(User Level: User is not logged in.)

साहित्य - ललित

नामवंत लेखक, नवोदित लेखक, ऑनलाईन लेखक यांच्या कथा, कविता, कादंबरी, प्रवासवर्णनासहित भरपूर साहित्य.

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • कवी अनिल यांची एक आठवण

    मुकुलजींच्या बालपणी कवी अनिलांचे त्यांच्या घरी सातत्याने येणे-जाणे होते. कवी अनिल अधूनमधून देवास येथे कुमार गंधर्वाच्या घरी मुक्कामाला असत. लहानग्या मुकुलशी अनिलांची विशेष दोस्ती होती. अशाच एका मुक्कामातली गोष्ट. मुकुलजी तेव्हा साधारण बारा वर्षांचे होते. मुकुलजींच्या मातोश्री श्रीमती भानुमती कोमकली यांच्या अकाली निधनाला तेव्हा उणीपुरी सात वर्षे झाली होती. आईवेगळा लहानगा मुकुल एकटा राहतो आणि मन रिझवण्यासाठी सारखा गात राहतो. हे त्यांच्या नजरेतून सुटले नाही. त्यांच्या कवी मनात वत्सल खळबळ उडाली. एका रात्री झोपलेले असताना कसल्याशा आवाजाने कवी अनिलांना जाग आली. त्यांनी कानोसा घेतला. घरातून छोटय़ा मुकुलचा गाण्याचा आवाज येत होता आणि बाहेर तुफान पाऊस पडत होता. धुवांधार पाऊस.. बाहेरही होता.. आणि आतही.. कवी अनिल बेचैन झाले.

      May 8, 2017


  • स्मरणगाथा : ७ 

    माझ्या एका कथेची ही जन्मकथा आहे . सन २००० च्या महाराष्ट्र टाइम्स च्या दीपावली अंकात ती प्रसिद्ध झाली होती .

      January 20, 2025


  • द लॉर्डस्…. (माझी लंडनवारी – 17)

    आम्ही RCA वर पोहचलो तोपर्यंत १-१.३० वाजला होता. रिसेप्शनिस्टशी बोलून प्रियांकाची २ दिवसांची सोय गेस्ट म्हणून माझ्याच रुममधे केली. थोडेफार वरचे चार्जेस् भरले. स्वस्तात काम झालं.अर्धा दिवस असाही संपला होता. आता विम्बल्डन शक्य नव्हते. माझ्यासारखीच प्रियांका पण क्रिकेट वेडी होती आणि लॉर्ड्स बघणे तिच्यासाठी एक पर्वणी होती. मग बहुमताने लॉर्डसवर शिक्का मोर्तब झाले. बाहेरच काहीतरी खावून पुढे जावूयात असे ठरले. आज मी, प्रियांका आणि उमेश असे तिघचं होतो फिरायला. आधी ‘रिजंटस् पार्क’, मग तिथून पुढे ‘लॉर्डस्’ असा प्लॅन ठरला.

    पॅडिंग्टनला KFC, Domino’s, Fish N Chips असे वेगवेगळे फूड आउटलेटस् होते. आज प्रियांकाच्या चॉइसने KFC मधे गेलो.मग पॅडिंग्टन ट्युब स्टेशनला बेकरलू लाइन्स् ने ‘रिजंट पार्कला’ उतरलो.

    थोडं चालल्यावर आम्ही पार्कमधे शिरलो.विविध टोपिअरिज्, फुलांचे विविध रंगी ताटवे, सर्वत्र हिरवळ, डेरेदार व्रुक्ष ह्यांनी आमचे जोरदार स्वागत केले. जेंव्हा कधी मी नविन पार्क बघायचे मला नेहमी वाटायचे, ही जास्त चांगली आहे.आताही तीच अवस्था झाली माझी. झाडा-झुडुपांवर, ग्रीनरीवर प्रेम करणारा इंग्रज पावलोपावली जाणवत होता.

