नामवंत लेखक, नवोदित लेखक, ऑनलाईन लेखक यांच्या कथा, कविता, कादंबरी, प्रवासवर्णनासहित भरपूर साहित्य.
सर्व पिल्ले बाहेर येताच त्यांच्या आईने भर दुपार असून,सर्व प्रथम आपले पंख पसरले. सारी पिल्ले पंखाखाली दाटीवाटीने शिरली. आईने त्यांना पंखात घेतले. जमिनीवर खाली बसून आपली उब देऊन “मी आहे बाळांनो, मी आहे” असा विश्वास दिला. दोन चार मिनिटे तशीच राहून नंतर उठली आणि पिल्लांचा चिवचिवाट आपल्याभोवती वागवत चरायला निघाली.
June 7, 2022
मराठी चित्रपटांत ललिता पवार, अलका इनामदार, आशा पाटील, सरोज सुखटणकर, लता अरूण, वत्सला देशमुख, माई भिडे, हंसा वाडकर, सुमती गुप्ते, इत्यादींनी ‘आई’ साकारली आहे. नव्या पिढीनुसार मराठी चित्रपटांतील आजची आई बदललेली आहे. तिनं नवीन टेक्नॉलॉजी समजून घेतलेली आहे. आयटी क्षेत्रात काम करुन ती घर-संसार करते आहे. इंटरनेट, फेसबुक, व्हाॅटसअप, ट्वीटर, ब्लाॅग ती लीलया हाताळते आहे. माॅड असली तरी ती काळाप्रमाणे चालणारी एक ‘आई’च आहे.
June 21, 2021
काही माणसं ‘हृदयात’ घर करतात तर काही ‘मनात’ घर करतात… गणेशने मात्र त्याची गाणी ऐकणारांच्या ‘कानात घर’ केलंय.
January 11, 2022
तो रविवार मला अजूनही आठवतो आणि डोळ्यातून अलगद पाणी येते. कारण तो काळ आमच्यावरही आला होता पण त्यास प्रेमाने हरविले. आज आमच्या लग्नाला दहा वर्षे पूर्ण झाली. अशा संकटास दोघेही चोख प्रत्युत्तर देत आहोत,.
April 29, 2022
तरुण आहे रात्र अजुनी राजसा निजलास का रे ?
एवढ्यातच त्या कुशीवर तू असा वळलास का रे ?
अजुनही विझल्या न गगनी तारकांच्या दीपमाला;
अजुन मी विझले कुठे रे ? हाय ! तू विझलास का रे ?
सांग, ह्या कोजागरीच्या चांदण्याला काय सांगू ?
उमलते अंगांग माझे.. आणि तू मिटलास का रे ?
बघ तुला पुसतोच आहे पश्चिमेचा गार वारा..
रातराणीच्या फुलांचा गंध तू लुटलास का रे ?
उसळती हुदयांत माझ्या अमृताच्या धुंद लाटा..
तू किनार्यांसारखा पण कोरडा उरलास का रे ?
गीत - सुरेश भट
संगीत - पं. हृदयनाथ मंगेशकर
राग - बागेश्री
"तरुण आहे रात्र अजुनी, राजसा निजलास का रे...."
हृदयनाथ मंगेशकरांनी सुरेश भटांच्या अनेक गझलांचे रुपांतर सुंदर गाण्यात केले, या अप्रतिम गझलांपैकीच एक, "तरुण आहे रात्र अजुनी, राजसा निजलास का रे ?" ही श्रवणीय गझल आहे.
