की उचलू नये असा विचार करत ती नोट त्याने गल्ल्यावर नेऊन दिली. ‘क्या गंदा काम करता है!’ एवढच पुटपुटत तो आत निघून गेला.
June 19, 2022
इकडे टमरेल वाल्याला कळलं काय झालं तो एकदम हैराणच झाला. आधी तर तो सौमित्र ला शिव्या द्यायला लागला पण नंतर त्याच्या लक्षात आलं की शिव्या देऊन काही उपयोग नाहीये. आणि अशा अवस्थेत त्याला सौमित्रच्या मागे पळता काय चालता पण येणं शक्य नव्हतं आणि पुन्हा तशाच अवस्थेत तो आता बऱ्यापैकी वाहतूक सुरु झालेला रस्ता पार करावा लागला असता.
August 30, 2022
इतका वेळ शांतपणे ऐकणारा मिलिंद भारावून बोलू लागला, ‘अप्पा. शिवाजी महाराज आणि सावरकर खरोखरच ग्रेट होते. अतिशय प्रतिकूल परिस्थिती आणि मृत्यूचे सावट सतत डोईवर असताना दोघांनी पेशन्स राखून, प्रसंगी दोन पावलं मागे सरून, मिळालेल्या संधीचा लाभ घेऊन, चकवा देऊन, संकटाशी दोन हात केले होते.
June 13, 2022
मुक्काम पोस्ट एक हजारमुळे माझ्याकडे असलेल्या मर्यादित वेळेची मला प्रो. अरुण गाडगीळ याने भिवंडी कॉलेजसाठी माझा कार्यक्रम आयोजित केला. महाराष्ट्र राज्य अल्पबचत योजनेतर्फे केंद्रिय अपंग कर्मचाऱ्यांच्या मदतीसाठी मान्यवर गायिका पुष्पा पागधरे, चंद्रशेखर गाडगीळ आणि श्याम हर्डीकर यांच्याबरोबर खोपोली, रोहा आणि ठाणे येथे तीन कार्यक्रम केले. या मदतीसाठी अजून दोन कार्यक्रम पालघर आणि डहाणू येथे सादर केले. या कार्यक्रमांना सुप्रसिद्ध अभिनेते जॅकी श्रॉफ आणि मुकेश खन्ना उपस्थित होते. ठाणे महानगरपालिकेच्या नवीन इमारतीच्या उद्घाटनप्रसंगी मुख्यमंत्री शरद पवार, अर्थमंत्री सुशीलकुमार शिंदे, ठाण्यातील शिवसेनेचे सर्वेसर्वा आनंद दिघेसाहेब आणि महापौर वसंत डावखरे यांच्या विशेष उपस्थितीत माझा कार्यक्रम झाला. कलर सोसायटी ऑफ इंडियाच्या अॅन्युअल कॉन्फरन्समध्ये भक्तीसंगीताचा कार्यक्रम मी मुंबईच्या हॉटेल लीला येथे सादर केला. सुप्रसिद्ध कवी शांताराम नांदगावकर यांच्या 'रजनीगंधा' या कार्यक्रमात मान्यवर गायक शरद जांभेकर, अरुण इंगळे, शिवानंद पाटील, सुहासिनी चितळे, चंद्रशेखर गाडगीळ यांच्यासोबत मी गायलो.
याचवेळी एक वेगळीच संधी माझ्याकडे चालून आली. सुप्रसिद्ध लेखक श्री. शशिकांत कोनकर यांनी लिहिलेले एक बालनाट्य 'उंदीर मामा आला कामा' रंगमंचावर येणार होते. या नाटकाचे संगीत दिग्दर्शन मी केले व त्यातील तीनही गाणी माझ्या आवाजात रेकॉर्ड केली. याबद्दल मी शशिकांत कोनकर यांचा कायम ऋणी राहीन. कारण या संगीत दिग्दर्शनाच्या अनुभवाचा फायदा मला पुढील गाणी गाताना झाला. संगीतकार दत्ता डावजेकर यांच्या संगीत दिग्दर्शनाखाली 'गंगेच्या काठी' या टीव्ही फिल्मसाठी एक मराठी काव्य 'हरवले गंगेच्या काठी' हे ग.दि. माडगूळकरांचे अप्रतिम गाणे माझ्या आवाजात रेकॉर्ड झाले.