    इंग्रज आपल्याच काय दुसर्‍यांच्या मातीवरही प्रेम करायचा असे गमतीत वाटून गेलेइतकी सुंदरकंट्री सोडून कशाला तडमडायला आले होते भारतात?अर्थात लुटलेल्या मालातूनच हे उभे राहिले असावे कदाचित,असो! उगीच भूतकाळात शिरुन वर्तमान कुठे बिघडवा?

    आम्ही आजूबाजूचे निसर्ग सौंदर्य पीत, ठिकठिकाणी फोटो घेत मजेत जात होतो. आणि आमचा मार्ग रोझ गार्डनने अडवला. आधीच सौंदर्य काय कमी होत? म्हणून त्यात अजून भर? किती विविध रंगी, विविध प्रकारची, thoughtfully arranged गुलाबाची फुले!!! किती हया दोन डोळ्यात सामावून घेऊ? हे कमी पडले म्हणून की काय, थोडे पुढे गेल्यावर समोर नदीसद्रुश तलाव आणि तलावाची शान वाढवत डौलाने फिरणारे बदक, राजहंस.....

    नदीच्या आसपास सुंदर ग्रीन लॅंडस्केपस्, वेगवेगळ्या आकाराची, पानांनची झाडे. सगळ्या गोष्टी स्वप्नवत!! इतके सौंदर्य एकत्र एका ठिकाणी पहायची माझी पहिलीच वेळ होती.वर्णन करायला शब्दही अपूरे आहेत.
    असे अविश्वसनीय देखावे टिपत आम्ही पार्कच्या दुसर्‍या गेटपाशी आलो.अर्थात् सगळं कव्हर करणे, आवाक्याबाहेरचे होते. प्रचंड मोठी पार्क होती ती!
    आम्ही ज्या गेटने बाहेर आलो,तिथून लॉर्डस् फक्त १० मिनिटांवर होते.आता आम्हाला लॉर्ड्सचे वेध लागले. आमच्या अधिरतेमुळे आम्हाला ते डिस्टन्स खूप वाटत होते. पार्कमधे रेंगाळणारी आमची पावले आता झपाझप पडायला लागली. आणि समोर ‘लॉर्ड्स’ अशी पाटी दिसली.

    डाव्या हाताला मिडिया सेंटरचा थोडा भाग दिसत होता. दुसऱ्या बाजूला नेहमी टीव्ही वर दिसणारा तो उंच ब्राऊन टॉवर दिसला. ते हॉटेल आहे असे आम्हाला नंतर कळले.
    आम्ही नेमके मागच्या बाजूला आलो होतो. एक अर्धवर्तुळाकार वळसा घेवून मेन एन्ट्रन्स्पाशी आलो.

    ‘रिजंट पार्क’ची हिरवळ बघूनही आमचे डोळे लॉर्ड्सच्या हिरवळीसाठी तरसत होते आणि मुख्य दारातून प्रवेश केल्यावर समोर हिरव मोठ्ठं ग्राउंड... डोळेभरून दर्शन घेतलं. तिथे तुम्हाला एक गाईड मिळतो. आम्ही तिकिटे काढून, एक छोटा टुरिस्ट ग्रुप आणि गाईड उभा होता तिथे गेलो. ते आमच्यासाठीच थांबले होते. आता आमची गाईडेड टूर सुरू झाली.

    सगळ्यात आधी डोळे त्या ‘बोर्ड ऑफ ऑनर्स’ वर स्थिरावले, या ग्राऊंडवर शतक केलेल्यांची नावे होती तिथे. त्यात बरीच ओळखीची, अनोळखी नावे दिसली. मी आपली वेंगसरकर, अझरुद्दीन, गांगुली, आगरकर ही नावे डोळे भरुन पाहिली.

    तिथेच MCC (Merlyborn Cricket Club) Museum चा डिस्प्ले होता. ट्रॉफिज्, जुने फोटोज्, बॅटस्, टी-शर्टस् अशा विविध गोष्टी त्या त्या प्रसंगाची आठवण म्हणून ठेवल्या होत्या.