हेच गाणं आशाजींच्या कर्णमधुर आवाजात ऐकलं की डोळ्यात पाणी येते. या गझलेमागे एक करुण कथा आहे असं जर मनात गृहीत धरून हे गाणं ऐकलं तर या गझलेचे भाव पूर्णतः बदलून जातात. ती केवळ शृंगारिक रचना न राहता एक आर्त करूण शोकगाथा बनून जाते, जी आपले हृदय पिळवटून टाकते…खरंच ही करूण, दुःखद घटनेवरची गझल आहे का ? नक्की काहीच सांगता येत नाही,
युद्धभूमीवर मारल्या गेलेल्या एका वीर जवानाचा मृतदेह घरी आणलेला आहे. त्याच्या पाठीमागे आता फक्त त्याची तरूण पत्नी व चिमुरडे मूल राहिले आहे. आपल्या पतीच्या निष्प्राण देहाकडे विमनस्क अवस्थेत शांत बसलेली पत्नी. तिने तिचा अश्रुंचा बांध थांबवलेला आहे, ती ओठ मिटून बसली आहे काहीच बोलत नाहीये. तिने आपल्या भावनांचा बांध खुला करावा, मनातलं आभाळ रितं करावं म्हणून तिचे सगळे स्नेहीजन एका वेगळ्या भ्रांतेत आहेत. पण ती काही केल्या निश्चल अवस्थेतून बाहेर येत नाही हे लक्षात आल्यावर एक वृद्धा उठते आणि तिच्या तान्हुल्या बाळाला तिच्या मांडीवर ठेवते. त्या बाळाच्या हुंदक्याने तिची समाधीतल्लीनता भंगते आणि तिच्या डोळ्यातून अश्रूंची वाट मोकळी होते… अशी ही कविता..
आयुष्यातल्या एका अल्वार वळणावर तो तिची साथ सोडून गेला आहे आणि त्याचे कलेवर घरी आणलेलं आहे.ते दृश्य बघून तिला काही कळतच नाहीये, ती दिग्मूढ होऊन गेलीय आणि नुसते त्याच्याकडे बघत बसलीय. रात्र उलटत चाललीय आणि हा सहवास कुठे तरी संपुष्टात येणार याची पुसटशी जाणीव तिला झालेली आहे. तिच्या मनात अशा वेळेस भावभावनांचे कोणते कल्लोळ उमटत असतील यांचे एक अप्रतिम काव्यचित्र म्हणजे ही गझल होय.
तरुण आहे रात्र अजुनी, राजसा निजलास का रे ?
एवढ्यातच त्या कुशीवर तू असा वळलास का रे ?
रात्र नुकतीच झाली आहे, ती तरुण आहे (आणि तो देखील ) प्रेमाच्या या हृदयीचे त्या हृदयी होण्याची ही वेळ आहे. तरीही तु असा निजलेला आहेस. खरे तर आपलं फुलासारखं नाजूक प्रेम तु माझ्या केसात माळण्याचं सोडून तु इतक्यातच त्या कुशीवर वळला आहेस. तु असं का केलं आहेस. ही काय जाण्याची वेळ आहे का असं तिला सुचवायचं आहे.
अजुनही विझल्या न गगनी तारकांच्या दीपमाला;
अजुन मी विझले कुठे रे ? हाय ! तू विझलास का रे ?
मला आठवतं की, तुझं प्रदीप्त धगधगतं मन तु असंच माझ्या डोळ्याच्या पारयात तु हलकेच रितं करायचास अन चंद्रासारखा शीतल होऊन जायचास. एक शब्दही न बोलता सारं माझ्या कानात हळूच ओठांनी स्पर्शून सांगून जायचास. आपल्या उत्कट प्रेमाला साक्ष असणारया या भव्य अंधारलेल्या दिगंतातल्या तारकांच्या त्या दीपमाला अजूनही तेवत आहेत, त्यांनाही अजून आपल्या मिलनाची ओढ आहे. एव्हढेच नव्हे तर मी देखील अजून तुझ्यावरील आसक्त भावनेत तग धरून आहे. ( नाहीतर मी देखील विझले असते ) पण तूच असा दगा का दिलास बरं ? का तू माझ्याशी प्रतारणा करून निघून गेला आहेस ?तुझ्या हृदयातला प्रेमाचा ध्रुवतारा असा कसा निमाला?
सांग, ह्या कोजागरीच्या चांदण्याला काय सांगू ?
उमलते अंगांग माझे.. आणि तू मिटलास का रे ?
तू हे जे काही केलं आहेस ते एकवेळ मी मनाच्या समजूतीसाठी स्वतःला काहीतरी सांगेन पण आपल्या प्रेमाला सोबती असेलेल हे कोजागिरीचं टिपूर चांदणं जे मोठ्या आशेनं माझ्याकडे बघतंय त्याला आता काय सांगू हा प्रश्न पडलाय. त्यांना पाहून सवयीने आपसूक माझ्या मनातल्या गुलबक्षीच्या फुलाच्या पाकळ्या आपसूकच उमलतात त्यांचं मी काय करू आणि तु तर असं स्वतःला मिटून घेऊन ( अज्ञाताच्या अनंत प्रवासाला ) निघून गेला आहेस. अगदी हृदय पिळवटून जाईल असं हे हळवे रुदन आहे.….