माझ्या आयुष्यातील महत्त्वाची घटना यावेळी घडली. माझे लग्न ठरले. माटुंगा रोड दादर येथे राहणारी विनीता पटवर्धन नावाची देखणी मुलगी माझ्या आयुष्यात आली. आम्ही अनेकदा भेटलो. तिला गाण्याची खूप आवड होती. पण गाणे आवडणे आणि एखाद्या गायकाची पत्नी होऊन त्याच्याबरोबर सतत गाणे अनुभवणे ह्या खूपच वेगळ्या गोष्टी होत्या. यातील फरक मी तिला समजावून सांगितला. ती किती वेळ गाणे ऐकू शकते हे पाहण्याची संधी मला लवकरच मिळाली. निर्माते सचिन पारेकर आणि संजय पारेकर यांच्या 'शेजारी-शेजारी' या मराठी चित्रपटाच्या रेकॉर्डिंगची तयारी सुरू झाली होती. या चित्रपटात मी आघाडीचे मराठी अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे यांच्यासाठी पार्श्वगायन करणार होतो. अशोक सराफ यांच्यासाठी सुरेश वाडकर गाणार होते. संगीतकार विश्वास पाटणकर यांनी खूपच मोठा विश्वास माझ्यावर दाखवला होता. या गाण्यासाठी खूपच मेहनत ते माझ्यावर घेत होते.
या चित्रपटाच्या पहिल्या गाण्याच्या (एक बायको तुझ्यासारखी नशीबाने भेटली) रेकॉर्डिंगची तारीख लवकरच पक्की झाली. दादरच्या श्री साऊंड स्टुडिओमध्ये दिवसभर या गाण्याचे रेकॉर्डिंग होणार होते. आघाडीचे पार्श्वगायक सुरेश वाडकर, अनुराधा पौडवाल यांच्याबरोबर मी आणि प्रज्ञा खांडेकर हे गाणे गाणार होतो. या रेकॉर्डिंगचे निमंत्रण मी विनीताला दिले. ती आनंदाने तयार झाली.
सकाळी दहा वाजता सुरू झालेले रेकॉर्डिंग रात्री नऊ वाजता संपले. जराही न कंटाळता संपूर्ण दिवस विनीताने रेकॉर्डिंग एन्जॉय केले. माझा निर्णय पक्का झाला.
५ मार्च १९९० रोजी माझे लग्न झाले. माझे सासरे डॉ. व्यंकटेश पटवर्धन हे प्रथितयश डॉक्टर होते. मेहुणे विद्याधर पटवर्धन हे गुंतवणूक सल्लागार म्हणून स्वतंत्र व्यवसाय करीत होते. विनीताची मोठी बहीण वैजयंती केतकर ही पुण्याला रहात होती. मी एकुलता एक मुलगा असल्याने मला सख्खे भावंड नव्हते. आता पटवर्धन परिवाराचा मी जावई म्हणून सदस्य झाल्यामुळे माझी ती कमी पुरी झाली. माझे साडू मकरंद केतकर यांनी तर थोरल्या भावासारखे माझ्यावर प्रेम केले व आजही करतात.
८ मार्च १९९० रोजी आमच्या लग्नाचा स्वागत समारंभ ठाण्याच्या सेंट जॉन दी बाप्टीस्ट स्कूलच्या भव्य पटांगणावर थाटात साजरा झाला. नातेवाईक आणि मित्रमंडळींसह अनेक नामवंतांची उपस्थिती या समारंभाला लाभली. ठाण्याचे कलेक्टर श्री. पिंगुळकरसाहेब, आयुक्त सुरेश जोशी, ठाण्यातील शिवसेनेचे सर्वेसवा आनंद दिघे साहेब, महाराष्ट्र विधानपरिषदेचे उपसभापती माननीय वसंत डावखरे यांच्यासह गायिका रंजना जोगळेकर, मृदुला दाढे-जोशी, शोभा जोशी, गायक विनायक जोशी, चंद्रशेखर गाडगीळ, सुप्रसिद्ध शहेनाईवादक शैलेश भागवत, सतारवादक शशांक कट्टी, संगीतकार प्रभाकर पंडित, कवीवर्य शंकर वैद्य आणि मंगेश पाडगावकर यासारखे अनेक मान्यवर समारंभाला उपस्थित होते. माझे वडील लायन्स क्लबचे डिस्ट्रीक्ट गव्हर्नर असल्याने अनेक लायन्स क्लबचे पदाधिकारीही समारंभाला आवर्जून उपस्थित होते. ठाणे वैभवचे संपादक मिलींद बल्लाळसारखे माझे अनेक पत्रकार मित्र समारंभात सामील झाले होते.