    एका ठिकाणी आम्ही एका बॉलवर एक भुसा भरून ठेवलेली चिमणी पहिली. ज्या बॉल वर ती ठेवली होती, तोच बॉल लागून तिचा ग्राऊंडवर मृत्यू झाला होता.आता ती तिथेच अमर झाली होती.

    ऍशेस सिरीज तर नेहमी उत्साहाने बघितल्या जातात. त्याच्या मागची स्टोरी आणि प्रत्यक्ष एशेस अर्न(Urn) बघायला खूप थ्रिलिंग वाटले. इंग्लंड जेंव्हा होम ग्राऊंडवर हरली तेंव्हा लोकांनी स्टंम्पस् आणि बेल्स जाळल्या.आणि त्याची राख ही त्या जार मध्ये भरून ठेवली, जी आता MCC Museum चा हिस्सा बनली आहे.जे सगळं आत्तापर्यंत ऐकलं होतं ते प्रत्यक्ष बघण्यात एक वेगळचं थ्रिल वाटत होतं.

    मग आम्ही फेमस ग्रँड पॅवेलिऑनला भेट दिली.तिथे बसून मॅचचा फील घेतला. तिथून आम्ही ज्या गॅलरी मध्ये बसून सौरव गांगुलीने शर्ट काढून विजयाचे सेलिब्रेशन केले त्या गॅलरीत गेलो. सगळ बघूनच इतकं एक्साईट व्हायला होत होते. तर ते प्रत्यक्ष ते अनुभवताना एखादी अशी कृती होवू शकते.त्याचा इतका इश्यू करायची गरज नाही, असे वाटले..
    आम्हाला आता मीडिया सेंटरला जायचं होतं. तिथे जाता येत हे कळल्यावर आम्ही अक्षरशः वार्‍याच्या वेगाने तिथे पोहचलो. जिथे सुनील गावसकर, हर्षा भोगले बसतात तिथे आम्ही बसलो. खूप खूप धन्य वाटले. आता आम्ही मेन ग्राउंड एन्ट्रन्स्पाशी उभे होतो. तिथले गेट बंद होते. आम्हाला ग्राऊंडवर जायचे होते. पण ग्राऊंडवर पाय ठेवायला बंदी होती.आम्ही एक दोनवेळा रिक्वेस्ट केली, पण त्याने ऐकले नाही. खूप विरस झाला. पण प्रियांकाने प्रयत्न सोडले नाहीत.तिने खूपच विनवण्या केल्या आणि अहो भाग्य आमचे!!...
    फक्त आम्हाला दोघींना ग्राऊंडवर एक मिनिटसाठी परवानगी मिळाली. तो क्षण म्हणजे मरणाऱ्याला जीवनदान मिळाल्या सारखा होता.

    पटकन गेट उघडून दोघी ग्राऊंडवर गेलो. जाण्यापूर्वी दोघींनकडून न ठरवता एकदमच एक क्रुती केली गेली. आम्ही आमचे शूज बाहेर काढले.अनवाणी चालत ग्राऊंडवर थोडे पुढे गेलो. खाली वाकून ग्राउंडला नमस्कार करून, ती माती कपाळाला लावली. ह्याच मातीला सर डॉन ब्रॅडमन पासून लिटिल मास्टर सचिन तेंडुलकरचे पाय लागले होते.त्यांच्या चरणांची धूळ आम्ही मस्तकी धारण केली.

    ह्याच मैदानावर कपिल देव आणि त्याच्या टीमने भारताचा पहिला वहिला विश्वचषक उंचावला होता. त्या आठवणींमधे आम्ही न्हाऊन निघालो.

    त्या क्षणी मला बाबा, नरेन आणि शैलेशची प्रचंड आठवण झाली. जणू काही ते इथेच आहेत,माझ्याबरोबर!
    क्रिकेटचे अनेक मोलाचे क्षण, अगदी 1983च्या विश्वचषकपासूनचे, आम्ही एकत्र जगलो होतो.आताही ते मनाने माझ्या बरोबर होते. एका वेगळ्याच धुंदीत आम्ही होतो. उमेशने बोलवल्यावर आम्ही भानावर आलो.