बघ तुला पुसतोच आहे पश्चिमेचा गार वारा..
रातराणीच्या फुलांचा गंध तू लुटलास का रे ?
आसमंतातल्या तारकाना मी डोळ्याच्या पापण्याआड करून त्याकडे डोळेझाक करू शकते पण तुझ्यामाझ्या सवयीचा झालेला पश्चिमेचा हा अवखळ वारा जो आपल्या देहाला थरथरता स्पर्श करूनच पुढं जातो. त्याला या स्पर्शाचा आभाळभर कैफ चढला आहे, तो देखील तुझ्याबद्दल विचारतोय त्याला काय सांगावे काही कळत नाही. आपण दोघे एकमेकाच्या पाशात विसावलो की खिडकीतून येणारा रातराणीचा बेधुंद करणारा गंध आपल्या भोवती नजाकतीने पिंगा घालत बसायचा. त्याला आपली सवय झाली होती आणि मला त्याच्या त्या नशील्या गंधाची ! पण तु आता जाताना रातराणीचा गंध तुझ्यासवे नेला आहेस की काय असे वाटावे इतके त्या रातराणीने स्वतःला गंधबंधित करून मिटवून टाकले आहे, ती आता खिडकीतून डोकावत नाही. मला तर काहीच सुचत नाही ( आता तूच ते काय सांग ) असं विचारत ती तिची कैफियत सुरु ठेवते…
उसळती हुदयात माझ्या अमृताच्या धुंद लाटा..
तू किनार्यातसारखा पण कोरडा उरलास का रे ?
शेवटच्या पंक्तीत कवी सुरेश भटांनी कमाल केलीय. अमृत म्हणजे अमर होण्यासाठी देवतांनी प्राशन केलेले पेय होय.तो जरी असा ( निश्चल ) बनून राहिला असला म्हणून काय झालं, तिच्या हृदयात प्रेमाच्या लाटा या उसळत आहेत त्या सदैव अखंडितपणे उसळत राहतील याची तिला खात्री आहे. पण तिला खंत आहे की या धुंद प्रेमाच्या लाटा उसळत असताना त्याची अनुभूती घेण्यासाठी तो मात्र सचेत नाही. तो किनारया सारखा कोरडा झालाय. पण म्हणून काय झालं, लाट ही शेवटपर्यंत त्या किनारयाकडे येतच राहणार अन त्याच्या पायाला स्पर्शून आपले अमर प्रेमगीत त्याच धुंदीने गात राहणार. इतकी ती तिच्या प्रेमावर फिदा आहे आणि त्यावर जगत राहणार आहे. पण त्यानं असं का वागावं, त्यानं असं ( अकाली ) विझून जावं ? याची तिच्या मनाला पोखरणारी खंत आहे ती तिला काही केल्या गप्प बसू देत नाहीये….
या कवितेमागील नेमकी पार्श्वभूमी अशीच आहे का याला मात्र त्यांनी कधी दुजोरा दिला नाही मात्र त्याबरोबरच त्यांनी या गझलेमागील नक्की भावबिंदू कोणते हे देखील सांगितले नाही. पण त्यांच्या जिवलगाला म्हणजे हृदयनाथ मंगेशकरांना मात्र याविषयी सांगतले असावे त्यामुळेच की काय त्यांनी बागेश्री रागात ही गझल आर्त अशा सुरात गुंफली असावी.
-- संजीव वेलणकर पुणे
९४२२३०१७३३
संदर्भ :- समीर गायकवाड.
"तरुण आहे रात्र अजुनी, राजसा निजलास का रे...." हे गाणे.
मा.आरती अंकलीकर
https://www.youtube.com/y1j3nP1E6cc&list=PL99D9CC5EA52821B8&index=7
मा.आशा भोसले
https://www.youtube.com/7YaMnvWnYBI
मा.पद्मजा फेणाणी
https://www.youtube.com/94Y5UUkPY6Q
शंकर महादेवन
https://www.youtube.com/EH4TuZq0YOI
April 17, 2017
एक राजा होता. एक दिवस तो शिकारीला गेला. रस्त्यात त्याला एक लाकूडतोड्या भेटला. तो लाकडं गोळा करीत होता. राजाने त्याला विचारले, “तुझं नाव काय आहे?” त्याने सांगितले, हुजूर, माझं नाव बहादुरशाह आहे.”