माझ्या जीवनाची नवी सुरुवात झाली. लग्नानंतर हनीमूनसाठी आम्ही पुण्याला गेलो. वाचून थोडेसे आश्चर्य वाटेल, पण गोष्ट खरी आहे. कारण पुण्याला संगीतकार राम पेठे यांच्याबरोबर माझी गाण्याची रिहल्सल होती. लग्नसमारंभाच्या गडबडीत अनेक दिवस मी गाण्यापासून दूर होतो. त्यामुळे आता वेळच नव्हता. लवकरच मुंबई दूरदर्शनसाठी मी राम पेठे यांच्या संगीत दिग्दर्शनाखाली 'शब्दांच्या पलीकडले' या कार्यक्रमात गायलो. या कार्यक्रमातील आमच्या समोरील प्रेक्षकात माझी पत्नी प्रियांका आणि माझे सासू-सासरे उपस्थित होते.
लवकरच प्रियांका आमच्या घरात रूळली आणि आमच्या कंपनीच्या कामात सहभागी झाली. तेव्हापासून आजपर्यंत सतत तिची साथ मला लाभली आहे. याही बाबतीत मी नशीबवान ठरलो. कारण घरात जर अशांती असेल, तर कोणीही आपल्या क्षेत्रात काम करताना पूर्ण योगदान देऊ शकत नाही. आपल्या जोडीदाराचे सहकार्य असेल तरच आयुष्याच्या परीक्षेत आपले मार्क वाढतात. त्याचप्रमाणे जोडीदाराचे सहकार्य नसेल तर निगेटीव्ह मार्कंग सिस्टीमप्रमाणे आपले मार्क कमी होतात. आईवडिलांनी पत्रिका पाहून आमचे अरेंज मॅरेज झाले. पण लग्नानंतर प्रेमविवाह झाला.
लग्नानंतर आमच्या कंपनीच्या मार्केटिंगमध्ये मी जातीने लक्ष घातले आणि त्यासाठी भारतभर फिरलो. भाऊ आणि प्रियांका ऑफिस सांभाळत असल्याने मला ते शक्य झाले.
दरम्यानच्या काळात महाराष्ट्राबाहेर बडोदा, अहमदाबाद, इंदौर, कलकत्ता आणि दिल्ली येथे मी गझलचे कार्यक्रम केले. आता कार्यक्रमांची संख्या थोडी कमी होत होती, पण भौगोलिक कक्षा वाढत होत्या.
त्याचे दुसरे कारण असे होते की 'शेजारी शेजारी'च्या पुढील गाण्यांची तयारी जोरात सुरू होती. लवकरच या चित्रपटाचे टायटल साँग मी सुरेश वाडकरांबरोबर रेकॉर्ड केले आणि सुप्रसिद्ध गायिका अनुराधा पौडवाल यांच्याबरोबर एक द्वंद्वगीतही रेकॉर्ड केले.