    लंडनच्या माझ्या वारीचे हे पंढरी होते. ग्राउंडला नमस्कार करताना, वारकऱ्यांच्या मनात पंढरीच्या पांडुरंगाच्या पायावर डोकं ठेवल्यावर जे भाव उमटत असतील तेच भक्ती भाव माझ्या मनात आत्ता होते. निःशब्द भारावलेल्या अवस्थेत, आम्ही लॉर्ड्स मधून बाहेर पडलो.

    परतीच्या प्रवासात मनात एकच शब्द रुंजी घालत होता, ‘THE LORDS…. THE LORDS..’

    -- यशश्री पाटील

      January 15, 2022


  • कुस्करलेली कळी – उमललेले फुल – ५

    कलकत्याहून येताना बिपीन साहेबांची स्वारी एकदमच खुशीत होती, कंपनीला मोठाली बरीच कामे मिळाल्याने भरभराटीचे दिवस उगवले होते. येताना संगीताला बंगाली साड्या, गाऊन, गळ्यात घालायच्या मण्यांच्या माळा, मौशूला ड्रेसेस, खेळणी, विवीध प्रकारच्या बंगाली मिठाया, खैरातच केली होती.

      December 26, 2021


  • नेहमीच्या यंत्रांमागील विज्ञान

    यंत्रे हा आपल्या दैनंदिन जीवनाचा आता अविभाज्य भाग झाला आहे. आपण सर्व जण यांचा घरोघरी वापर करून आपले जीवन अधिक सुखकारी करीत असतो. परंतु या यंत्रामागील विज्ञानाची आपल्याला अजिबात माहिती नसते. या विविध यंत्रांमागील विज्ञानाची सोप्या भाषेत ओळख करून दिली आहे. यंत्रांमागील विज्ञान : ले. जयंत एरंडे पाने : १२८, किंमत : १२५ रू. प्रकाशक : नचिकेत प्रकाशन मो. : 9225210130

      September 29, 2012


  • प्रेमाच्या वाटेवर – भाग २

    नीलम निघून गेल्यावर प्रतिभा आपल्या खोलीत जाऊन आडवी पडली असता तिच्या मनात विचार आला की रमेश भाऊंच्या बाबतीत सारेच इतके अस्वस्थ का आहेत?

      September 2, 2021


  • राधाकाकीचा वाडा

    बाभनाची राधा काकी मंजे गावातील एक गुढ व्यक्तीमत्वाची बाई ! गावाच्या मंधोमंध बुरुजाखाली तिचा जुन्या काळातला ढवळ्या मातीनं बांधलेला टोलेजंग वाडा व्हता !!!

      February 3, 2026


  • बॅड हॅबिट (कथा)

    तशी ती सॉलिड आहे ,
    सगळ्यांना माहित आहे हे ,
    तसे तिलाही माहीत आहे.
    पण मला ती फार उशीरा खरी कळली .

      May 26, 2021


  • ओढ

    ऐन पावसाळ्याचे दिवस होते. अगदी आषाढातला जोरदार पाऊस गेल्या तीन-चार दिवसांपासून सुरु होता. जागोजागी पाणी साचलेले होते. आमच्या गल्लीत तर पाणी खूपच साचून रहाते. त्या साठलेल्या पाण्यातून चालत गल्लीच्या बाहेर पडायचे म्हणजे एक दिव्यच. त्यातून चालताना घाणही वाटते आणि काही चावेल याची भीती सुध्दा वाटत होती.

      November 27, 2025


  • जन्मले पृथ्वी वरती (सुमंत उवाच – ९४)

    सुमंत जयंत परचुरे. 

    शिखर हे कधीच स्वतःच्या मी पणाचा दाखला देत नाही, कारण त्याला उंची प्राप्त होते ती एकावर एक साचलेल्या मातीच्या थरांमुळे.

      December 11, 2021