October 5, 2025
बावळट, खेडवळ’ अशी बिरुदे घेऊन सासरी ठाण्यात मी प्रवेश केला. शहरात एवढी गर्दी कशी? एवढ्या मोठ्या ट्रेनमधून लोक कुठे जा-ये करतात? नेहमी लग्नाला निघाल्यासारखे, नीटनेटक्या कपड्यात कसे असतात? बायकासुद्धा छान छान साड्या नेसून रोज ऑफिसला जातात. रात्रीसुद्धा दुकानात दिवसासारखा झगमगाट असतो.
August 23, 2023
डॉ. मोहंमद शकील जाफरी आणि माझी पहिली प्रत्यक्ष भेट यंदाच्या दिवाळी अंकांच्या प्रदर्शनाच्या निमित्ताने मुंबई मराठी वृत्तपत्र लेखक संघाच्या कार्यालयात झाली. त्यापूर्वी आम्ही भेटल्याचे आम्हा दोघांनाही फुसटसेच आठवत होते. मी आमच्या मासिक साहित्य उपेक्षितांचे दीपावली विशेषांक 2015 ची प्रत त्यांना दिली. तशा मी माझ्या मासिकाच्या प्रती मला नव्याने भेटणार्या व्यक्तींना देत असतो पण अंक वाचून झाल्यावर त्याबद्दल स्वतःहून प्रतिक्रिया देणारे क्वचितच भेटतात. डॉ. मोहंमद शकील जाफरी यांनी दूसर्याच दिवशी मला फोन करून आमच्या दिवाळी अंकाबद्दलचे त्यांचे विचार मांडले पण सुचना केल्या नाहीत. मी त्यांना आमच्या मासिकासाठी साहित्य पाठविण्याची विनंती केली ती त्यांनी आनंदाने मान्य केली. त्यानंतर फेसबुकच्या माध्यमातून आमचा संवाद सुरू झाला आणि मला डॉ. मोहंमद शकील जाफरी हा देवमाणूस उलगडत गेला. सध्या ते पुण्यातील मंचर येथे वास्तव्यास असल्यामुळे त्यांना प्रत्यक्ष भेटणे शक्य होत नव्हते. पण आमच्या पहिल्याच भेटीत मी त्यांना कधी मुंबईला आल्यास आपण भेटू आणि चर्चा करू असं म्ह्टल होतं.
काही दिवसापूर्वी मला त्यांचा अचानक फोन आला. ते मला म्हणाले मी घाटकोपरला आहे भेटूया का ? मी लगेच हो म्हणालो. मला भेटण्यासाठी म्हणून ते गोरेगांवला आले ठरल्या वेळेवर पण मलाच आर्धातास उशिर झाला माझ्या स्वभावानुसार त्याबद्दलची यकिंचितही चिडचिड मला त्यांच्या चेहर्यावर दिसली नाही. चहा पिता-पिता आमच्यात चर्चा रंगली आणि मला आपण एका देवमाणसासोबत चहा पित आहोत याचा आनंद झाला. सामाजिक कार्यासाठी त्यांना मिळालेले 150 हून अधिक पुरस्कार ही त्यांच्या सामाजिक कामाची पोचपावती होती. मनात असेल तर एक व्यक्तीही समाज कार्य करू शकते हे दाखविणारे ते एक जीवंत उदाहरण आहेत. हिंदी आणि उर्दू या भाषांवर प्रभूत्व असणार्या या अमराठी माणसाचे मराठी संत साहित्यावर असणारे प्रेम आणि मराठी साहित्याचे ज्ञान पाहून मी नतमस्तक झालो. डॉ. मोहंमद शकील जाफरी यांच्यासारखी स्वतःच्या व्यक्तीगत सुख-दुःखाचा विचार न करता इतरांसाठी जगणारी माणसे या जगात फार कमी असतात. त्यांनी आमच्या मासिकासाठी पाठविलेल्या कविता वाचूनच मला वाटले होते या माणसाला आपण पुन्हा भेटायला हवे शक्य होईल तेंव्हा ! त्यांच्या कविता समाजमनाच्या काळ्जात हात घालतात आणि आमच्या कविता काळजाला उब देतात. प्रत्येक कवीचं प्रतिबिंबच त्याच्या कवीतीतून छळकत असतं. डॉ. मोहंमद शकील जाफरी यांच्या कविता वाचता क्षणी हा माणूस समाजसेवक असणार याची जाणिव होते. मी कविता लिहतो पण त्यात रमत नाही म्हणूनच मी इतरांच्या कवीता मनापासून वाचून पचवू शकतो.