सुप्रसिद्ध गायक रविंद्र साठे यांच्यामुळे अजून एका रेकॉर्डिंगची संधी मला मिळाली. त्यांनी मला एच.एम.व्ही. स्टुडिओत बोलावून घेतले आणि संगीतकार रघुनाथ सेठ यांची ओळख करून दिली. रघुनाथजी एच.एम. व्ही.साठी दुर्गा चरित्राचे दोन हिंदी अल्बम्स बनवत होते. त्यात गाण्याची संधी त्यांनी मला दिली. या अल्बममध्ये मी रविंद्र साठे, दिलराज कौर, आनंदकुमार सी, घनश्याम वासवानी आणि विनोद सेहगल यांच्याबरोबर गायलो. संपूर्ण महिनाभर एच.एम.व्ही.च्या स्टुडिओत याचे रेकॉर्डिंग सुरू होते. ख्यातनाम संगीतकार यशवंत देव यांनी सारडा ट्रस्टसाठी संपूर्ण ज्ञानेश्वरीचे रेकॉर्डिंग केले. अनेक मान्यवर गायक-गायिकांबरोबर या प्रोजेक्टसाठीही मी अनेक ओव्या गायलो. रेकॉर्डिंगचा भरपूर अनुभव मला मिळत होता आणि भरपूर शिकायला मिळत होते. कारण कार्यक्रमात गाणे आणि रेकॉर्डिंगसाठी गाणे यात जमीन-अस्मानचा फरक असल्याचे मला जाणवले. रेकॉर्डिंगसाठी गाताना गायकाला अचूकता लागते, तर कार्यक्रमासाठी गाताना गाणे रंगवण्याची गरज असते. मला रसिकांचा प्रतिसाद घेत गायला आवडते तर रेकॉर्डिंग रूममध्ये तुमच्यासमोर रसिक प्रेक्षक नसतातच.
यानंतर एअर इंडिया एक्झिक्युटीव्ह क्लबसाठी हॉटेल जुहू सेन्टॉर, मुंबई येथे गझल नाईट सादर केली. याच सुमारास भिवंडीचे श्री. संतमाऊली शांताराम भाऊ जयवंत यांच्या श्री एकनाथ मंदिर संस्थानचे बांधकाम सुरू झाले होते. या पवित्रस्थानी एकनाथ षष्ठीच्या उत्सवात दरवर्षी मी कार्यक्रम गात असल्याने आयोजकांनी या संस्थानच्या मदतनिधीसाठी एक कार्यक्रम करण्याची कल्पना मांडली. यामुळे या कार्यात माझाही खारीचा वाटा असणार याचा मला अतिशय आनंद झाला. कार्यक्रमाची संपूर्ण जबाबदारी मी घेतली. लवकरच ठाण्याच्या गडकरी रंगायतनमध्ये सुप्रसिद्ध गायिका अनुराधा मराठे यांच्यासह 'देवाचिये द्वारी' हा अभंगाचा कार्यक्रम सादर केला. याचे निवेदन आणि निरूपण पुण्याच्या सुप्रसिद्ध लेखिका श्रीमती वीणा देव यांनी केले. त्यावेळी टेलिव्हिजनवर रमाबाईंच्या भूमिकेत गाजत असलेली अभिनेत्री मृणाल देव (सध्याच्या मृणाल कुलकर्णी) हिची उपस्थिती कार्यक्रमाला लाभली आणि कार्यक्रम अत्यंत यशस्वी झाला. श्री एकनाथ मंदिर संस्थानला भरीव मदतनिधी मिळाला. एकूणच या कार्यक्रमाने मला फार समाधान लाभले. कोणत्याही मदतकार्यात आपण सर्वजण आपल्याला जमेल तितकी आर्थिक मदत करतोच, पण आता एक गायक या नात्याने मला त्यापुढे जाऊनही थोडी मोठी मदत करता येऊ शकते हे मला जाणवले.
यानंतर 'संकल्प'च्या कोजागिरी पौर्णिमेनिमित्तच्या कार्यक्रमात सुरेश वाडकर, विनय मांडके, रंजना जोगळेकर, मिलिंद इंगळे यांच्यासोबत आक्सा बीच, मालाड येथे गायलो आणि त्यानंतर के.जी. ट्रस्ट अॅन्ड फाऊंडेशनच्या मदतीसाठी इस्कॉन ऑडिटोरियम, जुहू येथे २४ नोव्हेंबर १९९१ रोजी गझल नाईट सादर केली.
-अनिरुद्ध जोशी
July 12, 2022
वृक्षांच्या रक्षणासाठी वृक्षांवर देवतांचे निवास स्थान आहे, ही परिकल्पना लोकांच्या मनात रुजविण्यचा प्रयत्न आपल्या प्राचीन ऋषिंनी केला. वट वृक्षावर –ब्रह्मा, विष्णु आणि कुबेर….