आमच्या भेटीत डॉ. मोहंमद शकील जाफरी यांनी मला त्यांचा ‘हे प्रेषिता’ हा सनय प्रकाशनाने प्रकाशित केलेला कवितासंग्रह भेट म्हणून दिला. माझ्या सवयी प्रमाणे मी त्यांना म्ह्णालो हा वाचून मी याबद्दल नक्कीच लिहीण. कोणत्याही कवितासंग्रहातील मनोगत आणि प्रस्तावना मी शेवटी वाचतो. या कवितासंग्रहातील पहिलीच कविता होती ‘समुद्र’ ही कविता आपल्या समुद्रासारखं जीवन जगण्याची प्रेरणा देते. सोप्प्या भाषेत सांगायच तर एक समाजसेवक समुद्राचे जीवन जगत असतो हे पटवून देते. त्यानंतरच्या काही कविता देवाचं अस्तित्व मान्य करणार्या, ‘शुभरात्री’ या कवितेत कवीने एका समाजसेवकाची समाजाप्रतीची तळमळ दर्शविली आहे. उपदेश या कवीतेत कवी उपदेशा पेक्षा कर्माला महत्व देताना दिसतो. कविता या कवितेत कवी कवितेच्या ताकदीची जाणीव करून देताना दिसतो. स्वातंत्र्य, स्वेच्छा, मातीचा माणूस न्याय सारख्या कविता आपल्या देशातील सामाजिक समस्यांवर भाष्य करताना दिसतात. ‘मौन’ या कवितेतून कवी जगातील अशांततेला वाचा फोडताना दिसतो. ‘परमसत्य’ या कवितेतून कवीची आध्यात्मिक विषयाची जाण अधोरेखीत होते. भूक, गरीबी, अनाथपणा, ग्रामिण जीवनातील समस्या आणि व्यथा मांडताना कवी प्रत्येक गरीब आई – बाबाची आणि त्यांच्या मुलाची व्यथा मांडताना दिसतो. या कवितासंग्रहातील शेवटची कविता आहे ‘सज्दा’ ही माणसाने जीवन कसे जगायला हवे हे सांगणारी आणि मातीचे ऋण मानायला शिकविणारी कविता आहे... डॉ. मोहंमद शकील जाफरी यांचा हा कवितासंग्रह भरल्यापोटी वाचता कामा नयी तो रिकाम्या पोटीच वाचायला हवे या निशकर्षा पर्यंत मी येवून पोहचलो. त्यानंतर मी या पुस्तकातील डॉ. ज्ञानेश्वर ब. थोरात यांची प्रस्तावना वाचली आणि मी ती पहिली नाही वाचली याचा मला आनंद झाला. कारण ती जर मी पहिल्यांदा वाचली असती तर मी या कवितासंग्रहातील कविता तटस्थपणे समजून घेऊच शकलो नसतो आणि या कवितासंग्रहावर आणखी एक ओळही लिहिण्याची हिंमत माझ्याच्याने झाली नसती कारण डॉ. ज्ञानेश्वर ब. थोरात यांची या पुस्तकावरील प्रस्तावनाच प्रस्तावना कशी असावी याच जीवंत उदाहरण आहे. डॉ. मोहंमद शकील जाफरी यांचे या पुस्तकातील मनोगत हे एका कवीचे नाही तर समाजसेवकाचे मनगोत आहे. डॉ. मोहंमद शकील जाफरी यांच्या रूपात मला एक कवी, लेखक, समाजसेवक भेटला पण माझ्या डोळ्यांना दिसला तो त्यांच्यातील देवमाणूस...
-- निलेश बामणे
February 3, 2016
“ती” .. लहानपणापासून मुंबईतच वाढलेली .. घरची परिस्थिती तशी बेताची .. जेमतेम शिक्षण संपलं आणि वेळीच लग्न करून दिलं घरच्यांनी .. सासर मात्र अगदी लांब होतं .. कोकणातल्या एका छोट्याश्या गावात
February 4, 2026

July 3, 2022
Copyright © 2025 | Marathisrushti