June 30, 2013
जहाल क्रांतिकारक श्री अरविंद यांच्याविरोधात ब्रिटिशांनी कारवाईची तयारी सुरू केली तेव्हा त्यांच्या अंतर्मनात माणसाच्या आत्मिक स्वातंत्र्याचा विचार प्रकटला. त्याकरिता योगाभ्यासासाठी म्हणून ते फ्रेंचांची वसाहत असलेल्या पॉंडिचेरीला आले. तिथला त्यांचा मुक्काम म्हणजे खरे तर प्रथम अज्ञातवासच होता. तरी त्यांचे वास्तव्य ब्रिटिश गुप्तचरांच्या लक्षात आले आणि त्यांच्या हेतूंबद्दल संशय असल्याने ब्रिटिश तसेच फ्रेंच गुप्तहेरांची त्यांच्यावर पाळतही होती.
नंतर अरविंदांनी आपले वास्तव्य उघड केले आणि अनेक मान्यवर त्यांच्या भेटीलाही जाऊ लागले. त्यामुळे अरविंदांविरुध्द काही पुरावा उभा करावा आणि त्यांना ताब्यात घ्यावे, यासाठी ब्रिटिशांनी कट रचला. ब्रिटिश गुप्तहेरांनी काही बनावट छायाचित्रे, नकाशे तसेच काही पत्रे एका पत्र्याच्या डब्यात भरली व तो डबा अरविंदांचे मित्र सी.व्ही.व्ही.एस अय्यर यांच्या घरातील विहिरीत टाकून दिला आणि फ्रेंच पोलिसांना धाड टाकण्यास सांगितले. मात्र त्याआधीच अय्यर यांची मोलकरीण विहिरीतून पाणी काढत असताना तो डबा वर आला. त्या डब्याबाबत अरविंदांनीच फ्रेंच पोलिसांना वर्दी दिली. फ्रेंच पोलीस आले व त्यांनी अरविंदांच्या खोलीची झडती सुरू केली. त्या खोलीत बरीच पुस्तके कागदपत्रे होती. त्यातील काही कागदपत्रांवर ग्रीक तसेच लॅटिन भाषेत लिहिलेले आढळले. अरविंदांना या भाषादेखील येतात, हे पाहून त्या फ्रेंच अधिकार्याला आश्चर्य वाटले. योगी अरविंदांविषयी कृतज्ञता व्यक्त करुन निघून गेला.
पण या धाडीमुळे अरविंदांनी अल्जेरियासारख्या देशात जाऊन राहावे, असे काही जणांचे मत पडले. तमीळ राष्ट्रकवी सुब्रह्मण्यम भारती यांनीही तसा आग्रह केला. अरविंदबाबू शांतपणे म्हणाले, कितीही धाडी पडल्या तरी मी येथून क्षणभरही हलणार नाही.
पॉंडिचेरी फ्रेंचाच्या ताब्यात का असेना पण परक्या अल्जेरियापेक्षा आपल्या मायभूमीतील हा वनवास ही त्यांना प्रिय होता. मातृभूमीवरचे हे प्रेम पाहून सार्यांचीच अंत:करणे हेलावली.
February 25, 2017

स्टीव्हनसनचे वाङ्मय खूप प्रसिध्द आहे. डाॅक्टर जेकील आणि हाईड ही त्याची दीर्घकथा सर्व वाचकांच्या व सिनेरसिकांच्या परिचयाची आहे. अवघ्या ४४ वर्षांच्या (आतापर्यंतचे तीनही लेखक ॲास्कर वाईल्ड ४६, अँटन चेकॉव्ह ४४ आणि स्टीव्हनसन ४४ अल्पवयीच म्हणायचे) आंतच चौदा कादंबऱ्या आणि सहा कथासंग्रह लिहिले.
त्याने अरेबियन नाईटस् या नांवाखाली युरोपबद्दल सुरस कथा लिहिल्या. ट्रेझर आयलँड ही त्याची कादंबरीही प्रसिध्द आहे.
March 16, 2022
गणपती विसर्जन झालं होतं. आतां सर्व नवरात्रीची वाट पहात होते. देवीचे पूजन अनेक ठिकाणी घट बसवून होई.
देवीची मंदिरे तर देवीचा महोत्सवच करतात. अशा वेळेला यशवंतांकडे एका देवीच्या मंदीराचे विश्वस्त (Trustee) आले होते. ते चौघे होते.
January 28, 2024
Copyright © 2025 | Marathisrushti